Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 02, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » आश्विन » कथा कादंबरी » क्लोजप » Archive through November 02, 2007 « Previous Next »

Ajjuka
Thursday, November 01, 2007 - 2:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी माझी... कुठलेही explaination द्यायला तू बांधील नाहीस. असला कीस पाडणारे केवळ खुसपटंच काढत बसतात. कथा म्हणून चांगली मांडलीयेस. अनुभव नक्की कुणाचा यात शिरून लोकांनी आपले आंबटशौक दाखवलेत. तू सरळ दुर्लक्ष कर.

Rimzim
Thursday, November 01, 2007 - 3:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथा लेखिकेची च आहे असे जरि वाटत असले तरी ती कथा कोणाची आहे या पेक्षा लेखिकेने मांडलेला मुद्दा जास्त महत्वाचा आहे.

अशी माणसे पण असतात बापरे त्यामुळे निदान मला तरी मायबोली खेरीज ईतर ठिकाणी बोलायला भिती वाटते. अर्थात अपघाताने ईथेही काहि बरे वाईट अनुभव आले. पण एकंदर ईथे आपण खुप सेफ आहोत असे वाटते.

अजुन एक मी माझी..... जर ती व्यक्ती ईथे मायबोली वर असेल ( शक्यता कमी) तर मला तर प्रामाणीकपणे वाटते कि तुम्ही त्याचा ID Declare करावा. निदान पुढच्यास ठेच मागचा शहाणा.



Sahi
Thursday, November 01, 2007 - 5:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही रिमझिम म्हणतेय ते योग्य वाटत आहे. तो माणुस ईथे असावा असे विनाकारण (?) वाटत रहाण्यापेक्शा सरळ एक्स्पोज केलेले बेस्ट.
जरी नाही केलेस तरी हे धाडसाने लिहिल्या बद्द्ल तुझे आभार आणि कौतुक नक्किच आहे


Manuswini
Thursday, November 01, 2007 - 7:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या प्रकारावर बरेच लिहिण्यासारखे पण सध्या मला एकच प्रश्ण पडतोपडलाय,
कुठलीही कथा वाचून त्याबद्दल स्वभावीक कुतुहलता नी प्रश्ण पडणे ठीक आहे पण अतीशय वात्रट्पणे(हो मला तो वात्रटपणाच वाटतो) नी उगाच काहीही कारण नसताना लेखकाला किंवा लेखीकेला हा तुझा स्वतचा personal अनुभव आहे का नाही तसे कबूल करण्यास लावणे म्हणजे मुर्खपणा आहे. मला तरी असे वाटते जेव्हा कोणी लेखक लीहितो तेव्हा नक्केच तो 'त्याचा' अनुभव असतो मग तो त्याचा स्वतचा असो वा जवळचा काय फरक पडतो. कुतुलहतेने विचारणे वेगळे असते.
कळस म्हणजे मागे स्वतची सत्य कथा आहे मग दुसरी ID कशाला घेवून लीहीता असे शेरे होते कुठल्याशा कथेवर. मग बिचार्‍या लेखकाला पुर्ण explaination द्यावे लागले.
अरे यार तुम्ही चर्चा कथेवरच मर्यादीत करा ना. लेखक काय करतो नी कश्या रीतीने आपले अनुभव शेयर करतोय ह्याचे तुम्हाला काय करायचेय?( Mark my words, I am NOT supporting duplicate ID here ) पण उगाच काय स्वत एकदम दूध से धूली वागून विषय बदलायचा.
नसेल पसंत किंवा अगदीच आक्षेपार्य असेल नी जर त्या सौम्य शब्दात सांगु शकता.


