Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 26, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » आश्विन » काव्यधारा » झुळूक » Archive through October 26, 2007 « Previous Next »

Sarivina
Friday, October 12, 2007 - 8:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आश्विन

एखादा चुकार, एकान्डा ढग आणतो
सन्गे एक छोटीशी पावसाची सर
अन मन माझ अलगद उतरे
आठवणीन्च्या बेटावर


Menikhil
Friday, October 12, 2007 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्य बात है.
मस्त अहे सरिता.... छान सुरुवात अहे ह्या महिन्याची


Itgirl
Friday, October 12, 2007 - 9:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नात उमलाव अस,
घेऊन समर्पणाची जोड,
कृष्णाच्याही मनी रुजावी,
सखी राधेची ओढ


Rajya
Friday, October 12, 2007 - 9:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सरीता, शैलु :-) सुरुवात तर छान झालीय :-)

ओढ मिलनाची माझ्या हृदयी
अशी निरंतर राहु दे
आस तिच्या येण्याची
अशीच चिरंतन राहु दे


Monakshi
Friday, October 12, 2007 - 11:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उमलणार्‍या नात्यांना हवा सहवासाचा सुगंध
आपुलिही प्रीत दरवळू दे जसा दरवळे मृदगंध
ओढ तुझ्या मिलनाची जेव्हा लागे जिवाला
माझ्या मनीचे हे तारु मग फिरे अनिर्बंध


Krishnag
Monday, October 15, 2007 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


अश्विन मासात माझाही एक प्रयत्न!!

मास अश्विन उत्तम
त्यात शरदाचं चांदणं
कृष्ण कुंतली विखरे
जसं मोगर्‍याचं लेणं


R_joshi
Tuesday, October 16, 2007 - 7:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सरीता,शैलु, राजा, मोना, क्रिश छानच जमल्यात झुळका:-)

कृष्ण रमे रुक्मिणीसवे
श्वास राधेचा होत असे
मीरा व्याकुळ मीलनासी
कृष्ण प्राणात तिच्या वसे

प्रिति:-)

माणिक, रुप, गोबु राहिलात कोठे?


Monakshi
Tuesday, October 16, 2007 - 10:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कृ, प्रीती थोडी उधार की जिंदगी :-)

शरदाचं चांदणं पिऊन रातराणी बहरली
धरती जशी चांदण्यात न्हाऊन निघाली
यमुनेच्या तीरी खेळ चाले रास गरब्याचा
देहभान विसरुनी राधा मग कृष्णमयी जाहली


Akhi
Wednesday, October 17, 2007 - 4:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा!!! अतिशय मस्त!!!! दिल खुश हो गया!!!

Itgirl
Thursday, October 18, 2007 - 6:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक आठवण अशीही,
अश्रू बनून डोळां झरे
एक आठवण अशीही,
हासू बनून ओठीं फ़ुले


Krishnag
Thursday, October 18, 2007 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्या आठवणींची फुले
नेहमी टवटवीत ठेवली
डोळ्यातील पाण्याने सतत
त्यांच्यावर शिंपण केली


Ana_meera
Thursday, October 18, 2007 - 9:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुंदर चारोळ्या आयटी, कृष्णा... :-)

Mi_vikas
Sunday, October 21, 2007 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझीही आरोळी

तुझ्या फ़ुलदाणीतली फ़ुले
नेहमी टवटवीत ठेवली
पण शेजारच्या टौम्याने शिंपुन
अगदीच घाण केली


Shyamli
Sunday, October 21, 2007 - 8:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

याला चारोळी म्हणतात का?,टाईमपासच करायचा असेल तर इतर अनेक बीबी आहेत

Itgirl
Sunday, October 21, 2007 - 8:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, तुला अनुमोदन.
.. .


Shamli
Wednesday, October 24, 2007 - 6:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mi_vikaas maaf karaa h......



तुझ्या फ़ुलदाणीतली फ़ुले
नेहमी टवटवीत ठेवण्याचा प्रयत्न केला
पण तुझ्या मनिच्या दिलबराने
मझ्या प्रितिचा घात केला


Aavli
Friday, October 26, 2007 - 5:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्मान तुझ्या प्रितीचा
फूलदाणी देऊन केला...
बेचलाख दिल माझा
तेथेच कैद झाला..


Anaghavn
Friday, October 26, 2007 - 11:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयुष्यात प्रत्येकाच्या वाट्याला
एक गाणं येतं
आपल्या वाट्याचं गाणं
आपण मन लाऊन गायचं असतं

अनघा


Ana_meera
Friday, October 26, 2007 - 11:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

(अनघाची क्षमा मागून पुढे....:-) )

आयुष्याच्या गाण्यातला
तुझा माझा सुर वेगळा
पण राग एक, आलाप निराळा.
************************
तु मला न मी तुला
स्वप्नीही न पाहिले
सांग तूच की मग हे
धागे कसे जुळले?

मैत्री ही अशी दोन जुळलेल्या मनाची
वादळातल्या नौकेला जशी ओढ किनार्‍याची

आपली मैत्री अशी असावी
जशी द्रोपदी अन कृष्णाची
कधी कृष्ण सखा,
तर कधी पाठीराखा..


Anaghavn
Friday, October 26, 2007 - 12:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आना,ग्रेटच!!मस्तच जुळवले आहेस धागे.
खूप खूप आवडलं.

राग एक पण आलाप निराळा.
न भेटता ही जुळलेले धागे--मैत्रीचे

कधी सखा--कधी पाठीराखा!!

फिदा------
अनघा.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators