|
Aashu29
| |
| Tuesday, November 06, 2007 - 9:30 pm: |
| 
|
मनाला भिडेल असे लिहितेस नेहमी, कसे जमते बुवा एकेकाला? एखाद्या अपंग निराश मुलाचं मन खरंच उभारि धरु शकेल हि कथा वाचुन!
|
Pardesi
| |
| Wednesday, November 07, 2007 - 12:19 am: |
| 
|
शलाका, एकदम सुरेख. मस्त जमून आली आहे.
|
Farend
| |
| Wednesday, November 07, 2007 - 1:36 am: |
| 
|
शलाका, नेहमीप्रमाणे सुंदर कथा! धाग्यांच्या गुंत्याची उपमा व बागेत काम करायला आवडणार्या सुनीता ची झाडांबद्दलची उपमा दोन्हीही जमल्या आहेत. इतर काही कथा जशा 'पंच' ने संपवल्या आहेत तशी ही मुद्दाम संपविली नाही का?
|
Marhatmoli
| |
| Wednesday, November 07, 2007 - 2:16 am: |
| 
|
"आणि कधी कधी तर घरातलेच म्हणायचे ते खोदतात खड्डे, हळव्या मनाच्या मातीत.... मुद्दाम नाही पण चुकुनही धक्का लागला तर कोसळतात हे मनाचे कोपरे. हळू, हलकी फुंकर घालूनच वाळवायची असतात असली आसवं. त्यांना स्पर्शही सहन होत नाही! ......" अप्रतिम! कथा खुप आवडलि. पण... Lukkhi, Mrinamayee, Swati ani Kedaar च्या मताशिहि सहमत.
|
Maanus
| |
| Wednesday, November 07, 2007 - 4:55 am: |
| 
|
मला नाही कळाली गोष्ट... एकदाच वाचली. परत एकदा वाचावी लागेल.
|
शलाका, नेहमी प्रमाणे "दाद" द्यायला शब्दच नाहित... एकदम सुंदर कथा...
|
Alpana
| |
| Wednesday, November 07, 2007 - 10:46 am: |
| 
|
दाद..... अतिशय सुंदर कथा.... तुझ्या कथेला काय अभिप्राय लिहावा हेच कळ्त नाही..... इतके चांगले चांगले शब्द आम्हाला सुचत्च नाहित..... आणि थॅंक्स दिवाळी अगोदर... गावी जाण्याअगोदर कथा पुर्ण झाली......
|
Lopamudraa
| |
| Wednesday, November 07, 2007 - 1:08 pm: |
| 
|
दाद सुरेख अजुन काय प्रतीक्रिया देणार..!!
|
Supermom
| |
| Wednesday, November 07, 2007 - 1:54 pm: |
| 
|
दाद, सुरेख, अप्रतिम लिखाण. खूप आवडलं.
|
Divya
| |
| Wednesday, November 07, 2007 - 2:42 pm: |
| 
|
निवांत कथा वाचली तुझी, चहा जसा घोट घोट घेउन प्यावा तशी. नेहमी वाचते तुझ्या कथा पण इतके अभिप्राय असतात कि वाटायच मी अभिप्राय दिला काय नाही दिला काय, काय फ़रक पडणार आहे. पण तु तर वेगळीच निघालीस खुप उंची गाठलेल्या तुझ्या या कथांचा दोरा मात्र अगदी जमिनीवर पाय आहेत याच भान ठेवुनच धरलायेस ते जास्त भावल तुझ्यात. या कथेत हे खुप आवडल कि गुंत्याची उकल करायला गुंता झालाय हे आधी स्वीकाराव लागत मगच उकल होते. पुढच्या कथांना मनापासुन शुभेच्छा.
|
Chinnu
| |
| Wednesday, November 07, 2007 - 6:25 pm: |
| 
|
दाद, कथा आवडली. गुंत्यात गुंतलेला गिरिश आणि वळसा घालून पोहे आणणारी त्याची बायडी पण आवडली! गिरिशच्या आईचा एकुलता एक सॉल्लिड डायलॉग भारी आवडाला. एकच गोष्ट करता आली तर पहा. चिन्नुची व्यक्तिरेखा अजून थोडी खुलविता आल्यास बरे होईल. तुम्ही चिन्नुविषयी जे लिहिले आहे, त्याबद्दल नाही, पण गिरिशला आधार देतांना चिन्नु थोडा अजुन strong दखविता आला तर? अर्थात you know better! Thanks.
|
सुंदर कथा!!!मेंदुपेक्षा हृदयाला जाऊन भिडते!!!
