|
चिन्नु, मला मीनूची 'शब्द' आणि पमाची ' अव्यक्त' ह्या दोन्ही कविता 'नेम' शी जवळीक साधणार्या वाटल्या. त्यामुळे नव्हे पण विचारांचं नेमकेपण आणि मांडणीचं नेटकेपण यांमुळे दोन्ही कविता मनाला भिडून गेल्या. अभिव्यक्ती म्हणजे काय? आपले विचार, विकार, भावना आपल्यापाशी असतात नि:शब्द स्वरूपात. [मी त्यांना बोचकी ओझी म्हटलंय, ते कदाचित कुणाला तेव्हढसं रूचणार नाही पण काहीवेळा कविसुद्धा स्वत्:ला हमाल भारवाही म्हणतातच की] त्या सर्वांना शब्दांच्या माध्यमातून प्रकट होण्याची वाट मोकळी करून देणं हीच अभिव्यक्ती नव्हे का? पण जेंव्हा शब्दच अपुरे पडतात, सुचत नाहीत, समर्पक येत नाहीत तेंव्हा जोर जबरदस्ती करून लिहीण्याचा आटापिटा करायचा हा एक पर्याय किंवा सगळी ओझी बोचकी नि:शब्दांनाच सांभाळू द्यायची हा दुसरा पर्याय असू शकतो, या अर्थाने मी तो शब्द प्रयोग केला होता. असो. आपल्या कवितेच्या एकेका ओळीवर कुणाला तरी विचार करावा असं वाटलं यावरच मी समाधानी आहे. एकमत होणं बर्याचदा बोअरिंग असतं नाही का? -बापू
|
वाह गुलमोहर हिवांळ्यात बहरलाय. सुंदर लिहीता आहेत सगळे धमाल प्रत्येकाने वेगळा विषय सुन्दर रित्या मांडला आहे.
|
Ajjuka
| |
| Tuesday, November 27, 2007 - 5:06 am: |
| 
|
करंदीकर, तुमच्या आणि बाकी सगळ्यांच्याच शब्दांनी थोडी ताकद मिळाल्यासारखं वातलं. आभार!
|
Jo_s
| |
| Tuesday, November 27, 2007 - 6:23 am: |
| 
|
बापू तुमचा "नेम" अचूक आणि अप्रतीम आहे. बघा किती ठिकाणी लागला. आणि छान काव्ये तयार झाली. Desh_ks, meenu, pama सगळ्यांच्याच छानच झाल्याहेत कविता. माणिक मी परवाच म्ह्टलं आणि तू अजून एक उत्तम कविता टाकलीस, छानच आहे ही पण
|
Desh_ks
| |
| Tuesday, November 27, 2007 - 7:53 am: |
| 
|
बापूंनी म्हटलंय चिन्नूला दिलेल्या उत्तरात, 'अभिव्यक्ती' बद्दल, ते सारंच सुंदर आहे. आणि बापू, तुमचं 'नेम' मधे मांडलेलं चित्रही खूपच छान! औदासीन्यातनं ठामपणे प्रकटणारा सार्थ आशावाद किती आश्वासक! "पुन्हा भेटतीलही ते, त्यांचा काय नेम?" खूप आवडलं. मीनू, 'शब्द' छान आहेत. पमा, 'अव्यक्त' खूप छान! "...अलगद पापण्यांत उतरून, त्यांचे डोह तयार होतात..." वा! माणिक, किती सुंदर लिहिलं आहे शामलीनं म्हटलंय तसं -"हं तर सगळ्यांनाच जाणवत असतं हे असं." -सतीश
|
Jo_s
| |
| Tuesday, November 27, 2007 - 8:22 am: |
| 
|
बापू, तुमची "आरसा" कवीता आठत्ये, खुप शोधली पण सापडत नाहीये. परत टाकाल का? सुधीर
|
Devdattag
| |
| Tuesday, November 27, 2007 - 8:56 am: |
| 
|
सगळ्याच कविता एकसे बढकर एक.. माझीही एक कविता ठरवलं असतं खुप बोलायचं तू माझ्याशी अन मी तुझ्याशी ठरवतो मग भेटायच ठिकाण शांत सुंदर गावाबाहेरची टेकडी मी पोहोचतो टेकडीवर.. तसा वेळेवरच तू माझ्या आधीच पोचलेली ठरवलं असतं खुप बोलायचं तू माझ्याकडे बघतेस हलकेच हसतेस खुणेनेच दाखवतेस मावळतीच आभाळ मग बसतो मी ही तुझ्या बाजूला काही न बोलता एकटक त्या आकाशाकडे बघत आपण एकमेकांकडे बघून हसतो मग बरंच काही बोललेली तू आणि सारं काही समजलेला मी परततो टेकडीवरून ओघळलेल्या वाटेने ठरवलं असतं खुप बोलायचं तू माझ्याशी अन मी तुझ्याशी
|
बापू, सतीश, सुंदर कविता. पमा, ' अव्यक्त' खूप आवडली. देवा, मस्त.