Manuswini
Thursday, November 01, 2007 - 8:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विषय संकेत स्थळाचा आहे म्हणून मी _ माझी ची माफ़ी मागून लीहीतेय(कारण कथा तीची असताना ही एक त्यावरील प्रतीक्रिया आहे हे समजून)
आता माझा मायबोलीचा अनुभव,

मला इथे ( looking at positive site ) बर्‍यापैकी अनुभव आलेत. उलट काही मित्र त्यांना मी प्रत्येकक्षात भेटले देखील नाही सुरवातीला तरी अगदी पुर्ण माहीती आहे ने चांगली मैत्री की दिवाळीत फराळ पाठवेपर्यन्त ते आई वडीलांशी बोलेपर्यन्त. अगदी न बघता फोटो शेयर करण्यापर्यन्त. उलट ज्यांना प्रत्येकक्षात भेटले त्यांनी जरा बर्‍यापैकी वाईट अनुभव दिलेत.( I ignore it as it is part n parcel of life and moved on ). बहुतेक मायबोली freinds ना मी भेटले सुद्धा नाही पण फोनवर मनासारख्या गप्पा मारल्या,सल्ले दीले / घेतले नी चांगले friend झाल्यावर भेटली आहे. अनुभव सांगायचा झाला तर काही married लोक सुद्धा पांचटपने त्यांच्या खाजगी जीवनाबद्दल शेयर करून बघतात की पाणी कीती खोल आहे. किंवा माझी पत्नी कीती बोर आहे वगैरे वगैरे. आता हे तुमच्यावर आहे म्हणा की तुम्हाला अश्या गप्पा एकायच्या आहेत तर, नसतील तर अश्यांना उभे करु नये. Do not entertain even if they mention in inital chaatting or talks, How was my honeymoon if you havent asked. (स्वानुभव आहे,कुठला ते मी सांगणे टाळतेय पण कळेलच ज्याला त्याला).

मुद्दा हाच की कुठेतरी एक confidence असतो आपल्या मनाला जेव्हा आपण कुणाशीही मैत्री करतो अश्या संकेतस्थळावरून तेव्हा(मला असे ठाम वाटते), एक प्रकारचे signaling असते की ही बरोबर आहे. तो confidence येणे बंद होईल किंवा signal मिळत असेल की ही व्याक्ती बरोबर नाही तर आपण हा निर्णय घ्यावा नी मैत्री तोडावी.(माझा अनुभव).

कथेतील मुलीला कुठतरी त्याचे सतत फोटो घेणे खुपत होते. विचार करा एका विवाहीत स्त्रीशी असा कुठलाही बर्‍यापैकी सभ्य माणुस फोटो तरी काही कारणाशिवाय घेणार नाही असे मला तरी वाटते. एकटे असताना बोलवणार नाही. मुलीने सुद्धा त्याचा विचार करावा नी जाणे टाळावे. मग ती मुलगी married असो वा नसो.
कुठलाही आचरट जोक सुद्धा पसंद करु नयेखपवून घेवु नये. खरे तर आपण जेव्हढी मोकळीक देतो अजाणतेपनी तेव्हढेच लोक टपली असतात मग आरडाओरड करा कशाला लोक वाईट आहेत म्हणून.

राहता राहेला fantasy part , ती कोण करत नाही, कुठल्या पद्धतीने, कुठल्या level कोण कशी करतो हे कुणीच सांगु शकत नाही. पण काहींना उगाच आपण नाही त्यातले दाखवायची सवय असते.
माझी अशीच लग्न झालेली मैत्रीण अश्याच एका संकेतस्थळावरील एका लेखकाचे लिखाण, कविता वाचून प्रेमातच पडल्यासारखी होती. नवरा ऑफ़ीसला गेला की त्या संकेतस्थळावर. मग तीला नवरा कीती अरसीक आहे,कुचकामी आहे वगैरे वगैरे वाटायला लागले. ती तर fantasize करायची काश मनु, एकदा माझे लग्न नसते झाले तर मी propose केले असते त्याला. थोडे काळाने ती आली योग्य वळणार्वर पण तीला वास्तवतेचे भान होते. हे एक उदाहरण आहे की कुठल्या लेवलवर हे fatasize असु शकते.
कथेतील नायक हा एकदमच विकृत होता असे म्हणून शकतो जर compare करायचे झाले तर.


