कुणी सोसायटीतील मोठ्ठी झाडे तोडली तर....

Submitted by मेधावि on 6 December, 2014 - 08:21

मी रहाते त्या सोसायटीतील दोन मोठ्ठी वाढलेली झाडे, काही लोक तोडताना दिसले. नंतर समजले, मालकांनी स्वतःच दोन मोठ्ठी वाढलेली व त्यांच्याच बंगल्याच्या मागच्या आवारात लावलेली झाडे काढून घेतली. माझ्या माहीतीप्रमाणे स्वतः लावलेली झाडे देखील काढावयास मज्जाव आहे. इथे राजेरोस झाडे कापतायत. मला ह्याबाबतीतले रुल्स काय आहेत ते जाणून घ्यायची इच्छा आहे. कोणास माहीती आहे काय?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नगरपालिकेला कळवा. झाडे तोडायला त्यांची परवानगी लागते. मोठा गुन्हा आहे पण कार्यवाही सहसा होत नाही, कारण तक्रारकर्ता पाठपुरावा करत नाही.

प्रत्येक नगर / महानगर पालिकेमध्ये वृक्ष विभाग असतो. तूमच्या पालिकेत जाउन त्यासंदर्भात चौकशी करा आणि झाडे तोडणार्‍याने तशी रितसर परवानगी घेतली होती का ह्याचा पाठपूरावा करा. ह्यासंदर्भात एखदी स्वयंसेवी संस्था काम करत असेल तर त्यांची मदत घेता येईल. Happy

मागे हिरानंदानी मेडोज मधील २० झाडे परवानगी न घेता तोडली तर कोर्टकेस झाली होती. त्यांना २५ लाखाचा दंड आणि २०० झाडे लावून संगोपन अशी शिक्षा मिळाली होती.

झाडे तोडायला नगरपालिकेची परवानगी लागते.एक झाड तोडले तर दंड होतो.परवानगी घेतली तरी दुसरे झाड लावावे लागते.

>>झाडे तोडायला नगरपालिकेची परवानगी लागते.एक झाड तोडले तर दंड होतो.परवानगी घेतली तरी दुसरे झाड लावावे लागते.<<
हा नियम रिडेवलपमेंटला गेलेल्या सोसायटीला पण लागु आहे का?

>>झाडे तोडायला नगरपालिकेची परवानगी लागते.एक झाड तोडले तर दंड होतो.परवानगी घेतली तरी दुसरे झाड लावावे लागते.<<

झाड कोणाच्या हद्दीत येते यावर अवलंबून आहे. खाजगी मालकीच्या जागेत असल्यास सहसा कोणाच्याही परवानगीची आवश्यकता भासत नाही. किंवा एखाद्याने त्याच्या हद्दीतील झाड तोडल्यास तुम्ही त्याच्याविरुद्ध तक्रार करु शकत नाही.

मात्र झाड जर सार्वजनिक जागेत (बाग,रस्ता,सोसायटीच्या आसपासचा परिसर वगैरे) असेल तर ते तोडण्यासाठी नगरपालिकेची परवानगीसुद्धा पुरेशी नाही. त्याला उच्च न्यायालयाची परवानगी लागते. त्यासाठी नगरपालिकेचा अहवाल सोबत जोडून वकीलामार्फत आपली बाजू (झाड तोडायचे असल्यास ) उच्च न्यायालयात मांडावी लागते. ही प्रक्रिया कमीतकमी ६ महिने वेळ खाणारी आहे. तसेच परवानगीसाठी पुरेशी कारणे आणि एका झाडाच्या बदल्यात ३ झाडे लावून ती ३-४ महिने वाढवावी लागतात आणि त्याचे फोटो सादर करावे लागतात. त्यामुळे सार्वजनिक हद्दीतील झाड उच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय तोडताना आढळल्यास तोडणा-या व्यक्तीवर गुन्हा दाखल होतो. ती तक्रार तुम्ही करु शकता.

नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या स्वतःच्या विकास कामांसाठी(उदा. रस्ता रुंदीकरण,पाईपलाईन, किंवा इमारतीचे बांधकाम वगैरे) सुद्धा त्यांना न्यायालयाच्या परवानगीशिवाय झाडे तोडता येत नाहीत.

सोसायटीतील झाडे ही खाजगी हद्दीत येत नाहीत. त्यामुळे ती तोडू नयेत. केवळ धोकाधायक स्थिती उदभवल्यास नगरपालिकेमार्फतच झाड अथवा झाडाच्या फांद्या तोडणे उचित आहे.

पुणे महानगरपालिकेचे उद्यान विभागाचे कार्यालय संभाजी बागेच्या आतील बाजूस पश्चिमेकडे आहे. अधिक माहीती असल्यास संपर्क करावा.

"सोसायटीच्या आवारातील झाडे मालकाने तोडली"=बहुतेक कन्व्हेअन्स झालेला नाही आणि जमीन सोसायटीच्या नावावर झालेली नाही. गुंतागुंत आणखी वाढली आहे.

<<खाजगी मालकीच्या जागेत असल्यास सहसा कोणाच्याही परवानगीची आवश्यकता भासत नाही. किंवा एखाद्याने त्याच्या हद्दीतील झाड तोडल्यास तुम्ही त्याच्याविरुद्ध तक्रार करु शकत नाही.>>
आमच्या (पूणे) खाजगी हद्दीतील झाडे तोडायला सुद्धा परवानगी लागली होती, तीसुद्धा पूर्ण झाडे नव्हेत, काही फांद्या!
शेजार्‍यानी विनापरवाना तोडली तेव्हा एक अधिकारी येऊन शस्त्र ( कोयता) जप्त करुन गेला, ...पुढे काय झाले कळले नाही. आम्हाला लेखी परवानगी मिळाली होती....ती अशी..."उत्तरेकडील ४ फांद्या क्ष मीटर, आणि दक्षि़णेकडिल २ फान्द्या य मीटर तोडणेस परवानगी आहे"..... Happy

खाजगी मालकीच्या जागेत असल्यास सहसा कोणाच्याही परवानगीची आवश्यकता भासत नाही. किंवा एखाद्याने त्याच्या हद्दीतील झाड तोडल्यास तुम्ही त्याच्याविरुद्ध तक्रार करु शकत नाही.>>>> परवानगी लागते. शेजार्‍याने परवानगी घेऊन्,त्याच्या प्लॉटमधील आंब्याचे झाड तोडले आणि २ अशोकाची झाडे लावली

स्वतःच्या अंगणातील झाडे तोडायलाही परवानगी लागते. फांद्या वगैरे छाटु शकता, संपुर्ण झाड तोडायला वनविभागाचीही परवानगी लागते.

इथे बरीच चर्चा झालेली आहे.

बहुतेक सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे झाडे खाजगी मालकीच्या जागेत असली तरी त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परवानगीची गरज लागतेच. त्यासाठी प्रत्येक शहरातील महानगरपालिका अथवा नगरपालिका ह्यामध्ये वृक्ष प्राधिकरण असते. अशी परवानगी देताना ते झाड तोडण्यासाठी काहीतरी ठोस कारण असावे लागते नाहीतर परवानगी मिळत नाही. विनापरवानगी झाडे तोडली असतील तर त्याची तक्रार वृक्षप्राधिकरणाच्या कार्यालयात करू शकता व ते अश्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करू शकतात. प्रत्येक तोडलेल्या झाडाच्या बदल्यात दोन नविन झाडे लावावी लागतात. हे झाले शहरांच्या बाबतीत खेडेगावात सुध्दा झाडे तोडताना ग्रामपंचायत व वन विभाग यांची परवानगी लागते. झाडे तोडण्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागत नाही.

त्यासाठी सार्वजनिक स्वराज्य संस्थेच्या परवानगीची गरज
<<
"स्थानिक" स्वराज्य संस्था. मुन्शिपाल्टी, ग्रामपंचायत वै.

खासगीबद्दल अनुमोदन. पुण्यात ओळखीच्या एकांनी एक बंगला विकत घेतल्यावर त्यांना बंगल्यातल्या आवारातले पुर्ण जळुन-मरुन गेलेले झाड तोडायचे होते तर त्यांनाही वनविभागाने परवानगी देताना नाकीनऊ आणले होते.

झाडे तोडण्यासाठी परवानगी लागते तसेच सार्वजनिक ठिकाणी (रस्त्याच्या कडेला इ.) झाडे लावण्यासाठीही परवानगी घ्यावी लागते का?