तू भेट ना रे रोज रोज नव्याने

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

एके दिवशी दिवसभराची भरमसाठ कामे उपसून वैतागल्या अवस्थेत उशिरा घरी परतत असताना, अगदी आणखी काहीही करायची इच्छा नसताना देखील, गाना.कॉम उघडून बघितले. त्यातल्या सुचवलेल्या चारपाच प्ले-लिस्टींमधून एक प्ले-लिस्ट यंत्रवत अशीच निवडली. आणि तिच्यावर उपकार केल्याच्या अविर्भावात परतीच्या प्रवासात ती लावली.

श्रेया घोषाल आणि सोनू निगम. ते सूर कानावर पडले तिथेच तडकलेल्या मनोवस्थेला सुखद असा सुरूंग लागल्यासारखे झाले. लवकरच ते शब्द, ती चाल, त्यातला वाद्यमेळ, त्यातला निवांतपणे मनावर गारूड करणारा तबला, कानामागून येणाऱया हलक्याश्या अलाप यांनी मनाचा केंव्हा ताबा घेतला कळलाही नाही. गेले काही दिवस रिपीट मोडमध्ये ते गाणे चालूच आहे. ‘देवा - एक अतरंगी’ या मराठी सिनेमातलं हे गाणं आहे आणि अमितराज यांचं संगीत आहे. क्षितिज पटवर्धन यांनी लिहिलं आहे.

कधी कधी असे वाटते की हा निव्वळ (माझ्या बाबतीत वारंवार घडणारा?) योगायोग असतो की एखाद्या किंवा अनेक सुपीक डोक्यांतून निघालेला; वेळ, स्थळ, काळ, ऋतू, आवड या कॉम्बीनेशनचा अचूक विचार करून श्रोत्यापुढे प्ले-लिस्ट सादर करणारा असा एखादा जबरी अल्गोरिदम यामागे असतो?!

विषय: 
प्रकार: