Aaftaab
| |
| Tuesday, November 27, 2007 - 8:33 am: |
| 
|
पुलस्ती, खूपच छान ग़ज़ल.. मीही सध्या 'टिपतो आता दु:खाचे कण, सवडीने कळवळेन म्हणतो" अशाच मन:स्थितीत आहे.. हा शेर नक्कीच लक्षात राहील... अभिनंदन..
|
मिल्या, ' शेवाळ्या'ची कल्पना छान आहे. बाकी इथल्या चर्चेशी सहमत. पुलस्ति, ' सवडीने कळवळेन म्हणतो' सुंदर!! सुंदरच!!
|
Pulasti
| |
| Tuesday, November 27, 2007 - 8:03 pm: |
| 
|
प्रतिक्रियांबद्दल सर्वाना मनापासून धन्यवाद!
|
Meghdhara
| |
| Wednesday, November 28, 2007 - 9:02 am: |
| 
|
आनंदयात्री, मौन हे सामर्थ्य.. व्वा! मिल्या, साठते पाण्यात खुपच सहज खुपच सुक्ष्म अर्थ सांगून जातो. फक्त साठती की साठते..? यात अजुन काही बदल होऊ शकेल. पुलस्ति जबरदस्त! व्वा! टिपेन आता.. सुंदरच! मला सुचेना.. व्वा! आणि गुंता कसला इथे तर पूर्ण 'सुलझे हुए'पण दिसतय! मेघा
|
Satyajit_m
| |
| Thursday, November 29, 2007 - 10:06 am: |
| 
|
vaah Sagalyach gazala, avadalya majala.. mast maja ali vyakarana sahit ani vyakarana rahit
|
पराभव मी तुझ्या निर्ढावल्या डोळ्यात तेजाळू किती? उत्तरे देशील म्हणुनी प्रश्न ओवाळू किती? फाटक्या झोळीस माझ्या पाहुनी आले पुढे .. वाटले होते मला ते लोक कनवाळू किती ! तू तुझ्या सोयीप्रमाणे यायचे भेटायला मी असा हा एकटा माझ्यात रेंगाळू किती ? ओतुनी गंगाजळी काँक्रीटचे घर बांधले रोज पायाखालची पण सरकते वाळू किती मागचे काही पराभव भेटती अद्यापही मान राखायास त्यांचा व्यर्थ ओशाळू किती ह्या फुलांना त्या फुलांचा गंध का येतो इथे ? उमलणे विसरू कसे अन बाटणे टाळू किती ? वाटते आता मला मी नागवा होतो बरा ही जगाने सोडलेली लाज गुंडाळू किती ? ये कधी आलीस तर .. गेल्या क्षणांची गाठ घे एकट्याने गुंतले रेशीम सांभाळू किती ! जन्मल्यासाठी मला देणार ते फाशी कधी ? ह्या तुरुंगाचे उगा मी कायदे पाळू किती ?
|
Bairagee
| |
| Wednesday, December 05, 2007 - 5:30 am: |
| 
|
सगळेच शेर चांगले झाले आहेत. पण - तू तुझ्या सोयीप्रमाणे यायचे भेटायला मी असा हा एकटा माझ्यात रेंगाळू किती ? क्या बात है! उमलणे विसरू कसे अन बाटणे टाळू किती ? क्या बात है! रेंगाळणारी ओळ! ये कधी आलीस तर .. गेल्या क्षणांची गाठ घे एकट्याने गुंतले रेशीम सांभाळू किती ! क्या बात है! वा, वैभव! फार सुरेख गझल!
|
Psg
| |
| Wednesday, December 05, 2007 - 5:58 am: |
| 
|
खरंच फार सुरेख गजल. सर्वच शेर आवडले.. मतलाच काय भारी आहे! ये कधी आलीस तर .. गेल्या क्षणांची गाठ घे एकट्याने गुंतले रेशीम सांभाळू किती ! हा खूपच आवडला. 'कॉंक्रीट' मात्र खटकले.. म्हणजे असे शब्द तुझ्या गजलमधे वाचायची सवय नाहीये, म्हणून असेल कदाचित किती सहजता आहे सर्व शेरांत.. लयही सुंदर.. मस्त लिहिली आहेस नंदिनीने हाच मतला तिच्या कथेत लिहिला होता ना?
|
Mankya
| |
| Wednesday, December 05, 2007 - 6:24 am: |
| 
|
व्वाह मित्रा .. गज़ल एक नंबर ! आख्खीच्या आख्खी आवडली ! तू तुझ्या सोयीप्रमाणे यायचे भेटायला मी असा हा एकटा माझ्यात रेंगाळू किती ? .. वा ! व्वाह ! तू तुझ्या सोयीप्रमाणे यायचे भेटायला मी असा हा एकटा माझ्यात रेंगाळू किती ? .. खास ! उमलणे विसरू कसे अन बाटणे टाळू किती ? .. बैरागीशी सहमत ! रेंगाळणारी ओळ ! ये कधी आलीस तर .. गेल्या क्षणांची गाठ घे एकट्याने गुंतले रेशीम सांभाळू किती ! .. मस्त ! psg.. हो हो .. हाच तो मतला ! माणिक !
