Submitted by माउ on 27 March, 2016 - 13:21
तुझा प्रत्येक शब्द माझ्या आयुष्यातला एक सुंदर भास आहे...
कळूनही न कळलेला आणि दिसूनही न दिसलेला...
ग्रेस
आठवण कसली तुझी
भिजलेला भासच चिंब
रातीला गहिवरणारा
शब्दाचा हळवा थेंब
मी हरवत बहरत जाते
सावली तुझी वेचाया
पण श्वासच येती हाती
वर तुझी उदासीन माया
तू गूढ मनीचे खोल
गंधित घाव अंतरी
घोट तुझे घेते मी
चषकात रोज सोनेरी
क्षण एक तुझा सापडतो
धुंदीत तुला जगताना
जिंकून पुन्हा हरते मी
तुझी उन्हे बिलगताना
तो जाताना देऊन गेला
स्वर्गीय मनीचे काही
मग सावरताना कळले
हे दु:खच इथले नाही..
-रसिका
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप मस्त !!!
खूप मस्त !!!
स ऽऽहीच !!
स ऽऽहीच !!
धन्यवाद!
धन्यवाद!
तो जाताना देऊन गेला स्वर्गीय
तो जाताना देऊन गेला
स्वर्गीय मनीचे काही
मग सावरताना कळले
हे दु:खच इथले नाही..
हे पुन्हापुन्हा आठवेल. सगळी कविताच मस्त जमली आहे आणि हे शेवटचं तर खासच!
मस्त!!
मस्त!!
सहीच ! आवडली
सहीच ! आवडली
सर्वांचे आभार !
सर्वांचे आभार !
घोट तुझे घेते मी चषकात रोज
घोट तुझे घेते मी
चषकात रोज सोनेरी
>>>
हे मीटरमध्ये नसले तरी मला सगळ्यात जास्त आवडले
'शब्दाचा हळवा थेंब','उदासीन
'शब्दाचा हळवा थेंब','उदासीन माया'...क्या ब्बात है!
शेवट अफलातून!!
अभिनंदन...शुभेच्छा!
आवडली कविता.
आवडली कविता.
वाह, सुरेख ..
वाह, सुरेख ..
धन्यवाद!
धन्यवाद!
उत्कट
उत्कट
खूप सुंदर रचना.
खूप सुंदर रचना.
कविता वाचताना ग्रेस यांची वारंवार आठवण झाली. यातले अनेक शब्द हे ग्रेस यांचे ठेवणीतले आहेतच, पण वृत्त सुद्धा ग्रेस यांचेच आहे.
त्यांच्या कवितेत उत्कटता आहे, भावोत्कटता आहे आणि ती नादलयीतून बहरत जाते. त्यांच्या कवितेची रचना वृत्तानुसार केल्यासारखे वाटत नाही, त्र वृत्त हा स्वाभाविक अलंकार असल्याप्रमाणे ती असते. यातली शब्दांची निवड, शब्दकळा हे सौंदर्यालंकार या ही कवितेत आले आहेत.
खूप खूप सुंदर कविता.
गंधित घाव अंतरी .. ही ओळ मीटरमधे आहे का ? कारण वाचताना नाद भंग होतो असे वाटले.
स्वर्गीय मनीचे काही - इथे काही या शब्दाच्या जागी अचूक शब्दयोजना हवी असे वाटते.
अर्थात कविता विलक्षण आहे हे पुन्हा सांगणे न लगे.