हुषऽऽ बरीच मोठी post झाली बाई. थकले. :-)
(चु. भू. द्या. घ्या)


Rimzim
Thursday, November 01, 2007 - 8:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु
कथा कोणाची आहे या बद्दल बरेच वेळा अनावश्यक चर्चा होते हे मान्य. पण मग अशा वेळी जे लोक या बद्दल बोलतात त्या बद्दल आपण बोलण्या पेक्षा त्या कडे दुर्लक्ष करणेच जास्त योग्य नाहि का?
बोलणार्‍याला अथवा लिहिणार्‍याला आपण थांबाउ शकत नाहि.
हे सगळे तुझ्या पहिल्या post ला उद्देशुन होते बरं not the one which is right above my post, but the one b4e that

मी माझी
विचार करुन बघ आणि खरेच शक्य असेल तर तो ID कोण ते सांग.
का सांग ते मि आधिच्या एका post मधे दिले आहेच




Maanus
Thursday, November 01, 2007 - 8:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी हाच मुद्दा मी त्या "सामाजीक प्रश्नांच्या BB " टाकला होता, पण तुम्ही लिहीले तितके निट सांगता आले नाही. किंवा मी कोणा specific व्यक्ती बद्दल बोलत नव्हतो.

हे झाले तुम्हाला सांगुन फोटो काढनार्‍यांबद्दल, there are people who dont tell you that they are taking your photos, their count is growing very fast these days.


Manuswini
Thursday, November 01, 2007 - 8:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी खरे सांगु रीमझीम, मी ह्या BB सकाळपासून दोनदा येवून लिहिण्याचे टाळले का? तर एव्हढे कोणी दूधखुळे नाहीत नी कशाला आपली energy घालवा. आणि बहुतेकदा मी ही दुर्लक्षच करते, चल यार जावु दे. पण माहीत नाही शेवटी लीहून टाकले.

आणि मायबोलीवरील एका married माणसाच्या लघळपणे बोलण्याचा अनुभव मी सुद्धा घेतला आहे. पण वरती थोडक्यात लिहीले वरते ते काफ़ी आहे सगळ्यांना व त्या व्यक्तीला(आता कोण ते विचारून मला ह्या वादात घुसायचे नाही पण एव्ह्ढेच सांगेन की protect yourself, you reserve that right ).
फोटो misuse करायचे प्रमाण वाढले आहे.
एव्हढेच सांगेन, आपण स्वत न विचारता जर कोणी माणुस उगाच त्याच्या वैवाहीक गोष्टी वर चर्चा करत असेल नी तुम्हाला uncomfortable वाटत असेल तर निक्षून सांगावे. किंवा कोणी मैत्रीच पडदा घेवून सहानभूती(खोटी) दाखवून आपल्या खाजगी जीवनाबद्दल प्रश्ण विचारत असेल नी ते तुम्हाला रुचत नसेल तर लगेच निर्णय घ्यावा.

बास I dont want to write any more now on this I guess


Chinya1985
Thursday, November 01, 2007 - 9:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संकेतस्थळावरील गोष्टी माहिति नाहित पण या गोष्टींबद्दल पार्टनर या चित्रपटात सलमानचा एक डायलॉग फ़ार छान आहे तो कत्रिनाला म्हणतो की चुक तुम्हा मुलींची आहे तुम्ही साध्यासुध्या भास्करसारख्या मुलांना अजिबात भाव देत नाही आणि टुकार फ़ाल्तु माणसांवर एका दिवसात प्रेम करता. मला एक असाच टुकार,फ़ाल्तु मुलगा माहीत आहे ज्याने एका मुलीला असेच फ़सवले होते, त्या मुलीने त्या वेळी थोडा लॉजिकली विचार केला असता तर त्याचा खोटारडेपणा लक्षात आला असता. या कथेतील मुलीनेही अशीच काळजी घ्यायला हवी होती.

सुरेशचे काय, तो तर मजेतच असेल अजून. हे वाचेल तेंव्हा त्याला कदाचित प्राची अचानक बोलेनाशी का झाली , काँटॅक्ट का तोडला ते कळले असेल.

