बलात्कारी

Submitted by कटप्पा on 23 June, 2019 - 18:37

रात्रीचे दोन वाजले होते, संग्राम ने लाथ मारून दार तोडले, दुसऱ्याच क्षणी तो श्रेयस च्या घरात होता।
श्रेयस आणि त्याची आई दोघेही जागे झाले।संग्राम ला बघताच पुढे काय होणार त्यांना कल्पना आली।
संग्राम ओरडला, ऐ डॉक्टर.. आज सापडलास, तुला जित्ता नाय सोडणार आपण, माझ्या गरीब बहिणीला नासवलस, भेंन××।
श्रेयस ची भीतीने गाळण उडाली, मी काही नाही केले संग्राम, कोर्टाने मला सोडून दिले आहे, निघून जा नाहीतर पोलीस केस करेन।
संग्रामचे डोळे रागाने लाल लाल झाले, आयघाल्या, पुराव्याची भाषा कोर्टात, हिकडे नाही। हे माझे कोर्ट आहे। श्रेयसच्या आईला रडू अनावर झाले, बाळा अरे माझा श्रेयस असा नाही आहे रे, लहानपणापासून हुशार आणि कसलीच वाईट सवय नाहीय त्याला, तुझा गैरसमज होतोय बाळा ।
संग्राम एक क्षण शांत झाला, दुसऱ्याच क्षणी त्याने बंदूक श्रेयसच्या छातीवर लावली। श्रेयस ओरडू लागला, मी चुकलो, मला माफ कर, मला मोह झाला,मी हवे तर लग्न करतो तुझ्या बहिणी बरोबर, मला सोड, जाऊ दे। श्रेयासची आई आता जोरजोराने रडू लागली, संग्राम बेटा माफ कर त्याला, तुला तुझ्या बहिणीची शप्पथ, जीव नको घेऊ माझ्या मुलाचा। मला तुझा राग मान्य आहे, तू मार, फटक्यांची गरजच आहे त्याला,पण जीवानिशी नको मारू रे,नको मारू, आणि त्या आईने संग्रामचे पाय धरले।
संग्राम च्या डोळ्यातदेखील पाणी आले, आई, हे काय करताय, मागे व्हा। मला खरे तर याचा जीव च घ्यायचा होता, माझी बहिण काय एकटी नाही त्याच्याबरोबर ह्याने असे केलय, कोर्ट केस चालू असताना आणखी तीन जणींचे फोन आले होते, नाव न सांगण्याच्या अटीवर। तुमचा पोरगा सैतान आहे आई।
तुम्हाला वचन देतो, जीव नाही घेणार याचा, एक तासात परत आणून सोडतो, चल रे डॉक्टर..।
पण जर तुम्ही पोलिसांना फोन केला तर मात्र हा मेलाच समजा. आई म्हणावी, नाही करणार पण माझ्या मुलाला जीवानिशी मारू नको, तुदेखील वचन दिले आहेस।

बरोबर एक तासाने दोन्ही हात आणि दोन्ही पाय कापलेला श्रेयस , संग्रामने त्याच्या घरात सोडला- हे घ्या- बलात्कारी जित्ता सोडलाय, करा फोन हॉस्पिटल ला मलमपट्टी करायला।

Group content visibility: 
Use group defaults

काहीही लिहिलंयचा अर्थ शिक्षा न आवडणं असा बायनरी असायची गरज नसते.

मला नाही आवडली. एकदम साचेबद्ध, प्रेडिक्टेबल, बलात्कारी माणसाचे हातपाय तोडले अशी एका ओळीत लिहिता येईल अशी लिहिल्येय.
हात पाय तोडून ट्रान्सपोर्ट केल्यावर झालेल्या रक्तस्त्रावाने माणूस वाचेल असं ही वाटलं नाही.
यापेक्षा 'पुरूष' मध्ये दाखवल्यासारखं लिंग कापलं असतं तर जास्त बिलिव्हेबल वाटली असती, पण अर्थात ती नक्कल झाली असती.

अश्या दुष्कृत्या बद्दल सात्विक संताप येणे बरोबर आहे पण कुठल्याही अवयवाची कापाकापी करण्यापेक्षा माकडहाड किंवा पाठीचा मणका मोडून ठेवला की काम झाले... बिना बहे खून, मिटे सारी गंदगी । तरसे खडा रहने को... सारी जिंदगी ।
म्हणजे १ तासाची गिरणीची वेळ एक मिनटवर आली असती Wink