|
Pama
| |
| Wednesday, December 05, 2007 - 5:52 pm: |
|
|
वैभव, कार्यशाळा वाचून काढतेय तश्या तुझ्या गझला अधिकच आवडतात. फार सुंदर!! अख्खी गझलच सुंदर, पण शेवटचा शेर खास आवडला.
|
Meghdhara
| |
| Wednesday, December 05, 2007 - 6:02 pm: |
|
|
व्वाह वैभव. कॉंक्रिट.. च्या बाबतीत पी एस जी ला अनुमोदन. ओतुनी गंगाजळी म्हणाजे कळलं नाही. (पैसा ओतून.. की ??) तू तुझ्या सोयीप्रमाणे.. आणि ये कधी आलीस सुंदरच! मेघा
|
Meenu
| |
| Thursday, December 06, 2007 - 5:04 am: |
|
|
मेघा अगं गंगाजळी म्हणजे आयुष्यभर खपुन जी काही शिल्लक जमा केली. अर्थात जे काही होतं नव्हतं ते सगळं घालुन असं धरलस तरी चालेल. बरोबर ना ओ गुर्जी ?
|
सर्व प्रतिक्रियांचे स्वागत आणि मनःपूर्वक आभार . पूनम .. हो मी शक्यतो कॉंक्रीट वगैरे सारख्या शब्दांचा वापर करत नाही . पण म्हणूनच मी स्वतःला विचारलं की का नाही ? कॉंक्रीट इतका पक्का ! दुसरा शब्द मला शेवटपर्यंत सुचलाच नाही . rather एकदा हा सुचल्यावर स्वतःच्या नावाला जागला आणि पक्का होवून बसला असं म्हणू . चालेल ना ? सुधीर .. हो मला वाटतं तो सवय होण्याचाच भाग असावा . आणि अशा अपवादात्मक वापरांना आणि नवनवीन प्रयोगांना सर्वांनीच तयार असावं असं वाटलं . ( अर्थात नियमात राहूनच ) ( सर्वार्थाने ) केदार .. हे आपल्याला एकदा सांगायचं होतं . आपण माझं लिखाण सातत्याने वाचता आहात ही जाणीव सुखावह आहे . त्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद पाहिला की अजूनच बरे वाटते . धन्यवाद . मेघधारा .. मीनूचं बरोबर आहे . दुसरं असं की त्याला " गंगाजळीच " का म्हणत असावेत हा प्रश्न मला बरेच दिवस मनात होताच . हा मिसरा लिहीताना कष्टाचा , योग्य मार्गाने मिळवलेला म्हणजे गंगेसारखा पवित्र घाम असं तर नसेल ना असं वाटून गेलं मग त्या सानी मिसर्याला वजन जास्त मिळताना बघून मस्त वाटलं . अर्थातच हे माझं वैयक्तिक मत . थोडक्यात आपण आजवर कमावलेली सर्व स्वच्छ कमाई हे परिमाण मला हवं होतं . आणि गंगेचा म्हणजे नदीचा ओझरता उल्लेख आल्याने खालील मिसर्यात पायाखालची वाळू ही घराचा पाया आणि वाळू ( म्हणजे बेसिक मध्येच राडा ) तसेच माझे पाय आणि रोजच्या प्रवाहामुळे सरकणारी वाळू असे दोन अर्थ प्राप्त होतील असे मला वाटले . नचिकेत :- " ठीक " वाटलेल्या शेरांवर काही सुचवण्या असतील तर नक्की नक्की कळव . मला त्यावर अजून विचार करायला आवडेल . फोन ची वाट पाहतो . धन्यवाद .
|
Niru_kul
| |
| Saturday, December 08, 2007 - 7:38 am: |
|
|
सोडले मी... ( ग़ज़ल ) निशेला असे जागणे सोडले मी... नभाचे जणू चांदणे सोडले मी... नको आज तू या मनाशी दुरावू, तिला हे असे मागणे सोडले मी... तिच्या आठवांचे उरी घाव झाले, जुनी खोच ती सांधणे सोडले मी... नको या मनाला प्रियेची मुजोरी, सखीला सदा चाहणे सोडले मी... तिचे नाव घेताच आला उसासा, उसासे उरी पाळणे सोडले मी... कशी आर्तशी भैरवी आळवू मी? मनाला अता छेडणे सोडले मी... नभाचे जणू चांदणे सोडले मी... - निरज कुलकर्णी.
|
निरु_कुल, लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण संपूर्ण गझलेत सगळ्या शेरांमध्ये उला मिसरा मस्त आहेत. पण त्या वाढलेल्या अपेक्षा सानी मिसर्यातून एकदाही पूर्ण होत नाहीयेत... उदा. तिच्या आठवांचे उरी घाव झाले - अप्रतिम! नको या मनाला प्रियेची मुजोरी - आहा!! मस्त कलंदरी वाटतेय! तिचे नाव घेताच आला उसासा - क्या बात है! पण... कृपया, सानी मिसर्यांवर आणखी काम करा ना!! माझ्या मते, "सोडले मी" या रदीफमुळे थोडी अडचण येत असावी! (वाचता वाचता लगेच सानी मिसरा उदाहरणादाखल (मला) सुचू नये इतक एक एक भारी उला मिसरा आहे.. नाहीतर सोदाहरण सांगितलं असतं की असा असा शेर हवा आहे) :-)
|
Jo_s
| |
| Monday, December 10, 2007 - 3:51 am: |
|
|
निरज छान आहे तिच्या आठवांचे उरी घाव झाले, जुनी खोच ती सांधणे सोडले मी... नको या मनाला प्रियेची मुजोरी, सखीला सदा चाहणे सोडले मी... हे शेर चांगले वाटले
|
Daad
| |
| Monday, December 10, 2007 - 5:32 am: |
|
|
वैभवा.... सगळेच शेर अप्रतिम. कॉंक्रिटचा दुसर्यांदा वाचला तेव्हापासून आवडला.... बाटण्याचा, लाज... केवळ अप्रतिम! ते गाठीचं एकदा तुझ्या शब्दात सांग रे, बाबा. कारण गेल्या क्षणांची घ्यायची 'गाठ' आणि एकट्याने संभाळायचा रेशमाचा गुंता.... ह्याचा माझ्याच मनात तिढा आहे की तुलाही तसच सुचवायचय? नीरज, छानय गज़ल. उसासा खासच. आनंदयात्रीशी सहमत, मात्र.
|
|
|