|
Samurai
| |
| Tuesday, October 30, 2007 - 1:36 pm: |
|
|
अभंग पुन्हा भेटशील? जुन्याच ठिकाणी?, आठवू नव्यानी दूर जाणे डोळ्यात सांडूदे फ़िरूनी नजर, नशेचे जहर फ़ेसाळु दे मधुनच घेवु हातामधे हात, संगतीची रात मुठीमधे मनात दडले भलते धाडस, सुखाचे पाडस द्वाड भारी
|
Pulasti
| |
| Tuesday, October 30, 2007 - 7:08 pm: |
|
|
"पुरावा" आज जे ढळढळीत सत्य आहे, ते उद्या सापडेलही कुठल्यातरी सरकारी कागदावर - पुराव्यानिशी.. पण जेव्हा उलटलेली असतील काळाची पाने युगांच्या मापाने तेव्हा, त्या सरकारी कागदाची चुटकीभर माती केव्हाच ब्रम्हांडात विलीन झालेली असेल... दुःख याचे नाही, आणि असावेही का? राग हा की - तरीही मागत राहतात "पुरावे" काही बुद्धिवान निर्लज्ज आणि... गरागरा डोळे फिरवून इतर काही काढत राहतात बाजारू फतवे आता सांगा, प्रगतीच्या घोड्यांवर स्वार झालेल्या आम्ही तर्कशुद्ध माणसांनी पाडून टाकल्यावर... ५००० वर्षांनी कोणी काय पुरावा द्यावा कुठल्याश्या अडम्स ब्रिज चा?
|
व्वा!!!व्वा!!!पुलस्ती अगदी मनातल बोललास. मी ही कविता रामसेतुच्या वर पेस्ट करतो आहे तुझ्या नावासकट.
|
Ashwini_k
| |
| Wednesday, October 31, 2007 - 6:19 am: |
|
|
पुलस्ती, कविता आवडली व पटलीही कारण अनेकांच्या मनाची भळभळती जखम तुम्ही सुंदररित्या शब्दबध्द केली आहे.
|
Bee
| |
| Thursday, November 01, 2007 - 4:36 am: |
|
|
सामुराई, किती दिवसांनी येतो आहेस.. कविता अतिशय आवडली. एकेक कडवे खरच महान आहे.. पुलस्ती, कवितेचा आशय छान आहे पण रचना खूपच गद्य झाली आहे.
|
Gs1
| |
| Thursday, November 01, 2007 - 1:10 pm: |
|
|
पुलस्ती अतिशय उत्कृष्ट कविता, आश्विनीने म्हटले आहे तसे अनेकांच्या मनातली जखम सुंदररित्या शब्दबद्ध करणारी. तुमचे विशेष कौतुक अशासाठी वाटले, की केवळ सगळ्यांकडून कौतुक वाट्याला यावे, प्रसिद्धी मिळावी यासाठी इतर ठेवतात म्हणून आपणही हिंदू समाजाला, जातीयवादी वगैरे शेलकी दुषणे देण्याच्या स्पर्धेत भले भले स्वत्:च्या मनाशी, तत्वांशी प्रतारणा करून आघाडीवर असतांना तुम्ही मात्र एक प्रामाणिक अभिव्यक्ती सादर केली आहे. त्यात मग मी या बाजूचा वाटेन का, त्या बाजूलाही थोडी नावे ठेवू का ? म्हणजे मी कसा एकदम बॅलन्स्ड कवी वाटेन असा बाजारू विचार नाही. साहित्यक्षेत्रात दुर्मिळ झालेल्या या प्रामाणिकपणाला आमचा सलाम.
|
GS1 , अगदी बरोबर लिहिलेत
|
Pulasti
| |
| Friday, November 02, 2007 - 1:33 am: |
|
|
अश्विनि, चिन्या, बी, gs1 - प्रतिसादांबद्दल धन्यवाद! -- पुलस्ति.
|
Devdattag
| |
| Friday, November 02, 2007 - 3:37 am: |
|
|
तशी रोजचीच संध्याकाळ केशरी सूर्य आणि तांबूस आभाळ तळ्यावरची ओसरली गर्दी आणि भिजली पाउलवाट होडीवरती शीळ क्षीण आणि संथ झालेली लाट होताहेत स्तोत्रांची पारायणे बे एके बे बे दुणे चार मध्येच पुसट झालेल्या ओळी आणि ऐकलेले गीतेचे सार कुठे हूरहूर कुठे आभास अद्भूत दिवेलागणीची वेळ नुकत्याच सावरलेल्या भिंती अस्फुट सावल्यांचे गूढ खेळ
|
Desh_ks
| |
| Friday, November 02, 2007 - 3:55 am: |
|
|
खंत फुलं वेचता वेचता माझी परडी भरली, फांदी फांदी शोधुनीया, इथं तिथं, खाली, वर; आणि एकुलते फूल दिसे दूर फांदीवर, त्याची चिंता आता माझ्या राहे उरात भरली.
|
Desh_ks
| |
| Friday, November 02, 2007 - 4:06 am: |
|
|
सामुराय, "मनात दडले भलते धाडस, सुखाचे पाडस द्वाड भारी " हे खूपच छान! पुलस्ति, तुमची रचना आवडली. परखड आणि नेमकं लिहिलं आहे तुम्ही. देवदत्त, सुंदर, चित्रमय लिहिलं आहे. डोळ्यासमोर चित्र उभं केलंत. आणि त्या वातावरणाचा उदास परिणामही अनुभवाला आला. -सतीश
|
Desh_ks
| |
| Monday, November 05, 2007 - 3:47 am: |
|
|
|
Hems
| |
| Monday, November 05, 2007 - 6:19 am: |
|
|
सामुरई,पुलस्ति,देवदत्त आणि देश -- सुंदर कविता ! वेगवेगळ्या विषयांवरच्या,दर्जेदार कविता अशा एकत्र वाचायला मिळाल्या बर्याच दिवसांनी ! आभार !
|
Gobu
| |
| Monday, November 12, 2007 - 2:03 pm: |
|
|
कुणीतरी असावं.... कुणीतरी असावं हक्काचं हट्टामागुन हट्ट करणारं मागेल ते मिळाल्यावर गालात गोड हसणारं कुणीतरी असावं हक्काचं नेहमी भांडुन रुसणारं राग शांत झाल्यावर हळुच येवुन बिलगणारं कुणीतरी असावं हक्काचं बालपणीचे किस्से सांगणारं चेहरा लपवुन मग डोळ्यातले अश्रु पुसणारं कुणीतरी असावं हक्काचं नात्याचा अर्थ जाणणारं निरपेक्ष हक्क ठेवुनही सार्या मर्यादा जपणारं...
|
Chinnu
| |
| Monday, November 12, 2007 - 6:10 pm: |
|
|
देश, समुराइ, गोबू कविता आवडल्या. पुलस्तिजी फार परखड आहे "पुरावा". देवा संध्याकाळ सुरेख चित्तरली आहेस!
|
|
|