Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 03, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » कार्तिक » काव्यधारा » कविता » Archive through December 03, 2007 « Previous Next »

Mankya
Friday, November 30, 2007 - 4:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद की दाद .. धन्यवाद !

किमान ..

का कोणास ठाऊक पण अंधाराशी जवळीक वाढतेय
सांज जिवाभावाची सखी तर पहाट परकीच वाटतेय

अंधार्‍या कोपर्‍यात बसतानाही भिंतिचा मागत आधार
सीमा अंधुक झाल्या की आपलस वाटू लागतं आवार

कितीसे दिवस उलटून गेले ताळेबंधच पाहिला नाही
सरळसोप्या हिशेबाशी अताशा संबंधच राहिला नाही

कधी नयनी ह्याही बहरल्या होत्या सुखस्वप्नांच्या राशी
सतत असते ओल अता, कुणी ना फिरकते पापण्यांपाशी

मिट्ट काळोखही नाही, कधी आशेचाही किरण डोकावतो
फुकाचा दिलासा आशेचा, उगा अपेक्षांना जीव सोकावतो

तसा जेंव्हा आनंद होता, तो ही कसा पुरेसा वेचला नाही
असा कडेलोट झाल्याचाही किमान उपभोग घेतला नाही !

माणिक !


Desh_ks
Friday, November 30, 2007 - 6:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयावी, 'उपेक्षित' छानच!
मीनू, 'सुरुवात, सीझन, खडतर दिवस' - एकसे बढकर एक. खूपच आवडल्या सार्‍या कविता.
माणिक, 'रिक्त' फारच सुंदर. नखशिखांत म्हणावी तशी, शीर्षकापासून आवडली.
वैभव, 'गुत्ता' आवडली.
बापू, सुधीरच्या विनंतीवरून तुम्ही पुन्हा टाकल्यामुळे तुमची 'आरसे' ही छान कविता वाचायला मिळाली. याच कल्पनेवर मी मागे चार ओळी लिहिल्या होत्या. त्या इथे देतो आहे.
प्रत्येक आरशात मीच दिसणार
हे तर अगदी हमखास,
आहे तसाच दिसतो का पण
की तो फक्त एक भास?
-सतीश


Satyajit_m
Friday, November 30, 2007 - 7:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव गुत्ता एकदम तराट.

मणिक चौथ्या कडव्यात मीटर चुकतय, बाकी कविता झक्कास.


Pkarandikar50
Friday, November 30, 2007 - 1:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिन्नु आणी वैभव दोघांनी मस्तपैकी लाईट मूड पकडला पण बारकाईनं विचार केल्यावर अर्थांचे बरेच पापुद्रे हाताशी येऊ लागतात.. श्रेष्ठ साहित्य कृतीचं लक्षण.
लगे रहो.

-बापू


Chinnu
Friday, November 30, 2007 - 4:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सांज सखी अन पहाट परकी वाटत्ये.. क्या बात है माणिक! अपेक्षांना जीव सोकावतो.. सही..
वैभवा, गुत्ता अनोखा प्रयोग आहे माझ्यासाठी. काय म्हणायचं याला? आत्मसंवाद? मांडणी खूपच सुंदर.
मीनु अगदी लयीत आलं. मोठ्याने म्हणतांना छान वाटलं.
देवा, जयुताई मस्तच!
पमा, अवचित गवसल्या आकारात मन गुंतून जातं... कित्ती खरयं गं.
बापू, 'नि:शब्दांवरची बोचकी' थोडसं कळतयं आता.


Pama
Friday, November 30, 2007 - 4:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक.. 'किमान' बद्दल एक छोटासा प्रश्न. मला दुसर कडव कळत नाहीया अस वाटतय.

......अंधार् ०द्या कोपर् ०द्यात बसतानाही भिंतिचा मागत आधार
सीमा अंधुक झाल्या की आपलस वाटू लागतं आवार .....

बाकीच्या कडव्यांच्या संदर्भात ते ' out of place 'असल्या सारख वाटतय किंवा मला कळलेला / न कळलेला अर्थ बरोबर नाही.. या कडव्याचा अर्थ नक्की काय अपेक्षित आहे please सांगशील का?
बाकीची कविता छान जमलीय.


Chinnu
Friday, November 30, 2007 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला समजलेलं म्हणजे:
भिंतीचा आधार मागुन घेवून, अंधार्‍या कोपर्‍यात वसलेलं आवार, अंधार पडण्याच्या सुमारास आपलंसं वाटू लागतं. काळोखाशी होत असलेल्या जवळकीचा एक संदर्भ असावा.


Meghdhara
Friday, November 30, 2007 - 6:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा माणिक, अपेक्षांना जीव सोकावतो व्वा च!!! सुंदर कविता. पहिलं आणि शेवटचं कडवं अजुन अजुन कळावं लागेल.
चिनु हं.
किंवा.. अंधारात भिंतीचाही आधार वाटतो आणि आणि अंधार पडल्यावर कुंपण (सीमा) अंधुक झल्यावर बंधन/ सीमा नसलेलं मोकळं आवारही आपलसं वाटतं.. ??
माणिकप्रकाश पडेलच!

मेघा


Meghdhara
Friday, November 30, 2007 - 6:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव काय म्हणायचं? वपुंच्या एका कथेच नाव आठवलं 'हसरं दुःख'.
मीनू, दूर दुधावरली साय.. व्वा!

मेघा


Jayavi
Saturday, December 01, 2007 - 3:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणक्या, लाजवाब !!
मिट्ट काळोखही नाही, कधी आशेचाही किरण डोकावतो
फुकाचा दिलासा आशेचा, उगा अपेक्षांना जीव सोकावतो
....... क्या बात है!!

Mi_vikas
Sunday, December 02, 2007 - 2:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



कागदावर उतरलेले
गीत तू घेवुन जा
काळजातुन लावीलेले
सुर तू छेडुन जा
मुक झाले शब्ध माझे
अर्थ तू घेवुन जा
चांदण्यांचे स्वप्न माझे
चन्द्र तू होवुन जा
दिशाहीन ही नाव माझी
दीपस्तंभ होवुन जा
राख झाले हात माझे
अग्निपंख होवून जा

... विकास



Mankya
Monday, December 03, 2007 - 2:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनेकानेक धन्यवाद मित्रांनो !

अरे बरंच बोलण झालय वाटतं ' किमान ' बाबत .. चला माझा लिहिण्यामागचा दृष्टीकोन सांगून टाकतो दूसर्‍या कडव्याबद्दल. चिन्नू म्हणते तस अंधाराशी जवळीक तेथे अपेक्षित आहे. भिंतीच्या आधाराबाबत म्हणायचं झाल तर काही observations मुळे मी हे लिहिलं, काही लोक नेहमी कोपर्‍यातलीच जागा prefer करतात, बस मध्ये ऐसपैस जागा मिळाली तरी नेहमी supporting rod ला धरून बसलेली दिसतात, ह्याचं कारण मानसिक असुरक्षितता असाव अस मला वाटतं. ईथेही तेच अधोरेखित करायच होत.
सीमा अंधुक झाल्यावर अर्थात जसजस सगळ काही अस्पष्ट दिसू लागत, मग ते अंधार पडल्यावर किंवा आपणच अंधार केल्यावर ( दरवाजे खिडक्या लावून घेतल्यावर ) comfortable वाटतं. याचा संदर्भ तर ' गुत्ता ' मध्येही सापडेल, बार मधलं वातावरण तसच असतं ( बर्‍यापैकी अंधार असतो, दिव्यांचा धुरकट प्रकाश, अगदी रुमचेही कोपरेही अस्पष्ट ) , खरं तर त्या वातावरणातच एक प्रकारची धुंदी असते .. नशा असते. हे अगदी पेनकिलर सारखं, झोपेमुळं किंवा धुंदिमुळं फक्त वेदना जाणवत नाहीत .. सलत नाहीत, बाकी समस्या ही आहे तशीच असतेच फक्त तिची जाणीव होत नाही ईतकच.

बाकी ह्या कडव्याचा पोपट झाला हेच खरं !

माणिक !


Desh_ks
Monday, December 03, 2007 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालच्या बहरलेल्या वनात उतरले होते
स्थलांतराच्या वाटेवरचे पाखरांचे थवे,
किलबिलत, गात, सारं वन कोंदाटून जावं, इतके.
तेव्हां वाटलं होतं ते परस्परांच्या आनंदाचं देणं घेणं.

पण आज, या निष्पर्ण फांद्यांवर थांबलेत
परतीच्या वाटेवर,
हे चार दोन थकलेले पक्षी, नि:शब्दसे.
आणि या मौनातलाच त्यांचा संवाद
किती खरा.
त्या बहरलेल्या वनातल्या थव्यांच्या किलबिलाटापेक्षा...

-सतीश


Meenu
Monday, December 03, 2007 - 7:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वांनाच धन्यवाद. वैभव गुत्ता छान. माणिक चांगलं लिहायला लागला आहेस. शुभेच्छा.

Meenu
Monday, December 03, 2007 - 8:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवस

दिवस कधी पाण्यासारखे
मऊसूत लोण्यासारखे

दिवस गोड गाण्यासारखे
डाळींबाच्या दाण्यासारखे

दिवस पिंपळपानासारखे
आठवणींच्या पुस्तकात,
दिवस दिवस .. जपण्यासारखे.


Jayavi
Monday, December 03, 2007 - 11:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सतीश, मस्त !!
मीनु,
दिवस पिंपळपानासारखे
आठवणींच्या पुस्तकात,
दिवस दिवस .. जपण्यासारखे.
........हे खूप आवडेश :-)

Pkarandikar50
Monday, December 03, 2007 - 1:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Satish, Meenu
सुरेख.
Bapu

Lopamudraa
Monday, December 03, 2007 - 1:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कितीसे दिवस उलटून गेले ताळेबंधच पाहिला नाही
सरळसोप्या हिशेबाशी अताशा संबंधच राहिला नाही>..... काय सुरेख लिहितो तु
मस्त आहे.


Pkarandikar50
Monday, December 03, 2007 - 2:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Manik,
'किमान' छानच आहे, प्रश्नच नाही.
गज़लचा खूप प्रभाव अलीकडे जाणवतो. विरोधाभासाच्या प्रतिमांचा सढळ हातने वापर झालाय, असं वाटून गेलं.

मी गज़ल-विरोधक वगैरे काही नाहीय. पण मला प्रामाणिकपणे वाटतं की ज्या गोष्टी गज़लमधे शोभून दिसतात [किंवा चालून जातात] त्या कवितेत तितक्याशा 'फिट' होत नाहीत. हे विधान जरा वादग्रस्त ठरणार आहे, ह्याची मला जाणीव आहे. पण गज़लचा पगडा एकदा मनावर बसला की त्याच धर्तीच्या प्रतिमा आणि कल्पना सुचत जातात की काय न कळे.

गज़ल हा काव्य प्रकार खूप बन्दिस्त आहे, म्हणजे नियम आणि प्तथा यांनी करकचून आवळलेला आहे असं मला वाटतं आता गज़लची समीक्षा अगदी मायबोली वरची सुद्धा- पहा. जास्त भर असतो तो नियमांच्या भंगावर. 'कंटेंट' त्या मानाने दुर्लक्षित राहतो. गज़ल लिहीणारे सुद्धा चमकदार विरोधाभासाच्या शोधात असल्यासारखे वाटतात. त्यानंतर धडपड आणि खटाटोप रदिफ़ आणि यमक जुळवण्याचा. साहजिकच बर्‍याचदा ओढून ताणून गज़ल केल्याचा भास होतो. कवितेने असा अट्टाहास करू नये, हे आपलं माझं मत. असो.

'ताळेबन्द' का ' ताळेबन्ध'? का यमकासाठी थोडी तडजोड?
-बापू.


Vaibhav_joshi
Monday, December 03, 2007 - 7:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक

खरं म्हणजे मी अजूनही " किमान " समजून घेण्याच्या प्रयत्नात आहे . इतर मायबोलीकरांनी केलेल्या प्रश्नावरून तुझं उत्तर येणार हे माहीत होतं आणि त्यावरून तुझ्याकडून त्या कवितेतील तुला अपेक्षित अर्थ समजेल हा अन्दाज होताच . पण दुर्दैवाने तुझे पोस्ट सगळं कव्हर न करता गेली म्हणून आज हे लिहीणारच होतो . त्यातूनही बापूंची पोस्ट वाचली आणि अगदीच राहवलं नाही .

आता मला समजलेली तुझी कविता आणि त्यावरचे माझे प्रामणिक मत / प्रश्न मांडतो .

का कोणास ठाऊक पण अंधाराशी जवळीक वाढतेय
सांज जिवाभावाची सखी तर पहाट परकीच वाटतेय

डन . आपल्याला काय सूचित करायचंय , ही कविता काय असणार आहे हे ऍस्टब्लिश झालं .

अंधार् ०द्या कोपर् ०द्यात बसतानाही भिंतिचा मागत आधार
सीमा अंधुक झाल्या की आपलस वाटू लागतं आवार

डन . मघाचंच म्हणणं पुन्हा एकदा पण जरासं अधोरेखित झालं ह्यात वाद नाही . तू सांगितलेलं स्पष्टीकरण पण पटण्यासारखंच आहे .

कितीसे दिवस उलटून गेले ताळेबंधच पाहिला नाही
सरळसोप्या हिशेबाशी अताशा संबंधच राहिला नाही

इथे मी डिसकन्नेक्ट झालो . कशाचा कशाशी ताळेबंद ? ( ताळेबंध असा शब्द नसावा ) how does it take the poem ahead? हे समजलं नाही .

कधी नयनी ह्याही बहरल्या होत्या सुखस्वप्नांच्या राशी
सतत असते ओल अता, कुणी ना फिरकते पापण्यांपाशी

ओके . मघाशी जो अंधार जिवाभावाचा वाटतोय म्हणालास त्याचा विरहाशी संबंध असावा असे जाणवून जाते . त्यातही दुसरी ओळ मस्त .

मिट्ट काळोखही नाही, कधी आशेचाही किरण डोकावतो
फुकाचा दिलासा आशेचा, उगा अपेक्षांना जीव सोकावतो

म्हणजे काय ? इथे मला मिट्ट काळोखही नाही ही अर्धी ओळ अगदीच विसंगत वाटली . किंवा अनाठायी म्हणू .

तसा जेंव्हा आनंद होता, तो ही कसा पुरेसा वेचला नाही
असा कडेलोट झाल्याचाही किमान उपभोग घेतला नाही !

पहिल्या ओळीला अर्थ देणारा कुठलाच भाव ( भूतकाळाशी निगडित ) कवितेत आला आहे असे वाटत नाही . दुसर्‍या ओळीनुसार उपभोग न घेतल्याची खंत वाटते आहे तर सांज जिवाभावाची सखी का वाटेल ?

असे काहीसे प्रश्न मला पडले होते . कदाचित त्याच्मुळे सुट्या सुट्या कल्पनांची कविता बापूंना गझलसदृश वाटली असण्याची शक्यता नाकारता येत नाही .





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators