Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 21, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » कार्तिक » ललित » एक सकाळ » Archive through November 21, 2007 « Previous Next »

Chinya1985
Friday, November 16, 2007 - 8:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अतिशय छान लिहिल आहे. सगळ्यात आवडल ते हे-

इथे आपल्या बहिणाईला शाळेत सोडायला एक भाऊसाहेब आले होते. आधी चार पावलं आई ढकलत असलेल्या प्रॅम मध्ये, मग उतरून बहिणीचा हात धरून, मग तिचं दप्तर आपल्या खांद्यावर घालून घेत, गुढग्यापर्यंत येणारं ते दप्तर आपल्या अवाक्याच्या बाहेर आहे हे समजून मग ते आई कडे दिलं. मग आपली प्रॅम आपण ढकलण्याचा अट्टाहास, मग त्यात बहिणाईचं दप्तर ठेवून ती ढकलण्याचा हट्टं.... बहिणाई होती मुळात पाच्-सहा वर्षांची चिमखडी पण ह्या धाकट्या ध्यानापुढे ती खरच 'ताईबाई' झाली होती. त्याच्या समजुतीने सगळं घेत आईबरोबर चालली होती.


एकदम डोळ्यासमोर चित्र उभ राहिल आणि हसु आलं


Kedarjoshi
Friday, November 16, 2007 - 8:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जबरी. .. .. ..

Sunidhee
Friday, November 16, 2007 - 9:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुंदर.. मला वाटते 'ती' सकाळ तुझ्या लिखाणाने अजुनच सुंदर झाली आहे.. दाद!!

Daad
Friday, November 16, 2007 - 10:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे.... धन्यवाद सगळ्या सगळ्यांना!
अशी बाग खरच घराजवळ आहे आणि मी रोSSSज त्याला वळसा घालून जाते. प्रोजेक्ट खरच शब्दश: जीवघेणं आहे.... डॅरेन, माझा मॅनेजर खरच चांगला आहे....

पण.... अजून ही सकाळ उगवलीच नाहिये :-(.
ही सकाळ माझ्या मनातलीच. खरी खुरी उगवेल तेव्हा उगवेल, म्हटलं! मनात तरी उगवायला हरकतच नाही... नाही का?
लिहिल्यावरही ओझी हलकी होतात... गडे हो! कुछ लिख्खो!


Sayonara
Saturday, November 17, 2007 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नुसत्या मनात उगवलेल्या सकाळचं वर्णन जरं एवढं छान तर खरीखुरी सकाळ तुझ्या नजरेतून अनुभवायला नक्कीच आवडेल.

Manuswini
Saturday, November 17, 2007 - 8:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दर दिवशी सकाळी ऑफ़ीसला निघताना मला दोन गोष्टी अतीशय कराव्याश्या वाटतात, ते ही सकाळच्या गुलाबी थंडीत.. अजूनही गोड झोपेत दुनीया असताना.........
एक म्हणजे,सकाळी छानशी आरामात अंघोळ करून patio बसून छान वेलचीचा चहा हातात घेवून मस्त बसून प्यावा खुर्ची टाकून.

दुसरे म्हणजे, मस्त छान तयार होवून, सुंदरसे तयार होवून बाहेर असाच 'गुलाबी थंडीत' फेरफटका मारावा( हे सगळे सकाळी छान hat घालून तयार होवून morning walks करण्यर्‍या लोकांकडे बघून वाटते).

आणि हे अगदी weekdays च्या'च' दिवशी हे करावे. मग weekend ला काही 'ती' मजा नाही, ना चहाची ना फेरफटक्याची कारण weekend अगदेच सकाळी उजडत नाही ना, तेव्हा 'ती' चिवचिवणारी सुंदर गुलाबी सकाळ बघायला मिळत सुद्धा नाही.
कधी कधी छान सग्रसंगीत पूजा करावीशी वाटते मला. मग फिरायला जावे वगैरे वगैरे.

माझी सकाळ ही पाचला होते रोज,त्यामुळे सकाळमध्ये एक गोडपणा असतो......... कित्येकदा नुसते तयार होवून बसून रहावेसे वाटते.......... काय नी काय. ते काम कमी असताना 'काम' 'काम' ची भुणभुणच ज्यास्त असते.

रोज नाहीतर कशीबशी अंघोळ करून, कसा तरी चेहरा 'आवरून' निघा पाट्या टाकयला; कार मध्ये रंगरंगोटी करत, चहा पण घ्यायला वेळ नसतो, तो dip dip चहा ऑफ़ीसचा नशीबी असतो.


Swa_26
Monday, November 19, 2007 - 5:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, सहीच लिहितेस गं!!... सुपर्ब!!

Anaghavn
Monday, November 19, 2007 - 7:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तु,तुझी सकाळ,आणि ते अनुभवणारं,आमच्या समोर मांडणारं तुझ मन,सगळ्यानाच सलाम!!!!
अनघा


Bsk
Monday, November 19, 2007 - 7:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इतकं सुंदर लिखाण कधीच वाचलं नाही! दाद, आवडती लेखीका म्हणून तुझेच नाव सांगणार आता! अप्रतीम!!! आणि हे सगळं मनातलं?? किस चक्की का आटा खाते हो भाई??? :-)

Arch
Monday, November 19, 2007 - 7:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छानच.जादू आहे तुझ्या लिहिण्यात.

Mepunekar
Tuesday, November 20, 2007 - 12:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, खुप छान लिहिलेस, काश अशी एखादी सकाळ अनुभवायला मिळाली तर :-)

Bhagya
Tuesday, November 20, 2007 - 6:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद.... सुपर्ब. पण ही सकाळ मनातली मनातच न ठेवता प्रत्यक्षात उतरु दे.

Jayavi
Tuesday, November 20, 2007 - 7:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद..... अगं काय नशा आहे तुझ्या लिखाणात....! एक कडक सॅल्यूट यार.......!! तुझी ही लिखाणातली सकाळ प्रत्यक्षात उतरो... हीच प्रार्थना :-)

Fulpari
Tuesday, November 20, 2007 - 8:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, मस्तच गं. खुप छान.

Rachana_barve
Tuesday, November 20, 2007 - 4:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुरेख लिहितेस दाद... मस्तच एकदम..

Dineshvs
Tuesday, November 20, 2007 - 5:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक हवीहवीशी सकाळ, दाद.

Rashmee
Tuesday, November 20, 2007 - 6:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह अत्यन्त सुंदर !!!!

माझी अगदी मनापासून दाद!!



Daad
Tuesday, November 20, 2007 - 9:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांचे मनापासून आभार.
जया, अगदी अगदी.... वाटच बघत्येय.

ब्स्क (भाग्यश्री), चक्की माहीत नाही पण.... अन्नपूर्णा पासून पिल्सबरी पर्यंत कोणताही आटा जो इथे मिळतो.... सध्या भारतातून आटा निर्यातीला बंदी घातलीये म्हणे... :-)

रश्मी, तुझी दाद पोचलीच! thanks heaps लोक्स!


Rajya
Wednesday, November 21, 2007 - 11:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय दाद :-)
सुरुवात आणि शेवट एकदम बेश्ट अगदी 'दाद स्टाईल' :-)
पण एक वाटलं ते लिहीतो, उपमांचा अतिरेक झालाय असे वाटले, तसेच कथा ही थोडी लांबल्यासारखी वाटली.
मधले काही अनुभव वाचताना कंटाळा यायला लागला होता पण शेवटच्या लग्नाने मन प्रसन्न झाले. :-)
काही प्रसंग मात्र डोळ्यासमोर उभे राहेले :-) अगदी खास शब्दांकन आहे :-) मस्तच :-)

दाद, तु प्रतिक्रिया वाचुन त्यावर विचार करतेस म्हणुन हा प्रपंच केला :-) तुला माहीत आहेच कुठल्याही वादात मी नसतोच, मला वाटले ते मी लिहीले

कृपया इतर वाचकांनी माझ्या प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया देऊ नयेत.
दादला वाटलं तर तीच विचारेल, काय असेल ते :-)


Daad
Wednesday, November 21, 2007 - 9:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज्य, तुमची मोकळी प्रतिक्रिया आवडली.
ही कथा नाही. कथा नक्की नाही.... म्हणून ललितात पोस्ट केलीये.

माझ्या मनात उगवलेली एक सकाळ आणि तिने दूर केलेलं झाकोळ.... इतकच "घडतंय."
ह्यात कुठे नाट्य नाही, शौर्य नाही, दु:ख नाही.... तसं म्हटलं तर फारसा आनंदही नाही.
एका बागेत घडलेली सकाळ.... सगळं रोजचच... अगदी फोटोशूटसाठी आलेली पार्टीही.

ह्यात काही असेल तर, माझं तिथे असणं(प्रत्यक्ष नाहीच अजून), हे सगळं नव्याने अनुभवणं, अधीरपणे पिऊन घेणं......
माझ्या नजरेने(??) जे काही बघितलं.... प्रत्येक लहान सहान गोष्टं तिच्या नवलाईसकट... शब्दात मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्नं यापरतं काही नाही.
तुम्ही म्हणता तसा, उपमांचा अतिरेक आणि मधले काही अनुभव वाचताना तुम्हाला आलेला कंटाळा.... हे ह्याच "प्रत्येक लहान सहान गोष्टं तिच्या नवलाईसकट... " चा परिणाम आहे.
मी पुन्हा वाचून बघितली आणि अजूनही ते सगळं "प्रत्येक लहान सहान गोष्टं तिच्या नवलाईसकट... " मला आवश्यक वाटतं.

तुमचं न आवडलेलंही सांगणं.... मला आवडलच.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators