Pulasti
| |
| Tuesday, October 16, 2007 - 1:30 pm: |
| 
|
बरीच सामसूम आहे या thread वर... बहुतेक सर्वजण दिवाळीसाठी लिहिताहेत वाटतं ============= प्रवास झोप काढली झकास आहे तरी मासळी गळास आहे! माळी बघतो स्वप्न नफ्याचे कीड गोमट्या फळास आहे कशी माजली बेपर्वाई पर्वा याची कुणास आहे? लाल सरींनी धरा भिजे अन - क्रूर निळाई नभास आहे पाट्या टाकत सूर्य चालला गार शहारा उन्हास आहे पिकते येथे ज्वार-बाजरी आणि मागणी गव्हास आहे काल उगाचच खुशीत होतो आज अकारण उदास आहे... कुणी उतरतो, कोणी चढतो अव्याहत हा प्रवास आहे - पुलस्ति
|
Chinnu
| |
| Tuesday, October 16, 2007 - 3:29 pm: |
| 
|
पुलस्तिजी, वाह. तबियत खुष हो गयी! पाट्या टाकत सूर्य चालला.. मस्त कल्पना. गार शहारा हा छान विरोधाभास आला. कदाचित लहान तोंडी मोठा घास घेतेय, तरी एक छोटा बदल सुचवतेय: पिकते जेथे ज्वार्-बाजरी आज मागणी गव्हास आहे! वाचून गावी गेल्या सारखं वाटलं. प्रवास आवाडला आपला.
|
Nachikets
| |
| Wednesday, October 17, 2007 - 4:20 am: |
| 
|
काल उगाचच खुशीत होतो आज अकारण उदास आहे... क्या बात है!!! गझल आवडली!!
|
Milya
| |
| Wednesday, October 17, 2007 - 5:50 am: |
| 
|
वा वा सुरेख पुलस्ती... सुरवातीला एवढी नव्हती आवडली पण परत एकदा वाचल्यावर आवडली सर्वच शेर आवडले.. पण मतला नीटसा झेपला नाही
|
Mankya
| |
| Wednesday, October 17, 2007 - 6:14 am: |
| 
|
व्वाह पुलस्ति .. गजल आवडेश एकदम ! मिल्याप्रमाणे मलाही मतला पूसट वाटतोय. बेपर्वाई .. शेर खूपच बोलका, सहज वाटला ! मागणी .. मस्तय हा शेर, मस्त ! चिन्नूच म्हणन पटतय मलाही, जर ' आज ' म्हटलं तर तो सद्यपरीस्थितीशी निगडीत आणि जास्त specific होईल अस वाटलं ! उदास .. सगळ्यात जास्त आवडलेला शेर ! व्वाह ! बाकी शेरही सुंदर ! माणिक !
|
Daad
| |
| Wednesday, October 17, 2007 - 6:59 am: |
| 
|
पुलस्ति, मस्त गजल! बेपर्वाई, पाट्या अगदी आवडेश.
|
काल उगाचच खुशीत होतो आज अकारण उदास आहे... वाह .. पुलस्ति आवडला शेर. लाल सरींनी धरा भिजे अन - ही कल्पना पण आवडली. पिकते येथे ज्वार-बाजरी आणि मागणी गव्हास आहे हा शेर मला ओरिजिनल जसा आहे तोच योग्य वाटला . "आणि " मुळे विरोधाभास अधोरेखित होत आहे . " आज " लिहीण्यासाठी वरच्या मिसर्यात भूतकाळाशी निगडित काही विधान केलेले नाही त्यामुळे तितकं अर्थपूर्ण होईल असे वाटते . पु. ले.शु. बाकी इथे सामसूम दिसतेय हे तुम्ही म्हणावं म्हणजे .....
|
Meghdhara
| |
| Wednesday, October 17, 2007 - 9:20 am: |
| 
|
व्वा पुलस्ती! अगदी सहज. काल उगाचच.. मस्तच. मेघा
|
Jo_s
| |
| Wednesday, October 17, 2007 - 11:02 am: |
| 
|
पुलस्ति मस्तच वैभवशी सहमत काल उगाचच खुशीत होतो आज अकारण उदास आहे... छानच शेर लाल सरींनी धरा भिजे अन - ही ही कल्पना आवडली आणि "आणि" च योग्य वाटतय. सुधीर
|
Desh_ks
| |
| Wednesday, October 17, 2007 - 11:09 am: |
| 
|
पुलस्ति, गज़ल आवडली. 'गोमटे फळ', 'अकारण उदास' हे शेर आवडले. 'गार शहारा' तर फारच छान! 'क्रूर निळाई' मात्र नीटसं ध्यानी आलं नाही. -सतीश
|
Pulasti
| |
| Wednesday, October 17, 2007 - 6:23 pm: |
| 
|
प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे धन्यवाद! मिल्या आणि माणिक - मतल्यात एवढच म्हणायचय की कित्येकदा काहीही विशेष श्रम न घेताही खूप काही मिळत जाते... आणि मग आपल्याला त्या आपल्याच achievement वाटायला लागतात. अतिशय लोकप्रिय असलेले fishing (छंद, व्यवसाय नव्हे) मला यादृष्टीने मजेशीर आणि अनुरूप उदा. वाटले. (पण, "झोप", "झकास" या शब्दांमुळे हा शेर गझलेतल्या इतर शेरांच्या प्रकृतीत बसत नाहिये... ) गहू - चिन्नू, सूचनेमागचा भाव कळला. पण "आज" चपखल बसत नाही. वैभवने छानच स्पष्ट केलय. पण तरी उला मिसर्यात "जेथे" वापरायची सूचना मला interesting वाटतेय. म्हणजे असे काहीसे - पिकते जेथे ज्वार-बाजरी तिथे मागणी गव्हास आहे क्रूर निळाई - सामाजिकदृष्ट्या काहींच्या सुबत्तेचा, भरभराटीचा; इतर काहींच्या कल्पनातीत दुर्दशांशी संबंध असतोच... आणि पचायला कितीही जड असलं तरी हा संबंध कुठल्या ना कुठल्या पातळीवर "कार्य-कारण" संबंध असतो. लाल सरी ज्याच्यामुळे बरसताहेत त्याची निळाई म्हणून "क्रूर" आहे. माझ्या एका आधीच्या शेराचे (आलबेल या इथे, कत्तली तिथे जरी) हे अधिक तीव्र असे संक्रमण आहे. पुन्हा एकदा, सर्वांचे आभार!
|
प्रश्न आहे .... फक्त एका भाकरीचा प्रश्न आहे दुःख हे की नेहमीचा प्रश्न आहे बोल ना काहीतरी .. लाजू नको तू हा तुझ्याही आवडीचा प्रश्न आहे मी जुने दावे कसे सोडून देऊ ? वेदनांच्या मालकीचा प्रश्न आहे बैसल्या जागीच चिंताग्रस्त सारे ... हा खरोखर काळजीचा प्रश्न आहे चालताना प्रश्न केला सावलीने का तुलाही सोबतीचा प्रश्न आहे ? पायरी पाहून डोके टेकवावे आपल्याही पायरीचा प्रश्न आहे काय झाले ? का कळीचे फूल झाले ? जाउ द्या ना ! हा कळीचा प्रश्न आहे उत्तरे येतात सारी चूक माझी काय मी इतका चुकीचा प्रश्न आहे ?
|
Desh_ks
| |
| Friday, October 19, 2007 - 9:19 am: |
| 
|
वैभव, गज़ल छानच! मी जुने दावे कसे सोडून देऊ ? वेदनांच्या मालकीचा प्रश्न आहे पायरी पाहून डोके टेकवावे आपल्याही पायरीचा प्रश्न आहे हे शेर विशेष आवडले. 'कळीचा प्रश्न' मधे श्लेष अभिप्रेत आहेच ना? -सतीश
|
Desh_ks
| |
| Friday, October 19, 2007 - 9:46 am: |
| 
|
वास्तवापुढे जग स्वप्नांचे छोटे ठरले सत्य कालचे आज अचानक खोटे ठरले माणुसकीची हिंस्र पशूंनी केली हत्या समंजसपणे आपसात मग "कोटे" ठरले खुशाल वेचा थडग्यासाठी तुमचे कौशल बादशहा मग छाटणार ती बोटे; ठरले! शहाणपण आले विक्रीला चोहाट्यावर पंडित सारे नर्मदेतले गोटे ठरले ‘कसली हरकत’ ‘काय बिघडले’ हीच संस्कृती तिथे नव्याने पुन्हा फायदे तोटे ठरले मुन्नाभाईमुळेच त्याला आज प्रतिष्ठा, महात्मयाच्या पुण्याचे बळ थोटे ठरले पीठाधीशांभवती दाटे धुके संशयी संन्याशांचे कमंडलूही लोटे ठरले विकून टाकू शेती, खेळू क्रिकेट सारे, भरू विकतच्या अन्नाने मग पोटे; ठरले लबाड लुच्चांकडे जगाची सूत्रे सारी भाळ्याभोळ्यांमाथी आता सोटे; ठरले
|
Milya
| |
| Friday, October 19, 2007 - 10:10 am: |
| 
|
वैभव अप्रतीम आहे गझल... कुठले शेर आवडले ते लिहीणार होतो पण मग लक्षात आले की सर्वच फ़ार आवडलेत... इतके चपखल शब्द वापरतोस ना तू जियो... सतीश खूप छान... माणुसकीची हिंस्र पशूंनी केली हत्या समंजसपणे आपसात मग "कोटे" ठरले शहाणपण आले विक्रीला चोहाट्यावर पंडित सारे नर्मदेतले गोटे ठरले मुन्नाभाईमुळेच त्याला आज प्रतिष्ठा, महात्मयाच्या पुण्याचे बळ थोटे ठरले पीठाधीशांभवती दाटे धुके संशयी संन्याशांचे कमंडलूही लोटे ठरले लबाड लुच्चांकडे जगाची सूत्रे सारी भाळ्याभोळ्यांमाथी आता सोटे; ठरले हे खूप आवडले...
|
Jo_s
| |
| Friday, October 19, 2007 - 10:50 am: |
| 
|
वैभव, छानच गझल मी जुने दावे कसे सोडून देऊ ? वेदनांच्या मालकीचा प्रश्न आहे चालताना प्रश्न केला सावलीने का तुलाही सोबतीचा प्रश्न आहे ? पायरी पाहून डोके टेकवावे आपल्याही पायरीचा प्रश्न आहे हे शेर तर फारच आवडले. उत्तरे येतात सारी चूक माझी ....मस्त सतीश सुंदर ‘कसली हरकत’ ‘काय बिघडले’ हीच संस्कृती तिथे नव्याने पुन्हा फायदे तोटे ठरले मुन्नाभाईमुळेच त्याला आज प्रतिष्ठा, महात्मयाच्या पुण्याचे बळ थोटे ठरले विकून टाकू शेती, खेळू क्रिकेट सारे, भरू विकतच्या अन्नाने मग पोटे; ठरले हे शेर छानच सुधीर
|
Pulasti
| |
| Friday, October 19, 2007 - 2:31 pm: |
| 
|
मस्त गझला!! वैभव - मतला, पायरी, सोबत आणि उत्तरे हे शेर फार फार आवडले! आणि तुझ्या गझलेतल्या सफ़ाईबद्दल तर काय बोलावे! सतीशजी - जोमदार गझल! संस्कृती, मुन्नाभाई आणि क्रिकेट हे शेर तर खासच आहेत. सोटे आणि बोटे या कवाफ़ींनंतर "ठरले" रदीफ़ सहजपणे येत नाहिय असे वाटते. चु.भू.द्या.घ्या. -- पुलस्ति.
|
Mankya
| |
| Saturday, October 20, 2007 - 5:46 am: |
| 
|
वैभवा .. जियो ! दमदार गजल ! बैसल्या जागीच .. खूपच सहज अन अर्थपूर्ण, व्वाह ! पायरीचा शेर तर खासच जमून गेलाय. जियो ! कळीचे फूल झाले .. क्या बात कही है ! आवडला ! शेवटचा शेर मस्तच. सतीश .. सुंदर रे गजल ! फायदे तोटे .. जमून गेलाय अगदी ! गोटे .. मस्त उतरलाय ! सोटे .. मस्तच रे ! माणिक !
|
Swan
| |
| Monday, October 22, 2007 - 4:52 am: |
| 
|
ज़ाणार कधी तू हेच विचारीत सर्व ज़ण हसलीत मला चूक त्यान्ची नव्ह्ती, नीयतीच हुलकावण्या देत होती मला मन सावरत होत मला अन मी सावरत होतो मनाला फ़ार बर वाटल परत कधी येणार तु जेव्हा हे कुणी तरी विचारल मला Sachin
|
Bairagee
| |
| Monday, October 22, 2007 - 5:26 am: |
| 
|
वैभव, मस्त गझल. त्यातही शेवटचा शेर निरातिशय आवडला. 'पायरी' आणि 'कळीचा प्रश्न' खास आले आहे सुधीर, "संन्याशांचे कमंडलूही लोटे ठरले " क्या बात है!! फार-फार-फार आवडले आणि एकंदर गझल आवडली.
|