|
Anilbhai
| |
| Thursday, November 01, 2007 - 12:41 pm: |
| 
|
मिल्या, सुरेख गजल. एक बदल मोगरा फुललाच नाही अंगणी माझ्या कधीही त्यास हाती बांधुनी मी! उधळले आयुष्य माझे इथे 'त्यास' च्या ऐवजी 'ज्यास' कस वाटेल.
|
मिल्या, मस्त गज़ल! सिक्सर!! शेवटचा शेर मात्र मला तितकासा आवडला नाही. उपमा, रुपकं ही आपणच explain केली ( उदा : ' देहरूपी जोखडाला') की त्यातली गंमत कमी होते असं मला वाटतं. म्हणजे याच गज़ल मधलं उदाहरण द्यायचं तर ' दुःखे झडप घेण्या' च्या जागी ' दुःखरूपी श्वापदे' म्हटलं तर तितकं छान वाटेल का? अर्थात, हे अगदीच वैयक्तिक मत. आफ़ताब, पहिले तीन शेर अर्थासाठी आवडले, पण मला वृत्त समजलं नाही हे. देवा, छान प्रयत्न. शुद्धलेखनाकडे जरा दुर्लक्ष होतंय मात्र. उदा : ' शालू' मध्ये ' लू' दीर्घ हवा आहे, मात्रांसाठीसुद्धा. ' काठावरचा' ही टायपो असावी. पुलस्ति, देवाच्या गज़ल मध्ये ' का पाण्याचे' वगळता बाकी प्रत्येक ओळ २४ मात्रांची आहे. ' काय आगळीच' मध्ये वृत्तभंग कसा झाला ते समजलं नाही. मला तो शेर खूप आवडला. आणि शेवटचा ' फसवत गेले' ( ठाउक मध्ये तडजोड असूनही) आवडला.
|
Pulasti
| |
| Thursday, November 01, 2007 - 2:39 pm: |
| 
|
मिल्या, पुन्हा एकदा मनापासून दाद! दावणी चा शेर पुन्हा वाचला आणि पहिल्यापेक्षा जास्त आवडला! आफ़ताब - पहिले २ शेर मस्तच आलेत! देवा / स्वाती - "आगळीच" मिसर्यात माझी गल्लत झाली. मात्रा २४ च आहेत, वृत्त नीट आहे. जरा मला लय पकडता न आल्यामुळे कदाचित गोंधळ झाला. क्षमस्व. मिल्या, वैभव - मोठ्या मीटरमधे लिहिणे मला जरा कठीण जाईल असे वाटते पण जरूर प्रयत्न करीन प्रतिसादांबद्दल धन्यवाद! -- पुलस्ति.
|
Devdattag
| |
| Friday, November 02, 2007 - 3:36 am: |
| 
|
मिल्या जबरीच झालिये गझल.. वैभव, स्वाती धन्यवाद.. स्वाती, मला वाटलं लु नेहमी पहिलाच असतो.. , शुद्धलेखन आधीच तपासून घ्यायला पाहिजे खरंतर.. वैभव, सहजतेतच घोडं पेंड खातं ना.. प्रयत्न करतोय..
|
Aaftaab
| |
| Friday, November 02, 2007 - 5:33 am: |
| 
|
धन्यवाद मित्रहो.. खूप दिवस लखलखाट, झगमगाट वगैरे डोक्यात चालू होतं. त्याचं पुढे चीज करण्याइतकी मेहनत मात्र केली नाही.. जे जमलं ते लिहिलय. मीटरबद्दल म्हणायचं तर सगळीकडे एकच pattern follow केला तर पुरेसं आहे असं मला वाटलं, म्हणून गागालगालगागा गागालगालगागा मधला एक गा खाऊन टाकला.. मिल्या, तुझी ग़ज़ल एकदम सहज सुन्दर आहे.. अभिनंदन!
|
Desh_ks
| |
| Friday, November 02, 2007 - 6:49 am: |
| 
|
मिलिंद, छानसं, भावनांना आवाहन करणारं काही अनुभवताना रोमांचित होणं हा अनुभव तुमची गझल वाचताना आला. विशेषत: त्यातले हे शेर. पाहुनी बाहेर दु:खे झडप घेण्या थांबलेली मी सुखाच्या दावणीला बांधले आयुष्य माझे भाग्य हातांनी घडविले! भ्रम जरी माझा फुकटचा खेळणे होते तुझ्या हातातले आयुष्य माझे हासल्यावर तू, कळ्यांचा अंगणी वर्षाव झाला वेचण्यासाठी फुलांना, वेचले आयुष्य माझे झापडे लावून मोहाची वृथा फेऱ्यात फिरलो देहरूपी जोखडाला जखडले आयुष्य माझे आफताब, रुपयांत भीक आता, मागतो भिकारी नाही कसे म्हणावे? भरभराट आहे! हे छानच! -सतीश
|
Milya
| |
| Monday, November 05, 2007 - 12:49 pm: |
| 
|
सर्वांनाच खूप खूप धन्यवाद!!! भाई : त्यास चा ज्यास केला तर... चांगला बदल आहे पण मग मला अभिप्रेत असलेल्या अर्थापेक्षा एकदम उलटा अर्थ होईल असे वाटते... स्वाती : पटले तुझे.. रुपक एवढे स्प्ष्टपणे सांगितले की त्यातली गम्मत जाते पण कधी कधी ते खूप अस्प्ष्ट ह्यायची भिती पण असते की शेराचा अर्थ लागत नाही... ह्या दोन्हीमधला तोल सांभाळता यायला पाहिजे खरे तर.. हा मुद्दा लक्षात ठेविन...
|
Anilbhai
| |
| Monday, November 05, 2007 - 5:31 pm: |
| 
|
जो मोगरा फ़ुललाच नाही तर तो हाताला कसा बांधणार?. तुला काय अपेक्षीत आहे?.
|
Nachikets
| |
| Tuesday, November 06, 2007 - 4:26 am: |
| 
|
मला हा मोगर्याचा शेर वाचताना (खरं तर ऐकताना ) "माझ्या अंगणी" हे जास्त महत्वाचे वाटले. म्हणजे, तो मोगरा इतरत्र फुलला असेलही (किंवा नसेलही) अशी शक्यता राहते. बाकी मिल्या सांगेलच काय ते.
|
|
|