Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 29, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » कार्तिक » काव्यधारा » कविता » Archive through November 29, 2007 « Previous Next »

Jayavi
Wednesday, November 28, 2007 - 1:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दोस्तांनो :-)

बापू....... सुरेख !!

मीनु, फ़ार ओघवतं लिहितेस गं....! सिझन फ़ारच आवडली :-)

देवा.....खूप छान !!

माणक्या.......क्या बात है!

पमा.... <<गडद अंधारात..
रिकाम्या जागा हरवतात..>> सुरेख !!

देश....... मस्तच !!

खूप दिवसांनी इतका बहर....... मजा आ रहा है यारो :-)


Pkarandikar50
Wednesday, November 28, 2007 - 2:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दोस्तहो!
आरसा नवी रचना नाहीय. खास लोकग्रहास्तव पुन्हा टाकली.
-बापू


Pkarandikar50
Wednesday, November 28, 2007 - 2:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका,

विचारीन विचारीन म्हणता राहून गेलं. नक्की आठवत नाहीये पण खूप दिवसांपूर्वी तू पोस्ट केलेल्या एका कवितेंत स्वत्:ला मिडिऑकर वगैरे काहीतरी म्हटलं होतंस. नक्की का? तुझ्या अलीकडच्या कविता वाचून मला आठवलं. तुला त्यावेळी खरंच तसं वाटत होतं की ती कलात्मक विनम्रता होती?

-बापू


Ajjuka
Wednesday, November 28, 2007 - 2:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो बहुतेक..
बरीच जुनी कविता होती ती. साधारण २००५ च्या फेब्रुवारीमधली. हो म्हणाले होते. विनय बिनय कसला.. जिथे पोचयच असतं तिथे पोचण्याची आपली लायकी आहे की नाही हे आपल्याला माहितच असतं. तोच वैताग येतो बाहेर असा कधी कधी.


Meenu
Wednesday, November 28, 2007 - 4:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खडतर दिवस

खडतर दिवस म्हणजे काय ?
खर्च नुसते, जमा नाय ..
आपण प्रेम करावं अन,
तिकडून नुसतं 'हाय' 'बाय'.
खर्च नुसते, जमा नाय ..
आपण करावी पायपीट अन,
मित्रांचा कायम काढता पाय.
खर्च नुसते, जमा नाय ..
आपण वेचावं आयुष्य सारं अन,
दूर दूधावरची साय.
खर्च नुसते, जमा नाय ..
खडतर दिवस म्हणजे काय ?


Meenu
Wednesday, November 28, 2007 - 4:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोबु, पमा, आनंदयात्री, जयु आणि सगळ्यांनाच धन्यवाद !

Princess
Thursday, November 29, 2007 - 4:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु... खर्च नुसते जमा नाय धम्माल ग... सगळ्यांच्या सगळ्याच कविता खुप्प छान....वाह मज्जा आली इथे येउन आज.



Mankya
Thursday, November 29, 2007 - 4:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो .. अनेकानेक धन्यवाद प्रतिसादासाठी !

देवा .. मस्त !
बापू .. ' आरसा ' परत आवडली !
मीनू .. ' सिझन ' आवडली !


रिक्त

सलग दोन शब्दातल्या रिकाम्या जागा
जेंव्हा दडवून ठेवतात महत्वाचा धागा
घाईत वाचताना साळसूदासारखे ते शब्द दोन
निवांतपणी अवघा बदलून टाकतात दृष्टीकोन
ध्यानीमनी नसतं नंतर अस्वस्थ करुन टाकेल
तेच रिक्तपण आपल असं मनच भरुन टाकेल
कागदभर पसरलेली शाई फक्त प्रस्तावना होती
उरलेल्या जागेत अव्यक्त पण सच्ची भावना होती
दिसणार्‍या लिखाणाचे उत्तरांकडे ईशारे होते
जे न दिसले त्यातील प्रश्न भेडसावणारे होते
एकवेळ ' पण, जर, तर ..' नक्की परवडल असतं
मनात आहे ते कमीतकमी स्पष्टच दिसल असतं
आणि म्हणे ," सगळं समजून घेण्यावर अवलंबून आहे,
पाहिजे ते न मागता उमजून देण्यावर विसंबून आहे ."
निःशब्द .. अव्यक्त .. रिक्त जागा याचा विचार करणे व्यर्थ
कालांतराने उपयोग नसेल तेंव्हाच उलगडेलच खरा अर्थ !

माणिक !


Jo_s
Thursday, November 29, 2007 - 4:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनू, खडतर दिवस, छानच

माणिक, मस्तच रे, ही "मी मात्र मुखपृष्ठावरच्याच काही शब्दांच्या अर्थाने भारावलेला !" सवय कवितेचा पार्ट २ वाटत्ये.


Devdattag
Thursday, November 29, 2007 - 5:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मंडळी..:-)
मीनु, जयावि मस्तच..:-)
माणिक छान आहे रे रिक्त..:-)
तुझ्या आधीच्या कवितेने फार आधी लिहिलेला एक शेर आठवला

उस भरी महफ़िल में ना जाने वो क्या कह गये
उनकी तो नज्म बन गयी, हम तस्सव्वूर ढूंढते रह गये


Vaibhav_joshi
Thursday, November 29, 2007 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह !!! आता गुलमोहोर वाटतोय .

सतीशच्या कवितेपासून ( त्या आधीचा वाचून झाल्या होत्या ) माणिकच्या रिक्तपर्यंत सर्वच कविता वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणार्‍या वेगवेगळ्या शैलीतल्या . सुंदर ......

देवा .. शेर आवडला .

सर्वांनाच पुढील लेखनासाठी शुभेच्छा


Vaibhav_joshi
Thursday, November 29, 2007 - 10:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुत्ता

गुत्ता म्हटल्यावर अशा गोष्टी घडणारच ...
तुम्ही निवांत कोपर्‍यातलं टेबल धरून
तीन पेग डाऊन असणार
कुणीतरी येणार ... समोर बसणार
आणि मग हळूच .. " बसलं तर चालेल ना ? "
" बसा बसा मी मसाला दूध घेतोय .. घेणार ? "
हसतंय ! हसतंय ! अरे नाही .. रडतंय येडं
?
" काही नाही .. बर्‍याच दिवसांनी हसू आलं म्हणून रडू आलं "
" ए बाबा .. नाव एम . एस . श्रोत्री का ? स्ट्रेट फ्रॉम दुनियादारी ? "
" हं "
" रडू बिडू नका हां प्लीज इथे सगळे ओळखतात मला , चीअर्स !
हां तर श्रोत्री , मी अमुक तमुक ...
मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर
संसार बिंसार ? एकदम ओक्के
एंजॉय करायला येतो इथे
लाईफ गिव्ह्ज अ किक व्हेन यु नो हाउ टू सिप
शुक शुक .. रिपीट लार्ज ...
यु नो श्रोत्री आपल्याला रडूच येत नाही
रादर वेळच नाही ... लाईफ इज सो फास्ट "
बॉटम्स अप .
सालं रडतंच आहे अजून
हॅट ! मज़ा किरकिरा कर दिया
" बिल घे रे "
वेटर बॅग घेऊन गाडीपर्यंत येणार
" बरं का रे .. तो वाटतोय वेडा
पण सॉलिड दुखावलेला दिसतोय
हसू नकात कोपर्‍यात उभे राहून ,
आणि हे घे त्याच्या बिलाचे पैसे "
साहेब .....
अं ?
" त्याचं बिल लावलं होतं तुमच्या बिलात .. रोजच्यासारखंच !!! "
" आं ? बरं बरं "
च्यायला .. बेवड्यांच्या संगतीत राहून
वेटर पण झिंगल्यागत बडबडणारच
अर्थात गुत्ता म्हटल्यावर अशा गोष्टी घडणारच !!!


Satyajit_m
Thursday, November 29, 2007 - 10:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

rikta ani khadatar diwas donhi mast. barech diwasani rangat chadhali ahe. are pan halu halu post kara.. ekacha aswad ghei paryant dusari tayar. Time please!!! gulmoharacha sadaa padala ahe.

Jayavi
Thursday, November 29, 2007 - 10:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निःशब्द .. अव्यक्त .. रिक्त जागा याचा विचार करणे व्यर्थ ....... माणक्या जियो :-)

सलाम जोशी साब.....वा जनाब... दर्द भी क्या खूब उतारते हो !!!!

Akhi
Thursday, November 29, 2007 - 10:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव खुप छान आज प्रथमच आले कविता वाचायला..... आणि अस वातल विनाकारण इतके दिवस miss केल

Anilbhai
Thursday, November 29, 2007 - 1:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है वैभव. बहुत खुब.

Pama
Thursday, November 29, 2007 - 1:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू, 'खडतर दिवस' आवडली.
माणिक..' ध्यानीमनी नसतं नंतर अस्वस्थ करुन टाकेल
तेच रिक्तपण आपल असं मनच भरुन टाकेल'
...मस्तच!!
वै भाऊ.. काय लिहू..!! तू लिहिलस म्हटल्यावर, अशा कविता घडणारच.. सुंदर!!




Swaatee_ambole
Thursday, November 29, 2007 - 2:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयू, ' उपेक्षित' छान आहे.
मीनू, ' सीझन' आवडली.
माणिक, ' रिक्त' झकास. भिडली एकदम.
वैभव, सुंदरच. :-)


Mankya
Friday, November 30, 2007 - 1:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुधीर, देवा, वैभवा, जया, सत्यजित, पमा, स्वाती .. खूप खूप आभार !
सुधीर .. तुला Part 2 वाटली का .. असेल असेल !
देवा .. शेर मलाही आवडला !

वैभवा .. क्या बात है यारा !
बर्‍याच दिवसांनी हसू आलं म्हणून रडू आलं .. वा ! व्वाह !
दुनियादारीची आठवण करून दिलीस .. सलाम आपला ' दुनियादारी ' ला !!

माणिक !


Daad
Friday, November 30, 2007 - 2:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आहा! मस्त वाटलं!
सगळ्याच कविता, एक से बढकर एक.... वैभव म्हणतोय तस्सा बहरलाय्- गुलमोहर.
पमा, जया, देवा, बापू, मीनू, माणक्या.... बहोत बहोत खूब!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators