लिओनार्डो डी कॅप्रिओ....अखेर आले हाती "ऑस्कर"

Submitted by अशोक. on 29 February, 2016 - 03:50

लिओनार्डो डीकॅप्रिओ....जर्मन आई आणि इटालियन वडील...दोघेही अमेरिकन नागरीक, यांचा मुलगा. जगभर अभिनेता आणि चित्रपट निर्माता म्हणून, अतिशय देखणा आणि लोकप्रियतेचे प्रतीक बनून राहिला आहे. १९७४ मध्ये जन्मलेल्या या मुलाने बालपणापासूनच अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली होती आणि अमेरिकन टीव्हीमधून जाहिरातीद्वारा तो सतत छोट्या पडद्यावर चमकत राहिला. याचा अनुभव आणि फायदा त्याला पूर्णवेळ चित्रपट उद्योगात प्रवेश मिळवून देण्यास झाला. वयाच्या १८ व्या वर्षीच त्याने रॉबर्ट डी नीरो समवेत १९९३ मध्ये आलेल्या 'धिस बॉयज् लाईफ" मध्ये एका युवकाची भूमिका वठविली आणि त्यापुढील इटिंग ग्रेप व बास्केटबॉल डायरीजमधून सहजसुंदर अभिनयामुळे आणि विलक्षण देखणेपणामुळे सर्वसामान्य प्रेक्षक लोक तसेच निर्माते दिग्दर्शकांच्या नजरेत भरू लागला. त्यातील एक बडे नाव होते...जेम्स कॅमेरून. या धडाडीच्या आणि कल्पक दिग्दर्शकाने त्याला हॉलिवूड सृष्टीतील सर्वाधिक गल्ला मिळविलेल्या "टायटॅनिक" चित्रपटातील जॅक डॉसन या प्रमुख भूमिकेसाठी निवडले आणि या चित्रपटाने सर्व जगात जे काही अभूतपूर्व यश मिळविले त्या लोकप्रियतेचा फायदा दोन्ही कलाकारांना....लिओनार्डो डी कॅप्रिओ आणि नायिका केट विन्स्लेट याना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी खूप असा मिळाला. त्याचा फायदा दोघांनीही घेतला. "मॅन इन द आयर्न मास्क.... कॅच मी इफ यू कॅन...गॅन्ग्ज ऑफ न्यू यॉर्क...." आदी चित्रपटातील लिओनार्डोच्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी त्याला आघाडीचा अभिनेता तर बनविलेच शिवाय मार्टिन स्कोरसेसे, स्टीव्हन स्पिएलबर्ग आदी सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकांच्या गळ्यातील तो ताईतच बनला. "ब्लड डायमंड" सारख्या राजकीय पार्श्वभूमी आणि काळेगोरे भेदावर असलेला चित्रपट असो, संघटीत आणि मेट्रो शहरातील गुन्हेगारीवर आधारीत "डीपार्टेड" सारखा दिग्गजांच्या भूमिका असलेलाच चित्रपट असो किंवा गल्फ देशातील हेरगिरीबाबतचा "बॉडी ऑफ लाईज" असो....सार्‍या चित्रपटांचा नायक असलेला लिओनार्डो दिग्दर्शकांचाही लाडका बनत चालला. प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरत गेल्यामुळे स्टुडिओ सिस्टिमदेखील या नावावर फिदा झाली असल्यास त्यात नवल नाही. प्रचंड बजेटसचे प्लॅन्स बनत गेले आणि त्यांचा केन्द्रबिंदू ठरला हा प्रत्येक भूमिकेतील राजा...लिओनार्डो डीकॅप्रियो...२०१० चा इन्सेप्शन घ्या किंवा हॉवर्ड ह्यूजेसची कहाणी असलेला एव्हिएटर घ्या...तसेच जे.एडगर...प्रत्येक भूमिका स्वीकारण्यापूवी त्या पात्राचा इतिहास तपासून त्यानुसार केवळ अभिनयच नव्हे तर आपले लूक्स आणि देहयष्टीही तशीच असण्यामागे त्याने घेतलेले परिश्रम वाखाणण्याजोगेच आहेत.

अशा गुणी अभिनेत्याला हॉलीवूड चित्रपटसृष्टीतील मानाचे पान ठरलेले "ऑस्कर" पारितोषिक मिळावे ही त्याच्या जगभरातील चाहत्यांची इच्छा होती....आणि तशी असण्याचे कारण त्याने साकार केलेल्या लक्षणीय भूमिका. ऑस्करसाठी त्याला सर्वप्रथम मानांकन मिळाले ते १९९३ साली सर्वोत्कृष्ट सहा.नायकाचे "व्हॉट्स इटिंग गिल्बर्ट ग्रेप" मधील अर्नीच्या भूमिकेसाठी...नंतर पुढील काळात तीन वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे मानांकन मिळाली....२००५ एव्हिएटर, २००७ ब्लड डायमंड आणि २०१४ वोल्फ ऑफ वॉल स्ट्रीट....या सर्व वेळी ऑस्करने त्याला हुलकावणी दिली. या व्यतिरिक्त आम्हा लिओ प्रेमी रसिकांना डीपार्टेड आणि रीव्होल्युशनरी रोड तसेच इन्सेप्शन साठीही त्याला मानांकन मिळायला हवे होते असे वाटत राहिले.

पण अखेर २०१५ साल उजाडले आणि त्याला मिळाली एक जबरदस्त भूमिका...."द रेव्हेनंट" या चित्रपटातील नायकाची. चित्रपटात त्याचे दर्शन म्हणजे बर्फाळ प्रदेशातील....सन १८२३ सालातील घडामोडी....त्याने साकारलेली एका सैन्य तुकडीच्या मार्गदर्शकाची भूमिका...तो ही कशी जगला आणि कशारितीने ती पूर्ण क्षमतेनिशी दर्शविली आहे ते प्रत्यक्ष पडद्यावर पाहाणे गरजेचे आहे. या चित्रपटातील याच भूमिकेसाठी त्याला जगभरातून अनेक पारितोषिके मिळाली आहेत...पण त्याची आणि त्याच्या चाहत्यांची भूक होती ती ऑस्करची. ते त्याला मिळायला हवेच हवे अशी हवाच तयार झाली.

आज अखेरीस अ‍ॅकॅडेमीने ते स्वप्न पूर्ण केले आणि यंदाच्या "ऑस्कर" बहुमानासाठी लिओनार्डो डी कॅप्रिओ याची "रेव्हेनंट" मधील ह्यू ग्लास या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवड झाल्याचे जाहीर झाले आहे.

अभिनंदन !!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाई....लेखात फ़ोटो द्यायची पद्धत बंद करण्यात आली आहे का ? तुला काही माहिती आहे या विषयी ? ऑस्करच्या निमित्ताने लिओनार्डोचा एक फ़ोटो द्यायचे मनी आले होते...पण लेखपानावर फ़ोटोची सुविधा कुठे दिसलीच नाही.

ये धत्तड तत्तड धत्तड तत्तड. अपुन बहुत खुश हुवा. मेरी तरफसे सबकु चायां, लुखमियां और मशहूर आइसक्रीम.

अमा...सबकु नक्कोच....मेरेकूच देना....मै लै दम्या हूं लेख लिख लिख के.
>> ऐजी नवाब साहब कल बिर्यानी खाना बनरा वोइच भेजतुं तोशे में डालके. लिओ भाई के लिए दस्तरख्वानैच बिछाएंगे. दावतां देंगे. कबसे की लड रा बच्चा. अब जाके मिला क्याकि ऑस्क्रफल.

कॅच मी इफ यु कॅन...
माझा डीकॅप्रियोचा सग्ळ्यात जास्त आवडता सिनेमा, (वोल्फ ऑफ वॉल स्ट्रीट आणि द रेव्हेनंट बघायचे राहिलेत Sad )

मामा , ग्रेट गॅट्स्बी अन शटर आय्लंड विसरलात?
जॅन्गो अनचेन्ड पण आवडला होता .
अखेरीस मिळाले हे ब्येस झाल , पण ब्लड डायमंडसाठी मिळायला हवं होत .
अमा दावत्मे मै भी !:)

अजी अमा....बराब्बर बोली तुमे देको....पसिना फ़ुट्या उसको कामा कर कर के इत्ते साल....और अब्बी नंबर लग्या देको....बिर्याणी देनेकू हुनाच उसको....नक्की भेजो.

अग्निपंख आणि बी.....मात्र आता कोणतेही कारण न सांगता "रेव्हेनंट" सिनेमा अवश्य पाहा....ऑस्कर का मिळाले हेही स्पष्ट होईल.

हॅप्पी फॉर हिम!
गेल्या आठवड्यापासुन रोज लक्षात ठेवलं होत.. पण आज सकाळी दोघेही ५.३० ला उठलो नि टिव्ही लावायचा विसरलो Sad
माझा पण द रेव्हेनंट बघायचे राहिलयं

इन्ना.....अरेरे "शटर आयलंड" चा उल्लेख माझ्याकडून कसा काय राहिला गं ? कमालच आहे माझीदेखील. तुझ्या कॉफ़ीच्या गडबडीत हे नाव मिस् झाले बहुधा माझ्याकडून.

मला रॉबर्ट रेडफ़ोर्ड ने सादर केलेला ग्रेट गॅट्सबी फ़ार भावला होता.....लिओच्या गॅट्सबीमध्ये भव्यतेवर आणि सादरीकरणाच्या डामडौलावर जास्त लक्ष दिल्याचे मला जाणवले होते....त्यामुळे त्याचा उल्लेख आला नाही.

_मनाली_

~ थॅन्क्यू सो मच....फ़ोटोसाठी...तोही ऑस्करसोबतचा आहे हे पाहून जास्तच आनंद झाला मला.

मस्तलेकख.

लिओ माझादेखील अतिशय आवडता अभिनेता. शटर आयलंड, इन्सेप्शन, टायटॅनिक, आणि कॅच मी इफ यु कॅन हे अतिशय आवडीचे पिक्चर. ब्लड डायमंड एकंदरीत खूप डिप्रेस करतो म्हणून मी फार पहात नाही पण त्यात त्याने जे काय उच्चार साधलेत त्यासाठी त्याला साष्टांग दंडवतच.

त्याला ऑस्कर जाहीर झाल्यानंतर मीच उड्या मारल्या!!! त्यानंतर त्याह्चं भाषणही खूप सुंदर झालं. स्वतःचा अजेंडा तो कुठल्याही प्लॅटफॉर्मवर बिन्दिक्कतपणे मांडतो याचं मला खरंच कौतुक आहे,.

नंदिनी....

धन्यवाद....त्याच्या भाषणाबद्दल उल्लेख करायला हवा होता....पण त्याने ऑस्कर मिळविले हाच आनंद अगोदर माझ्या मनी मावतच नव्हता जणू काही...त्यामुळे घाईघाईने अगोदर हे लिखाण केले, इथे प्रकाशित झाल्यावर काय काय त्रुटी राहिल्या त्या जाणवत गेल्या....चक्क "शटर आयलंड" चा उल्लेख राहिला...पाचेक मिनिटांपूर्वी इथल्या एक सदस्या सोनाली मालवणकर यानी लिओच्या भाषणाबद्दल मला विचारले, त्यावेळी लक्षात आले की तो तर उल्लेख अगदी आवश्यक होता....शिवाय सभागृहातील तमाम ज्येष्ठ अतिथी आणि सहकलाकारांनी लिओ स्टेजकडे जाताना त्याला टाळ्यांच्या गजरात दिलेली खडी सलामीही आता नजरेसमोर आली आहे.

Pages