सध्या मायबोली वर डॉक्टरांविषयी चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे धागे सुरु आहेत! मी त्यात माझेही काही बरे वाईट अनुभव शेअर केलेत. पण हा मात्र अगदी शेख आजींचा आलेला दैवी अनुभव म्हणुन त्या साठी एक वेगळे लिखाण. अलोपॅथी आयुर्वेद होमिओपॅथी युनानी अश्या अनेक विषयवार मंडळी अगदी जोशात भांडत असतात आपापले अनुभव मते मांडत असतात..
आमच्या औषध वाल्या शेख आजी!
नगर जिल्ह्यातील जामखेड येथे माझ्या जन्मापुर्वी वडील असताना माझी बहिण आजारी पडलेली. तेंव्हा गांव लहान गावात सुविधा नाही जास्त. डॉक्टर प्रयत्न करीत होते त्यात नागिण झाली कुणी तरी शेजार्यांनी गावात एक शेख म्हणून आहे. त्यांची लाकडाची वखार त्यांची पत्नी काही झाडपाल्याची औषधी देते म्हणून सांगितले. बहिणीचे वजन झपाट्याने कमी होऊ लगलेले त्यात त्या आजींकडे नेले. त्यांनी अक्षरश: मरणाच्या दारातुन ओढुन काढलेले माझ्या बहिणीला. त्या नंतर त्या आजींवर खुपच विश्वास निर्माण झालेला. त्या तर बहिणीला 'माझी मुलगी आहे ही हिला मी पुनर्जन्म दिलाय' म्हणायच्या. दरम्यान वडिलांच्या नोकरीतील बदल्यांमुळे आजींशी संपर्क तुटलेला जवळपास.
पुन्हा ८-१० वर्षांनी नगर मध्ये असतांना अचानक ह्या आजींचा पत्ता मिळाला. व छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आजींकडे जाणे सुरु झाले अगदी घरच्या सारखे असायचे कधी आई, मी आणि ही बहिण बरोबर असलो की अगं माझी लेक आली म्हणुन हिला जवळ घेऊन बसायच्या. जन्मजात स्त्रीच्या हृदयात मातृत्व असते आणि ते मातृत्व ह्या शेख आजींच्या नजरेत बोलण्यातुन अक्षरश: ओसंडत असायचे.
तर माझा अनुभव ह्या आजींचा.
नगरला सातवीत असताना डाव्या पायाच्या पिण्डरीला तव्याचा हलकासा चटका बसलेला पण दुर्लक्ष केले किरकोळ असेल तेंव्हा त्या काळात चटक्याला शाई लावणे असले प्रकार. पण जखम चिघळली सेप्टीक झाले २ सेमी लांब वर १/२ सेमी रुंद चटक्याने माझ्या लहानश्या पायावर ६ सेमि लांब आणि ४ सेमि रुंद एवढे रुप धारण केलेले फॅमिली डॉक्टरांकडे उपाचार सुरु होते जखम दिवसेंदिवस वाढत होती अत्यंत दुर्गंधी जी मला असह्य व्हायची. रोज ड्रेसिंग करुन बरी होईना. डॉक्टर म्हणाले गँगरीन झाले तर पाय कापावा लागेल ह्यात १ महिना तरी गेला असेल. तेंव्हा आईला अचानक आजींची आठवण आली आणि मला आजींकडे घेऊन गेली. आजींनी माझा पाय आणि लंगडणे पाहता क्षणी आईला विचारले. सगळे समजल्यावर भयंकर रागावले. माझ्यावर विश्वास नाही का वैगेरे तू डॉक्टर कडे नेलेच का? आणि नेले तर एवढे महिनाभर का वाट पहिलीस लवकर का नाही आणलेस. आई बिच्चारी केविलवाणी झाली.
