Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 01, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » आश्विन » कथा कादंबरी » क्लोजप » Archive through November 01, 2007 « Previous Next »

Mimajhi
Wednesday, October 31, 2007 - 6:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'तुम्हाला एक निरोप आहे', त्या संकेतस्थळाकडून आलेली मेल सांगत होती, प्राचीने अगदी उत्सुकतेने उघडली. तिला रजिस्टर होउन जेमतेम चार दिवसच तर झाले होते. तिने फारसे काही लिहिलेही नव्हते, उगाच आपले दोन चार प्रतिसाद, आणि लगेच एक मेल..खुषच झाली ती.

तुमचा माझ्या वरणभात या लेखाला लिहिलेला प्रतिसाद वाचला तू तुम्हाला खूप खूप आवडला हे तुम्ही एवढ्या मनापासून लिहिलत याच मलाही मनापासून बरं वाटलं. कसे एखाद्याशी सहज सूर जुळून जातात नाही ? माझे तर असे अनेकदा होते की अनोळखी लोकही लगेच माझ्या अगदी प्रेमातच पडतात. आता ओळख झाली आहेच, ती वरणभातासारखीच दृढ करूया. कधीतरी भेटायला आवडेल. मी सध्या दमणला असतो खाजगी नोकरीत, तुम्ही ?
तुमचा
सुरेश

मेल वाचून ती थोडी बुचकाळ्यातच पडली, लहानपणच्या वरणभाताची आठवण सांगणाऱ्या एका ललित लेखाला की ज्यात विषयांतर होत होत लेखाचीच खिचडी झाली होती, त्याला आपण 'छान आहे' असा एक माफक प्रतिसाद दिल्याचे तिला आठवले.

सुरेशचे अजून लेखन शोधले तेंव्हा तो बऱ्याच विषयांवर लिहितो आणि त्याची संकेत्स्थळावरच्या बऱ्याच जणांशी ओळख आहे असे दिसले आणि मग तिने नि:शंक मनाने उत्तर लिहिले.

'मी मुंबईत असते, नुकतेच लग्न झाले आहे, आता थोड्या दिवसांनी पुन्हा नोकरीचा शोध सुरू करणार आहे. तुम्ही किती वेगवेगळ्या विषयावर लिहिता हो. किती माहिती आहे तुम्हाला. चला अच्छा, भेटू कधी तरी'

'प्रिय प्राची, थोड फार लिहितो, एवढा काही ग्रेट नाही, अजून पुल, जीए, मारूती चितंपल्ली वगैरे सारखी सफाई नाही आली माझ्या लेखनात, पण लोकांन मात्र उगाच वाटते की मी त्यांच्यापेक्षा छान लिहितो म्हणून . हो जरूर भेटु. पुढच्या वेलेला मूंबईला आलॉ की तुझ्या घरी नक्की येणार. अगदी प्रॉमिस. तुमचाच सुरेश'

सुरेश घरी आले तेच एक्दम मस्त दमण स्पेशल बर्फी घेउन, सासुबाई, नवरा सगळ्यांशी हसून बोलले, आधेवेढे न घेता जेवायला थांबले आनी एक चांगली छाप पाडून परत गेले. आठवणीने घरातल्या सगळ्याम्चे फोटो काढून घेतले होते त्यांनी. अशाच भेटिगाठी वाढत गेल्या. एकदोनदा एकटेही भेटले ते फुलं बघायला म्हणून काही बागात चक्कर मारली, चौपाटीवर हिंडले. अगदी गुणी मनुष्य, नाही मह्णायला एक दोन गोष्टी खटकायच्या प्राचीला , जास्त सलगी करायला बघतात का असे कधी वाटायचे शारिरिकपेक्षा भावनीक जास्त तर कधी फार खाजगी गोष्टीत लक्ष घालतात प्रश्न विचारतात , किंवा उगाच इतर चार चौघांना मुद्दाम आम्ही फिरायला गेलो होतो बागेत असे सांगतात असे वाटायचे. पण असे ते इतर काही मुळींबद्दल पण लिहायचे म्हणू खूप काही वाटले नाही, असतो एखाद्या शो ऑफ करण्याचा स्वभाव. शिवाय त्यांचेही काही प्रॉब्लेम्स होते त्यातून असा स्वभाव झाला असेल असे म्हणून सोडून द्यायची प्राची. दुसरी एक गोष्ट म्हणजे आजूबाजूचे फोटो काढतोय असे दाखवत कधी कधी माझे क्लोजप काढायचे, आणि मग मला पाठवून द्यायचे ईमेलने. ते नाही आवडायच प्राचीच्या नवऱ्याला, तिने म्हटल कस सांगू त्यांना ? तो म्हणाला स्पष्ट सांग, त्यात काय भ्यायच. पण नाहीच जमल ते.

विशेषतः तिच्या समस्या डिस्कस करण्यात त्याला फार रस असायचा असे तिला जाणवले. एकदा असाच फोन, अग मी या या हॉतेलला उतरलो आहे, थोडा वेळ भेटता येईल का ? कुठे ? तिने विचार केला हॉटेलवर नको जायला. पण सुरेश लगेच म्हणे की माझी कंबर दुखते आहे तू येउन जा ना, मी तुझ्या सासूबाईसाठी खास लोकर आणली आहे. प्राचीला वाईट वाटले, ती म्हणाली येते. हॉटेलवर गेली, थोड्या वेळ गप्पा झाल्या, पुन्हा एकदा फोटो झाले आणि ती निघाली, खाली आल्यावर लक्षात आले की किल्ली वरच राहिली, तशीच पुन्हा वर आली, दारात पेपर अडकल्याने दार नीट लागले नव्हते, दार उघडून आत आली आणि समोर काय चालले आहे ते बघून तिला उलटीच आली. सुरेश पलंगावर पसरला होता, त्याचा कॅमेरा कवटाळून त्यावरची तिचीच इमेज झूम करून तो ती हपापल्यासारखा कुरवाळत होता. ती मुळापासून हादरली, उलट्या पावली परत फिरली.

तिने आल्यावर भराभर त्याच्याशी आजपर्यंत कम्युनिकेशन केलेल्या, त्याला स्क्ऱॅप लिहिणाऱ्या मुली शोधल्या, त्यांना मेल लिहिल्या, एक दोन दिवसातच उत्तरे आली, सगळीकडे तेच, तिला अपघातानेच आलेला शेवटचा अनुभव सोडला तर सगळे तेच,मेल, ओळख, खाद्यपदार्थ, सिडी, पुस्तके, अशा भेटवस्तू खाजगी सल्ले, फोन, भेटणे, मर्यादा न ओलंडता पण तरी खटकणारी सलगी, प्रत्येकीचे अनेक वेळा काढलेले फोटो आणि क्लोजप, सगळ्यासोबत भेटले तरी काहीतरी कारण काढून थोडा वेळ एकट्याने भेटण्याचा प्रयत्न, सगळे तेच.

ती सुन्न झाली. खरे तर काय घडले होते ? काहीच घडले नव्हते ? त्याने तर स्पर्शही केला नव्हता तिला, पण तरी तिला अस्वच्छ वाटू लागले. त्याच्याकडे आपले किती फोटो क्लोजप आहेत यानेच तिला मळमळू लागले. अशा संभावितांचा क्लोजप दिसायला किती वेळ लागला याबद्दल ती स्वतःला दूषणे देण्याव्यतिरिक्त पण करण्यासारखेही काहीच नव्हते ही जाणीव तिला अजूनच अपराधी बनवून गेली.

समाप्त
एका मैत्रिणिच्या नौभवावरुन लिहिलीये, गोष्ट आहे की ललित नीत कळले नाही.




Daad
Wednesday, October 31, 2007 - 10:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापरे, कसला अनुभव हा!
'मी माझी', तुमची शैली छानय. अजून कथा, ललित वगैरे येऊदे, वाट बघते.


Ss_sandip
Wednesday, October 31, 2007 - 11:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

psychik ka kaay mhantaatt to problem asavaa tyacha bahutek. pan kathaa chaan hoti baraka.

Akhi
Thursday, November 01, 2007 - 4:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापरे!!!! काय भयानक अनुभव!!!! एकदम shocked

पुढच्या कथेची वाट बघतेय.


Itgirl
Thursday, November 01, 2007 - 4:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापरे!! काय भयानक!! अतिशय धक्कादायक!! आणि मैत्रिणीचा अनुभव असेल, तर खरच किती शॉक बसला असेल तिला :-(

Mi_anu
Thursday, November 01, 2007 - 5:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपला किंवा मैत्रिणीचा अनुभव हादरवणारा आहे यात शंकाच नाही.
इतर ठिकाणी कोणी व्यक्तीगत बाबींत जरा चौकशी करायला लागले तर 'माइंड युवर ओन बिझनेस' म्हणून सुनावणार्‍या स्त्रीया(किंवा काही केसमध्ये पुरुष) बहुतेकदा हल्ली मराठी संकेतस्थळांवर एखाद्या सदस्याला व्यक्तीगत बाबींत दखल घेऊ देतात, प्रश्न शेअर करतात, कारण 'साहित्यीक पातळीवर वावरणारे' सदस्य कोणत्याही हीन हेतूने संपर्क साधणे शक्यच नाही, ते चांगलेच आहेत याची त्यांना खात्री असते. समोरचा एक पुरुषस्त्री या नात्याने विचारत नसून समविचारी साहित्यीक या उच्च पातळीवर संवाद साधत आहे वगैरे भ्रमात बरेच मराठी सं. स्थ. सदस्य जगत असतात.
पण हेही लक्षात घ्यायला हवे की आंतरजालावर आपली इमेज विचार करुन लिहून आपल्याला हवी तशी बनवता येते. तशी ती प्रत्यक्षात असेलच असे नाही. आंतरजालावर आपल्याला रियाक्ट करायला पुरेसा वेळ मिळतो. आपली प्रतिमा समोरच्याच्या मनात कशी तयार होईल याचे आडाखे बांधून त्याप्रमाणे लिहीता येते. बरेचदा एखादा हे मुद्दाम करतो असेही नाही, ते होत जाते. पण आंतरजालावरचे प्रोजेक्शन हा पूर्ण माणूस नव्हे, तो फक्त त्याच्या व्यक्तीमत्वाच्या अनेक पैलूंतला एक आहे, त्यामुळे सावध राहणे उत्तम. तसेच अनावश्यक माहिती, उदा आपला दूरध्वनी क्र. किंवा इमेल आयडी प्रतीसादांच्या किंवा लेखाच्या ओघात देऊ नये. जवळजवळ पाच सहा हजार सदस्यांना आपण आपल्या आयुष्यातला काही भाग उलगडून दाखवत आहोत, ते सगळे एकसारखे नसतील याची काळजी स्त्री वा पुरुष सर्वांनीच घ्यावी. अन्यथा एखादा अदनान ऑरकुटाच्या ओळखीतून प्राणास मुकला तशा सौम्य घटना मराठी सं स्थ वरुन घडण्यास जास्त वर्षे लागणार नाहीत.
मला माहिती आहे, मी जरा अतिशयोक्त आणी बळंच शहाणपणा शिकवणारे लिहीले आहे. पण विषयच असा होता की लिहावेसे वाटले.
(अशा स्वरुपाचे काही सौम्य आणि लहानसहान अनुभव घेतलेली) अनु.


Ajjuka
Thursday, November 01, 2007 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथा म्हणून चांगली आहे. तसं पाह्यलं तर दिसायला घडत काहीच नाही पण अनुभवातून जाणार्‍याची मात्र पडझड होते. ते छान रंगवलय आणि यावर उपाय म्हणून ती नेट वर स्वतःची प्रोफाइल दडवते किंवा तत्सम काही उपायांच्यापाशी शेवट आणला नाही हे फार बरं केलंस.

अनुभवाबद्दल... shocking नाही. घाणेरडा आहे हा अनुभव आणि त्रासदायक. पण जेव्हा आपण ४ लोकांच्यात माहित असतो तेव्हा आपले मित्र म्हणवणारेही असं fantacise करत नसतीलच अशी gurantee देता येत नाही.. मग हा तर उघड उघड हिंटस देत होता.
वेल.. ओळखून असावे पण जोवर आपल्यापाशी काही येत नाही तोवर काणाडोळा करण्यापलिकडे पर्याय नाही. विकृतीचा तुम्ही नायनाट करू शकत नाही.
किंवा एखाद्याने एखाद्याबद्दल आपल्या private वेळात आणि space मधे नुसते fantacise केले तर त्याला थांबवू ही शकत नाही आणि त्यात प्रचंड अयोग्य असेही काही नाही. आपण सगळेच कुठल्या ना कुठल्या पातळीवर कुणा ना कुणाबद्दल fantacise करत असतो. कोणी नुसतं स्वप्न बघेल तर कोणी विचार करत गादी उशी कवटाळेल. डीग्रीचा फरक. घोळ आहे की आपण स्वतःला खूप पवित्र, righteous (स्पे चु भू दे घे) समजतो, मखरात बसवतो आणि माणूस म्हणून येणार्‍या -ve गोष्टी नाहीतच असं ठरवून मोकळे होतो. पण असं काही नसतं.
तेव्हा थोडंसं दगड बनणं गरजेचं आहे नाहीतर बुरख्यात राहूनही फरक पडणार नाही..


Princess
Thursday, November 01, 2007 - 5:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीमाझी, खुपच धक्केदायक खरेतर खुप वाईट अनुभव. मुलीनी सध्याच्या जगात जपुनच राहिलेले बरे. दिवसेंदिवस विकृत लोकांचे प्रमाण वाढतेय.

Ashwini_k
Thursday, November 01, 2007 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डोकं सुन्न झाले हो! :-(

Anaghavn
Thursday, November 01, 2007 - 5:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीमाझी,
प्रत्यक्ष काहीच घडत नसताना,बरेच कही घडते.ते छान दाखवले आहेस.म्हणजे घडले ते भयानकच,पण सांगण्याचि पध्द्त वाखाणण्याजोगी.
समोरच्या कडुन आपल्याला बरयाचदा हिंट्स मिळत असतात, पण आपण कधी कळूनही दुर्लक्ष्य करतो, किंवा कधी स्वतःच्याच मनाला(जे आपल्याला काही सूचना देत असतं ) चूक ठरवतो.
आपल्या मनाला निग्लेक्ट न करता, निदान त्याला म्हणायचंय तरी काय? हे बघावं. आणि मग सारासार विचार करून पुढचं पाऊल टाकावं.
एकदा ही सवय लागली की मग त्याचं प्रोग्रामिंगच होऊन जातं, आणि मग आपोआपच आपण वागताना बलेन्सड वागत जातो--सहजपणे.
अर्थात यासाठी आपण जाणिवपूर्वक सराव करावा लागतो--चुकतमाकत.

बरयाचदा मुलींना अगदी सौम्यगडद प्रमाणात,कळत नकळत्--कधी शाळेत,कधी कॉलेज मध्ये,तर कधी बाहेरच्या जगात्--अनुभव येत असतात. आपल्या सगळ्यांपैकी अनेकींना आले आहेत.
पण त्यातून बाहेर येणं खूप महत्वाचं आहे.

सगळ्या पुरुषांना एकाच तराजूत तोलणं चुकीचं वाटतं मला.
बरयाचदा काही मुलं चुका करतात हे खरंय. पण त्याचा त्यांना पश्चाताप होतो नंतर. आणि मग ते त्या चूका सुधारण्याचा प्रयत्न करत असतिल, तर त्यांना संधी मिळाली पाहीजे. एकच शिक्का त्यांच्यावर लाऊन, एकाच चश्म्यातून त्यांच्याकडे बघणं हा अन्याय होईल.
विशेषतः, टीन एज मुलं जर असतिल तर त्यांन समजाऊन सांगण आणि त्यांना त्यासाठी वेळ देणं हे महत्वाचं ठरतं.त्यावेळी दोष वयाचा असतो.
योग्य वेळी योग्य गोष्टी समजाऊन सांगितल्या तर एक योग्य माणूस तयार होईल.
अनघा


Ana_meera
Thursday, November 01, 2007 - 7:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किळसवाणा पण डोळे उघड्णारा अनुभव.. या मायाजालात वावरताना अशी माणसे असणार... पण फोटो सतत काढ्णार्‍याचा संशय यायला पाहिजे होता मैत्रिणीला.. आधुनिक युगातली स्त्री इतकी भोळी... हॉटेलात पण एकटी भेटायला गेली? असो.. कोणतेही युग असो, स्त्रियांनी 6th sense जागृत ठेवायला हवा असे वाटते.. :-(

Ajai
Thursday, November 01, 2007 - 7:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथा ठीक्- पण मांडलेला प्रश्न खुप गंभीर. व्हर्चुअल जगात स्वतचा कुरूप हेतू दडऊन चांगला चेहरा प्रेसेंट करण सहज शक्य आहे. निश्कारण वय्यक्तीक गोष्टीत नाक खुपसणार्‍यांना दुर ठेवणेच उत्तम. यात पुरूष, स्त्री असा भेद करू नये. मायबोलीवर माझे वैयक्तीक मित्र मैत्रिणी नाहीयेत, पण याहुवर बरे वाईट बरेच अनुभव आहेत.
मदत करणार्‍या बर्‍याच व्यक्ती भेटल्या तसेच वाईट अनुभव ही खुप आले.
याहूवर एक मराठी ग्रुप होता. त्यात एक मुलगी होती जी अतीशय सेन्सिबल बोलायची आणि एकंदरीत level headed वाटायची. स्वतच्या आजारपणाची खोटी कहाणि रचुन सगळ्यांची सहानभुतीही मिळवली. तीचा खोटेपणा जेव्हा कळला तेव्हा तीच्या virtual Image च्या प्रेमात पडलेला एक मुलगा (तेव्हा तो MS करत होता professionally he is doing great now) अगदी आत्महत्या करण्याच्या मार्गावर होता. तेव्हा त्याला आधार देणारे सुद्धा या मायाजालातलेच मित्रमैत्रिणी होत्या.
आणि एक मैत्रीण मला माहीती आहे तीच्या खर्‍या आयुष्यात breakup झाला होता. तीला नेटवर सहानभुती दाखवुन येकाने नंतर तीचे आयुष्य बरबाद केले.
सगळ्याच अनुभवावर लिहण्या येव्हढा प्रामाणिकपणा माझ्यात नाहीये.
हा विषय मांडलात हे खुप महत्वाचे.


Aaftaab
Thursday, November 01, 2007 - 8:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरती अज्जुकाने खूप महत्त्वाची बाब सांगितलीये. प्रत्येक मनुष्य (स्त्री वा पुरुष) चांगल्या तशाच वाईट गुणांचा मिळूनच बनलेला असतो. आजच्या जगात अगदी सद्गुणाचा पुतळा बनून (सार्वजनिकपणेच नाही तर खाजगीमध्येही) राहणं एक आव्हानच आहे.. इंग्रजीमध्ये म्हणतात ना " She brings about the best (or worst) in him.. हे तसंच काहीसं आहे. जेव्हा ती व्यक्ती दिलखुलास, मदतीला तयार, एक चांगला मित्र वगैरे भूमिका निभावत असते, तेव्हा तेही खरंच असतं किंवा असू शकतं, आणि त्याच व्यक्तीचं किळसवाणं वाटणारं रूपही तितकंच खरं असू शकतं. मी त्याच्या कृत्यांचं समर्थन करत नाहिये, फ़क्त एक विचार मांडलाय..


Zakasrao
Thursday, November 01, 2007 - 8:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बाप रे.
हा अनुभव अगदीच बेक्कारच आहे. :-(
हे असही होउ शकत हे तुम्ही ह्यातुन मांडल ते छानच केलत.
अज्जुकाने खुप छान लिहिले आहे. सहमत आहे.
असो.
पण मला एक गोष्ट खटकली ती म्हणजे तो जो कोणी माणुस असेल तो दरवाजा असा थोडा का असेना उघडा ठेवुन अस काही करेल ह्याची. तो त्याबाबतीत काळजी घेइलच. आणि एखाद्या वेळी चुकेल तो पण प्रत्येक वेळी अशी चुक करनार नाही असे मला वातते.


Mimajhi
Thursday, November 01, 2007 - 11:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


खूप खूप बरं वाटल माझ्या पहिल्याच लेखनाला सर्वांनी दाद दिली म्हणून. नवऱ्याने सावध केले तेंव्हा हीच मैत्रीण नवऱ्याशी भांडली होती की तुम्ही पुरूष एकाच चष्म्यातून बघता म्हणून. पण मग नंतर नवऱ्याला सगळे सांगतांनाही खूप लाज वाटली. नवऱ्याने समजून घेतले, पण आता एखादा मित्र घरी आला आणि तो नवऱ्याला आवडला नाही तर खूपच दडपण येत तिच्यावर, नवरा टोचत नाही, पण कुठे तरी मनात मागे असे असतेच ना 'एकदा झाला ना शहाणपणा करून....' कदाचित त्याला नसेल तसे म्हणायचे.. पण काय माहित अधीच्या नंतराच्या कुठल्याच मित्रांबरोबर तो मोकळेपणा नाही राहिला आता. थोड विचित्रच झालय. या कुचंबणेबद्दल थोड लिहायला पाहिजे होत पण नाही जमल. सुरूवातीला खूप संताप आला तिला. त्याला सगळ्याSअमोर एक्स्पोज करावे,असे पन वाटले, पन नंतर वाटले की झाली तेवढी शोभा पुरे झाली, त्याला एक्स्पोज करण्यात तीही एक्स्पोज होणार.

सुरेशचे काय, तो तर मजेतच असेल अजून. हे वाचेल तेंव्हा त्याला कदाचित प्राची अचानक बोलेनाशी का झाली , काँटॅक्ट का तोडला ते कळले असेल. आणी त्याचे बाकी जे गुण होते ते काही खोटे नव्हते, हा मनुष्य असे करूच शकत नाही, आपली बघण्यात काही चूक झाली असेल असे स्वतःला समजवण्याच किती प्रयत्न केला तिने. त्याच्या एकून प्रोजेक्शनमुळे त्यालाही नव्या नव्या मैत्रिणी मिळतही राहतील, अज्जुका म्हणते तसा द्रूष्टिआड स्ऱूष्टी असा विचार केला तर त्यांना मानसिक त्रासही होणार नाही, पण मला तरी वाटते की सावधगिरीच घेतलेली बरी अशी काही लक्षण दिसली तर कारण सत्यघटना आहे आणि फार दूरचीही नाही. १० मित्रातला एखादाच स्वतःहून उगाच क्लोजप फोटो वगैरे काढत असेल तर सावध राहिलेलेच बरे..

अनुचे म्हणणे १००% टक्के पटले. अशी एखादी मैत्रिण आधीच मिळाली असती तर प्राचीला... आताचा सगळा मानसिक त्रास टळला असता.

झकासराव सग्ळ्यांना हा घाणेरडा सोडून बाकी सगळे आधीचे अनुभव आले असे लिहिले आहे मी. .आणि झाले ते तसे झाले होते. ते तसे का झाले, म्हणजे त्याने का नीट लॉक केले नाही (दार लावलेलेच होते पण पेपर का पायपुसणे काहीतरी फटीत अडकल्याने लॉक झाले नवह्ते), तिने का नॉक केले नाही (कदाचित दोन मिनिटापुर्वीच बाहेर पडली होती म्हणून ?) असे प्रश्न पडणे त्या परिस्थितीत थोडे अवघड होते.

तुमच्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद.


Rajankul
Thursday, November 01, 2007 - 11:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे वाचेल तेंव्हा त्याला कदाचित प्राची अचानक बोलेनाशी का झाली , काँटॅक्ट का तोडला ते कळले असेल.>>पन बाई कॅमेरातील इमेज इतकी छोटी असते ती तुम्हाला दारातुन दिसली शिवाय त्याला त्या अवस्थेत कळलेच नाही तुम्ही येउन किल्ली घेउन गेलात? माफ़ करा मी तुम्हाला खोटे ठरवत नाही. (मला वाटते ही कथा तुमचीच आहे कुणा मैत्रिणीची नाही.) सत्य आहे तर मोकळं बोला घाबरु नका.

Vegayan
Thursday, November 01, 2007 - 12:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटत हि कथा अहे आणी
त्यावरील प्रतिसादच लेखिकेला अपेक्षीत असतो. उगाच ही घटना कुणावर बेतली आहे हा प्रश्नच येत नाही.. कथेवरील अभिप्राय न देता ती कोणची सत्यघटना आहे कि नाहि हे कशाला?
Admin योग्य न वाट्ल्यास तुम्ही माझि post खुशाल delete करा

Rajankul
Thursday, November 01, 2007 - 12:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवऱ्याने सावध केले तेंव्हा हीच मैत्रीण नवऱ्याशी भांडली होती की तुम्ही पुरूष एकाच चष्म्यातून बघता म्हणून. पण मग नंतर नवऱ्याला सगळे सांगतांनाही खूप लाज वाटली. नवऱ्याने समजून घेतले, पण आता एखादा मित्र घरी आला आणि तो नवऱ्याला आवडला नाही तर खूपच दडपण येत तिच्यावर, नवरा टोचत नाही, पण कुठे तरी मनात मागे असे असतेच ना 'एकदा झाला ना शहाणपणा करून....' कदाचित त्याला नसेल तसे म्हणायचे.. पण काय माहित अधीच्या नंतराच्या कुठल्याच मित्रांबरोबर तो मोकळेपणा नाही राहिला आता. थोड विचित्रच झालय. या कुचंबणेबद्दल थोड लिहायला पाहिजे होत पण नाही जमल. सुरूवातीला खूप संताप आला तिला. त्याला सगळ्याSअमोर एक्स्पोज करावे,असे पन वाटले, पन नंतर वाटले की झाली तेवढी शोभा पुरे झाली, त्याला एक्स्पोज करण्यात तीही एक्स्पोज होणार.>>.
लेखिकेच्या इतर सगळ्या स्पष्टीकरणावरुन तरी वाटत नाही ही कथा आहे म्हणुन.

Mimajhi
Thursday, November 01, 2007 - 12:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला त्या प्रसाम्गाचे सविस्तर वर्णन टाळायचे होते म्हणून मी मुद्दाम तपशील नाही दिला.

सुरेशला फोटो काढुन झूम करून दाखवायची सवय होती, असा एखादा पाचच मिनिटापुर्वी पाहिलेला स्वत्:चा फोटो ड्रेसच्या रंगामुळे तीन इंची स्क्रीनवर सुद्धा ओळखू येऊ शकतो, ओळखू आला
एका क्षणात घडल सगळ. दार उघडण, पोटावर झोपून, दोन हातात कॅमेरा धरलेला, दारकडे पाय असलेला सुरेश, निमिषार्धात ओळखू आलेल्ला फोटो, आणि दाराचा / पायाचा आवज ऐकून गडबड्लेला सुरेश, तिने पटकन टीव्हीवरची उचललेली किल्ली, आणि जाते म्हणून काढलेला पळ. त्या दोन क्षणात वाटलेली भीती, तिने काय पाहिले, किती पाहिले हे नाही कळले बहुधा सुरेशला. म्हणजे मनात शंका असेल पण तसातो ओव्हरकॉंफिडंट आहे. ठेट काही बोलू शकत नव्हती ती, आजकाल फोटो वाप्रून ऑरकूट्वर खोटी घाणॅरडी प्रोफाईल बनवून वगैरेही सूड घेऊ शकताट लोक. ती टाळतेय लक्षात आल्यावर त्याने विचारले चार पाच वेळा तरी, काय आजकाल वेळ नसतो आमच्यासाठी etc.

अनि कथा मझीच आहे की पण घटना माझी नाही.

बर ते जऊ द्या हो. व्यक्ती आणि त्या घटनेच्या तपशीलात नको जायला प्लीज. ते अजिबात महत्वाचे नाही.

एक कथा म्हणूनच बघा, अनु म्हणाली तसा ज्यांना जो बोध घ्यायचा आहे तो ते घेतील.
पुन्हा एकदा धन्यवाद.


Meenu
Thursday, November 01, 2007 - 2:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हं ! खरंय मीमाझी, धन्यवाद हे इथे लिहील्याबद्दल. योग्य ती काळजी मैत्रिणी घेतीलच.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators