मायबोलीच्या दर उत्सवात आपण एखादातरी नविन गंमतखेळ खेळतो.... यावर्षीचा गंमतखेळ आहे "ओळखा पाहू"
यामध्ये दर तीन दिवसांनी खेळाचा विषय बदलला जाईल.
पुढच्या तीन दिवसांसाठी विषय आहे: महाराष्ट्रातील गावे
या खेळामध्ये मंडळ सुरुवातीला एक कोडे देईल.... ज्यात एखाद्या गावाबद्दल काही क्ल्यू असतील.... त्या क्ल्यू वरुन तुम्हाला गावाचे नाव ओळखायचे आहे.
बरोबर उत्तर ओळखणारा पुढचे कोडे/क्ल्यू देईल.
उदाहरणार्थ:
डोंगरांमध्ये वसलेले टुमदार हे गाव
त्याच डोंगरांवरुन याचे पडलेय नाव
सुपारी, बडीशेप, बटर अन खारी
इथला कंदी पेढा जगात भारी
उत्तर: सातारा
कोडे/क्ल्यू देताना गद्य/पद्य कुठल्याही प्रकारात देवू शकता
कोडे देताना शक्यतो त्या गावाची ठळकवैशिष्ट्ये/प्रसिद्ध वस्तू/वास्तू/व्यक्ती यांचा उल्लेख असावा.... जेणेकरुन ते ओळखायाला सोपे जाईल आणि लोकांच्या माहितीतही भर पडेल.
इथे फक्त महाराष्ट्रातीलच गावे ग्राह्य धरण्यात येतील.
आवडला का हा खेळ?
चला तर मग करुया का सुरुवात?
पहीला क्ल्यू आहे:
सह्याद्रीच्या कुशीमधले हे एक गिरीस्थान
पर्यटनाच्या दुनियेत याचा मोठ्ठा मान
ब्रिटिश अधिकारी यायचे इथे सुट्टीला
इथे जवळच आहे राजांचा एक किल्ला
माथेरान?
.
रायगड
रायगड
संयोजक-प्रश्नाचे उत्तर
छान खेळ
रायगड नाही
.
मला वाटतंय संयोजकांच्या
मला वाटतंय संयोजकांच्या कोड्याचं उत्तर महाबळेश्वर आहे. कारण तिथून प्रतापगड जवळ आहे
महाबळेश्वर उत्तर बरोबर आहे.
महाबळेश्वर उत्तर बरोबर आहे.
वावे तुम्ही पुढचं कोडं द्या आता.
हजारो वर्षांचा आहे याला
हजारो वर्षांचा आहे याला इतिहास
न घडविले माणसाने त्यास
भलामोठा मारूतीही निद्रिस्त इथे असे
एकमेवाद्वितीय आकर्षण असे हे विदर्भात वसे
खुल्दाबाद?
खुल्दाबाद?
नाही
नाही
लोणार.
लोणार.
लोणार करेक्ट!
लोणार करेक्ट!
बराच वेळ झाल्याने मी देतो....
बराच वेळ झाल्याने मी देतो....
..............
जिल्ह्याच्या मुख्यालयापासून तसे जवळच
या मुख्यालयाला सिटी बस व एस टी या दोहोंनी जोडलेले
थंडीत असते गरिबांचे महाबळेश्वर
प्रसिद्ध गड पण आहे जवळच
खडकवासला?
खडकवासला?
सापुतारा?
सापुतारा?
भंडारदरा
भंडारदरा
नाही .
नाही .
गावाचे नाव पडलंय झाडाच्या नावावरून !
आंबोली
आंबोली
नाही
नाही
सांगू ?
लोणावळा?
लोणावळा?
मग काय पिंपरी - चिंचवड ?
मग काय पिंपरी - चिंचवड ?
नरेश,
नरेश,
तुमच्या उत्तरातीलच दोन अक्षरे पकडून बघा !
Mahabaleshwar
Mahabaleshwar
वडगाव.
वडगाव.
नाही.
नाही.
झाडाचे नाव, त्याची विशिष्ट संख्या ,पुढे अपभ्रंश.
गिर्यारोहकांना माहित पाहिजे राव !
पळसदरी.
पळसदरी.
नरेश, पहिले धरलेले झाड सोडू
नरेश, पहिले धरलेले झाड सोडू नका राव !
गड चढायचा आहे / वारीला जायचे
गड चढायचा आहे / वारीला जायचे आहे,
त्यावरून जावेच लागेल की हो !
सासवड.
सासवड.
बलोब्बल !
बलोब्बल !
सात वडाची झाडे >>> सातवड >>>सासवड
मज़्ज़ा आली डॉक्टर
मज़्ज़ा आली डॉक्टर
आधी खंडाला वगैरे पटकन वाटलेले पण काही क्लू त्यात नव्हतेच
टफ होते पण छान होते
भारी कोडं दिलेले सासवड वाले
Pages