Submitted by यतीन on 28 September, 2019 - 02:06
मी नसता......
नयन पाणवता धीर दे मनाला।
उसासा घेता शांत कर श्वासाला।।
एकांतात आठवणींना दे उजाळा।
पान पालटायला वेळ दे नियतीला।।
मी नसता...... नयन पाणवता धीर दे मनाला।
लाही लाही होता पावसाची ओढ लागली।
सय तुझी येता विरह तो जाणवू लागली।।
दिस उजाडता तो "दिन" होऊनही मावळला।
नको विसरू जीवनाच्या या रहाटगाडग्याला।।
मी नसता...... नयन पाणवता धीर दे मनाला।
चित्र रेखाटता कुंचला तो अडखळला।
पाण्यात रंग मिसळता रंगहीन झाला।।
नितळ हे पाणी सर्व काही सांगून गेले।
हे कळता तुझला, माझे जीवन अनमोल झाले।।
मी नसता...... नयन पाणवता धीर दे मनाला।
यश
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अप्रतिम!
अप्रतिम!
अप्रतिम आहे.
अप्रतिम आहे.
>>>>>> पान पालटायला वेळ दे नियतीला।।
मी नसता...... नयन पाणवता धीर दे मनाला।>>>>>> सुरेख.
प्रतिसादा बद्दल खुप खुप
प्रतिसादा बद्दल खुप खुप धन्यवाद - मन्या
सामो आपले आभार
सामो आपले आभार
प्रतिसादा बद्दल खुप खुप धन्यवाद
खूपच सरेख..
खूपच सरेख..
Bantiraj
Bantiraj
प्रतिसादा बद्दल धन्यवाद
छान
छान
डॉ.विक्रांत सर
डॉ.विक्रांत सर
प्रतिसादा बद्दल धन्यवाद