|
Milya
| |
| Wednesday, December 05, 2007 - 7:29 am: |
| 
|
वा वैभव.. पुन्हा एकदा सुरेख गजल.. सर्वच शेर मस्त आहेत पण तू तुझ्या सोयीप्रमाणे यायचे भेटायला मी असा हा एकटा माझ्यात रेंगाळू किती ? ये कधी आलीस तर .. गेल्या क्षणांची गाठ घे एकट्याने गुंतले रेशीम सांभाळू किती ! जन्मल्यासाठी मला देणार ते फाशी कधी ? ह्या तुरुंगाचे उगा मी कायदे पाळू किती ? खूप आवडले...
|
Desh_ks
| |
| Wednesday, December 05, 2007 - 8:11 am: |
| 
|
वैभव, मागचे काही पराभव भेटती अद्यापही मान राखायास त्यांचा व्यर्थ ओशाळू किती ह्या फुलांना त्या फुलांचा गंध का येतो इथे ? उमलणे विसरू कसे अन बाटणे टाळू किती ? वाटते आता मला मी नागवा होतो बरा ही जगाने सोडलेली लाज गुंडाळू किती ? हे शेर फारच छान! (ही जगाने सोडलेली लाज गुंडाळू किती ? मधे मला "...सांभाळू किती" असंही दिसलं. - या अनाहूत, आगाऊ प्रतिक्रियेबद्दल क्षमस्व.) -सतीश
|
Jo_s
| |
| Wednesday, December 05, 2007 - 9:32 am: |
| 
|
वैभव, सुंदर गझल... हे शेर खासच आवडले, तू तुझ्या सोयीप्रमाणे यायचे भेटायला मी असा हा एकटा माझ्यात रेंगाळू किती ? मागचे काही पराभव भेटती अद्यापही मान राखायास त्यांचा व्यर्थ ओशाळू किती ह्या फुलांना त्या फुलांचा गंध का येतो इथे ? उमलणे विसरू कसे अन बाटणे टाळू किती ? वाटते आता मला मी नागवा होतो बरा ही जगाने सोडलेली लाज गुंडाळू किती ? ओतुनी गंगाजळी कॉंक्रीटचे घर बांधले रोज पायाखालची पण सरकते वाळू किती यात "कॉंक्रीटचे" सुरुवातीला थोडे खटकले पण परत वाचताना नाही तस वाटलं. "रोज पायाखालची पण सरकते वाळू किती " ही ओळही छानच.
|
Satyajit_m
| |
| Wednesday, December 05, 2007 - 10:19 am: |
| 
|
vaibhav mast ekdum sundar
|
महाराजा... अप्रतिम... तू तुझ्या सोयीप्रमाणे यायचे भेटायला मी असा हा एकटा माझ्यात रेंगाळू किती ? Great!! मागचे काही पराभव भेटती अद्यापही मान राखायास त्यांचा व्यर्थ ओशाळू किती सुंदर.... ये कधी आलीस तर .. गेल्या क्षणांची गाठ घे एकट्याने गुंतले रेशीम सांभाळू किती ! हे तर रत्न आहे!! बाकी शेर (माझ्या मते) ठीक आहेत..
|
Meenu
| |
| Wednesday, December 05, 2007 - 1:52 pm: |
| 
|
वैभव आणि पुलस्ति दोघांच्याही गज़ल सुंदर. फार आवडल्या ..
|
वैभव, अप्रतिम गज़ल. सगळेच शेर आवडले.
बापूंनी वाचली का?
|
Ashwini
| |
| Wednesday, December 05, 2007 - 3:15 pm: |
| 
|
वैभव, अतिशय सुरेख गझल. खूप आवडली. विशेषतः, तू तुझ्या सोयीप्रमाणे यायचे भेटायला मी असा हा एकटा माझ्यात रेंगाळू किती ? ये कधी आलीस तर .. गेल्या क्षणांची गाठ घे एकट्याने गुंतले रेशीम सांभाळू किती !
|
Kedarjoshi
| |
| Wednesday, December 05, 2007 - 4:46 pm: |
| 
|
क्या बात है. ..
|
Meenu
| |
| Wednesday, December 05, 2007 - 4:54 pm: |
| 
|
दाद तु जी दाद देतेस त्यालाही वाह म्हणावं लागतय गं ..! तुझी दाद वाचायलाही आम्ही वाट पहात असतो ..
|
Pulasti
| |
| Wednesday, December 05, 2007 - 5:49 pm: |
| 
|
वा! वा! वैभव - मस्त गझल! मतला, पराभव आणि रेशीम हे शेर तर फार फार आडले!!
|