कैरीचे अनेक प्रकार

Submitted by तनमयी on 8 April, 2019 - 07:50

कैरीचा मौसम आला की मी अनेक प्रकारे त्याच्या पाककृती बनवते.
ह्या दिवसात भाज्या मिळत नाहीत किवा चव हीन लागतात ,जेवण जात नाही .
अश्या वेळेला कैरीची चटणी असली कि पोळी संपते डब्यातली.
तर मग आपापल्या रेसिपीज share करा .
माझ्या काही रेसिपीज खालीलप्रमाणे.
१) कैरीचे लोणचे
पाककृती: कैरी बारीक चिरून ठेवावी.
मोहरी डाळ/मोहरी पूड ,मेथी पूड ,जीर पूड,, लाल तिखट ,मीठ गरम तेलात कालवून न जळता हिंग व बडीशोप घालावी
थंड झाल्यावर कैरी टाकावी.
१२ तास झाल्यावर खाण्यास घ्यावी. ८ दिवस टिकते हे लोणचे नंतर फ्रीज मध्ये ठेवावे.baalkairya असल्याने instant लोणचे
आहे .जास्त दिवस नाही टिकत. दोन चार कैयांचे करावे
२)मेथी आंबा / कैरीची लुन्जी :
पाककृती : कैरी चे साल काढून कापून घ्यावी
तेलात मोहरी, मेथ्या तडतडल्यावर मेथी पूड ,जिरे पूड,तीळ पूड ,कडिपत्त , अख्या लाल मिरच्या ,मिरची पूड,गुळ
मिठ घालावे
कैर्या घालाव्या .अर्धा कप पाणी घालावे .शिजवून थोडे translucent झाल्यावर गस बंद करावा.
5 दिवस टिकते .
३)कांदा कैरी
कैरी ,कांदा याचं समप्रमाणात कीस घ्यावा.त्यात साखर ,मीठ तिखट कालवून ghyave
तेलात मोहरी हिंग हवे असल्यास लाल मिरच्या टाकाव्यात.गस बंद करावा .
त्यात वरील कीस टाकावा
शिजवू नये .
४) डाळ कैरी
हरभर डाळ भिजवलेली घ्यावी .त्यात आंबट पण नुसार कैरी चे तुकडे ,मिरच्या हिरव्या,, कोथिंबीर optional ,मीठ साखर
टाकून mixer करावी. वरतून मोहरी,हिंग तडका द्यावा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लहानपणी आम्ही झाडावरुन कैरी तोडायचो. घरातल्या दाभणाने नाहितर एखाद्या टोकदार वस्तुने तीला मधे भोक पाडायचो. त्या भोकातुन कोयीचा गर महत्प्रयासाने बाहेर काढुन पोकळी करायचो. त्या पोकळीत मीठ् + चटणी + हळद भरायचो आणि ती कैरी गाडग्यात ठेऊन गाडग्यासहीत वाळुच्या ढीगात अथवा मातीत खड्डा करुन त्यात पुरुन ठेवायचो. दुसर्‍या दिवशी ते गाडगे बाहेर काढुन आतल्या कैरीच्या फोडी करुन खायचो. काय अप्रतीम चव लागायची म्हणुन सांगु..

प्रत्येक रेसिपी सविस्तरपणे लिहायला हवी होती ही अपेक्षा. म्हणजे एक एक स्टेप व्यवस्थित समजली असती. पुलेशु. धन्यवाद.

आमच्याकडे स्वयंपाक करायला कोकणस्थ आजी होत्या. त्या वेगवेगळे अस्सल कोकणी पदार्थ बनवायच्या. त्यांच्याकडून शिकलेला एकमेव पदार्थ -

कैरीच्या फोडी, खोवलेला ओला नारळ, गूळ, मीठ, कोथिंबीर, जिऱ्याच्या फोडणीत परतलेला कांदा आणि लसूण हे सगळं एकत्र वाटून घ्यायचं आणि वरून किंचित तेलाची हिंग आणि लाल तिखटाची फोडणी द्यायची. इतकी tangy चटणी होते की संपेपर्यंत व्यसनासारखी खाल्ली जाते. उन्हाळ्यात खायला चांगली असते म्हणे.

५)कैरी भात
पुलिहोरा/चिंच भात/लिंबू भात प्रमाणे अप्रतिम लागतो
फोडणीत मोहरी ,लसून, भिजवलेली डाळ, शेंगदाणे ,कडीपत्ता, हिंग, लाल मिरच्या घालाव्या .हळद , मीठ टाकून कैरीचा कीस घालावा .
शिजवून घ्यावा .नंतर मोकळा शिजवलेला भात घालून परतून घेवून कोथिंबीर पेरावी.

६)कैरी चे वरण
फोडणीत मोहरी ,लसून,कडीपत्ता, हिंग, लाल मिरच्या/हिरव्या मिरच्या घालाव्या .हळद ,तिखट , मीठ,गुळ टाकून कैरीचा कीस/फोडी घालाव्या .
थोडे शिजवल्यावर तुरीची शिजवलेली डाळ घालून उकळून घेवून कोथिंबीर पेरावी.हवे असल्यास थोडा खोबरे कीस घालून पण छान लागते.

कैरी मिक्सर मधून काढून तो किस फडक्याने गाळून घ्यायचा
त्यात रसात बसेल इतकी साखर घालून उकळून पाक करायचा
हे सरबत थंड करून बाटलीत भरायचं आणि बाटली फ्रीज मध्ये...
एक ग्लास गार पाण्यात 4 चमचे सरबत मिक्स करून गारेगार प्यायचं...

चटणी: माझी पद्धत कैरीचे तुकडे , कांदा भाजलेले शेंगादाणे जिरे तिखट कोथिंबीर व मीठ हे सर्व मिक्सरमधून काढून घ्यायचे. वरून हिंग मोहरी फोडणी घालायची. तीन पोळी व चट णी मस्त जेवण होते.
कैरीचा तक्कू व छुंदा पण एकेकदा केलेला आहे यु ट्ञूब वर बघून. पण आता इक्वल भाग गूळ साख र असलेले काही बनवत नाही.
पन्हे आ व ड्ते पण साखर फार असल्याने नाही बनवत. आंबेडाळ वगिरे आहे

कैरीचे तुकडे समप्रमाणात कच्च्या कांद्याचे तुकडे, तिखट, मीठ, जिरे आणि गूळ चवीनुसार हे सगळा एकत्र बारीक करायचा. मस्त tangy flavour येतो.

पाणी वली कैरी
कच्ची कैरी धवून पुसून घ्या एका काचेच्या बरणीमधेय एक मोठा चमचा एरंडेल तेल टाका त्याच्यावर कैर्या टाका त्यावर थोडे मीठ टाका ।परत अश्याच प्रकारे करा बरणी कैऱ्या नि पुरणे भरल्यावर त्यावर तोंडी हळद टाका।नंतर बरणीचे तोंड कपड्याने घट्ट झाकून घ्या घरातच सावलीच्या ठिकाणी ठेवा ३ ते ४ दिवस बरणीचे तोंड बान्धलेलेच असू द्या व फक्त बरणी हलवा।त्यावर झाकण लावा। अश्या रीतीने पाणी वली कैरी तयार। २ वर्षापर्यंत टिकते ।गुजरात मधेय नेहमी बनवली जाते
kairi.png

पारंपारिक आंब्याचे/कैरीचे लोणचे
https://www.maayboli.com/node/25660

कैरीची आंबटगोड कोशिंबीर - https://www.maayboli.com/node/33762

कैरीचे रायते https://youtube.com/shorts/gVmqffSl1Xg?feature=share

आंब्याची कढी https://youtu.be/aFv7F4aA_RE

कैरी घालून करंदी https://youtu.be/afzyEvjHIQg

कैरी ठेचा...
हिरव्या मिरच्या भाजून घ्या थोड्या तेलात.
मिक्सर करताना लसूण पाकळ्या जिर कोथींबीर मीठ
आणि सोस्वेल तेवढी कच्ची कैरी टाकून ओबड धोबड वाटून
कैरी ठेचा तय्यार.

खोबरं कैरी चटणी
ओल खोबर मिरच्या कोथिंबीर जिर मीठ
सोसवेल तेवढी कच्ची कैरी
सगळ वाटून घ्या
झाली चटणी तय्यार.

काहीच येत नाही कैरी रेसिपी....
कैरी कापून त्यात तिखट मीठ साखर घालून त्यावर मोहरी फोडणी टाका.
चटपटीत कैरी तय्यार

कैरी पुदिना चटणी...
कच्ची कैरी हिरव्या मिरच्या पुदिना कोथिंबीर मीठ साखर ओल खोबर
सगळ मिक्सर मधून बारीक करून घ्या.
वरतून मोहरी फोडणी टाका.

कैरी पुदिना चटणी...
कच्ची कैरी हिरव्या मिरच्या पुदिना कोथिंबीर मीठ साखर ओल खोबर
सगळ मिक्सर मधून बारीक करून घ्या.
वरतून मोहरी फोडणी टाका.

कैरी पुदिना वाली वाटली डाळ.
कच्ची कैरी हिरव्या मिरच्या पुदिना कोथिंबीर मीठ साखर भिजवलेली हरभरा डाळ
सगळ मिक्सर मधून बारीक करून घ्या.
वरतून मोहरी फोडणी टाका.

कैरी चटणी नुसती....
कैरी साल काढून कापून घ्या..मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या त्यात तिखट मीठ गूळ किंवा साखर टाका.
वरतून मोहरी लाल मिरची फोडणी करून त्यात टाका.

Pages