आकाश

Submitted by sahebrao ingole on 7 December, 2011 - 02:34

रात्रीचे अकरा वाजले होते. रिमोटनेच टि.व्ही.बंद केला आणि बिछान्यावर आडवी झाले. डोळ्यात खूप झोप होती. पण का कुणास ठावूक आज जास्तच हूर हूर वाटत होती. जे घरटे आम्ही दोघांनी मिळून बनविले होते आज आकाश ने माझ्या हवाली केले होते. त्याचे नाव हि कधी घ्यायचे नाही असे किती तरी वेळा ठरविले होते. पण स्त्रिया किती हळव्या असतात ते आज प्रकर्ष्याने जाणवू लागले. मीच तर त्याला घरातून हाकलून दिले होते. आणि कधीच येवू नको म्हणून सांगितले होते. पण त्याने मी असताना दुसरी कोणी प्रियसी... म्हणजे काय? एक छत्री असताना दुसरी एक घेवून येणे ...एक बायको असताना दुस-या सोबत प्रेमाचे चाळे करणे...कशी माफ करू?..एवढे सोपे आहे का..? त्या दिवशी मी त्याचे काही एक ऐकले नाही..आणि का म्हणून ऐकू...मी मी बायको आहे त्याची... त्याला कळायला नको ? पिलू म्हणजे त्याचा जीव कि प्राण. निदान त्याचा तरी विचार करायला नको होता का..? दोषी कोण ? मी कि तो...? पण याने काय फरक पडणार? काय तर म्हणे , पिलू आल्या पासून मी पिलूचीच होवून गेले ..म्हणून काय झाले पिलू तरी त्याचाच ना..? पिलूचे संगोपन चांगल्या प्रकारे करायला नको..? आम्ही जीवनात किती संघर्ष केला. .निदान पिलू च्या वाट्याला तरी येवू नये असा का विचार करत नाही. पिलू केवळ माझेच आहे का..? आकाश बाप आहेस तू.. .. तुझी काहीच जबाबदारी नाही..? विचार करता करता माडोळे भरून आले.उशी मांडीवर घेतली आणि स्फंदू लागले. होते. मोठ्याने रडावे वाटू लागले...नको पिलू उठला तर... एक वेळ पिलू कडे पाहिले. तो निर्विकार गाढ झोपेत होता. अर्धवट मिटलेल्या पापण्या, शिंपल्या प्रमाणे बंद ओठ. त्याच्या अंगावर शाल घातली. तो झोपेत आहे हे समजून हि मला मातृत्वाचा मोह आवरता आला नाही. आणि मी हळूच त्याच्या कपाळावर माझे ओठ ठेवले. या अचानाक स्पर्श्याने तो थोडा चूळ बुळला पण लगेच मी त्याच्या पोटावर संथ पणे थोपटले आणि तो कूस बदलून लगेच दीर्घ श्वास घेवू लागला. सगळीकडे भयान शांतता होती परंतु भिंतीवरील घड्याळ मात्र आक्रमक झाले होते. त्याच्या तिन्ही काट्यांचा आवाज स्पष्ट पणे ऐकू येत होता. तेवढ्यात किचन मध्ये भांडी पडण्याचा आवाज झाला आणि मी विचार चक्रातून बाहेर आले..किचन मध्ये जावून आले. लाईट बंद केला आणि पिलुला कुशीत घेतले. त्याच्या उबदार स्पर्श्याने पुलकित झाले.तेवढ्यात दारावर टक टक असा आवाज झाल्याचे जाणवले म्हणून परत एकदा डोळे उघडले पण कुणी काहीच बोलले नाही. त्या मुळे पुन्हा डोळे बंद करून अंगावर ब्लंकेट ओढून घेतले. मागील दहा वर्षात कधी नव्हे ती कडक थंडी पडली होती. घरा बाहेर तोंड हि काढवत नव्हते.तेवढ्यात पुन्हा टक टक आवाज आला आणि घाबरत घाबरत मी विचारले, " कोण आहे..?" " बाय साब, म्या हाय रखमा..." हि रखमा होती. रखमा माझ्या घरा समोरच राहत असे. दारूच्या व्यसनाने नव-याचे लिवर सडले होते. मोलकरणीचे काम करून खूप पैसा खर्च केला पण त्याला वाचवू शकली नाही. एक मुलगा दिनू आणि एक मुलगी कमला होती. मुलगा मोठा होता. त्यामुळे त्याला होस्टेल मध्ये शिक्षणासाठी ठेवले होते. स्वता अशिक्षित असूनही मुलाना शिकवण्याची धडपड करत होती. मी लाईट सुरु केला आणि अंगावर शाल घेत दरवाजा उघडला . " रखमाबाई, काय हो, काय झाल..?" तब्येत तर बरी आहे..?" " तब्येतीला काय व्हैल...बायसाब, झोप मोड तर झाली न्हाई न व.." " नाही बाई ..आताच झोपू लागले होते .. या ना आत या...." " कम्मी घरात एकटीच हाय.. आता पस्तुर टि.वी. चालूच होता जणू.." "हो ..नुकताच बंद केला..उद्या सुट्टी आहे..म्हणून बघत बसले होते. ." " आव, माझ्या सपरात थंडी लयच हाय बघा...म्हून म्हणलं जरा च्या करावा अन पोराना द्यावा..पर पावडरच न्हाय .. " " थांबा , देते " असे म्हणून मी किचन मध्ये गेले. चहाचा डब्बा काढला आणि एका कागदात चहा पावडर घेतली. डब्बा राक वर ठेवला. आणि कागदाची पुडी बांधत हाल मध्ये आले. पुडी तिला देत विचारले, "साखर आहे का?" " बाय साब, साखर नग म्हणत्यात..गुळ हाय..जरा गर्मीचा राहतो. बर येते म्या.. " " ठीक आहे " असे म्हणून मी दरवाज्या बंद केला. मी हि आता थंडीने कुडूकुडू लागले.पण तशीच बिच्यान्यावर पडले.ब्लंकेट अंगावर घेतले आणि पिलू ला छातीशी घेवून किती तरी वेळ तशीच पडून राहिले. डोळ्यात झोपेचा एक अंश हि नव्हता.मनात आले रखमा आताच तर चहा पावडर घेवून गेली. अजून झोपली नसेल. पण थंडीत बाहेर पडण्याची हिम्मत होत नव्हती. तरी हि एकदा जावे असा निश्चय करून दरवाजा उघडला. बाहेर दाट धुके पसरले होते. स्ट्रीट लाईट चा पिवळा प्रकाश हि अंधुक दिसू लागला. बाहेरून दाराला कुलूप ठोकले आणि सखूच्या अंगणात जावून पोहोचले. " रखमाबाइ, ओ रखमाबाइ" मी हळूच आवाज दिला. " आग बाई कोण हो ..बाय साब तुम्ही..?अन पिलू बाळ..घरात एकटे.." " होय हो..झोप येत नव्हती...आणि पिलू आता उठणार नाही.."
" बसा ना.." खाटेवरील गोधडी सरकवीत म्हणाली. तिची मुलगी खाटेवर झोपली होती..तिला हाताने ढकलत म्हणाली, " कम्मे, सरक पिलूची आई हयात." कमला काहीशी पेंगुळलेल्या अवस्थेत होती पण माझे नाव ऐकून लगेच उठून बसली. " रखमाबाई, तिला कशाला उठावताय..? झोपू द्या..झोप ग बाई..माझे काय रिकाम टेकडीचे..काय हो कुणी ऐकले तर काय म्हणतील.. बाई अर्ध्या रात्री इकडे कशी घर सोडून नाही का..?" " कोणी रिकामं नाही बाई...आपण काही वाईट कर्ताव का..? ज्या करतात त्यांला कोणी काही म्हणत नाही..अन त्या बी भेत न्हाईत. .इज्जात्दाराला मरण असतंय.." “खरं आहे तुमच...रांडेला हे पण कळले नाही कि त्याला बायको आहे, मुलगा आहे.. खायला भेटले कि निघाल्या बोंबलत त्याच्या मागे... निर्लज्ज कुठल्या “ “ बाय साब, ह्यांना इज्जत कळती व्हाय..आव इज्जत गाई म्हशीला असती. ह्या त कुत्र्या हायत... पर सायब म्हंजी देव माणूस” “ “काय देव माणूस ? बायको पोराचा विश्वासघात करणारा देव माणूस ..” “पर मला वाटत, समद नादार व्हैल...जरा धीर धरा.. डोस्क शांत ठिवा...” " रखमाबाई, कशी शांत राहू, पिलू मुळे अडकले नाही तर कधीच जीव दिला असता..." ती कानावर हात ठेवत म्हणाली, " देवारे देवा,बायसाब, असला इचार बी मनात आणू नका...गाय शेळीच्या पिल्याला दुध पाजते, कोंबडी मोराचे अंडे उब्विते, अन बाई दत्तक घेवून पोर वाढवतात..मग हि तर आपली रक्त मासाची. अन तुम्ही शिकल्या सवरल्या, असं शोभतंय व्हय? लोखंडाचे चणे खावं पर दुनिया बघावी म्हणत्यात. तुम्ही त सोताच्या पायावर उभ्या हैत.. ज्यांच्या पोटात अन्नाचा एक कान न्हाई ते जगण्याची धडपड करत्यात अन भरल्या पोटी तुम्ही मरण्याची गोष्ट करता.. तुम्ही कश्या आलात, म्या आपली बरळत्येय” "म्हटल गुळाचा चहा पिवून खूप दिवस झालेत...आणि तुम्ही करणार म्हणून मुद्दाम आले बघा.. " हे ऐकून रख्माचा पडलेला चेहरा दिसला. मी थेट चुलीजवळ गेले. चुलीत छान निखारे फुलले होते. मी अगोदर छान हात शेकले..चुलीजवळ एक कप भरून ठेवला होता. आणि पातेल्यात अजून चहा शिल्लक होता. मी तो कप हातात घेतला आणि रखमा पांढरी फटक पडली. मी चहाचा एक घोट घेतला "शी..." त्यात साखर किंवा गुळ काहीच नव्हते. मीठ घालून चहा पावडर उकळली होती. " वा..खरच छान आहे चाहा..आवडला मला.." मी कसा तरी घश्यात ढकलला. पण मळमळू लागले. आता घरी जाणे गरजेचे होते. चव नसली तरी गरम चहा मुळे एक प्रकारची उर्जा आली होती. " रखमाबाई, जरा बाहेर उभ्या रहाना...निघते मी.." असे म्हणून आम्ही दोघी हि बाहेर आलो. " भेवू नका...म्या अंगणातच हाय..." "मी सांगे पर्यंत थांबा, आत जावू नका.. ..." "न्हाय जी...हुबी रहाते म्या..." मी कसे तरी घर गाठले. कुलूप उघडून सरळ किचेन मध्ये गेले. अगोदर अर्धा ग्लास पाणी प्याले. आणि विचार करू लागले..तर रखमा अशी जगते...जिथे संघर्ष नाही तिथे जीवन नाही...मृत्यू समोर असून हि जे जगण्यासाठी धडपडतात तेच ख-या अर्थाने जगतात. माझे दुख मला रखमाच्या दुख पुढे तुच्छ वाटू लागले. आपण बोटाला साधी इजा झाली तर दुख करत बसतो. मग ज्यांना हातच नाही त्यांचे काय होत असणार..?.शरीराच्या मानाने पोट लहान असून हि काय काय करायला भाग पाडते. तर कमला झोपेने नाही भुकेने तडफडत होती. ग्यासच्या शेगडीवर पोळ्यांचा डब्बा ठेवला होता. त्याला असंख्य झुरळांनी वेढले होते. इतकी झुरळे होती कि डब्बा उचलून नेतील.ते पाहून एक वेळ अंगावर काटा आला. मी बेल्न्याने डब्याला हलविले. चारी दिशेला झुरळे पळू लागली. मी तो डब्बा उघडला त्यात दोन पोळ्या होत्या. बरणीतून थोडेसे लोणचे घेतले आणि ते घेवून परत निघाले रखमा कडे. रखमा अजून हि अंगणातच होती. मला पाहताच ती म्हणाली, “ या बया , तुम्ही परत आलायसा... " " रखमा बाई, तुमचा चहा, भरल्या पोटी खूप छान लागतो. कमला ये कमला उठ पाहू, आधी..दोन दोन घास खावून घ्या..अन मग प्या तो चहा ..पण आता साखर घालून. डब्यात कप आहे सांडवू नका." रखमा काही बोलली नाही. मी घरी जायला निघाले तसी ती हि मागे आली. डोळ्यातून अश्रुच्या धारा वाहू लागल्या.. ती एकटक माझ्याकडे पाहत राहिली. मी तिचा खांदा धरत म्हटले , " चला येवू का आता" .. आणि अचानक माझ्या पायाला गरम गरम स्पर्श झाला. माझ्या पायावर तिच्या डोळ्यातून दंव बिंदू पडावे तसे अश्रू पडत होते. मला गहिवरून आले. माझे हि डोळे डबडबले. मी तिला उठवत म्हणाले, " आहो, कायकरताय..? हे काय बाई..तुम्ही माझ्या आई सारख्या..." ती रडत म्हणाली, " व्हाय जी, म्या आई सारखी...पर एका आईला पाहत्येय. आज माझी कम्मा उपाशी झोपली असती." एक क्षण हि थांबणे आता मला जड जावू लागले. कारण कंठ दाटून आला होता. मी काही न बोलता घरी आले. दार उघडून आत गेले. फक्त दरवाजा तेवढा बंद केला..लाईट सुरूच ठेवला..कारण आता मी मायेने काठोकाठ भरले होते. लाइटच्या प्रकाश्यात मला स्वताला पहायचे होते. आता रात्रीचे साडे बारा वाजले होते. मी मोबाईल हातात घेतला आणि आकाशला मेसेज टाईप करू लागले.. : AKASH, I AM SORRY ..I CANT LIVE WITHOUT YOU..PLS FORGET WHAT HAPPENED... FORGIVE AND COME TO ME..FOR PILOO..THIS IS YOURS..I ..U MAY UNDERSTAND WHAT I AM....
SMS करून मोकळी झाले.. आता हलके हलके वाटू लागले.. किती तरी वेळ भिंतीकडे टक लावून बघत राहिले... ब-याच ठिकाणचा रंग उडाल्या मुळे भिंतीवर विचित्र आकृत्या उमटू लागल्या..मी आतून खूप घाबरले..उठण्याची हिम्मत झाली नाही...तसेच तोंडावर पांघरून घातले....आणि स्वताच्या श्वासावर निन्त्रण ठेवण्याचा प्रयत्न करू लागले..कधी झोपले ते कळले नाही. पण सकाळी जेव्हा उठले तेव्हा किचेन मध्ये भांड्यांच्या राक चा आवाज झाला. पाहते तर काय आकाश पिलुला मांडीवर घेवून कोम्प्लेन पाजू लागले. मला राव्हले नाही मी हळूच त्यांच्या मागून गेले आणि खांद्यावर डोके ठेवून ओक्साबक्षी रडू लागले. "आई, का लाल्ते, पप्पा,त्लीप ला गेले होते ना..?" पिलूच्या ह्या बोबड्या बोलांनी मी भानावर आले. " हो रे माझ्या राजा..." मी त्याला उचलून घेतले आणि कुरवाळू लागले... पण पिलू आकाश कडे पाहत म्हणाला," पप्पा, तुम्ही मला सोलून नाही न जाणाल त्लीप ला...मम्मी आपण सगले मिलून जावू या" आता आकाशचे हि डोळे पाणावले, त्यांनी पिलुला माझ्या पासून घेतले, छातीला लावले आणि डोळे पुसत म्हणाले, “ येस बेटा, आपण सगले जावू या..पण मम्मीने मला माफ केले तर...”” ”मग सोली म्हणा “सोरी बाबा, कान धरू ...का मुर्गा बनू..." " आकाश , प्लीज...आपण दोघे हि विसरून जावू या का... ? प्रोमीस मी, नो मोर “ “सविता, पिलूची शपथ... “ मी त्यांच्या तोंडावर हात ठेवत म्हणाले, “ प्लीज आकाश, आय बिलीव्ह ऑन यु.. ” तसे मला आकाश म्हणाले, " थेंक्यू , सविता, तू मला माफ केलेस.. पण आज मी हे सांगू शकतो कि हे हे फक्त एक आईच करू शकते.. ”

गुलमोहर: 
शब्दखुणा: