Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
कविता

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » कार्तिक » काव्यधारा » कविता « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through November 22, 200720 11-23-07  4:46 am
Archive through November 26, 200720 11-27-07  2:53 am
Archive through November 28, 200720 11-28-07  1:26 pm
Archive through November 29, 200720 11-30-07  2:02 am
Archive through December 03, 200720 12-03-07  7:55 pm
Archive through December 05, 200720 12-05-07  8:24 am

Satyajit_m
Wednesday, December 05, 2007 - 8:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा एक प्रयन्त...

झाली मज विषबाधा
तव जहरी नयनांची
झाली राख आता
मी रचिल्या कवनांची

असा घाव केलास
जो लागला जिव्हारी
तरी कवटाळूनी घ्यावे
तुझे डंख हे विखारी

दिला डंख उरी अन
पंख दिले मनाला
तू तरु हो मनाचा
दे आसरा खगाला

ह्या सावजास सांगा
का आवडे शिकारी?
झेलुनी घाव सारे
मरणास ये खुमारी

मी घायाळ काळजानी
आक्रंदतो तुला स्मरूनी
मी विषावर जगतो आहे
तुजवर कित्येकदा मरूनी

- सत्यजित


Shyamli
Wednesday, December 05, 2007 - 11:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झेलुनी घाव सारे
मरणास ये खुमारी>>>> मस्त, आवडलं

Pkarandikar50
Wednesday, December 05, 2007 - 3:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रहो,

माझ्या वयाच्या आणि स्वभावाच्या माणसाच्या आत एक व्रात्य मूलहि दडून बसलेलं आहे, ते कधी कधी असं बाहेर पडतं. मित्रांनो, हात जोडून कबूल करतो की मी मुद्दामच थोडा चावटपणा करून पाहिला.क्षमस्व.

माझ्या मते ह्या विदूषकीमुळे "स्वाती" चांगल्यापैकी अपसेट झालेली दिसते. तेंव्हा सर्व प्रथम तिची माफी मागतो.

दुसरी माफी अर्थातच "पुलिस्त"ची. हा सगळा प्रकार त्याच्या एका चांगल्या गझलच्या आधारे झाला, म्हणून.

तीसरा मानकरी "माणिक". त्याच्याही एका चान्गल्या कवितेच्या मी चिन्ध्या काढल्या.

आता मला सर्वात जास्त आवडलेल्या प्रतिक्रियांविषयी.

मला शंका येतेय की "देश"ला माझा गेम लक्षांत आला असावा पण त्याने ताकास तूर लागू न देता, अगदी पांचट ताकातून लोण्याचा गोळा बाहेर काढावा तसे मुद्दे मांडलेत. बहोत खूब.

"वैभव"च्या प्रतिक्रिया अर्थातच [नेहमीप्रमाणे] अतिशय संयत आणि विद्वत्ताप्रचुर, सर्वांच्याच आकलनात भर घालण्यार्‍या.

"श्यामली", सिम्पली ग्रेट.

एकूण काय, सर्व थोर कवि मित्र-मैत्रीणींनी प्रतिभा आणि कारागिरी, काव्य-प्रकाराची बंधनं आणि अभिव्यक्तीची उत्स्फूर्तता ह्या विषयांवरची आपापली मतं जरा घासून पूसून घेतली, ह्यावर मी जाम खूष आहे.

मला माझ्या व्यासंगाच्या आणि आकलनशक्तीच्या मर्यदा चांगल्याच ठाऊक आहेत. मी कवि अजिबात नाही, कवितेची आवड असणारा एक अतिसामान्य वाचक आहे. कोणत्याही विषयाची जाणकारी फार वाढली की रसास्वादाची खुमारी कमी होत जाते असं माझ्या पहाण्यात खूपदा आलय. त्यामुळे, आपण जाणकार नाही, जाणकार होण्याची कुवतही आपल्यामधे नाही याची खंत न बाळगता, मी जमेल तेव्ढ्या समरसतेने चांगल्या संगीताचा आणि कव्याचा आस्वाद घेतो इतकंच.

मी फिरक्या ताणल्या त्याबद्दल पुन्हा सर्वांची माफी मागतो.
-बापू.


Shyamli
Wednesday, December 05, 2007 - 4:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय हो बापू पोपटच केलात तुम्ही एक्दम,
हे म्हणजे कसं झालं, घरात पोरांबरोबर खेळायला लागायच आणि मुद्दामच पोरांना जिंकू द्यायचं. :-)

असो , आता एखादि कवितापण येउ द्या, का गज़लच ? :-)

Pama
Wednesday, December 05, 2007 - 5:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरील सर्व चर्चा वाचली.
(वैभवची गझल कार्यशाळा मिसल्याच फार दु:ख होतय. सगळी कार्यशाळा वाचून काढते. बघू माझ्या बालबुद्धीत काही प्रकाश पडतो का!)
गझल या काव्यप्रकाराबद्दल मला अजून तरी technically सर्व माहिती नसल्यामुळे मी त्यावर न बोलणेच योग्य आहे. इतरांच्या चर्चेचा फायदा घेतेय.

पण एक मात्र खर, काव्य हे सहजस्फूर्त असत. आता ते एखाद्याला गझलेत लिहिता येत तर एखाद्याला मुक्तछंदात. माझ्या सारखीला मात्रांच्या हिशोबात लिहायला अजून तरी जमलेल नाही, कदाचित प्रयत्नांती जमेलही. पण म्हणून माझे विचार, भावना मी मात्रांच्या प्रतिक्षेत दडपून ठेवणे योग्य होणार नाही.
त्या अर्थी मी वृतांत मात्रांच्या हिशोबात लिहीणे म्हणजे 'ओढून ताणून' लिहिणे अस मात्र म्हणणार नाही. प्रत्येक काव्यप्रकाराच वेगळ सौंदर्य असत. ते गवसल कि आपोआप त्याबद्दल ओढ निर्माण होते आणि लिहिण्याचा प्रयत्न होतो. तो किती जमतो, त्यातून किती श्रेष्ठ कनिष्ठ कलाकृती निर्माण होते, हा मुद्दा वेगळा.
लिहिणार्यास जे आवडेल, जमेल आणि मुख्य म्हणजे पटेल तेच तो लिहितो. आणि हेच वाचकाच्या बाबतीतही सत्य आहे.

बापू.. चर्चा नक्कीच घडवून आणलीत. पण तुमचे पोस्ट वाचून वाटत नाही त्या फिरक्या होत्या.. अगदी मनापासून लिहिल्यासारख वाटतय. :-)
म्हणजे अगदी उदाहरण देऊन काव्यगुणांविषयी मते मांडलीत म्हणून म्हणतेय! त्या पण फिरक्याच होत्या कि ती तरी तुमची खरी खरी मते होती?


Meghdhara
Wednesday, December 05, 2007 - 6:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा.. !
'पण तुमचे पोस्ट वाचून........ '
:-)

सत्यजीत शेवटच्या कडव्यात 'आहे' क्रियापद वेगळं वाटतय का?

मेघा


Bee
Thursday, December 06, 2007 - 3:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा, माझे मत असे आहे की कवितेचा आशय, तिची विषय विविधता, तिची परिपक्वता हे ३ गुण तिच्या छंदांपेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत. कित्येक चांगल्या कविता छंदांच्या मागे लागून फ़सतात. साधे यमक जुळवताना होणारी दमछाक देखील कवितेवर भयाणक परिणाम करते. मुक्तछंदात कविता लिहिणे हे काम इतके सोपे नाही.

Bee
Thursday, December 06, 2007 - 3:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी एक की, इतर भाषेतील कविता ही छंदांपासून मुक्त आहे का? मी जे छंद मराठी कवितेबद्दल वाचलेत ते छंद इतर भाषेत देखील आहेत का? कुणाचा जर अमराठी कवितेंच्या छंदावर अभ्यास झाला असेल तर लिहा..

