|
Mimajhi
| |
| Friday, November 02, 2007 - 11:07 am: |
|
|
अनुसारखेच ऍडमिनचे पण एकदम पटले. त्याचा कुठल्याही संकेतस्थळावरचा आयडी उघड केला किंवा उगाच च्रचेला चालना देणार्या हिंट्स दिल्या तर ती चिखलफेक होईल. ती कोणीही कोणावरही उद्या एक आयडी घेऊन करू शकेल. इथे काहींनी प्राचीवरही अशीच एकटीने हॉटेलात का गेली फोटॉ काढू का दिले असे प्रश्न विचारून थोडी चिखलफेकच केली आहे त्याचे मात्र वाईट वाटले. फोटो काही तिचे एकटीचे आणि ते सुद्धा असे काही पोझ देउन नव्हते काढलेले, गृपमध्येच बसले असतांना काढलेले बरेचसे.... प्रत्येक प्रश्नाचे कसे सविस्तर उत्तर देणार ? सर्वांचे पुन्हा एकदा आभार. कुणा एकापासून नाही पण अशा छुप्या प्रवृत्तीपासून वरकरणी कितीपण आदरणीय चांगला वाटला तरी सावध रहायला हवे आणि छोटी सुद्धा खटकणारी गोष्ट असेल तरी दुर्लक्ष करायला नको हाच धडा मी या प्राची प्रकरणावरून घेतला.
|
Admin
| |
| Friday, November 02, 2007 - 5:01 pm: |
|
|
Ranjankul, >काहीतरी घाण बोलुन वाद निर्माण कराय्ची सवय आहे आपल्याला. झक्किसारखी तुही रिकामीच. No personal attacks. Write only if you can contribute to discussions
|
Chaava
| |
| Friday, November 02, 2007 - 5:15 pm: |
|
|
कथा खुप छान आहे. विचार करण्यासारखी आहे. खरच प्राचीला वाईट अनुभव आला. एवधे रेस्पोन्सेस बघुन लिहावस वाटल. माझ्या मते, मुद्दा प्राचीने काय करायला हवे होते हा नसावा. She already went through that horrible experience. जे घडले ते झाले. पण जर का अशी परिस्थीति कोणावर आली, तर हि गोष्ट ध्यानात असावी आणि असे परीणाम टाळावे
|
चिन्या माझे मायबोलीकर आणि ईतर सगळे मित्र मैत्रिणी चांगले आहेत. आणि जर हि कथा सत्य असेल तरी मी इंडिया मधे नाही जिथे व्यक्ती असण्याची शक्यता आहे. तसे असेल तर आनंदच आहे रिमझीम. तुझ्या पोस्ट वाचुन वाटल की तु घाबरली आहेस म्हणुन मी लिहिले.
|
इथे काहींनी प्राचीवरही अशीच एकटीने हॉटेलात का गेली फोटॉ काढू का दिले असे प्रश्न विचारून थोडी चिखलफेकच केली आहे त्याचे मात्र वाईट वाटले >>>> मीमाझी. प्राचीची जी चूक झाली त्याला तू "चिखलफ़ेक" असे नाव का देत आहेस? एक लक्षात घे, मी या कथेकडे सत्यघटनेवर आधारित एक कथा एवढंच बघत आहे. त्यापाठच्या आयडीशी मला घेणे देणे नाही. मुळात अशा घटनामधे स्वत्:ला दूषणं देणं थांबवले पाहिजे. खरंतर काहीच घडत नाही तरी प्राची स्वत्:ला "अवच्छ" मानू लागते. मला वाटतं की गिल्टीपणा पूर्ण चुकीचा आहे. तिची काहीच चूक नसताना तिने गाढवपणा केला आहे. वर जाऊन हे नवर्याला सांगायला कशाला हवं होतं??? मुळात एखाद्या व्यक्तीचे private life आणि पब्लिक इमेज यात अशी तफ़ावत असू शकते. त्यामधे काहीच चूक नाही. महिलानी अजग रहावे वगैरे काही उपदेश यातून मिळत नाही. प्राचीने सुरेशशी संबंध तोडले आहेत. उद्या जर तिच्या हे लक्षात आलं की तिचानवरा एखाद्या नटीचे फोटो घेऊन असंच काही करत आहे तर ती काय करणार?? बरं या सर्वामधून सुरेश वाईट आहे हे ठरतं का? तो हुशार आहे. आदरणीय आहे पण तो असं वागतो म्हणून तो व्हिलन ठरत नाही आपण सेक्स या विषयाक्डे अत्यंत घाणेरड्या दृष्टीकोनातून अत्यंत विच्त्र आहे. आंबटशौकिनानी इथेही लिहायला सुरुवात केलेलीच आहे. बाकीचे "हर हर" म्हणत असतीलच. जोपर्यंत या विषयावर आपण पुरेसे प्रबोधन करत नाही तोपर्यंत हे प्रकार आपल्याला "विचित्र" वाटणारच. जे काही घडलं ते नॉर्मलच होतं. (कुठलाही सायकोलॉजिस्ट हेच सांगेल) त्यामुळे उगाचच "भयानक" "हॉरीबल" अशी विशेषणे लावू नयेत. उगाचच आपण म्हणजे फ़ार पवित्र आहोत आणि कुणी आपल्या फोटोला जरी हात लावला तरी आपलं पावित्र्य भंग झालं हे वाटण्यात काहीही अर्थ नाही.
|
Peshawa
| |
| Sunday, November 04, 2007 - 12:30 am: |
|
|
बरं या सर्वामधून सुरेश वाईट आहे हे ठरतं का? तो हुशार आहे. आदरणीय आहे पण तो असं वागतो म्हणून तो व्हिलन ठरत नाही >>> हे कसे बुआ? मुद्दा इथे त्याच्या private space चा नाही तर त्या मुलीला तो त्याच्या वासनाविश्वातले एक object बनवतो आहे हे तीला समजले आहे. मुद्दा विश्वासाला तडा जाण्याचा आहे. त्या मुलीची त्यांच्या मैत्रीत ही अपेक्षा नव्हती इतकेच. ह्याचा अर्थ ती मुलगी नाइव्ह होती असे कदाचीत फ़ार्तर म्हणता येइल... हे लक्षात आलं की तिचानवरा एखाद्या नटीचे फोटो घेऊन असंच काही करत आहे तर ती काय करणार?? >>> हे नवरा बाय्कोतील संबंधांवर अवलंबून आहे. sexual fantasies असणे ह्यात गैर काहीच नाही. पण तो नत्यातील मर्यादेचा भाग असतो. आणि ह्या मर्यादेमधे न बसणारी fantasy असेल आणि ती partner ला समजली तर तो विश्वास्घातच ठरतो... अशावेळेस अशी fantasy असणारा हा त्या नात्यासाठी खलनायकच ठरतो... कुणी आपल्या फोटोला जरी हात लावला तरी आपलं पावित्र्य भंग झालं हे वाटण्यात काहीही अर्थ नाही.>>> it is not about photo when a person knows you it is about you and that is violation. it is about pretending to be friends but secretly scouting for an opportunity. It is about treating you as an object all along. "ohh! you using my photo to mastr******, how wonderful! I am flattered ! i have an album I will upload it for you my naughty fellow..." is this what what you think his/her attitude should be? I dought anybody (man or women) would take such objectification kindly.
|
Divya
| |
| Sunday, November 04, 2007 - 5:43 am: |
|
|
बापरे खुपच भीतीदयक वाटल वाचताना. admin चा message म्ह्णजे आधारच आहे. पण विचार करताना जाणवल कि यात प्रत्येकाचा प्रेम, मैत्री, आकर्षण, विकृती या गोष्टींबद्दल च मत हे व्यक्तीनुसार बदलु शकत. मैत्री असण आणि ओळख असण यात खुप फ़रक आहे. ओळख असणार्या माणसाबरोबर आपण खुप मर्यादा संभाळतो. माझ्या आइने मला सांगीतलेले आठवले, मी नववी दहावीला असताना उगाचच रस्त्यावर गाठुन एकजण विचारायचा काय कशी आहेस वैगरे पण मी जेव्हा आइल सांगीतले तेंव्हा तीने जे मला बजावले कि कुणालाही ओळख दाखवायची नाही रस्त्यात ते मी खुप पाळले अगदी आजसुद्धा. मर्यादा घालण हे सर्वस्वी प्रथम स्त्रीच्या हातात असत आणि ती पाळण हे पुरुषाच्या हातात. जेंव्हा तुम्ही मैत्री करता तेंव्हा या मर्यादा थोड्या सैल होतात, तुम्हाला रस्त्यात दिसल भेटता बोलता, फ़ोन हि त्यानंतरची बाब, त्याच्या बरोबर फ़िरायला जाण घरी येण ही त्या नंतरची, फ़ोटो काढण ही त्या पुढची, personal exp share करण ही तर मैत्री फ़ारच गहन असण्याची गोष्ट होते. मग जर तुमची मैत्री या level पर्यन्त पोचली असेल तर असा काही अनुभव येण आणि त्या मित्राला विकृत ठरवुन मोकळ होण म्हणजे थोडस तुमच्या स्वताच्या विचारांमधला, मैत्री कडे बघण्याचा दृष्टीकोन सुद्धा किती फ़ोल आहे हे दिसुन येत. मैत्री ही अशी नसतेच. मला सुनीताबाइ नी आहे मनोहर तरी... मधे त्यांच्या मित्राबरोबर घडलेला प्रसंग आठवुन गेला. त्यांचा मित्र मुसल्मान आणि विवाहीत असुन तो क्षण कसा सावरतो हे फ़ार छान उदाहरण दिलय. एकदा मैत्री केली तर त्या मैत्रीलाही जपाव लागत, कुठे जर वासना असेल तर तिला वेळीच शोधुन हे चुक आहे हे सांगण्याची जबाबदारी ही दोघांची असते. सरसकट विकृत ठरवायच म्हंटल तर माझ्या मते एक प्रभु श्रीराम सोडले तर कोणी आजुन तरी मर्यादा पुरुषोत्तम झालेल नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात कुठेतरी असे नाजुक क्षण येतात. योग्य विचार करण्याच सामर्थ्य नाहीतर त्या व्यक्तीला चुक समजावणार मग ती आइ असो पत्नी असो मैत्रीण असो भेटल तर पुन्हा त्या खाइत कोणी जात नाही. प्रेम आणि आकर्षण ह्यांच्या मधली सीमारेषा पुसट आहे अस वाटत पण त्यात खुप फ़रक आहे. आणि आकर्षण आणि विकृती याही खुप टोकाच्या गोष्टी आहेत. प्रेम असणार्या व्यक्तीच असण मग ते जगाच्या पाठीवर कुठेही असो ते असण ते अस्तित्व पुरेसे असते, आपल्या आइवडिलांच प्रेम हे अस्सल उदाहरण त्याच, पण आकर्षण असेल तर त्या व्यक्तीच्या सहवासाची चटक लागते. त्यातही आकर्षण असण ही नैसर्गीक आहे जर ते एखाद्याच व्यक्तीबद्दल वाटत असेल तर पण खुप व्यक्तींबद्दल वाटत असेल तर ती विकृती ठरते. मैत्रीत प्रेम असु शकत पण आकर्षण असेल तर ती मैत्री रहात नाही. नवरा बायको या नात्याचा base आकर्षणावरच आहे जर ते नसेल तर ते नात मग नवरा बायको म्हणुन रहात नाहि. मग ते मुलांसाठी म्हणुन तडजोडी करत काढलेल समांतर आयुष्य होत. नवरा बायको मधली committment हा खुपच वेगळा विषय होईल पण एकमेकांपासुन काही न लपवणे ही खुप महत्वाची कमीटमेन्ट आहे. तुम्हाला या जगात कोणीच परिपुर्ण भेटणार नाही. परिपुर्ण असतो तर देवच नसतो का झालो. पण माफ़ करण्याची आणि चुक कबुल करण्याची संधी माणसाला देवपदाकडे, चांगुलपणाकडे म्हणा( देव आहे कि नाही यावरच वाद आहे काहींचा ) जाण्याचा मार्ग दाखवते. माझ्या दृष्टीने तरी कोणताच माणुस वाइट नसतो. तो परिस्थीतीने, ज्या वातावरणात वाढला त्या प्रभावाने तो तस बनतो मग मैत्रीच करणार असाल तर तेवढी मानसिक कुवत नसेल तर मैत्री करुच नका फ़क्त ओळखच ठेवाना फ़ार पुढे कशाला जाताय. शेवटी हा ज्याचा त्याचा दृष्टीकोन आहे. समोरचा माणुस कसा आहे यापेक्षा तुमच नाण किती खणखणीत आहे हे पण फ़ार महत्वाच आहे.
|
Bsk
| |
| Sunday, November 04, 2007 - 2:06 pm: |
|
|
मस्त लिहीलयस दिव्या! खूप पटलं.. समोरच्या माणसावर मर्यादा आपणच घालू शकतो हे आहेच.. कथेबाबतीत बोलायचं झालं तर, प्राची ने हॉटेल मधे जायची काहीच जरूरी नव्हती.. बाकी कथा छान लिहीलीय..पण अनुभव विचित्र आहे..
|
Maanus
| |
| Sunday, November 04, 2007 - 3:39 pm: |
|
|
चुक कबुल करण्याची संधी >>>> gr8, reminded me few teenage events
|
Mimajhi, खरच विचित्र अनुभव आलय तुझ्या freind ला . . तुझ्या अनुभवा वरून ' मानलेला भाउ - मानलेली बहिण ' नात्याच्या नावाखाली मी आजु बाजुला पाहिलेली काही विकृत वागणारी लोकं आठवली . मुळात एखाद्या चांगल्या मित्राला / मैत्रीणीला कोणी मानलेला भाउ / बहिण मानणे मला somehow थोडं विचित्र किंवा मला तरी कधीही न पटण्या सारखं वाटतं . मित्राशी / मैत्रीणीशी खूप personal वागण्या साठी म्हणून अजुन एखाद्या खोट्या नात्याचं नाव देणारी लोक मला तरी नेहेमीच कोड्यात टाकतात . अर्थात मी काही generalise करत नाही पण मानलेल्या बहिण भावाच्या नात्यांच्या नावाखाली safe flirting कराणारी मुलं - मुली च जास्त पाहिली आहेत , मला या अनुभवात लेखिकेने लिहिलेलं सुरेश चं character थोडं त्याच type चं वाटलं . हा इथलाच अनुभव लिहिलाय असं मलाही वाटलं .
|
mimajhi , ह्या विषयावर लिहल्याबद्दल अभिनंदन! कथेइतक्याच प्रतिक्रिया पण विचार करायला लावणार्या आहेत. I will second peshawaa here . "मुद्दा विश्वासाला तडा जाण्याचा आहे. त्या मुलीची त्यांच्या मैत्रीत ही अपेक्षा नव्हती इतकेच. ह्याचा अर्थ ती मुलगी नाइव्ह होती असे कदाचीत फ़ार्तर म्हणता येइल..." हे अगदि १००% पटले. विकृत लोकांपसून सावध रहा हे सांगणे योग्य पण तुम्हाला एखाद्या विकृत व्यक्तिचा अनुभव आला म्हणजे तुम्हिच मुर्ख अस एखाद्याला सांगण हे काहि योग्य वाटत नाहि.
|
Rajankul
| |
| Tuesday, November 06, 2007 - 12:57 pm: |
|
|
त्याचा कुठल्याही संकेतस्थळावरचा आयडी उघड केला किंवा उगाच च्रचेला चालना देणार्या हिंट्स दिल्या तर ती चिखलफेक होईल. ती कोणीही कोणावरही उद्या एक आयडी घेऊन करू शकेल.>>>. बाई, तुम्ही लिहिल्याप्रमाणे वागला नाही या लेखात तुम्ही उघड हिंट दिली आहे. कुणिही मी किती आंबट शौकिन आहे म्हटल्याने फ़र्क पडत नाही. इथे मायबोलिकर ज्यावर भोळेपणाने विश्वास ठेवला आहे ते कार्स्थान वाटते आहे. लिहिणारी ने ती व्यक्ती कोण आहे हे कळण्याची पुर्ण काळ्जी घेतली आहे. कथा टाकण्याची जागा वैगैअरे जर माझ्या सारख्या नव्या माणसला हे कळु शकते तर बकिच्यांना का नाही? लेखिकेने लिहिल्याप्रमाणे त्या माणसाने तीला ओळ्खले असेल. एखाद्या बाइला तीचा नव्रा काय म्हणेल याची काळजी आहे तर ती घाबरली नसती का? तुम्ही सुरेश्ला बदनाम करत आहात जर त्याने असाच विचार केला तर हे सह्ज शक्य आहे. त्याला तुम्ही व्हिलन केलेत. सुरेश जवळ तुमचे फोटो आहेत. त्याने त्या फोटोंचा गैर्वापर केला तर आणि नवर्यला पाठवले तर तशी भिती हिला वाटत नाही करण ही फ़क्त कथा आहे. सत्यकथा नव्हे. बाई रोज घरात सासु समोर रोज च्टींग करत होती? या साठी विवेकि यांचे विचार वाचा. होटेल्चे दार उघडे राहिले कुठल्याही होटेल्चे दार लच मुळे उघडे रहु शकत नाही. माफ़ करा फ़ार मरठीत लिहिण्याची सव्य नाही त्यामुळे चुका झाल्यात.
|
|
|