|
Rimzim
| |
| Thursday, November 08, 2007 - 8:37 pm: |
| 
|
कथा सुंदर आहे, आहे आणि मनाला खुप स्पर्षुन (बहुतेक शब्द योग्य असावा) जाते. मान गये दाद....
|
Daad
| |
| Thursday, November 08, 2007 - 10:06 pm: |
| 
|
बापरे.... इतक्या प्रतिक्रिया! मान गये लोक्स! 'धन्यवाद'- सव्यसाचीला स्मरून (मी thanks heaps म्हटल्यावर त्याने जरा तोंड वाकडं केलं होतं. ). सगळ्यात आधी एक कबुली- ही गोष्टं इतर गोष्टींसारखी आधी लिहून पोस्टली नाहीये. प्रोजेक्टचं इम्प्लिमेंटशन करताना शुक्रवारपासून चार दिवस कामाला वाहून घेतलं होतं- ऑफिसातच पथारी! त्यात वेळ मिळाला तेव्हा काहीतरी रिकामटेकडेपाणाचा उद्योग म्हणून पोस्टली... म्हणजे पोस्टतानाच लिहिली... किंवा लिहिताना पोस्टली. (आता हा गाडावपना कबूली केल्यावर बरं वाटतय, मलाच!) अशा कथा लिहू शकणार्यांना साष्टांग प्रणिपात! इतक्या जणांच्या डिटेल प्रतिक्रिया आहेत की, त्याला उत्तर म्हणजे एक गोष्टंच होईल. तेव्हा माझा एकच अभिप्राय.... गोष्टं तुम्ही म्हणताय तसा "मांडणीचा विचार न करता" केलीये हे खरच आहे. कुठे व्यक्त व्हायला हवी आणि कुठे संदिग्ध हवी ह्याचा पूर्ण विचार नाहिये... त्यामुळे अतिशय ताकदीची पात्रं असूनसुद्धा सुद्धा त्यांच्या 'रोल'ला पूर्णं न्याय मिळाला नाहीये. खरतर सुनिताच्या तोंडचं स्वगत लिहिल्यावर इतकं रिकामी वाटलं की, पुढे चक्कं गुंडाळली.... (तोपर्यंत ऑफिसमधली पथारी गुंडाळण्याची वेळ आली होतीच) आज ही कथा नव्याने वाचल्यावर त्यातल्या अनेक त्रुटी लक्षात आल्यात. अगदी उत्तम ingradients हाताशी असूनही planning नसल्यास फसलेला अनारसा बघितलाय का कधी.... अगदी दारूण्- करणारा, खाणारा आणि अनारसाही! ही कथा एक उत्तम उदाहरण. (पण मी अजूनही अनारसा करते....) हीच कथा एका वेगळ्या मांडणीसह, त्यातल्या पात्रांना न्याय देण्याचा माझ्यापरीने पूर्णं प्रयत्नं करून परत एकदा लिहीन... नक्की! सगळ्या मायबोलीकरांनो, तुम्हाला, तुमच्या कुटुंबियांना आणि मित्र-परिवाराला दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा! सगळ्यांना पुढली सगळीच वर्षं आरोग्यपूर्ण आणि सुख-समाधानाची जावोत!
|
Ashwini
| |
| Friday, November 09, 2007 - 4:08 am: |
| 
|
शलाका, नको लिहूस परत. राहूदे अशीच. छान आहे. मला स्वतःला उत्स्फूर्तता जास्त भावते. प्रत्येक कथा perfect असायला पाहीजे असं थोडीच आहे? तुझ्याच भाषेत सांगायचे तर एखादा सूर चुकला तरी काही हरकत नाही. जे तुला मांडायचे आहे ते अतिशय व्यवस्थितपणे लोकांपर्यंत पोहोचते आहे. मूळात तुझे विषय strong असतात, कल्पना सुरेख असतात आणि शब्दवैभवाला तर उपमाच नाही. अधिक नेटकेपणाने मांडता येईलही परत लिहीलिस तर पण मला वाटते की त्यातला प्राण हरवून जावू नये. असो हे माझे मत झाले.
|
T_pritam
| |
| Friday, November 09, 2007 - 6:10 am: |
| 
|
अश्विनी ला अनुमोदन. खरच तुम्ही परत नका लिहु ही कथा... आहे तशीच खुप सुरेख आहे. तुमच्या कथा नेहमी अप्रतिम आणि संदेशात्मक असतात. लिहायची style तर सुंदरच. कधी कधी विचार करतो की कसं जमतं असं लिहायला... मला तर कधी २ ओळींचा response पण लिहिता नाही येत. anyway, मस्त वाटली कथा... गिरीशच्या आईचा dialogue तर जबरदस्त... Happy Diwali!!!
|
दाद, धन्यवाद ! तुझे ते दिवाळीच्या शुभेच्छांनी संपणारे लिखाण पाहील्यावर ४ दिवस काही लिहू नये अस वाटल होत. पण आता इतर आल्याच आहेत तर...(खर तर मलाच काही काम नाहीये ) एका कठोर टिकाकाराच्या दृष्टिकोनातून... "कथा अगदीच फालतू आहे. इतकी सरधोपट क्था कधी वाचली नव्हती पूर्वी. छ्या, दिवाळीची सुरवातच इतकी बेकार... आणि हिरविणीने (नायिकेने) तिच्या बालमनतज्ञतेचा उपयोग करून, त्या मुलाचा प्रश्न ४ दिवसात सोडवला अस ४ वाक्यात लिहून कथांत गोड करून प्रकरण संपवायच सोडून चांगल सणासुदीला त्या हिरोला (नवरा) कशाला उगाच पाडायचे, त्याचा पाय मोडायचा, ऐन दिवाळीला त्याच्या सहकार्यांना वैताग द्यायचा म्हणतो आम्ही? आणि ४ वाक्यात संपवली असती तर आम्ही चाकरमाने लोक फराळाच्या तयारीला लवकर जाऊ शकलो असतो. मायबोलीचा ई कागद पण वाचला असता. काही पर्यावरणाचा विचार पण आहे की नाही? अर्थात कथा सोडून नायिकेला काय पडली आहे म्हणा. इथे आम्हाला प्यायला पाणी नाही आणि ही मंडळी अखंड डुंबताहेत पाण्यात ! सगळा पैशाचा, वेळेचा अपव्यय. आणि वर म्हणे कथा परत लिहीणारे. हटकेश्वर हटकेश्वर आता आमच पोस्ट पाहून येतीलच इतर टवळे वा वा करायला. आलेच आहेत वर म्हणा. सगळी संघटीत गुंडगिरी आहे. आम्ही सुचवलेले कठोर आत्मपरिक्षण करायची गरजच काय?"
|
Manuswini
| |
| Friday, November 09, 2007 - 8:27 pm: |
| 
|
सव्या, काय ठीक आहे ना सगळे? दिवाळी फराळ ज्यास्त झाला केला का? दाद, दादला काय लिहायचे बरे. एक असते हिच्या कथेत काही काही शब्द इतके पॉवरफूल असतात तीन तीन वेळा वाचून मग कळल्ते(हा माझा प्रॉबलेम आहे बरे का...) असो, समस्त मायबोली परीवारास मनुकडून दीपावली शुभेच्छा!
|
>>दिवाळी फराळ ज्यास्त झाला केला का? ते एक पार्सल येणार होत चिपळूणहून, त्याच काय झाल कोणास ठाऊक मधल्यामधे VA वाल्यांनी लंपास केले बहूतेक
|
Manuswini
| |
| Sunday, November 11, 2007 - 10:29 pm: |
| 
|
all the way चिपळुणहून पार्सल येणार होते? तु त्यांना पत्ता नसशील दिलास नीट.
|
Meggi
| |
| Monday, November 12, 2007 - 1:33 pm: |
| 
|
दाद, सुंदर कथा.. ही कथा नव्याने लिहिण्याऐवजी नवीनच कथा लिही ना
|
Amruta
| |
| Monday, November 12, 2007 - 5:55 pm: |
| 
|
दाद, तुझ्या कथेतल्या एकसे एक डायलॉग पुढे बाकिच्या खटकणार्या गोष्टींकडे मी पुर्ण दुर्लक्श केल. मला तुझी शैली प्रचंड आवडते. अशीच लिहित रहा.
|
Bhagya
| |
| Monday, November 12, 2007 - 11:31 pm: |
| 
|
मला वाटतंय, दाद, सगळे तुझ्याकडून खूप उच्च दर्जाची अपेक्षा करतायत आणि ते रास्तच आहे. पण कधी कधी अगदी उस्फ़ूर्तपणे, जशी 'आतून' आली तशी गोष्ट वाचण्यात काय हरकत आहे? like a working document ग! म्हणजे कथेच्या मांडणी, घाट यापेक्षा सुंदर विचार आणि लेखिकेच्या मनातलं कळतं. परत लिहू नकोस ग! त्यापेक्षा दुसरं काहि लिही!
|
|
|