Submitted by admin on 3 April, 2008 - 17:40
बे एरियातील मायबोलीकर
बे एरियातील मायबोलीकर
बे एरियातील मायबोलीकर
बे एरियातील मायबोलीकर
बे एरियातील मायबोलीकर
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
विकु
विकु

कधी न्यू जर्सीला येणं झालंच तर नक्कीच करू लाईव्ह कमेंटरी.
गांधीजींचे इंग्लंड मधे राजाने आमच्या दोघांच्या वतीने भरपूर कपडे घातले आहेत वाले वाक्य वापरले असते. >> फा
मुळात स्मिता जोगिंदरची मुलगी असते हे कोहलीकाकांना सुचू शकलं याबद्दलच मला त्यांचं कौतुक करायचं आहे >> मी अजूनही डिसबिलीफमध्ये आहे. एकतर हे 'द अदर कोहली' ला सुचलं. दुसरं म्हणजे स्मिता पाटील अशा रोलसाठी तयार झाली.
बदले की आगची जाहिरात कंटिन्यूड
सध्याच्या पैलवानांमध्ये फेमस झालेले "वाकिफ नही हैं तू अभी मेरे जनून से, नहला दूंगा तुझे तेरे ही खून से" हे कादरखानीजम या चित्रपटातून आलेले आहे. याशिवाय जिस्म की गर्मीचे फिलोसॉफिकली अपडेटेड व्हर्जन (म्हणजे काय ते चित्रपटात बघा) आणि धरमपाजींनी स्मिताकडे बघून शब्दश: कपाळावर हात मारून घेणे हे आणखी काही जेम्स!
एकतर हे 'द अदर कोहली' ला
एकतर हे 'द अदर कोहली' ला सुचलं. दुसरं म्हणजे स्मिता पाटील अशा रोलसाठी तयार झाली >>> टोटली!
कादरखानीजम
हा पिक्चर आहे माझ्या हिट लिस्टवर आता.
जिस्म की गर्मीचे फिलोसॉफिकली अपडेटेड व्हर्जन
>>>
प्रिथ्वी नामक पिक्चरचा मी
प्रिथ्वी नामक पिक्चरचा मी परवा उल्लेख केला होताच. तर या प्रिथ्वीचा शेवटचा स्क्वेन्स फारच भारी आहे.
कोर्टात केस चालू असते. हे सगळं ह्यूस्टन मधे चालू असल्यामुळे ज्यूरी वगैरे आहेत. बाकी सगळे लोक्स इंग्लिशमधे बोलत असले तरी वकील सुरेश ओबेरॉय हिंदीतच बोलतो आहे. इंग्लिशमधे बोलणार्या लोकांची तोंडं इंग्लिशमधे हलत असून आपल्याला ते हिंदीत ट्रान्सलेटेड ऐकू येतं आहे. फराज खानवर केस चालू आहे. ज्यूरींना फैसला विचारला जातो. एकेक ज्यूरी नॉट गिल्टी सांगतो आणि जज्जा फैसला द्यायला सुरूवात करतो तेवढ्यात सुशे येतो. त्याला काही कंटेंप्ट ऑफ कोर्ट वगैरे नाही. तो फराज खान कसा खुनी आहे हे सिद्ध करतो. या सगळ्यामुळे जज्ज इतका सैरभैर होतो की तो त्यांच्याकडे ज्युरी सिस्टीम आहे हेच विसरून जातो आणि डायरेक्ट 'सारे सबूतों और गवाहों के बिनाह्पर..'
बायदवे, या पिक्चरात पण बर्याच ठिकाणी वाक्यं आधी इंग्लिशमधे आणि मग त्यांचं हिंदी ट्रान्सलेशन अशी आहेत. कदाचित ही धडकन साठी केलेली रंगीत तालिम असावी
र्म्द अफलातून दिसतोय हा
र्म्द
अफलातून दिसतोय हा पिक्चर. आणि बॉलीवूडवाले ह्यूस्टनपर्यंत पोहोचले हे एक आश्चर्य. आत्तापर्यंत अमेरिका म्हणजे न्यू यॉर्क. फार फार तर सॅन फ्रान्सिस्को. परदेस मधे लास वेगास, एल ए म्हणून व्हॅंकूव्हर होते, तर ओम जय जगदीश मधे अटलांटा म्हणून इंग्लंड.
याशिवाय जिस्म की गर्मीचे फिलोसॉफिकली अपडेटेड व्हर्जन (म्हणजे काय ते चित्रपटात बघा) >>>
हे काय आहे याकरता तरी पाहायलाच हवा.
बॉलीवूडवाले ह्यूस्टनपर्यंत
बॉलीवूडवाले ह्यूस्टनपर्यंत पोहोचले >>> हो, नंतर पण गेले तिकडे दिलबर दिलबर म्हणायला

या सिनेमात प्रत्येकजण सारखा सुशेला आठवण करून देत असतो की ही इंडिया नाही अमेरिका आहे, इथे कानून हाथ में मत लो. पण सुशे आण्णा ऐकत्यात व्हय?
आजच एका फेबु ग्रूपवर "हम साथ
आजच एका फेबु ग्रूपवर "हम साथ साथ है" ची तारीफ व एके काळी कशी त्याची क्रेझ होती वगैरे वाचले, त्यावर सव्वाशे-दीडशे अनुमोदन प्रतिक्रिया पाहिल्या आणि आपल्या बबल बाहेर एक वेगळीच दुनिया आहे हे जाणवले.
हम साथ साथ है ची क्रेझ होती
हम साथ साथ है ची क्रेझ होती हेच मला नवीन आहे. अर्थात त्याचा प्रेक्षक वर्ग वेगळा आहे त्यामुळे त्यांना तो आवडला असूच शकतो.
हनिमूनला सगळे मिळून साथ साथ
हनिमूनला सगळे मिळून साथ साथ जायची क्रेझ
ए बी सी डी ई एफ जी एच आय
ए बी सी डी ई एफ जी एच आय
जे के एल एम
एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स
वाय झेड
तुमभी कहो
टोट्टल वाय झेड गिरी
टोट्टल वाय झेड गिरी
हनिमूनला सगळे मिळून साथ साथ
हनिमूनला सगळे मिळून साथ साथ जायची क्रेझ >>>
त्या ग्रूपवर "त्या काळात इनोसंसमुळे वगैरे आवडला होता", ते "अजूनही आवडतो" अशा रेंज मधे प्रतिक्रिया आहेत. मोहनीश बहलचे नाव त्यात "विवेक" आहे का? त्याच्या सज्जनपणावर तारीफोंके फूल चढवले जात आहेत.
मला एका सीन मधे मोहनीश समोर सलमान साग्रसंगीत लाजतो तो सीन, आणि कोणत्यातरी किल्ल्यावर हे लोक फिरायला जातात तेव्हा खाली हत्ती बघून कोणीतरी कोणालातरी तो हत्ती आहे असे सांगते इतकेच लक्षात आहे. मला वाटले (रार चा ऑटाफे पिक्चर
) राजवाडे अॅण्ड सन्स मधे मृणाल कुलकर्णीला जसे पुण्याहून मुंबईला कसे जायचे माहीत नसते, तसे यांच्या कुटुंबात त्या प्राण्याला काय म्हणतात हे माहीत नसणारे कोणीतरी असेल.
कोणीतरी कोणालातरी तो हत्ती
कोणीतरी कोणालातरी तो हत्ती आहे असे सांगते >>> हो, पण ते गाणं मात्र मोराबद्दल आहे
रार चा ऑटाफे पिक्चर Wink ) राजवाडे अॅण्ड सन्स >>>
हायवे, एक सेल्फी आरपार पण लाडका आहे तिचा 
हम साथ साथ अगदी सोलाणं घेऊन सोलता येईल एवढ्या सालांचा पिक्चर आहे. पण त्यात जानी दुश्मनची मजा नाय
फा, रमड
फा, रमड



माझ्या ऑटाफे सिनेमांची आठवण ... इश्य !
'छावा' बघून संपलीये मी इतक्यात. राजे आहात ना? किती बोलाल...अरे ! किती बोलाल. त्यात एकाच मुद्द्यावर प्रत्येकानं वाक्य वाटून घेऊन क्रमाक्रमानं बोलणं.... सगळ्यात डोक्याला शॉट त्या 'श्री-सखी' नं लावला. आणि संभाजी आणि कवी कलश यांना आपण भगतसिंगासारखे फासावर चढतोय असं का वाटावं ह्यावर विचार करुन डोक्याचा भुगा झालाय माझ्या.
एकूणच या सिनेमावरची माझी मतं कुठे लिहिली तर घरावर मोर्चा येईल.
हो, पण ते गाणं मात्र
हो, पण ते गाणं मात्र मोराबद्दल आहे >>> (xx ब्लीप) कातील आहे हे
त्यात एकाच मुद्द्यावर
त्यात एकाच मुद्द्यावर प्रत्येकानं वाक्य वाटून घेऊन क्रमाक्रमानं बोलणं. >>>
हे लक्षात नव्ह्तं आलं. पटकथा/सादरीकरणावरची तुझी निरीक्षणं भारी असतात. 'आजचा दिवस माझा' आठवला
आणि राजवाडे मधला तो भावी मॉडेलकरता मधली जागा मोकळी सोडलेला पोस्टर्/होर्डिंग सुद्धा 
आपल्याकडे राजा सेनापतीला फार प्राथमिक माहिती देतो. पद्मावतमधेही तेच. म्हणजे राजा->सर्वसामान्य सैनिक पेक्षा राजा->सेनापती हे संभाषण जरा "बात जरा ऊंचे लेव्हल की है" असायला हवे. तसे कोठे दिसत नाही.
'छावा' बघून संपलीये मी
'छावा' बघून संपलीये मी इतक्यात >>> मी असा ट्रायच मारला नाही. मारायचाही नाही असं ठाम ठरवलंय. गाणी आवडली नाहीयेत. बाकी इकडून तिकडून जे काही कानावर पडलंय ते इतकं डेंजर आहे की त्यापेक्षा मी नवीन येणारा 'सिनर्स' बघेन थेट्रात असं ठरवलंय. हॉररच बघायचा तर जो अॅक्चुअली हॉरर आहे तो तरी पहावा
संभाजी आणि कवी कलश यांना आपण भगतसिंगासारखे फासावर चढतोय असं का वाटावं >>> रिअली?
एकूणच या सिनेमावरची माझी मतं कुठे लिहिली तर घरावर मोर्चा येईल >>> लिहूच नकोस मग. बघतोस काय मुजरा कर टाइप व्हिडिओ कर एखादा
<<<सगळ्यात डोक्याला शॉट त्या
<<<सगळ्यात डोक्याला शॉट त्या 'श्री-सखी' नं लावला.>>
त्यांनी सगळ्या (ऐतिहासिक माहितीच्या) रकान्यात बरोबर ची खुण करायचीच असा चंग बांधलेला दिसला.
येसुबाई ह्या काही काळासाठी संभाजीच्या दीवाण होत्या. आणि राज्यकारभारात जी मुद्रा असते ती त्यांची "श्रीसखी राज्ञी जयंती" अशी काही तरी होती. म्हणून पुर्ण पिक्चर भर त्या श्रीसखी.
संभाजी महाराजांनी बुधभूषण हे काव्य लिहिले तेव्हा कवी कलश हे त्यातील वृत्त वगैरे तपासुन गरज वाटल्यास सुधारणा सुचवित असतं म्हणून ते पुर्ण पिक्चर भर छंदोगामात्य.
पण अभ्यास इथेच थांबवला बहुतेक. गणोजी शिर्के हे संभाजीच्या मोठ्या बहिणेचे (आणि संभाजी गणोजीच्या लहान बहिणेचे म्हणजे येसुबाईचे) यजमान होते. त्यामुळे त्या नात्याचा आदर म्हणून ते किमान त्यांना "दाजी" किंवा तत्सम काही तरी संबोधन वापरत असणार. पिक्चर मध्ये मात्र संभाजी महाराज त्यांना डायरेक्ट गणोजी म्हणतात.
फा ने हिंदि सिनेमातील काही
फा ने हिंदि सिनेमातील काही नियम लिहिले आहेत
उदा : आपल्या समोर तो व्हिलन आहे , ज्याला मारण्यासाठी आपण जंग जंग पछाडले आहे, आपल्या हातात भरलेली बंदूक आहे, तो गलितगात्र झाला आहे, अशावेळी त्याल थेट गोळी न मारता किंवा त्याला पायावर गोळी मारून जखमी न करता आपण का बदला घेणार आहोत त्याबद्दल लंबी चवडी भाषणे देणे व त्याने केलेल्या पापांचा गिट लॉग वाचणे.
त्यात माझी अॅडिशन : चिखलात पडून आपले कपडे घाण झाले व आपण रस्त्यावरचा हापसा, एखादे उडुपी हॉटेल वगैरे टाळून एका परिचित अविवाहित स्त्रीच्या घरी जाऊन तोंड धुण्याची परवानगी मागितली व मग बाथरूम मध्ये तोंड धुताना अचानक डोक्यावर शॉवर सुरू झाला तर शॉवर मधून लगेच बाजूला जाणे, बाथरूम मधून बाहेर येणे वगैरे न करता तिथेच शॉवर मध्ये भिजत नॉब हुडकणे व मग 'ये शॉवर बंद क्यूं नहीं होता' असे ओरडून तिला बाथरूम मध्ये बोलावणे.
विकु मी तो सीन डायरेक्ट
विकु
मी तो सीन डायरेक्ट बाथरूमपासूनच पाहिला आहे. हा आधीचा भाग् माहीत नव्हता.
विकु
विकु
जितेंद्र साठी नियमावली लिहायला सांगूया फा ला
विकु
विकु
जितेंद्र साठी नियमावली लिहायला सांगूया फा ला >> +१
जितेंद्र साठी नियमावली
जितेंद्र साठी नियमावली लिहायला सांगूया फा ला>>> +२