Vaibhav_joshi
Thursday, December 06, 2007 - 6:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापू ...
खरंतर आता पुन्हा काही लिहीण्यासारखं उरलेलं नाही पण इतरांची मतं मागून , मी लिहीन असं कबूल करून असं करणं ठीक नाही .

बापू सुदैवाने मला आपल्यासारख्या व्यासंगी व्यक्तिमत्त्वाला भेटण्याचं भाग्य लाभलं आहे . तथाकथित जाणकार न म्हणावून घेता प्रत्येक कलेतील मर्म जाणून घेण्याचा , जाणून खुल्या दिलाने वाखाणण्याचा तुमचा स्वभाव मी अगदी जवळून पाहिला आहे . आणि तसेच या आधीही मायबोलीवर चर्चेत भाग घेऊन स्वतःचं मत कळकळीने मांडताना पाहिलं आहे . आता तुम्ही हा सगळा विनोदच होता म्हटल्यावर निदान तुम्हाला हे मुद्दे आधीपासूनच मान्य होते ह्याचं समाधान वाटलं पण खरं सांगू का तुम्हाला , तुम्ही लढतानाच पाहणं मला आवडेल . माझ्या मनाला काय ते तुम्ही नंतर सांगितलेलं पटलं नाही . अर्थात हे सगळं आपल्याबाबतचा आदरभाव बाळगूनच बोलतो आहे . तुम्ही आम्हा मुलांची अशी माफ़ी वगैरे मागण्याचीही गरज नाहीये . एका fatherly figure ला जर सांगायचं झालं तर मी इतकंच सांगेन Dad, if it was a joke , then it was a very bad one

ह्या सर्व चर्चे दरम्यान छान छान कविता येऊन गेल्या आहेत . कविता बीबी चा काही काळापुरताच चर्चा बीबी झालेला बरा .

मीनू .. जहाज आवडली .

सत्या .. मला कवितेपेक्षा ती झुळूक वर चारोळी टाकली आहेस ना ती जास्त आवडली . विशेषतः " पुरावा " वरच्या श्लेष चा सुंदर वापर . पण तू इथे पुन्हा सातत्याने लिहू लागला आहेस ही आनंदाची बाब आहे .

मेघा ... आरशाचा धर्म आणि नंतर आलेला धर्मांतरा चा रेफ़ मला खूपच आवडला . कविताही आवडली .

इंटरनेट कनेक्शनच्या प्रॉब्लेम मुळे इथे येणं अलीकडे अवघड होत चाललं होतंच , आता ऑफिसच्या कामामुळे पुढील बरेच दिवस मी इथे नसेन . सर्वांनाच पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा . खूप खूप धन्यवाद
पुन्हा कवितंचे सत्र सुरू होण्यासाठी एक कविता टाकून निघतो . one for the road
:-)


Vaibhav_joshi
Thursday, December 06, 2007 - 7:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुक्ती ..

असा कसा तृप्त भासलो मी असून हाती रिताच पेला
पुन्हा कुणी चोरपावलांनी मनात माझ्या प्रवेश केला

अशी कशी शांतता पुन्हा मंद चाहुलीने भरून गेली
निनादला नाद अंतरी पैंजणे अशी छुनछुनून गेली

इथे तिथे आणखी तिथे वावरावया लागले कुणीसे
जुई नि चाफा नि रातराणी .. फुलावया लागले बगीचे

हवेवरी हालता पदर , उमलते अधर , नेत्र लाजलेले
कळून येई धपापणार्‍या उरात काहूर माजलेले

मिठीत अद्वैत घ्यावया द्वैत त्या ठिकाणीच वाट पाही
युगायुगांची सरे प्रतीक्षा , पुनर्मिलन फार दूर नाही

निवांत एकांत तेवतानाच प्राण कर्पूर होत गेला
हळूच श्वासात भास आले , हळूच हातात स्वर्ग आला

रित्याच पेल्यातुनी मला लाभले असे थेंब अमृताचे
रित्याच पेल्यामधून अलगद .. तरंगले देहभान माझे



वृत्त :- हिरण्यकेशी
मीटर :- लगालगागा , लगालगागा , लगालगागा , लगालगागा



Manogat
Thursday, December 06, 2007 - 10:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, सुरेख लिहिलि आहेस कविता..

Manogat
Thursday, December 06, 2007 - 10:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हरवलेले दिवस

आज अठवताय ते क्षण
जे सोबत होते घालवले
त्या छोट्याश्या room मधे
जणु सगले विश्वच साजरे केले

सखे आठवताय का ग तुला
त्या रूम ला घराच स्वरुप देण
दोन स्वतंत्र पलंगांना एकत्र करुन
दोघिंच विश्व निर्माण करण

सखे आठवताय का ग तुला
त्या भिंतिन वर कोरलेल चित्र
त्यचित्रां साठि मग भरलेल
madam कडे fine च कटोर

सखे आठवताय का ग तुला
पहिल्य पावसात ते आपल भीजण
hostel च्या मधोमध
मग आपल बेधुंद होउन नाचण

सखे आठवताय का ग तुला
थंडिच्या दिवसात उन्हात जाउन
गरम गरम चाहा पिणे
दोन नव्हते म्हणुन
एकाच cup मधे share करण

सखे आठवताय का ग तुला
त्या सुट्टि नंतर रंगणार्या गप्पा आपल्या
रात्री रत्री जागुन ही न संपणार्या
त्या गोष्टि आपल्या

सखे आठवताय का ग तुला
तो स्वछता मोहिमेचा निर्धार
तो सुरेख दिवस उगवणार कधी
ह्याचा प्रत्येक रत्री केलेला विचार

सखे आठवताय का ग तुला
त्याच तुला चोरुन बघण
अणि त्याच्यावर मग रात्री
आपल रंगणार चरचा सत्र

सखे आठवताय का ग तुला
आपलि ते भांडण
नंतर तुझ मला आणि
माझ तुला मनविण

कीती सुरेख होत ते विश्व
आता बाहेर आल्यावर कळतय
अणि ते हरवलेले सुगिचे दिवस
मि आज हि miss करतेय



Satyajit_m
Thursday, December 06, 2007 - 11:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वै छान शेवट आणि सुरवात सुरेख. मध्ये मात्र शब्द अर्था पेक्षा जड होता आहेत अस मला वटल. बाकी व्रुत्त वगैरे सांभाळुन लिहीण म्हणजे मानल पहीजे यार. सही

मनोगत वाटात आहे मनोगत आहे ते... :-)


Pkarandikar50
Thursday, December 06, 2007 - 1:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Pama,
विनोदामध्ये थोडासा सत्यांश असतोच. अतिशयोक्तीच्या आवरणाखाली तो दबलेला असतो. तसंच विडंबनाचंही.
Immitation is the best form of flattery.
Bapu


Meghdhara
Friday, December 07, 2007 - 5:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा! काय लिहिलयस वैभव.
फक्त 'तेवतानाच..' वाचताना थोडी गडबड वाटतेय.

मेघा


Mi_anandyatri
Friday, December 07, 2007 - 6:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनोगत,

सखे आठवताय का ग तुला
तो स्वछता मोहिमेचा निर्धार
तो सुरेख दिवस उगवणार कधी
ह्याचा प्रत्येक रत्री केलेला विचार

ह्या ओळी एकदम आवडून गेल्या...


Shyamli
Friday, December 07, 2007 - 6:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुर्जी, रागावू नका पण ऐश्वर्या झालीये कवितेची :-)
अर्थात तेही कोणा येरागबाळ्याच काम नव्हे



Vaibhav_joshi
Friday, December 07, 2007 - 8:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली :- रागावण्याचा प्रश्न कुठे येतो? एकतर तुला काय म्हणायचं आहे हे मला नक्की कळलेलंच नाही आणि तरीही समजा तुला कविता आवडली नसली तर कुठे बिघडलं? प्रत्येक वाचकाला हा अधिकार आहेच. मी नाही का तुझ्या कित्येक कवितांना आवडली नाही म्हणून सांगत? पण बरं केलंस हे वेळेत सांगितलंस. बाहेरगावी जाण्याआधी मला त्या कवितेतून काय अपेक्षित होतं हे तरी सांगून जाता येईल तसेच प्रवासात आणखी विचारही करता येईल.

कवितेच्या बाबतीत मी इतकंच म्हणेन की नवनिर्मिती वगैरे प्रकार फार कमी वेळा घडतो. ब-याच वेळा ठराविक भावनांमधूनच ती पुनर्निर्मिती होत असते. आणि हे कुठल्याही कलेला लागू होतं असं माझं मत. त्या पुनर्निर्मितीतून तुम्ही काय सांगता हे महत्त्वाचं . त्याला तुमचं एक परिमाण तुम्ही देऊ शकलात का हे महत्त्वाचं.आणि ते परिमाण हे ब-याचवेळा दोन किंवा अधिक अर्थांनी जाणा-या कवितेमुळे अधोरेखित होतं. नाहीतर नुसतेच वृत्तांत वाचताना आपण कंटाळून जातो , नाही का? आता चर्चेतली कविता.हिचे मला सुचलेले दोन ट्रॅक असे होते. १) प्रणय आणि दुसरा सटल अर्थ २)मृत्यू. प्रणयाला स्वर्गसुख का म्हणत असावेत अशा कवीकल्पनेतून जन्मलेली ही कविता.

असा कसा तृप्त भासलो मी असून हाती रिताच पेला
पुन्हा कुणी चोरपावलांनी मनात माझ्या प्रवेश केला

संपूर्ण आयुष्य रित्या पेल्यागत समोर असताना मी तृप्त का भासलो ह्या प्रश्नापासून कविता फ्लॅशबॅक मध्ये जाते. तो एक मृत्यूशय्येवर असलेला आणि ती आधीच निघून गेलेली. फक्त एक वचन आहे की भेटायचं आहे. आता जेव्हा ते एकत्र येतील तेव्हाच दोघांनाही मुक्ती मिळेल. म्हणून आता तिने पुन्हा मनात प्रवेश केला आता वेळ जवळ आली आहे.

अशी कशी शांतता पुन्हा मंद चाहुलीने भरून गेली
निनादला नाद अंतरी पैंजणे अशी छुनछुनून गेली

सांगायची गरज नाही.

इथे तिथे आणखी तिथे वावरावया लागले कुणीसे
जुई नि चाफा नि रातराणी .. फुलावया लागले बगीचे

सर्वत्र ती दिसू लागली आणि ते ओळखीचे दर्वळही जाणवू लागले. भक्तीमार्गात कुणी खूप पुढे गेलं की त्याला सुगंध जाणवू लागतो म्हणे. सुदैवाने हा अनुभव एकदा मी स्वतः घेतला आहेथे कदाचित मनाची केवळ संवेदनशीलता व तरलताच असावी पण मग मरणासन्न माणसाची मनोवृत्ती याहून काय वेगळी असते?

हवेवरी हालता पदर , उमलते अधर , नेत्र लाजलेले
कळून येई धपापणार्‍या उरात काहूर माजलेले

हे सगळं भासात्मक आहे. आणि अर्थातच दोन वेगवेगळ्या वाटांनी जाणारी असल्याने दोन्ही भावना आलेल्या आहेत.

मिठीत अद्वैत घ्यावया द्वैत त्या ठिकाणीच वाट पाही
युगायुगांची सरे प्रतीक्षा , पुनर्मिलन फार दूर नाही

इथे ती धूसर वाट आणखी स्पष्ट होत जाते. वरती अर्थ सांगितल्याने आता ते पटायला हरकत नसावी.

निवांत एकांत तेवतानाच प्राण कर्पूर होत गेला
हळूच श्वासात भास आले , हळूच हातात स्वर्ग आला

अजून काय सांगू? (मेघधारा- हो .. तेवतानाच मध्ये यती "ना" वर येत असल्याने तसं वाटतं. मलाही वाटलं होतं)

रित्याच पेल्यातुनी मला लाभले असे थेंब अमृताचे
रित्याच पेल्यामधून अलगद .. तरंगले देहभान माझे

आता शेवटी दोन्ही भावनांना कवितेने न्याय दिला की नाही हे बघणं सर्वात महत्त्वाचं. प्रणय तरी काय वेगळा असतो?रित्याच पेल्यातून भरभरून द्यायचं असतं ना? देहभान तरंगत ना? आणि प्राण जाणं तरी वेगळं काय असतं? आणि आपल्या जाण्याची वाट बघणा-या लोकांकडून तथाकथित गंगाजल वगैरे घेण्यापेक्षा तिला भेटल्याच्या भासात जाणं छान ना? (आणि हो. फ्लॅशबॅकचा लूपही पूर्ण होतो. ह्या सगळ्या छोट्या छोट्य गोष्टींची सुजाण वाचक नोंद घेत असतो असं माझं मत म्हणून सर्वार्थी परिपूर्ण असल्याशिवाय कुठली गोष्ट सहजासहजी आवडत नाही )

आता हे सगळं असूनही कविता आवडली नाही हे मत सर ऑंखो पर. (हे सगळं "सांगितल्यावर कळतं " ह्या युक्तिवादासकट ) पण हे सांगण्याचे कष्ट मी ह्याचसाठी घेतले की कुणीही मेक अप चं किट हातात घेऊन पोर्ट्रेट काढू शकत नाही. त्या कवितेत प्राण (शब्दशः ) नसता तर ती मी लिहीली नसती . पहा विचार करून.मी ही नक्कीच विचार करेन . आणखी काही शंका असतील तर कृपया मेल कर कारण मी निरसन करायला सध्या इथे नसेन.



Shyamli
Friday, December 07, 2007 - 8:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऐश्वर्या झालीये म्हणजे>>> दिसायला अगदी सुंदर पण अर्थ पोचत नाहिये अस वाट्ल होतं, कविता अगदि ४-५वेळा वाचूनही :-(
तुझ्या कविता सहसा समजायला अवघड वगैरे होत नाहित, तरी मी बराच विचार केला ,आणि तरीही समजत नाहिये म्हणल्यावर मग शेवटी अभिप्राय टाकला मी आणि बरच झालं,एवढा सुरेख अर्थ आणि त्याहीपेक्षा एवढ सुंदर विवेचन वाचायला मिळालं.आणि आता अर्थ स्पष्ट केल्यावर अध्यात्मिक बाजुनी विचार केल्यावर मात्र जबरी आवडून गेली कविता. थॅंक्स वैभव. :-)




Jo_s
Friday, December 07, 2007 - 9:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, छान आहे कविता,
स्पष्टीकरणही छान, पटतय.
वृत्त मोठं आहेना जरा, या वृत्तातलं पुर्वी काही वाचलेलं आठवत नाहीये.


Milya
Friday, December 07, 2007 - 12:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा कवितांचा फ़ुलोरा आलाय की एकदम... सर्व नाही वाचू शकलेलो पण :-(

वैभव : मुक्ती आवडली.. कविता पहिल्यांदा वाचताना असे दोन tracks असू शकतात हे जाणवलेच नाही पण तुझे विवेचन वाचलयावर एक छान कलाकृती वाचल्याचा आनंद झाला...

Yog
Saturday, December 08, 2007 - 7:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे पण पूर्णत्वाकडून असे तुकड्या तुकड्यात जाण्याची गरज काय..? सम्पूर्ण कवितेचा परिणाम जो काही आहे तो राहू दे ना.. कुठलिही कविता (मुक्तछन्दी सुध्धा) एक अनुभव आहे तो घ्यावा आणि रमून जावे...




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators