पितृृृ"पक्षी"

Submitted by अनन्त्_यात्री on 1 October, 2018 - 08:47

*पितृ"पक्षी"*

माझा कावळा अजब
जीवखड्याशी खेळतो
इहलोकीच्या अंगणी
परलोक धुंडाळतो

माझा कावळा गणिती
तेरा आकडे मोजतो
आठ नख्यांच्या अष्टकी
पंचप्राण मिळवितो

माझा कावळा तत्वज्ञ
गुह्य विश्वाचे जाणतो
जे जे पिंडी ते ब्रह्मांडी
पिंड फोडून सांगतो

पैलतीरी कोकताना
हळवा का होसी काऊ
जीवखड्याची रे माझ्या
आज नको वाट पाहू

Group content visibility: 
Use group defaults

छान ...

छान लिहिलीय .. Happy

आपल्या कविता विचार करायला लावणार्या असतात.. Happy

सुंदर कविता!

तेरा आकडे मोजतो >> १३ का बरं ? १० हवे का ?

>>>>>पैलतीरी कोकताना
हळवा का होसी काऊ
जीवखड्याची रे माझ्या
आज नको वाट पाहू
वाह!! कातर भावना आहे.

निकु धन्यवाद.
मृत्यूनंतरचा १३ वा दिवस महत्त्वाचा असतो कारण तो शोक कालावधीचा शेवट आणि मृताच्या आत्म्याला योग्य गती मिळण्यास मदत करणाऱ्या विधींचा दिवस असतो.