|
बापु,माणिक,सतीश, देश, पमा आणि देवा खुप दिवसांनी इकडे आल्याचे चीज झाले.. अप्रतीम लिहिताय सगळे..!!
|
आरसा दूर-दूर हून लोक येतात, माझ्या घरी, लाम्बच लाम्ब रान्गा लावतात, झुम्बड उडते. माझा आरशांचा संग्रह पहाण्यासाठी. शेकडो, हजारो, आरसे, पहावे तिकडे आरसे. छोटे, मोठे,गोल, चौकोनी, षटकोनी, छान-छान सजावटी, मढवलेल्या महिरपी, जडवलेली नक्षी, बुट्टे, पाने, फुले, वेली. काहींच्या भोवती, चित्र-विचित्र आकृती. काही वेळाने, पाय थकतात त्यांचे. आपली तीच ती छबी न्याहाळून, डोळेही शिणतात, कंटाळा येतो. किती पहायचे? शेवटी सगळे आरसेच. 'काय मुलुखावेगळा छन्द हा, नाही?' 'पण परिश्रम किती घेतले असतील.' 'हौसेला खरंच मोल नसतं.' 'एका आरशात दिसतं, तेच दुसर्यांत, काय करणारे हा इतक्या आरशांचं?' 'सरकारने ताब्यात घ्यावा हा संग्रह, छानसे म्युझियम होईल, नाही का?' नानाविध प्रतिक्रिया, मतं, प्रतिवाद, माझ्या सवयीचं झालंय आता सारं. एक जण मात्र निघाला, समोर येऊन बसला. "दोन प्रश्न विचारू कां?" मला म्हणाला. मी मान डोलावली, तशी म्हणाला, "का?" मी म्हटले,"आणि दुसरा प्रश्न?" "आणखी किती जमले की थांबणार?" त्याचा दुसरा प्रश्न, तयारच होता. "दुसत्या प्रश्नाचं उत्तर आधी देतो, मग पहिल्याचे, कदाचित नाही द्यावे लागणार. खरं उत्तर आहे, 'मला माहीत नाही'. मलाही वाटतं, कधी कधी,पुरे झाले आता, थाम्बावं इथेच. नको आणखी आरसे. पण एकच आरसा आणखी हवाय, तो मिळेपर्यन्त, कसं थाम्बणार?" "आणखी कसला आरसा हवाय तुला?" "तू नीट पाहिलंस का? संग्रहातला एक आरसा दुसर्यासारखा नाही. तुला काय दिसलं, ठाऊक नाही, पण मला प्रत्येकात दिसतं वेगळं प्रतिबिम्ब. एक मी दुसर्या मी सारखा नाही. अजून शोधतोय, शेवटचा एक आरसा, जो दाखवेल, जुन्यातल्या एकातरी प्रतिबिम्बाची पुनरावृत्ती. एकदातरी, फक्त एकदाच, एकाची दुसरी हुबेहूब आवृत्ती. घेऊन ये, माझ्या साठी, मिळाला तुला, कुठे जर, असला आरसा, शेवटचा." बापू
|
Jayavi
| |
| Tuesday, November 27, 2007 - 7:14 pm: |
| 
|
वा..... किती छान !! किती छान बहरलाय गुलमोहर.... मज्जा येतीये...!!
|
Jayavi
| |
| Tuesday, November 27, 2007 - 7:19 pm: |
| 
|
उपेक्षित का वाटतं इतकं निराधार....... शब्दांशिवाय.... ते सुद्धा मुद्दाम करतात अडवणूक जाणूनबुजून.... मला हतबल होताना बघून, विजयोन्मादानं अधिकच उधळतात त्यांना गोळा करण्यातच थकायला होतं हातात आलेल्या चार-पाच शब्दांचीच जुळवाजुळव करावी तर.... तेच अंगावर येतात मी गुदमरते.... याचकासारखी हात पसरते भीक नकोय.... माझेच हवेत मला ... .. पण माझ्या दुबळ्या हाकेला दुर्लक्षून ते सरळ निघून जातात आणि मी .... मी रहाते तशीच उपेक्षित ! नि:शब्दातून व्यक्त व्हायची सवय करायला हवी आता.... जयश्री
|
Meenu
| |
| Wednesday, November 28, 2007 - 3:01 am: |
| 
|
पमा, देश मस्त. देवा छान रे. जयु निशःब्दातनं व्यक्त होणं हम्म. तेवढं सोपं नाहीये नं ? बापु आरसा पुन्हा आवडली.
|
Meenu
| |
| Wednesday, November 28, 2007 - 3:05 am: |
| 
|
कुठून सुरुवात करावी ? कुठून सुरुवात करावी ? पानगळ .. पानगळ .. की वसंताची वाट पहावी ? कुठून सुरुवात करावी ? साफ करावी घासुन पुसून, की घ्यावी नविन कोरी पाटी ? कुठून सुरुवात करावी ? करावीच का सुरुवात ? की करावा सन्मान, नजिक आलेल्या अंताचा ? कुठून सुरुवात करावी ?
|
Meenu
| |
| Wednesday, November 28, 2007 - 3:41 am: |
| 
|
सिझन सध्या सिझन आहे कविता कळण्याचा .. किती दिवस टिकेल सांगता येत नाही .. रोजचे व्यवहार, कामधाम, गुंतागुंती वाढत जातात.. आणि मग कळेनासे होतात कवितांचे हळवे भाव .. कधी कधी तर भिती वाटते कवितेची .. हळवं हळवं होऊन वहावत जाण्याची .. डोळ्यामधे दाटुन येणार्या पाण्याची .. पण सध्या सिझन आहे कविता कळण्याचा .. किती दिवस टिकेल सांगता येत नाही ..
|
Jo_s
| |
| Wednesday, November 28, 2007 - 5:17 am: |
| 
|
व्वा, बापू परत आरसा मिळाला, शेवटचा नाही हं... देवा, जयावी, मिनू मस्त चाललय, व्वा
|
Meghdhara
| |
| Wednesday, November 28, 2007 - 10:41 am: |
| 
|
सामुराइ.. जहाज आता खुपच छान. करंदीकर त्यांचा काय नेम..? व्वा! आरसा खुपच सही. अज्जुक्का.. कविता कळण्याचा सिज़न.. खरच! मेघा
|
मीनू, मस्त कविता.. एकदम सोप्पी.. सहज.. अर्थवाही.. लिहीत रहा... शुभेच्छा...
|
Pama
| |
| Wednesday, November 28, 2007 - 1:08 pm: |
| 
|
सर्वांना मनापासून धन्यवाद.. बापू.. 'आरसा' वाचली नव्हती आधी. छानच आहे. देवा, जयु.. आवडली कविता. मीनू.. छान सहज लिहितेस.
|
Gobu
| |
| Wednesday, November 28, 2007 - 1:26 pm: |
| 
|
जयवी,मीनु,बापु,देवदता, खुप छान रचना! माणिक, अतिSSSशय सुंदर मित्रा!!! अतिशय अर्थपुर्ण, शेवटचे कडवे तर फ़ारच आवडले!! (शब्दरचनेला ८ गुण तर कल्पनेला १० पैकी १०!)
|
|
|