Submitted by दत्तात्रय साळुंके on 7 November, 2018 - 01:56
हे प्रकाशपर्वा
हे प्रकाशपर्वा तू झगमगतोस महाली
घे पुसून यंदा झोपडीची खुशाली
उल्लंघुनी या मदमस्त भिंती कुबेरी
उजळू दे दिवाळी श्रमिकांच्या दारी
लाव एक पणती तिथे कुबट झोपडीत
जिथे रक्ताची चिमणी जळे दिन रात
सुखाची वात लाव स्वप्नील डोळयात
रोजच होऊ दे तयांची दिवाळीपहाट
ते राकट काळे तडकलेले हात
सुरकुत्याची रांगोळी नखशिखांत
नको घालू घास गोडाचा तोंडात
दे एक रोटी त्यांच्या ताटात
तो बालकृष्णही नागडा कृश देही
पान्हा यशोदेचा आटत जाई
ना मागतसे टिकली फुलबाजी
दे वाटीभर दूध, होईल आतषबाजी
नको देऊ नवनवी वस्त्रप्रावरणे
झाकाया लाज दे जुनेर एखादे
रापल्या भिंती जराजर्जर झोपडीच्या
त्रिपुरारी तयावर ओसंडू दे
© दत्तात्रय साळुंके
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
'रापल्या भिंती जर्रजर्र
'रापल्या भिंती जर्रजर्र झोपडीच्या
त्रिपुरारी तयावर ओसंडू दे'....अहाहा !
निशब्द
निशब्द
छान कविता दत्तात्रयजी. तुम्ही
छान कविता दत्तात्रयजी. तुम्ही फार हृदयाला भिडणारं लिहिता.
आवडली!
आवडली!
भुईकमळ , AMIT, भास्कराचार्य,
भुईकमळ , AMIT, भास्कराचार्य, फारएण्ड
प्रेरक प्रतिसादासाठी खूप धन्यवाद ....
खूप छान. मनाला भिडणारी कविता.
खूप छान. मनाला भिडणारी कविता.
वा! अगदी छान. आवडली.
वा! अगदी छान. आवडली.
पण मला लयीत वाचता आली नाही. परत वाचून पहातो.
वाली, मीरा... खूप धन्यवाद
शाली, मीरा... खूप धन्यवाद प्रतिसादासाठी.
काळजात चर्रर झालं....
काळजात चर्रर् झालं....
जबरदस्त रचना...
काळजात चर्रर् झालं....
double post
सुखाची वात लाव स्वप्नील
सुखाची वात लाव स्वप्नील डोळयात
रोजच होऊ दे तयांची दिवाळीपहाट.....
अत्यंत छान कविता आहे. मनापासून आवडली.
शशांकजी, अशोकजी खूप धन्यवाद..
शशांकजी, अशोकजी खूप धन्यवाद.....
खूप छान. मनाला भिडणारी कविता.
खूप छान. मनाला भिडणारी कविता.>>>>>+ १
मंजूताई खूप धन्यवाद....
मंजूताई खूप धन्यवाद....
उल्लंघुनी या मदमस्त भिंती
उल्लंघुनी या मदमस्त भिंती कुबेरी
उजळू दे दिवाळी श्रमिकांच्या दारी>> खूपच सुंदर
रापल्या भिंती जराजर्जर झोपडीच्या
त्रिपुरारी तयावर ओसंडू दे>> हे पण आवडलं
सग्गळ्याच ओळी छान ! आवडली कविता
अप्रतिम खुप आवडली
अप्रतिम खुप आवडली
anjali_look, mr.pandit खूप
anjali_kool, mr.pandit खूप धन्यवाद...
तो बालकृष्णही नागडा कृश देही
तो बालकृष्णही नागडा कृश देही
पान्हा यशोदेचा आटत जाई
ना मागतसे टिकली फुलबाजी
दे वाटीभर दूध, होईल आतषबाजी>>> करुण ओळी आहेत। मनाला भिडणारी कविता। खूप आवडली।
मस्त
मस्त
वेडोबा, Mi Patil aahe खूप
वेडोबा, Mi Patil aahe खूप धन्यवाद ....
दिवाळी निमित्त धागा वर काढतो.
दिवाळी निमित्त धागा वर काढतो.
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा....
व! खूपच सुंदर
व! खूपच सुंदर
वाह!!! किती हृदयस्पर्शी!
वाह!!! किती हृदयस्पर्शी!
@गौरी सामो अनेकानेक आभार
@गौरी
सामो
अनेकानेक आभार