|
Sush
| |
| Tuesday, November 06, 2007 - 9:05 am: |
| 
|
अरे sorry वेंधळेपणाचा कळस. काये मी पहिले post वाचलेच नाहित. असो, दाद सुंदर कथा. त्यातुन अपंग मुलांचे स्वभावचित्र सुंदर रेखाटलेस.
|
Mi_anu
| |
| Tuesday, November 06, 2007 - 9:37 am: |
| 
|
सुंदर आणि आशावादी संदेश देणारी कथा. लिहीत रहा.
|
Monakshi
| |
| Tuesday, November 06, 2007 - 9:59 am: |
| 
|
दाद. u r simply great!!!! अगं काय ते शब्द, काय त्या वाक्यरचना, निरगाठी, सूरगाठी, धाग्यांचा गुंता. simply amazing . तुझी गोष्ट एकदा वाचायला घेतली ना, की कितीही महत्त्वाचं हापिसचं काम असलं तरी ते बाजूला टाकून मी ती सगळी गोष्ट पूर्ण वाचून काढते. ती अर्धवट ठेवून दुसरी कामं करायला जमतच नाही.
|
Itgirl
| |
| Tuesday, November 06, 2007 - 10:02 am: |
| 
|
मोना, तुझा बॉस पण हे वाचत असेल तर तुझ काय खर नाही बघ!
|
नमस्ते, मी मागच्या १५ दिवसापासून सर्व कथा वाचून काढ ल्या आहेत. दाद च्य कथा मनाला अतिशय भावतात. कथेतील सर्व चित्र डोळ्यासमोर उभे रहाते आणि पात्र देखिल. सर्वाना दिवाळीच्या हार्दीक शुभेछया.
|
Lampan
| |
| Tuesday, November 06, 2007 - 11:13 am: |
| 
|
मागे १दा केला होता .. आता परत १दा _/\_ साष्टांग मानुन घेणे ... आणि हो ते "टकरी कावळिण" जाम आवडलं ... कधी वापरता येइल त्याची वाट बघतोय 
|
Monakshi
| |
| Tuesday, November 06, 2007 - 11:16 am: |
| 
|
हे हे हे. शैलू, माझा बॉस पण मराठीच आहे उलट तो मला धन्यवादच देईल एवढी छान कथा वाचायला दिल्याबद्दल.
|
R_joshi
| |
| Tuesday, November 06, 2007 - 11:24 am: |
| 
|
दाद तुझ्या कथेंना दाद द्यायला शब्द नेहमीच अपुरे पडतात. अजुन एक उत्कृष्ट कोटीतील कथा वाचायला दिल्याबददल धन्यवाद आणि हो दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
|
Ajai
| |
| Tuesday, November 06, 2007 - 11:38 am: |
| 
|
अरे बापरे केव्हढ्या या प्रतिक्रिया..त्याही कोणताही वाद न होता. :- P . जास्त गुंता न करता सहज उकल केलित, खुप नाही पण आवडली कथा.
|
दाद, उत्तम प्रतिची कथा जी एका दिवाळी अंकात नक्कीच शोभली असती, ती दिवाळी आधीच वाचायला मिळाली! अगदी खरेखुरे अनुभव मांडताना कधी कधी नाटकीपणा लिखाणात येतो, तो तुमच्या कथेत नावाला सुद्धा आढळत नाही. वाचता वाचता डोळे भरुन आलेच खूपच वास्तवदर्शी कथा! ह्यापुढे दाद देण्यासाठी शब्दच नाहीत! तुम्हाला अन तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा! असेच सुंदर लिहित रहा!
|
Vrushs
| |
| Tuesday, November 06, 2007 - 2:02 pm: |
| 
|
खरच सुंदर. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
|
Mahe
| |
| Tuesday, November 06, 2007 - 2:16 pm: |
| 
|
दाद, खुपच छान! नेहेमीप्रमाणेच!! दिवाळीची सुरुवात मात्र जोरात केलीत. तुम्हाला आणि सर्वाना दिवाळीच्या शुभेच्छा!!
|
Lukkhi
| |
| Tuesday, November 06, 2007 - 2:24 pm: |
| 
|
दाद तुमच्या इतर कथांप्रमाणेच ही कथादेखिल अत्यंत उच्च प्रतीची. एकदम आवडली. उत्तम कथाबीज व्यवस्थित मांडणी सुरेख भाषाशैली. सर्वच अंगांनी ही कथा परिपूर्ण वाटली. शेवटाजवळचे सुनिताचे जे epilog सदृष स्वगत आहे, ते थोडेसे अनावश्यक वाटले. कथेतील आधीच्या प्रसंगांमध्ये 'गुंता कसा सुटला' याबद्दल बरीच माहिती मिळाली, मग त्या स्वगताची खरच गरज उरली होती का, आणि त्याऐवजी घटनाक्रम अजून विस्तृत करुन सांगितला असता तर चालले असते का असा प्रश्न मला पडला. अर्थात यामुळे कथा आहे त्यापेक्षा चांगली वाटलीच असती हे मी खात्रीने सांगू शकत नाही. एक दर्जेदार कथा वाचायला मिळाल्याबद्दल अनेक धन्यवाद.
|
Kshitij_s
| |
| Tuesday, November 06, 2007 - 2:30 pm: |
| 
|
सुन्दर कथा दाद. लिहित रहा.
|
Mrinmayee
| |
| Tuesday, November 06, 2007 - 3:06 pm: |
| 
|
दाद, नेहमीप्रमाणेच अप्रतीम कथा!!! 'भरले डोळे घेऊन वळण्याचं झालं नाही तिला. तशीच पाठमोरी परत परत पोहे ढवळत राहिली.....' कथा इथवर आल्या नंतर अखेरच्या उकलीपेक्षा, गिरिशला मदत करता करता चिन्मयने आपल्याच गुंत्यातल एक महत्वाचा धागा गिरिशच्या हाती दिला होता.... आत्मविश्वासाचा! सुनिताच्या मते दुरंगी मोज्यासारखा दोन रंगांचा.... एका बाजूने बघावं तर आत्मविश्वासाचा अन दुसर्या बाजूने सह-अनुभूतीचा'.. हे एकच वाक्य कथेचा शेवट करण्याच्या ताकदीचं आहे असं मला वाटतं. पुन्हा एकदा, अशी दर्जेदार कथा वाचण्याचा आनंद दिलास, थँक्यु!
|
Sunidhee
| |
| Tuesday, November 06, 2007 - 5:18 pm: |
| 
|
दाद दाद, काय सुरेख लिहिलयस गं!!! मला सुनिताचे चिन्मय बद्दलचे स्वगत खूप आवडले. खरंच अश्या वयातल्या मुलांवर अशी वेळ आली तर किती जपावं लागते त्यांचा मन खंबीर रहाण्याकरता ते कळते. दिवाळी साठी खू SSSSS प खू SSSS प मोठ्ठी SSSSSS कथा लिही.
|
दाद कथा आवडली पण काही प्रश्न आहेत. चिन्मय फक्त अंपग आहे एवढेच कळाले. त्याचा मनात नेमके काय चालु आहे हे कथेतुन कळाले नाही, प्रथम काहीच न करन्याची ईच्छा असलेला चिन्मय नंतर कसा बदलतो हे उमगले नाही, (कदाचीत गिरीश च्या वागन्यामुळे पण तेवढा भाग तु अजुन जास्त खुलवु शकली असतेअस असे वाटते. तसेच सुनीताचे स्वगत उगीच वाटले तरी अपंगा कडे बघन्याचा द्रुष्टीकोण बदलवनारे ठरते त्यामुळे आवडले पण तिची मदत चिन्मयला (मान्सोपचार वा चिन्मयचा मनातला गुंता ) झालीच नाही, कथेत अचानक वाटते की ती चिन्मयला मदत करनार. तु तुझ्या खास शैलीत तिकडे नक्कीच काही टाकु शकली असतीस. पण त्या सर्वात पहील्या प्यारेग्राफचा कथेशी संबंध मला लावता आला नाही, तसेच या प्रतीक्रीया मनातल्या आहेत म्हणुन लिहील्या. उगीच काही वाद सुरु करावा असा उद्देश बिलकुल नाही.
|
दाद, कथेची 'theme' छान आहे. शेवटी being able to make a difference यापेक्षा मोठं motivation च नाही जगण्याला, हे खरंच. तुझी भाषाशैली नेहेमीप्रमाणेच सुंदर. मात्र कथेची मांडणी या वेळी नाही आवडली मला. सुरुवात सरधोपट वाटली, शेवटचा भाग पूर्णतः अनावश्यक वाटला ( हे निष्कर्ष वाचकावर सोडायला हवे होते), केदार यांनी म्हटल्याप्रमाणे सुनीताच्या मानसोपचारतज्ञ असण्याचा उपयोग ना पात्रांना झाला, ना कथेला, ( उदा. as a professional ती चिन्मयच्या आईवडिलांच्या denial चं सुद्धा वस्तुनिष्ठ मूल्यमापन करेल. - ती सगळ्याच प्रसंगात एखादी समंजस, सह्रदय, आशावादी बाई वागेल तशी वागते, व्यावसायिक मानसोपचारतज्ञ वागेल तशी नाही - ) असं वाटलं, आणि एकूण flow , ज्या क्रमाने आणि अनुषंगाने ह्या पात्रांविषयीची माहिती ( त्यांचे स्वभाव, व्यवसाय, छंद, त्यांचं वंध्यत्व, इ.) वाचकासमोर येते, त्यात सुधारणा शक्य आहे असंही वाटलं. अजून नेटकी आणि आटोपशीर होऊ शकली असती ही कथा. सुनीता जर प्रथमपुरुषी निवेदकाच्या भूमिकेत असती तर कथा अजून खुलली असती की काय असंही वाटलं. लहान तोंडी मी जरा फारच मोठा घास घेतलाय याची मला कल्पना आहे. पण तू ह्या suggestions आणि त्यामागची कळकळ नक्की समजून घेशील अशी खात्री वाटली म्हणून लिहायचं धाडस करत आहे. पटलं नाही तर सोडून दे.
|
Yog
| |
| Tuesday, November 06, 2007 - 8:59 pm: |
| 
|
दाद, काही अनावश्यक तपशिल वगळता कथेची मान्डणी आवडली, कथा मनाला भिडते, मुख्ख्य म्हणजे honest वाटते. दिवाळी अन्कात काही खास लिहीले असेल तर वाट बघतो.. (तोकडा) स्वानुभव : एकदा flow मधे लिहायला लागल्यावर सर्व बारीक सारीक तपशिलासकट लिहीले जाते. मागाहून फ़ेरफ़ार करून पुन्हा आपलेच लेखन आपण अधिक मुद्देसूद किव्वा नेमके, अचूक, सगुणात्मक बदल करून लिहू शकतो (अधिक objective अन्गाने) हे खरे आहे. अर्थात तेव्हडा वेळ हाताशी असणे मुश्कील आहे शिवाय आपलाच review होवून आपण बदल करेपर्यन्त ते देवनागरी लिखाण इथे कुणाला दिसणार नाही अशी काही सोयही नाही. ललित लिहीताना मात्र flow ला अधिक महत्व असल्याने असे बारीक सारीक तपशिल अधिक लज्जत देतात. असो. लेखक व वाचक दोघान्चीही भूमिका subjective असल्याने जे लिखाण मनाला भिडते ते उत्तमच असते, त्यातील सर्व तपशिल व गुणदोषासकट.
|
Shachi
| |
| Tuesday, November 06, 2007 - 9:04 pm: |
| 
|
नेहमी वाचणार्याच्या डोळ्यातुन पाणी काढता तुम्ही दाद... अगदि नकळत... खुप सुन्दर कथा.
|
|
|