रिमझिम या वाक्यावरुन कळते की तो माणुस मायबोलीकरच आहे. तुझे जेव्हढे मायबोलीकर मित्र असतिल त्यांच्याबाबत असा विचार करुन बघ की हा खोट तर बोलत नसेल ना??आणि मग त्यांना नीट विचार करुन काही प्रश्न विचार ज्यावरुन असे लक्षात येउ शकेल की हा खोटारडा आहे का नाही. आपल्या आजुबाजुला अनेक खोटारडे असतात पण बर्‍याचश्यांना चतुरतेने प्रश्न विचारुन पकडता येते.


Aashu29
Thursday, November 01, 2007 - 10:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी माझी, तुझा कथाप्रयत्न आणि महिलांना सजग करायचा हेतु दोन्हीहि मनापासुन आवडले!!

Rimzim
Thursday, November 01, 2007 - 10:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या
माझे मायबोलीकर आणि ईतर सगळे मित्र मैत्रिणी चांगले आहेत.
आणि जर हि कथा सत्य असेल तरी मी इंडिया मधे नाही जिथे व्यक्ती असण्याची शक्यता आहे.

Admin आणि ईतर HG करांनो
हो पण असा अनुभव कोठेही येवु शकतो हे मान्य, पण मायबोली सारख्या सेफ ठिकाणी असे काहि असेल तर त्याला वेळीच आवर घालावा असे मला प्रामाणिकपणे वाटते. याचे कारण असे की मी ईतकी वर्ष ईथे येते आहे आणि ईथे सगळे नेहमी एका चांगल्या हेतुने येतात ( अपवाद सगळ्यालाच बाबतीत असतात थोडे फार). त्या मुळे मला तरी मायबोली बद्दल एक आदर आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे. त्या मुळेच वाटते की जर ती व्यक्ति ईथे असेल तर वेळीच admin च्या मदतीने याला आवर घालावा.



Apurv
Friday, November 02, 2007 - 2:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी माझी, तुम्ही इथे लिहून खुप चांगले केले. अश्या प्रकारच्या विकृतीला वेळीच आळा घातला नाही तर ती पुढे पुढे वाढत जाऊन कुठल्या टोकाला पोचेल ह्याचा नेम नाही.

जर तो माणूस थोडा जरी शहाणा असेल तर वेळीच सावध होउन स्वत: वर आळा घालेल.

NBC Dateline वर लहान मुलांना internet chat वरून ओळख होउन भेटायला येणार्‍या लोकांना पकडतात. त्यात काही महाभाग तर दोनदा पकडले गेले आहेत. शिवाय काही जण हा program आधी बघुन सुद्धा असे कृत्य करायल धजावले आहेत.

राहीला त्याचा ID expose करण्याचा भाग, सर्व जगाला सांगणे कितपत योग्य ठरेल माहीत नाही, पण admin group ला तरी त्याची माहीती असावी आणि admin group ने योग्य तो निर्णय घावा असे वाटते.


Admin
Friday, November 02, 2007 - 3:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी सहसा इथे लिहित नाही. पण मुद्दाम इथे मी लिहावे अशी विनंती केली आहे आणि प्रश्नही तितकाच गंभीर आहे म्हणून लिहितो आहे.

"मी माझी" यांनी एका फार महत्वाच्या समस्येला हात घातला आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुकच आहे. इंटरनेटच्या नवोदित वाचकांना अशा गोष्टींची कल्पना असणे फार महत्वाचे आहे.

पण गेल्या ११ वर्षात मायबोलीवर अनेक गोष्टी पहायला मिळाल्या. आणि त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रथमदर्शनी जे वाटतं ते प्रत्यक्षात असतंच असे नाही.

काही वर्षांपूर्वी मायबोलीवरच्या एका व्यक्तिवर (पुरूष, ज्याला आपण "क्ष" म्हणू) अशी चिखलफेक मायबोलीवरच्या एका स्त्री लेखिकेने (तिला आपण "य" म्हणू) केली होती. पण नंतर "य" ही स्त्री नसून, "क्ष" शी व्यक्तीगत वैर असणारा दुसरा मायबोलीकर "ह" (पुरुष) आहे असे काही मायबोलीकरांनी शोधून काढले. यातले खरे खोटे हे आम्हाला (admin team) कधीच कळणे शक्य नाही. किंबहूना इंटरनेटची थोडिफार तांत्रिक माहिती आहे त्या कुणालाही स्वत्:ची खरी ओळख कायमची जगापासून लपवणे सहज शक्य आहे.

एका व्यक्तीच्या शैलीत मुद्दाम खोडसाळपणे दुसयाबद्दल लिहून त्यांची भांडाभांडी बघायचा खेळ मधून मधून इथे चालूच असतो.

मी माझी यांचे एका महत्वाच्या प्रश्नाला प्रकाशात आणल्याबद्दल मी आधीच अभिनंदन केले आहे. पण ज्या व्यक्ती "मी माझी" याना सुरेश चा खरा ID सांगायचा आग्रह करत आहे त्याना माझे सांगणे आहे कि जी चूक प्राचीने पटकन सुरेशवर विश्वास ठेवून केली तीच चूक तुम्ही पटकन "मी माझी" वर विश्वास ठेवून करत नाही का?
त्यातले खरे काय हे आपल्याला कुणालाच नक्की माहिती नाही.

सुरेश काय किंवा मी माझी काय? दोन्ही इंटरनेटवरच्या व्यक्तिरेखा आहेत. त्यातल्या खर्‍या किती आणि खोट्या किती हे ज्याचे त्यानेच ठरवायचे आहे. उलट मला चांगला अनुभव येत नाही तोपर्यंत हे सगळे खोटे आहे असे धरणेच योग्य होईल.

किंबहूना हे सगळे लिहिणार्‍या admin वरही जोपर्यंत तुम्हाला त्याचा चांगला अनुभव येत नाही, विश्वास ठेवू नये अशा मताचा मी आहे.



Zakasrao
Friday, November 02, 2007 - 4:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी माझी ओ के माझ्या लक्षात आल नाही ते वाचताना.
सॉरी. :-)


Mi_anu
Friday, November 02, 2007 - 4:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशासकांचे मत तंतोतंत पटले.इंटरनेट वर कोणावरही विश्वास ठेवताना विचार करावा हेच खरे.

Ajjuka
Friday, November 02, 2007 - 4:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशासक,
एकदम करेक्ट..
प्रत्येकाने आपलं आपण सावध असावं..


Nandini2911
Friday, November 02, 2007 - 7:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथल्या काही प्रतिक्रियावरती माझे मत्: हा अनुभव "भयानक" किळसवाणा" किंवा भितीदायक बिल्कुल नाही.
सुरेश त्याच्या private space मधे काय करतो हा सर्वस्वी त्याचा प्रश्न आहे. आणि जर त्याला fantasise करायचेच असेल तर फोटोचा क्लोजप कशाला प्राचीचा रुमाल ती वापरत असलेला सेंट किंवा तिची त्याच्या मनात असलेली इमेज हे काहीही चाललं असतं.
यातून सुरेशला एखादी मानसिक विकृती आहे हे म्हणणं बरोबर नाही. मला इथे जास्त काहीही लिहीता येणार नाही.. पण नेटवर सर्च केल्यास याबद्दलची जास्त माहिती मिळू शकेल.
मुळात प्राचीने ही बाब मनाला लावून का घेतली? नवर्‍याला सांगायचा गाढवपणा का केला? हा मला पडलेला प्रश्न आहे.

एवढीच स्वत्:च्या पवित्र्याची काळजी होती तर त्याला आपले फोटो काधू द्यायचे नव्हते. (संगणक वापरून फोटोचे काय करता येते हे सर्वाना ठाऊक आहे... ते प्रकार याहून भयानक असतात.)

एखाद्यावर किती विश्वास ठेवावा यालाही मर्यादा आहेतच. सख्ख्या नवर्याने बायकोचे "तसले" फोटो विकल्याचं मी पाहिलय. तेव्हा कुणापासून किती वाचावं आणि सांभाळावं याचा विचार करणंच नको होतं.