आजीने त्या क्षणी मला जवळ घेतले आणि कुरवाळले त्या कुरवाळण्यातले ममत्व आत्मियता आजही आठवते. त्या दिवशी आजीने माझी जखम डेटॉलच्या पाण्याने धुवुन एक हिरवी पानांची भुकटी आणि एक गेरुसारखी लाल भुकटी टाकुन फ़डक्याने बांधली. नंतर रोज दुपारी आजी आमच्या घरी येऊन जखम धुणे त्यावर त्या पावडरी टाकणे आणि बांधने करीत होती विचार करा ज्या जखमेचा वास मला असह्य व्हायचा तीच जखम आजी अगदी आत्मियतेने धुत असायच्या. ३ दिवसांत जखम कोरडी पडली आठदिवसांत खपली धरु लागली. त्या ८-१० दिवसांत आजींनी जे काही केले ते केवळ एक आई आपल्या मुलासाठी करु शकते..
ह्या आजी औषधोपाण्याचे ५ पैसेही घेत नसत. जर काही औषधी आणायची असतील तरच बाहेरुन जडी बुटी आदी आयुर्वेदिक दुकानातुन आणायला सांगत शक्यतो स्वत: जवळचेच औषध देत. पण गुण ९९% आजीच्या हाताला. मला तर जेंव्हा मी घरी जायचो त्यांच्या माझ्या पायासाठी तेंव्हा बर्याच गमती जमती सांगायच्या. त्यांच्या यजमानांची लाकडाची वखार त्या मुळे सतत हातात लाकडाची धसकटे शिरायची ह्या आजीच त्यावर औषोधोपाय करीत.
आजींकडे ’रमझान इद' ला आम्हाला मुलांना विशेष निमंत्रण असायचे आजी आम्हाला जवळ बसुन शिरखुरमा आणि रोट खाऊ घालायच्या. ते खात असताना आमच्या चेहर्यावरचा आनंद तृप्तीने न्याहळायच्या. मी त्यांच्या घरी गेलो अधे मध्ये औषधासाठी किंवा आईचा काही निरोप घेऊन तर नेहमी २५ पैसे माझ्या हातात कोंबणार आणि जा जाताना बोरे घेऊन खा मस्त..
ह्या आजींची एक बहुगुणी तेल तयार केलेले जखम असो मुरगळलेले असो मुकामार असो त्यावर खुप उपयोगी. त्याची प्रोसेस आईला गुप्त औषधी म्हणून समजावलेली आणि "माझ्या आईने मला हे औषध सांगितले मी फ़क्त तुला सांगतेय हे तुझ्यपाशीच ठेव". असे बजावले देखिल;. एकदा घरी येऊन बनवून दाखविले. पुन्हा एक दोन वेळा आईने बनविले.
नंतर नगर सुटले आमचे आजींचा त्या नंतर एकदोनदा संपर्क झाला पुन्हा नाही पण आजी आजही स्मरणात आहेत. त्यांचा चेहरा मायेने ओथंबलेले डोळे आजही आठवतात.
अश्या ह्या औषधवाल्या शेख आजी! जिथे केवळ माया प्रेम विश्वास आणि माणुसकी ह्याशिवाय दुसरे काहीच नव्हते.
आजही पायावरच्या जखमेच्या व्रणाने आजींची आठवण कायम ठेवलिये....
आणि वाटते पॅथी कुठली आहे त्या पेक्षा ती वापरताना वृत्ती कुठली आहे आणि आपला त्यावर विश्वास किती आहे हे महत्वाचे!
छान अनुभव
छान अनुभव
केवळ ग्रेट .... तेथे कर माझे
केवळ ग्रेट ....
तेथे कर माझे जुळती .... _____/\____
छान आहे लेख!! कितीतरी चांगले
छान आहे लेख!!
कितीतरी चांगले उपाय केवळ आयुर्वेदिक/झाडपाल्याचे म्हणजे तुच्छ ह्या न्यायाने आपण गमावले असावेत.
छान अनुभव मांडलाय!
छान अनुभव मांडलाय!
छान अनुभव
छान अनुभव
छान लेख.
छान लेख.
छान अनुभव. काहि लोक
छान अनुभव.
काहि लोक औषधापेक्षा आपल्या मायेनेच बरे करत असतात आपल्याला
खुप छान
खुप छान
छानच अनुभव, सध्या माझा एक
छानच अनुभव, सध्या माझा एक डॉक्टर मित्र जामखेडलाच असतो. त्याला नक्की सांगतो.
जबरदस्त! देव त्या आजीना
जबरदस्त! देव त्या आजीना निरोगीआणी निरोगी आयुष्य देवो. देवाला खूप काम असत म्हणून तो अशा लोकाना आपले प्रतिनिधी बनवुन पाठवतो.
खुप छान..._______/\_______
खुप छान..._______/\_______
जबरदस्त! देव त्या आजीना
जबरदस्त! देव त्या आजीना निरोगीआणी निरोगी आयुष्य देवो. देवाला खूप काम असत म्हणून तो अशा लोकाना आपले प्रतिनिधी बनवुन पाठवतो.
>>>
+१
मस्त अनुभव आणि शेवटचे वाक्य
मस्त अनुभव आणि शेवटचे वाक्य भार्री आहे
मस्त लिहिलयं.. शेवटच वाक्य
मस्त लिहिलयं..
शेवटच वाक्य खरचं छान
Khup sunder mandalay anubhav
Khup sunder mandalay anubhav aaNi vyaktichitraN!
क्रिश्नंत, पुरंदरे, अग्नीपंख,
क्रिश्नंत, पुरंदरे, अग्नीपंख, मंजु, निल्सन, मी_अनु, दक्षिणा, प्रिती, दिनेशदा, रश्मी, मनाली, रिया, हार्पेन, टीना, वत्सला,
धन्यवाद सर्वांना!
काहि लोक औषधापेक्षा आपल्या मायेनेच बरे करत असतात आपल्याला स्मित>>>
दक्षिणा, अगदी बरोबर !!
पण आधी मी ज्या डॉक्टरांची ट्रीटमेंण्ट घेत होतो ते पण खुप छान डॉक्टर होते वयोवृद्ध तरी अत्यंत मिश्कील आणि मायाळू पण तरी देखिल ह्या आजींच्या औषधाचा गुण पण महत्वाचा भाग होता.. तिसर्या दिवशी पायाची जखम कोरडी पडु लागलेली!
सध्या माझा एक डॉक्टर मित्र जामखेडलाच असतो. त्याला नक्की सांगतो.>>>
दिनेशदा, ही जुनी घटना आहे ह्या आजी त्यांचे यजमान गेल्या नंतर नगरलाच स्थाईक झालेल्या मुलाकडे जो एस् टी मध्ये होता.
देव त्या आजीना निरोगीआणी निरोगी आयुष्य देवो. >>>
तसे असेल तर खरोखर परमेश्वर कनवाळू आहे.. . कारण माझ्य पायावर उपाचार सुरु असताना आजींनी ६० पार केलेले असावे.
देव त्या आजीना निरोगीआणी
देव त्या आजीना निरोगीआणी निरोगी आयुष्य देवो. देवाला खूप काम असत म्हणून तो अशा लोकाना आपले प्रतिनिधी बनवुन पाठवतो. >>> + १०
छान अनुभव
छान अनुभव >> + १
छान अनुभव >> + १
छान अनुभव ! कोणत्याही लौकिक
छान अनुभव !
कोणत्याही लौकिक पदवीशिवाय केवळ अशा झाडपाल्यांची जाण, उपयोग माहित असलेले बरेच आधीच्या पिढीत होते.
माझ्या सासूबाई त्यांच्या वडीलांच्या अशाच आठवणी सांगतात. त्यांच्याकडेही गावातले, आजुबाजूच्या गावातले कैक रुग्ण येत असत. त्यांची पद्धत वेगळी होती. ते रुग्णाची परीक्षा करीत असत. त्यानंतर ते स्वतः रानात जात आणि त्या रुग्णावर उपाय करण्यासाठी ज्या औषधींची गरज आहे, त्या झाडाजवळ जाऊन त्या झाडाची मनोभावे पुजा करुन त्यास सांगत असत की "मी अमक्याचा असा असा रोग बरा करण्यासाठी उद्या पहाटे येऊन तुझा पाला/मुळ्या नेईन. तू यश दे." मग दुसर्या दिवशी भल्या पहाटे सूर्योदयापूर्वी आदल्या दिवशी पुजलेल्या झाडाच्या फांद्या, मुळ्या, पाने जे हवे ते नेत आणि स्वतः ते वाटून योग्य ते औषध बनवत असत. त्यांच्या हातालाही गुण होता.
छान अनुभव.
छान अनुभव.
हृद्य अनुभव.
हृद्य अनुभव.
मस्त अनुभव.
मस्त अनुभव.
छान अनुभव.
छान अनुभव.
वाह!! खूप छान अनुभव!! आशा आहे
वाह!! खूप छान अनुभव!! आशा आहे कि या ज्ञाना चा कुणी योग्य वारसदार , आजींना मिळाला असेल !!!
>>वाटते पॅथी कुठली आहे त्या
>>वाटते पॅथी कुठली आहे त्या पेक्षा ती वापरताना वृत्ती कुठली आहे आणि आपला त्यावर विश्वास किती आहे हे महत्वाचे +१२३४५६७८९
खूप छान अनुभव मांडलात.
ग्रेट, ग्रेट.
ग्रेट, ग्रेट.
एमबीबीएस झालेल्या डॉक्टरच्या
एमबीबीएस झालेल्या डॉक्टरच्या ओषधाने बरे न वाटायचे कारण काय असावे? मला असे वाटते की त्या डॉक्टराची निदान क्षमता कमी पडली. याचे कारण पैसे देऊन वैद्यकीय कॉलेजात प्रवेश मिळवुन ते पास झाले असतील.
धन्यवाद अंकु, अनघा, आशिका,
धन्यवाद अंकु, अनघा, आशिका, चैत्राली, शैलजा, मानव, देवकी, वर्षू, वेका, अंजु ...
आशिका, तुम्ही सांगाताय तसे आपल्या हाताला गुण यावा म्हणून ह्या आजी पण काही तरी देवाचा त्यांच्या जप करीत बसायच्या उपाय करण्याआधी..
अश्या लोकांची श्रद्धा एकच आपण निमित्त आहोत करता करविता तोच आहे! आणि त्या श्रद्धेनेच ते आपल्या रुग्णावर उपचार करायचे!
एमबीबीएस झालेल्या डॉक्टरच्या
एमबीबीएस झालेल्या डॉक्टरच्या ओषधाने बरे न वाटायचे कारण काय असावे? मला असे वाटते की त्या डॉक्टराची निदान क्षमता कमी पडली. याचे कारण पैसे देऊन वैद्यकीय कॉलेजात प्रवेश मिळवुन ते पास झाले असतील.>>>>>
दिगोचि, ही घटना खुप जुनी आहे. आणि आमच्या डॉक्टरांची पदवीही मला स्मरत नाही. हे डॉ. आमचे खुप पुर्वी पासुनचे होते माझ्या जन्मापुर्वी पासुनचे फॅमिली डॉक्टर त्यांच्या योग्यतेवर आणि क्षमतेवर तेंव्हाही अविश्वास नव्हता आणि नंतर ही बर्याच प्रसंगी आम्ही त्यांचीच ट्रीट्मेण्ट घ्यायचो... माझ्यावर उपचार सुरु होते तेंव्हा ते साठीचे होते!
असो तुमचा एकंदरीत इतर धाग्यावरील चर्चेचा रोख दिसतोय असो!
खूप छान अनुभव .
खूप छान अनुभव .
Pages