Submitted by सामो on 20 September, 2019 - 23:50
माझ्या कल्पनेत कोण्या रमलेल्या वनदेवीचा व यक्षाचा रात्रीचा शृंगार आणि सकाळी परतताना त्यांच्या घाईगडबडीत तिचा तुटलेला मोत्यांचा हार तेच सकाळचे दवबिंदू.
_______
शुभ्र चांदण्या रात्री
परिमळु गंधला गात्री
वनदेवी कुठे रमलेली चांदण झोक्यावरती
.
कुणी यक्ष पायीचा दास
लुटलेला तिच्याचसाठी
लेपितसे रक्तआळीता रेखिव पाऊलांवरती
.
प्रणयास येई मग रंग
शृंगारीत देह तराणे
तृप्तीच्या हुंकारांतून मादक गंधीत गाणे
.
तेजाळून फुलल्या दोन्ही
कमलिनी दोन देठांशी
जडाभार चांदण्या रात्री मीलनदिठी दोन प्राणांची
.
अन तृप्तावलेली, वनदेवी पहाटे घाईघाईत परतताना,
...
सर कंठीचा तुटला की
ओघळती मोतीया दाणे
पहाटेस रानफुलाचे त्या दवांत ओल्या न्हाणे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्रतिम कल्पना..
अप्रतिम कल्पना..
छान !
छान !
मन्या व रवी दोघांचेही आभार.
मन्या व रवी दोघांचेही आभार.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=iEL_2UECqxA
- गर्द सभोती रान साजणी .....
‘गर्द सभोंतीं रान साजणी तूं तर चाफेकळी!
काय हरवलें सांग शोधिसी या यमुनेच्या जळीं?’
ती वनमाला म्हणे, ‘नृपाळा, हें तर माझें घर
पाहत बसतें मी तर येथें जललहरी सुंदर.’
‘रात्रीचे वनदेव पाहुनी भुलतील रमणी! तुला;
तूं वनराणी, दिसे भुवनीं ना तुझिया रूपा तुला.
अर्धस्मित तव मंद मोहने, पसरे गालांवरी
भुललें तुजला हृदय साजणी, ये चल माझ्या घरीं.’
अप्रतिम !!
अप्रतिम !!
शब्दकळा भारी आहेत.
यक्ष वाचले आहे. पण कुणाला म्हणायचे हे कळले नाही कधी.
कल्पना सुरम्य आहे.
कल्पना सुरम्य आहे.
तुम्ही बालकवींच्या कवितेचा संदर्भ दिला म्हणून, ताराराणी (मोहिनी) देखील https://www.transliteral.org/pages/z150515232000/view तुमच्या कवितेच्या पार्श्वभूमीच्या जवळची आहे.
तू तर चाफेकळी मधील आणखी कडवी मिळून ती पूर्ण, अपूर्ण, कविता अशी आहे https://tinyurl.com/bdemu46d
बालकवींच्या कवितेत प्रेमाची भावना विशुद्ध, अलौकिक प्रेम, त्याग या प्रकारची दिसते. रा. शि. वाळिंबे बालकवींच्या कवितेचा सर्वात प्रथम अभ्यास करणाऱ्यांपैकी एक होते (त्यांच्याच प्रबंधामधील काही भाग ‘फुलराणी – बालकवींची निवडक कविता’ या संकलनाची प्रस्तावना म्हणून घेतला आहे). वाळिंबे त्यांच्या प्रबंधात (बालकवींची कीट्स बरोबर तुलना करताना) म्हणतात की “पॅशन काय चीज आहे हे बालकवींना माहित नाही” :). तुम्ही त्यांच्या कवितेच्या संदर्भाने मुख्यतः passion-centric असे लिहावे हे विशेष.
राभु आणि छेराज धन्यवाद.
राभु आणि छेराज धन्यवाद.
चेराज, ताराराणीच्या
चेराज, ताराराणीच्या दुव्याबद्दल खूप आभार. आजकाल फार अलंकारिक वाचवत नाही. जरी माझी कविताही अलंकारिक असली तरी ती जुनी आहे. आता मला मुक्तछंद कविता जास्त आवडतात. पूर्वी अलंकारिक आवडत.
रा. शि. वाळिंबे - यांचे मत अर्थात अभ्यासपूर्णच असणार. रोचक आहे.