पण याला उपाय म्हणून तालिबान बोलवायचं का?
:-)

थोडे माझे अनुभव. मुळात मी खूपच बोलकी असल्याने आणि बर्‍यापैकी बोल्ड मुलगी म्हणून प्रसिद्ध असल्याने लोक त्याचा हवा तसा अर्थ काढतात.
"तुम्ही संध्याकाळी घरी गेला की काय करता?"
"आता घरी जाऊन डायरेक्ट झोपणार की अजून काही करणार?"
"तुम्हाला रात्री कंटाळा आली की तुम्ही काय करता?
"कधीतरी बोलव ना तुझ्या घरी कॉफ़ी प्यायला..."

हे प्रश्न किती साधे वाटतात. पण हे विचारतानाची नजर काय असते... याची कल्पना करा...

माझ्या एका कलीगचा बॉयफ़्रेंड मर्चंट नेव्हीमधे असल्यामुळे सहा महिने येणार नव्हता. त्यावेळेला ती एका दुसर्‍या मित्रासोबत पिक्चरला गेली होती. एक महाशय मला म्हणे... "ते असंच असतं. एकदा झोपायची चटक लागली की कुणीही चालतं. काय बरोबर ना?" आणि नजर माझ्या अंगावरून....

आता माझ्याही बाबतीत ते असंच दुसर्‍यासमोर बोलत नसतील कशावरून....

एकदा माझ्या अंगात जबरदस्त ताप होता. पण मी नेहमीप्रमाणे काम करत होते. तर लिफ़्ट्मधे या माणसाने नको तिथे स्पर्श करून "ताप आहे की नाही" हे विचारले.
मी जोरात ओरडल्यावर (तो शब्द इथे लिहिता येणार नाही.) मग लगेच सॉरी... तुम्हा गैरसमज करून घेताय. माझ्या मनात काही पाप नाही. तुम्ही मला मुलीसारख्या आहात. वगैरे वगैरे...

मी एकदाच उत्तर देलय... कंपनीचे sexual harassment ची प्रिंट आऊट काढुन त्याच्या हातावर ठेवली. "वाचा... नीट वाचा."

हे मला या आधुनिक एकविसाव्या शतकात आलेले अनुभव आहेत. :-) असेच अनुभव बरेचदा बर्‍याचजणाना आलेले असतील.
माझ्या एका मॉडेल मित्राला निर्मात्याचे अनुभव आले आहेत. :-)
चला इथेतरी स्त्रीपुरुष समानता दिसत आहे.




Rajankul
Friday, November 02, 2007 - 8:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनुभव नक्की कुणाचा यात शिरून लोकांनी आपले आंबटशौक दाखवलेत. तू सरळ दुर्लक्ष कर.>>>

कुठला आंबट शौक वाटला तुला.?जरा सांगशील का?काहीतरी घाण बोलुन वाद निर्माण कराय्ची सवय आहे आपल्याला. झक्किसारखी तुही रिकामीच.
आणि तुला हे कुणाबद्दल लिहिले आहे हे माहित नाही अस समजण्याइतका मी मुर्ख नाही.


Ajjuka
Friday, November 02, 2007 - 10:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

करेक्ट नंदीनी,
स्वतःच्या private space मधे माणूस काय करतो याला किती महत्व द्यायचं आपण?

तरी ह्या माणसाला टाळणं शक्य होतं. कट ऑफ करणं शक्य होतं. अनेक वेळेला टाळणं शक्य होत नाही, पकडता येईल असं काही तो माणूस करत नाही, पण त्याचे subtle advances आणि hints त्रासदायक होत असतात. पण तरीही स्वतःला वाचवत आणि safe distance ठेवून, NO अश्या अर्थाच्या subtle but firm hints देऊन पण कामावर परिणाम न होऊ देता ते ते project तुम्हाला संपवायचं असतं. सबकुछ हसर्‍या चेहर्‍याने. तेही भयानक असतं. थकवतं तुमचा मेंदू.

पुढच्या पोस्टमधे ऑर्कुटवरचा एक किस्सा टाकतेय.


Ajjuka
Friday, November 02, 2007 - 10:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते पोस्ट इथे नाही करत. my experience मधे orkut किंवा इतर ठिकाणे लोक असे approach होतात अस जो बीबी आहे तिथे करते.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators