|
Sarang23
| |
| Monday, October 22, 2007 - 6:41 am: |
| 
|
वा!!! वैभवा झकास गझल... जवळ जवळ प्रत्येक शेरात फोडणी झकास आहे! पुलंच्या भाषेत "हा सदरा त्या सदरात पडला" किंवा "सरळ वळणाची आडवळणी व्याख्या" वा!!! पुलस्ती... आज अकारण उदास आहे... हा शेर आवडला! छान गझल! desh_ks काही काही शेर / कल्पना छान आहेत!
|
Desh_ks
| |
| Monday, October 22, 2007 - 8:20 am: |
| 
|
मिलिंद, सुधीर, पुलस्ति, माणिक, बैरागी आणि सारंग, अभिप्रायाबद्दल सार्यांचे आभार. पुलस्ति, 'बोटे' आणि 'सोटे' बद्दल तुमचं म्हणणं मान्य. त्या कल्पना मला सोडून देता आल्या नाहीत इतकंच. -सतीश.
|
प्रतिक्रियेबद्दल सर्वांचेच आभार सतीश ... गज़ल आवडली. बैरागीशी सहमत . " लोटे " वाला शेर खास आहे . पुढील लेखनास शुभेच्छा
|
बर्याच दिवसांनी आले इथे. मिल्या, सतीश, तुम्ही सातत्याने अधिकाधिक चांगलं लिहीत आहात. त्याबद्दल अभिनंदन आणि पुढील लिखाणासाठी शुभेच्छा. पुलस्ति, मलाही ' अकारण' चा शेर आवडला. आणि एकूण सफाईचा प्रश्नच नाही. वैभव, मस्त गज़ल. सगळ्याच द्विपदींमधे आलेला मिश्कील सूर आवडला.
|
Tiu
| |
| Monday, October 22, 2007 - 6:18 pm: |
| 
|
पुलस्ति, सतीश, मिल्या...काय सुंदर लिहिता तुम्ही सर्व जण! वैभव! प्रश्न आहे... अप्रतीम
|
Pulasti
| |
| Monday, October 22, 2007 - 8:15 pm: |
| 
|
सारंग, स्वाती, तिऊ - धन्यवाद!
|
Desh_ks
| |
| Tuesday, October 23, 2007 - 3:55 am: |
| 
|
वैभव, स्वाती, तिऊ, धन्यवाद. -सतीश
|
Devdattag
| |
| Wednesday, October 24, 2007 - 1:16 pm: |
| 
|
दु:ख स्वत:चे शब्दांनी जे रंगत गेले सौख्य स्वत:चे पायदळी ते तुडवत गेले काठवरचा जुना वृक्षही स्तंभित झाला का पाण्याचे हे रंग अचानक बदलत गेले काय आगळीच हौस बाजारी बसण्याची भाव स्वत:चे इथले सारे चढवत गेले हाय अडकला हिरवा शालु उंबरठ्यावर अन पदराचे धागे सारे उसवत गेले एकदुजाला पाहून सारे हसले थोडे कुणास ठाउक कोण कुणाला फसवत गेले
|
बर्याच दिवसांनी गज़ल लिहायचा प्रयत्न केला आहे जाणकारांनी मार्गदर्शन करावे "देवळात.." थांबले पाऊल आता.. गाठले राऊळ आता.. स्वप्न सारे सत्य झाले मन परी व्याकूळ आता.. का स्वतःच्या वेदनेतच राहतो मश्गुल आता.. वाळवंटी थेंब नाही मृगजळाची भूल आता.. पेलवेना साहवेना ही व्यथेची झूल आता.. आयता मी नाग होतो सोडले वारूळ आता.. अन तुझ्या छायेत आलो दे तुझी चाहूल आता.. लावितो थोडी कपाळी पावलांची धूळ आता.. होऊ दे निर्माल्य चरणी या तनूचे फ़ूल आता..! -- अभिजीत दाते
|
Pulasti
| |
| Wednesday, October 31, 2007 - 3:42 am: |
| 
|
देवा, पाण्याचे रंग आणि फ़सवत हे शेर आवडले! काही मामुली निरिक्षणे - का पाण्याचे हे रंग अचानक - "हे" मुळे मात्रा वाढताहेत. काय आगळीच हौस बाजारी बसण्याची - यातही वृत्त भंगतय.. अभिजीत, वाळवंट, नाग हे शेर खासच!! मश्गूल, धूळ हे शेर जरा सपाट वाटताहेत. काफ़ियातली "ल", "ळ" ची सरमिसळ टाळता आली असती तर आणखी उत्तम झाले असते! पण एकूण गझल आवडली!! -- पुलस्ति.
|
Pulasti
| |
| Wednesday, October 31, 2007 - 3:45 am: |
| 
|
"तमाशा" एकटेपण मागता का? अन स्वतःला टाळता का? हरवलेला सूर्य शोधा चांदण्या कुरवाळता का? "झूठ आहे सर्वकाही" झूठ हेही मानता का? मार्ग चुकला! व्यर्थ आता या दिव्याला राखता का? जा बघ्यांनो, हा तमाशा - संपला; रेंगाळता का? -- पुलस्ति.
|
Milya
| |
| Wednesday, October 31, 2007 - 7:57 am: |
| 
|
अरे देवा!! देवाची गझल मी मिसलीच की देवा चांगला प्रयत्न. मलाही बदलत आणि फ़सवत आवडले... उसवत नीटसा कळला नाही... अभिजित चांगला प्रयत्न पण पुल्सतीशी सहमत अर्थात जाणकार नसल्याने फ़ारसे लिहीत नाही.. पुलस्ती : छोटा बहर मध्ये तुमची मास्टरी झाली आहे आता.. मस्त गजल. पहिले तीन शेर फ़ार आवडले...
|
Devdattag
| |
| Wednesday, October 31, 2007 - 8:38 am: |
| 
|
मिल्या आणि पुलस्ती धन्यवाद.. पुलस्ती, बरोबर, पोस्ट करतांना 'हे' काढायचा राहिला, मिल्या, हिरवा शालु नवविवाहीता घालतात(माझ्या माहितीप्रमाणे..;) ), आणि उंबरठ्यावरचे माप ओलांडतांनाच काहितरी बिनसलं आणि मग बिनसतच गेलं असा साधारण शेर होता, फसलाच म्हणायचा..
|
Milya
| |
| Thursday, November 01, 2007 - 8:46 am: |
| 
|
परत एक गजल टाकायचे धाडस करत आहे आयुष्य माझे! मॄगजळाच्या व्यर्थ मागे, धावले आयुष्य माझे आज कळले, कोरडे का भासले आयुष्य माझे प्रेम ना कोणी दिले अन, ना दिला कोणी जिव्हाळा कौतुकाने मीच मग कुरवाळले आयुष्य माझे मोगरा फुललाच नाही अंगणी माझ्या कधीही त्यास हाती बांधुनी मी! उधळले आयुष्य माझे पाहुनी बाहेर दु:खे झडप घेण्या थांबलेली मी सुखाच्या दावणीला बांधले आयुष्य माझे भाग्य हातांनी घडविले! भ्रम जरी माझा फुकटचा खेळणे होते तुझ्या हातातले आयुष्य माझे हासल्यावर तू, कळ्यांचा अंगणी वर्षाव झाला वेचण्यासाठी फुलांना, वेचले आयुष्य माझे झापडे लावून मोहाची वृथा फेऱ्यात फिरलो देहरूपी जोखडाला जखडले आयुष्य माझे तळटीप : www.sureshbhat.in वर चक्रपाणी ह्यांनी केलेल्या सुचनेनुसार राहले चे भासले हा बदल केला आहे.
|
Aaftaab
| |
| Thursday, November 01, 2007 - 9:35 am: |
| 
|
चोहीकडे... (गा गालगाल गागा, गालगाल गागा) चोहीकडे दिखाऊ, झगमगाट आहे गाभार भग्न, शिखरी लखलखाट आहे रुपयांत भीक आता, मागतो भिकारी नाही कसे म्हणावे? भरभराट आहे! पाऊल खुंटले का?, हे अगम्य कोडे डाव्यास दाहिन्याचा, जळफ़ळाट आहे अस्तित्व राघवाचे, संशयात आले जाहीर रावणांचा, थयथयाट आहे आले समाजसेवी, गाव धन्य झाला फ़ांद्यांत का खगांचा, कलकलाट आहे?! - रवि (आफ़ताब)
|
देवदत्त एकदुजाला पाहून सारे हसले थोडे कुणास ठाउक कोण कुणाला फसवत गेले वाह वाह . फार मस्त उतरलाय हा शेर. बाकी शेरांमधल्या कल्पना अजून सहज आणि स्पष्ट यायला हव्यात असे वाटते . अभिजीत स्वरकाफियाची सूट घेऊनही शेर ताकदीने उतरले नाहीत असं वाटलं . अर्थात छोट्या बहर मध्ये थोडी अडचण होतेच. शुभेच्छा पुलस्ति खरंच तुम्हाला बर्याचदा छोट्या बहरमध्येच लिहीताना पाहिलंय . एखादी मोठ्या मीटरमधली गज़ल वाचायला आवडेल . अर्थात ह्या गज़लमधले "झूठ आहे सर्वकाही" झूठ हेही मानता का? मार्ग चुकला! व्यर्थ आता या दिव्याला राखता का? हे दोन शेर फारच सुरेख उतरले आहेत. मिल्या .. क्या कहने ! तुला अशी गज़ल लिहीताना बघून मला जितका आनंद झाला असेल तितका खचितच आणखी कुणाला होईल . प्रेम ना कोणी दिले अन, ना दिला कोणी जिव्हाळा कौतुकाने मीच मग कुरवाळले आयुष्य माझे हासल्यावर तू, कळ्यांचा अंगणी वर्षाव झाला वेचण्यासाठी फुलांना, वेचले आयुष्य माझे वाह वाह वाह . superb ( केव्हातरी लिहून तशीच ठेवलेली एक गज़ल आठवली . केवळ आठवला म्हणून मतला लिहीतो . ) तेच ते रस्ते जरी मी टाळले आयुष्यभर तेच ते आयुष्य मजला भेटले आयुष्यभर मतल्यात " कोरडे का राहले " मध्ये राहले असा वापरता येतो का ? पण ही अगदीच जुजबी , माझ्या माहितीसाठी विचारलेली शंका आहे . तिथे राहिले लिहीले असते तरीही मतल्यात अलामत भंग करण्याची सूट आजकाल सर्रास घेतली जाते त्यामुळे काही बिघडत नाही . पण भटांनी एक सूट सांगितली म्हणून त्याचा अत्यंत गैरवापर करणारी उदाहरणे काही कमी नाहीत . माझ्यामते कुठल्याही प्रकारची सूट घेणे टाळता आले तर बरे इतकेच . असो . अश्या काही अट्टाहासापायी मी बरंच काही गमवून बसलो आहे त्यामुळे अधिक न बोलणेच उत्तम .
|
आफ़ताब मी वरची पोस्ट टाकत असताना तुझी गज़ल पोस्ट झालेली दिसते . रुपयांत भीक आता, मागतो भिकारी नाही कसे म्हणावे? भरभराट आहे! सही आहे . मीटर पण छान आहे . मला तरी लयील अडले नाही . अभिनंदन
|
मिल्या पुनर्वाचनात पाहुनी बाहेर दु:खे झडप घेण्या थांबलेली मी सुखाच्या दावणीला बांधले आयुष्य माझे हा शेर पण खूप आवडला . तसेच बाहेर " सूख " आणि आत " दुःख " वा " व्यथा " असतं तर काय झालं असतं हा विचार डोक्यात आला . अर्थात मीटरचा प्रश्न आहेच . पण anyways मी सुखाच्या दावणीला बांधले आयुष्य माझे मधली सहजता वाखाणण्याजोगी आहे .
|
Milya
| |
| Thursday, November 01, 2007 - 10:15 am: |
| 
|
वैभवा .. खूप सारे धन्यवाद... तुझ्या प्रोत्साहनामुळेच असे लिहायचे धाडस करत आहे ..(I hope तुला पश्चात्ताप होत नसेल मला प्रोत्साहन दिल्याचा ) राहले ची शंका एकदम रास्त आहे आणि मला पण ती आलेली... राहिले असे जास्त वापरले जाते... किंवा वैदर्भिय भाषेत काय करुन 'राह्यले' तुम्ही असेही म्हणतात पण 'राहले' दिसत नाही फ़ारसे. त्याजागी दुसरा एखादा चांगला शब्द सुचला तर जरूर कळव.. मी पण बघतो दुसरे काही जमतेय का? एक अजून मिसरा असा सुचलेला आज कळले, का जगी ह्या पोळले आयुष्य माझे! आफ़ताब : मतला आणि भिकारी आवडले खूप.. हे कुठले वॄत्त आहे?
|
Princess
| |
| Thursday, November 01, 2007 - 10:42 am: |
| 
|
मिल्या... जबरदस्त. सगळेच शेर जबरी.. पण सुख, दु:खाचा कळला नाही (किंवा कळुन सुद्धा आतवर पोहचला नाही)
|
|
|