Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 30, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » कार्तिक » काव्यधारा » झुळूक » Archive through November 30, 2007 « Previous Next »

Devdattag
Tuesday, November 13, 2007 - 9:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगम्य आहे मलाच माझे मी असे का वागतो
जगण्याचे माझ्याच मजला मी खुलासे मागतो


Devdattag
Tuesday, November 13, 2007 - 10:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऐकले, कालच्या रात्रीस त्यांनी उसासे टाकले
साथ द्याया त्यांना मग आम्हीही उसासे टाकले

बोलले ते, दु:ख आम्हा म्हणूनी उसासे टाकतो
कोरड्या आसूंची अता चव अशी ही चाखतो

बोललो आम्ही अम्हाला आसू काय ते ठाउक ना
अवघ्या जन्मात आम्ही झालो कधी भाउक ना

पाहूनी तुमचे उसासे आम्ही उसासे टाकले
खेळ व्हावा ऐसा आधी कोणी उसासे टाकले


Shyamli
Tuesday, November 13, 2007 - 10:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वा देवा, लिवा अजून

Itgirl
Thursday, November 15, 2007 - 4:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाप्पा, छानच आहे रे :-)

शब्दांचे सांडती धबधबे,
रक्तास जिव्हाळा नाही
नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे,
विश्राम जिवाला नाही...


Bhramar_vihar
Friday, November 16, 2007 - 8:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयटे पहिली ओळ बदलता येईल का??

Itgirl
Friday, November 16, 2007 - 8:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तू काय सुचवतोस भ्रमा?

R_joshi
Monday, November 19, 2007 - 5:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा छानच लिहिलस:-)
भ्रमा ओळ बदलायची गरज आहे का?


Mankya
Monday, November 19, 2007 - 5:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे कसं वाटेल

शब्दांचे वाहती नुसतेच झरे
पण रक्तास जिव्हाळा नाही
नात्यांचे मृगजळीच फुलोरे
अन विश्राम जिवाला नाही ..

आयटे .. मस्तय चारोळी !
' फ़ ' आहे ना, तो ph असा लिही म्हणजे ' फ ' अकारण नुक्ता येणार नाही.
अता नुक्ता कधी वापरतात हे नको विचारूस, ते माहित नाही.

माणिक !


Punekarp
Tuesday, November 20, 2007 - 10:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे कसं वाटतंय

शब्दांचे नुसतेच फुलोरे
अन्तरात वसंत नाही
नात्यांचे विणले धागे
ऊब त्यात पुरेशि नाही


Mahe
Tuesday, November 20, 2007 - 2:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुणेकर, खुपच छान!! लिहित रहा.

शब्दांचा धबधबा पण आवडला. माणिक तू केलेला बदल पण भावला..
लिहित रहा

भाग्यश्री


R_joshi
Thursday, November 22, 2007 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे कस वाटत.....

अंतरी सु-मनांचे फुलोरे
शब्दवेल असती नाती
गुंतता मन प्रेमात
जीवनास अंत नाही

प्रिति:-)


Mankya
Friday, November 23, 2007 - 9:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवस कसा बसा सरला संध्येला देत हाक
मावळत्या क्षितिजाशी आली अंधाराला जाग
आठवांच्या काजळीने मनात झूरली सांजवात
आसवांच्या स्पर्शाने पून्हा थरथरली सांज रात !

माणिक !


Itgirl
Wednesday, November 28, 2007 - 9:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिटवून टाकलेत आता आवेग सारे
मनही बांधून ठेवलय कधीच बासनात
अनोळखी हसू फुललेल असत ओठीं
आजकाल यालाच ना जगणं म्हणतात?



Meenu
Wednesday, November 28, 2007 - 4:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयटे तुझ्या झुळुकेवरुन सुचलं म्हणून लिहीतेय. मस्त लिहीलंस

मिटवू म्हणुन मिटत नसतात कुठले आवेग,
मनही नाहीच रहात बांधुन बासनात ..
हसु फुललेलं असतं गं ओठी,
पण डोळे खरं तेच बोलुन जातात ..


Itgirl
Thursday, November 29, 2007 - 7:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स मीनू :-)
पण डोळे खरं तेच बोलुन जातात ..
खरय ग.


Satyajit_m
Thursday, November 29, 2007 - 9:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान आहेत सगळ्या चारोळ्या अजुन येउ देत

Krishnag
Thursday, November 29, 2007 - 11:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयटी, मिनू छानच!!
मला ही काही सुचले...
तुमच्या पंक्तीत शोभेल की नाही संगता येत नाही तरी टाकतो!!

आवेग मिटवले मनही बांधले
पण वेदना कश्या लपविणार?
आपले डोळे चुगली करू लागले
तर दोष तरी कुणाला देणार?


Itgirl
Thursday, November 29, 2007 - 2:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कृ, खरच, दोष कुणाला देणार? मस्त.

Spuranik
Friday, November 30, 2007 - 3:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूप दिवसानी आले मायबोलीवर आणि झुळकेवर तर वर्षभराने असेल. छान वाटल. असच चलू दे मंडळी. देवा, आयटी, मणिक, पुणेकर, प्रीती, मिनू, कृष्णा मस्त.

Meghdhara
Friday, November 30, 2007 - 6:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा मस्तच चाललय.
क्रिष्णा चुगली पेक्षा फितुरी किंवा असं काही..?

मेघा






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators