Namrata4u
| |
| Friday, October 12, 2007 - 8:25 am: |
|
|
एक होत रानफूल अवचित फूलल ...सौन्दर्य अन सुगंधावाचुन जगल त्याचा मनी त्याने एक शल्य जपल कारण काय माझ्या असण्याच नाही माध्यम मी देवाला पुजन्याच नाही सौन्दर्य नाही सुगंध कधीच नाही होणार माझ निर्माल्य पण तेवढयात एक राजकुमार आला हो तो होता भिल्लांचा राजकुमार ज्याने त्या फूलाला कल आपलस कोवल्या मृदु स्पर्शातुन दिल त्याला हव असलेल त्यातून जणू सांगीतल , प्रत्येकाच्या अस्तित्वाला महत्व असते बघणारयाच्या नजरेत तर सौन्दर्य असते
|
Namrata4u
| |
| Friday, October 12, 2007 - 8:27 am: |
|
|
|
Kkaliikaa
| |
| Saturday, October 13, 2007 - 12:34 pm: |
|
|
प्रेम म्हणजे काय घडाभर पाणि???? तहान लागली ..... पीऊन टाकलं संपलं सारं........................ प्रेम म्हणजे काय निरभ्र आकाश????? ढग जमल्यावर .... आलं झाकोळुन संपलं सारं......................... प्रेम म्हणजे अद्वैत भक्ति राधेची प्रिती...... मीरेची विरक्ती प्रेम म्हणजे प्रेम फक्त.............. प्रेम म्हणजे शाश्वत ईशशक्ती!
|
Mi_vikas
| |
| Saturday, October 13, 2007 - 12:42 pm: |
|
|
पाहीले तूला जेव्हा मी हरवून मीच मज गेलो माझ्याच जून्या गीतांना सूर नविन लावित गेलो गुंतता ह्रदय हे माझे उरले ना बंध क्शितिजाचे स्म्रुतिगंध मनी दरवळता मी तोल सावरित गेलो जाहले भास श्वासांचे अन कोमल तव स्पर्शांचे पावुल पुन्हा घुटमळता मी वाट आठवित गेलो पाहिले तुला जेव्हा मी ....... विकास
|
Kkaliikaa
| |
| Saturday, October 13, 2007 - 1:56 pm: |
|
|
मनाचा ठाव घेता आला असता तर........ तर मी त्यालाच सर्व कांही सांगीतलं असतं तुला ते कळण्याइतपत....... नक्किच असलं असतं! नयनांची भाषा तु ज़ाणली असती तर.... तर मला बघण्याची ओढही तेवढीच असली असती सुक्ष्मांनाही जाणिव होईल....जरा डोळे मीटुन तर बघ! भावना कळ्तात कां कधि एक-मेकांना??? खरं सांग...खरं खरं सांग कां जाणुन बुजुन, पेडगांवला जाणे... ह्यालाच म्हणतात! ओढ काय असते ....... मला नसणार कां ठाऊक??? ह्रदयांची भाषा मलाही समजते कांहीशी सीमा मर्यादा काळाचं बंधन.... जायचं नसतं असं ओलांडुन! तुझं येणं हर्षाचं आंदण... आणि जाणं किती जीवघेणं गोड गुपीतं स्वत:च उलगडायची असतात बघ नं जरा अंतरंग न्याहाळुन!
|
Meghdhara
| |
| Wednesday, October 17, 2007 - 9:23 am: |
|
|
अगदी खरय बदामराजा. अगदी आईची आठवण झाली. मेघा
|
Menikhil
| |
| Wednesday, October 17, 2007 - 5:09 pm: |
|
|
डोळ्यान्च्या कडा चटकन ओल्या झाल्या.
|
badamraja, ही जागा तुमचे स्वताचे साहित्य पोष्ट करण्यासाठी आहे. तुमची कविता खालील ठिकाणी हलवली आहे. /cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=103385&post=1013597#POST1013597
|
Mkmanasi
| |
| Thursday, October 18, 2007 - 9:12 am: |
|
|
अजुनही अतॄप्त मी श्रावण येता नाचु लागला मोर, गगनात या थाटला काळ्या ढगांचा शोर दाट काळोखात या वीज ही कडाडली, ढगांच्या कुशीत जणू सौदामिनी ही नाचली अनेक दिवसांनी जाहला वर्षाव आनंदाचा, पूर ओसंडला बागडणार्या चिमण्यांचा तठी काठा भरुन आले नद्या आणि नाले, रुक्ष कोरडे वॄक्षही आनंदात नाहले धरणीने या धारण केला हिरवा शालु, शेतामधली पिके कणसे लागली नाचु डोलु ग्रीष्मानंतरच्या पावसात झाली शांत भूमी, दुखा:च्या या वाळवंटात अजुनही अतृप्त मी........
|
Desh_ks
| |
| Friday, October 19, 2007 - 8:55 am: |
|
|
सर्व मायबोलीकर कवी आणि काव्यरसिकांना दसर्याच्या शुभेच्छा. तसं तर बर्याच मायबोलीकरांनी अक्षरश: सीमोल्लंघन केलेलंच आहे, तरी
|
Vaisanty
| |
| Monday, October 22, 2007 - 2:35 pm: |
|
|
स्वत्त्वाची उल्लंघून सीमा विस्तारावे अस्तित्वाने.... दशांगुळे व्यापून उरावे उत्साहाने... आनंदाने... समृद्धी आणिक सौख्याने.....
|
Manogat
| |
| Wednesday, October 24, 2007 - 7:33 am: |
|
|
आकाशात उडता आल की प्रत्येकालाच हव असत एक वेग्ळ घरट पण आकाशाशि अवगत करणार्याच नको असत त्यात अस्तित्व इतका का हा मनुष्य स्वार्थि होतो आपसुखा साठि आपल्यांच दु:ख देतो घरट्यात दुसर्यांच्या अस्तित्वाचि त्याला घुसमट होते कसा विसरतो हे पुढ्यात आलेले क्षण हि त्या दुसर्यांच्या मार्फ़त होते इतका का हा मनुष्य स्वार्थि होतो आपसुखा साठि आपल्यांच दु:ख देतो चुकतो तो की चुकतो आपण आहे संस्कारा पासुन त्याला का तोडले आहे? अपेक्षांच्या पाहाडा खाली का त्याला चेंदल आहे? प्रशन्नांचे हे काहुर का त्याला छेडत नाहि घरट्यातुन उडुन गेलेलय पाखराला का आपल्यांची हाक ऐकु येत नही इतका का हा मनुष्य स्वार्थि होतो आपसुखा साठि आपल्यांच दु:ख देतो
|
Chinnu
| |
| Wednesday, October 24, 2007 - 5:10 pm: |
|
|
सही चाललयं लोक्स! आकाशासारखं.. आकाशाएवढं! सर्वांनाच हवं असतं हक्काचं आकाश.. उडायचा मोह असला-नसला तरी! मलाही मिळालयं ना माझं स्वत:चं आकाश.. क्षितीजाच्या रेषा रुंदावत उडतांना जमीनीची आठवण न येऊ देणारं माझं गुणी आकाश! पण आता त्या मऊ मऊ ढगांच्या हातांना धरून सांगावसं वाटतं "पुरे आता!" तुझ्या मायेने पुष्ट असे माझी पंख पसरून होईन मी आकाश.... नाही पडू देणार दु:खाचा टिपूस जमीनीवर, अगदी तुझ्याच सारखं!
|
Yog
| |
| Thursday, October 25, 2007 - 4:05 am: |
|
|
कोण? मनात काजव्यान्चे रान भुरुभुरू जळते स्वप्नात उमटलेले बिम्ब कुणाशी मिळते? ही सान्जवेळी टेकली दारी कुणाची पालखी? सावल्यान्चे मार्ग विझले आता काळोखाच्या ओळखी विरघळले मिठीत कोणत्या चन्द्राचे डाग पुराणे भग्न किनार्यावर तेव्हा माळली कुणी निळी तोरणे? रक्ताच्या दिठीत मुरणारे जाम नशिबी होते तरी पदराखाली कोण स्वप्न पाजत होते? वार्यावर उडली जेव्हा जुन्या वळणावरची धूळ फ़ुलातून गळली माती कुण्या कळीची भूल? हा भास असूदे उशाशी की चोळीचा बन्ध उसतो प्राक्तन कुण्या स्पर्शाचे पारवाही मूक होतो..
|
Akshata
| |
| Thursday, October 25, 2007 - 6:02 am: |
|
|
आता तरी???... आता तरी जमेल का माझा रंग घेणं आता तरी जमेल का गुलमोहर होणं? व्यथा सार्यांच्या कथा सार्यांच्या आता तरी जमेल का कुणाला सामोरं जाणं? उगाच जुनी वळणे घालुन जातात कोडी, जमेल का आता फ़सवे शब्द होणं? किती झाले वार आणिक किती उसासे ओली जख़म घेउन असं अश्वत्थामा होणं? सारे अटळ तरीही तुझं माफ़ी मागणं अन तु पाउस असताना माझं इन्द्रधनु होणं अक्षता
|
Akshata
| |
| Thursday, October 25, 2007 - 6:04 am: |
|
|
मित्रांनो हा मझा मायबोलीवर पहिलाच प्रयत्न, तुमची साथ असुदे. अक्षता
|
Swan
| |
| Friday, October 26, 2007 - 4:55 am: |
|
|
खुपच छान अक्षता अजून लिह ना
|
Chchotu
| |
| Friday, October 26, 2007 - 5:58 am: |
|
|
कीप इट अप अक्षता.
|
Shyamli
| |
| Sunday, October 28, 2007 - 9:38 am: |
|
|
मस्त कविता अक्षता आवडली
|
Anilraja
| |
| Monday, October 29, 2007 - 11:03 pm: |
|
|
मनात दडवुन ठेवलेल गुज हळुच तुझ्या कानी सांगाव तुझ्या प्रतिसादाची वाट पहात श्वासाला थोडस रोखुन ठेवाव तुझ्या गोड नाजुक गालावरी लाजेच लाल फ़ुल फ़ुलवाव तुझ्या केसात फ़ुल गुलाबाच माझ्या हातानी अलगद खोचाव तुझा हात हाती घ्यावा तुला कळणारही नाही असा क्षण असेल दोघांच्या प्रतिक्षेचा चातकासाठी पावसाचा थेंब जसा लांब जाव दुर कुठेतरी कोणीही नसेल आजु बाजुला तुझ्या खांद्यावर डोके टेकवता स्वर्गच फ़ुलेल चोहु बाजुला तुझ्या डोळ्यात मिटुनी जाव जाणवाव तुझ्या प्रत्येक श्वासाला मन आनंदात जाइल हरखुनी शब्द फ़ुटतील मुक्या भावनेला
|