Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 16, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » आश्विन » कथा कादंबरी » अशोका » Archive through October 16, 2007 « Previous Next »

Namrata4u
Tuesday, October 16, 2007 - 5:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डीअर डॅडी ,
खर तर पत्रातुन डीअर शब्द लिहिताना देखिल हात थरथरतो. कदाचित मी तुम्हाला लिहिलेल हे पहिल
आणि शेवटचचं पत्र असेल. ह्यापुर्वी खुप वेळा वाटले की तुमच्याशी मनमोकळं बोलाव.
लहानपणीच्या मनात असलेल्या शंका कुशंका दूर करुन घ्याव्यात.
तुमचे माझ्याबद्दलचे विचार समजावुन घ्यावेत पण तशी संधीच कधी मिळाली नाही आणि जेव्हा मिळाली तेव्हा माझी जीभ धजावली नाही.

Namrata4u
Tuesday, October 16, 2007 - 5:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्हाला जेव्हा दुसरा heart attack आल्याचं कळाल तेव्हा अरुण म्हणाला आपण डॅडीना पत्र लिहू पण तेव्हा सुध्दा मला काळजीपेक्षा तुमची भितीच जास्त वाटली.

मी तुमची ugly duckling नावडती ..काहीच देऊ शकले नाही तुम्हला.
अगदी कित्येक बाबतीत अपयशच. ममा तर मला नेहमी म्हणायची माझ्याऐवजी खर तर तुम्हाला मुलगा हवा होता म्हणजे traditional ह्या अर्थाने म्हातारपणाची काठी म्हणून नव्हे तर मीरा ताई मुलगी होती म्हणून.
ममा म्हणायची मीरा ताई मुलगा असती तर मी तुम्हला मुलगी म्हणून आवडले असते मग लहानपणी मला मीरा ताईचा खुप राग यायचा की ती मुलगी का झाली?? तुम्ही माझ नाव अशोका ठेवलत ही एक जमेची बाजु पण
त्यात सुद्धा एक मेख ! तुम्हाला अशोकाच झाड खूप आवडायचं. तुम्हाला होणारया मुलाच नाव तुम्ही अशोक ठेवणार होतात पण जगात आली मी आणि म्हणून मग मी अशोका.

Namrata4u
Tuesday, October 16, 2007 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डॅडी , तुम्ही मला खूप खूप आवडायचात . प्रत्येकच मुलगी hero worship करते. कुणाचा hero एखाद्या सिनेमातला
नट असतो तर कुणाचा एखादा सुप्रसिद्ध खेलाडू. माझे hero मात्र तुम्ही होतात. आंतरराष्ट्रिय कीर्तीचे biotechnologist
अनिरुद्ध गद्रे माझे वडिल आहेत याचा मला फार फार अभिमान होता. लहानपणी पाठ्यपुस्तकातले newton ,henry Cavendish
, perrie currie कुणी दुसरया जगातले वाटायचात. बलाढ्य ! तुम्ही तसे होतात आणि म्हणूनच अशोका अनिरुद्ध ग़द्रे हे नाव सांगताना मला अक्षरशः हवेतून चालल्यासारखे वाटायच. पण तुमच्या ह्या बलाढ्य असण्यानच तुमच्या माझ्यातली दरी रुंदावत गेली.
माझ्या मनावर कोरले गेले ते result चे दिवस. मीरा ताई नेहमी वर्गात पहिली यायची. मला मात्र ७०%
मार्क्स असायचे. डॅडी, तुम्ही कधीच रागवला नाहीत मला त्यावरुन. पण तुमची नजर सांगायची. result घेउन आल्यानंतर मिराताई हक्काने तुमच्या मांडिवर बसायची. तुम्ही तीचे लाड करायचात. ती मागेल ते तिला घेवुन द्यायचात वर म्हणायचात ," प्रिया , हे पेढे ठेव देवापूढे , आपल्या पोटी हीरा जन्माला आलाय.". मी हीरा नसले तरी अगदीच गारगोटी नव्हते ,डॅडी.
माझ्या प्रगति पुस्तकावर मात्र तुम्ही कधी सही केली नाही. तुमच्या डोळ्यात मला निराशा दिसायची.
तुम्ही मग माझी जणु अस्तित्व नाकारू पाहायचात , जणु मी ह्या जगात नाहीच असे वागायचात. You just use to ignore me डॅडी...
सीतेला धरणीनं पोटात घ्याव अस का वाटल असेल हे त्यावेळि कळलं डॅडी मला.

Namrata4u
Tuesday, October 16, 2007 - 6:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्हाला आठवत डॅडी, तुमच्या silicon tissue च्या संशोधनाबद्दल royal institute तर्फे तुम्हाला खास fellowship मिळणार होती . केवढा मोठा समारंभ झाला आणि तो देखील london ला .
आपण सगळेच फार आनंदात होतो. रोज कोणत्या ना कोणत्या वर्तमानपत्राचा माणूस तुमची मुलाखत घ्यायला येत होता. सारखे अभिनंदनाचे फोन खणखणत होते. मी आणि मिराताई अक्षरशः हवेत तरंगत होतो.
घरच,दारचं आल्यगेल्यांच आणि शिवाय London च्या प्रवासाची तयारी करताना ममा तर अगदी थकुन जात होती.
खोट खोट चिडत सुद्धा होती. शेवटी आपण london ला गेलो. आमची पहिली वहीली परदेशवारी त्यामुळे
प्रत्येक गोष्टिच अप्रूप वाटत होत. एवढ्या मोठ्या scientist ची family म्हणून जिकडे तिकडे royal treatment
मिळत होती आणि तुमच्याबद्दलचा अभिमान जास्त जास्तच उचंबळून येत होता. प्रत्येक समारंभात तुमचा भव्य
सत्कार करण्यात आला. उल्लेखनीय पुढची पीढी म्हणून मीरा ताई चा उल्लेख करण्यात आला.
तीला स्टेजवर बोलावुन फुलांचा bouquet देण्यात आला. माझा मात्र साधा उल्लेखसुद्धा केला नाही. मम्मान हळूच आठवण करुन दिली तर तुम्ही तुछतेने मान उडवलित. दुसरया कुणाच्या लक्षात आलि नाही ही गोष्ट पण मला मात्र कळलचं. Perrie currie ची सुद्धा दुसरी मुलगी शास्त्रज्ञ नव्हती डॅडी.

Princess
Tuesday, October 16, 2007 - 6:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नम्रता, छान आहे सुरुवात. लवकर लवकर येउ देत...

Namrata4u
Tuesday, October 16, 2007 - 6:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I am sorry , डॅडी जे जे काही मी नाही त्याबद्दल sorry.
लहानपणी मला गुणगुणायला आवडायच. माझा आवाज गोड होता , स्वरज्ञान बरयापैकी होत. गाणं हे माझ खास स्वतःच गुपीत होत.
मधल्या सुट्टित चारचौघी जमल्या म्हणजे किंवा कुणाच्या वाढदिवसाच्या पार्टित मला हमखास गाणं म्हणायची फरमाइश व्ह्यायची.
मी ही मग फारसे आढेवेढे न घेता गाणं म्हणत असे. सोनियाची आई कधी तरी ममाजवळ बोलली. ममानं तुम्हला सांगीतल असाव.
तुम्ही मला शिकवायला एकदम गवईच आणुन ठेवलात. माझ्या आवाजाच्या मर्यादा मला माहित होत्या. पण तुम्ही मला एकदम किशोरी आमोणकरच बनवायला निघलात. संगितामध्ये मी विशारद्च्या पुढे जाउच शकले नाही. पण माझा साधा गुणगुण्याचा आनंद देखील हरवुन गेला.
का केलत अस डॅडी? की तुम्हाला जगाला सिद्ध करुन दाखवायच होत your daughter possesses a म्युझिकल talent if not in academics????
ज्यादिवशी माझ्या गुरुजीनी मला सांगीतल की मी मैफील कधीच करु शकणार नाही त्यादिवशी रात्रि माझी उशी पार भिजुन गेली. अश्या कित्येक रात्रि माझी उशी पार भिजुन गेली आहे.प्रत्येक failure नंतर मी उशी भिजवलेली आहे.

Suhasnikam
Tuesday, October 16, 2007 - 7:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाव !!!!!!!!, खुपच छान आहे ग नम्रता हि स्टोरि, लिहि लवकर आता, काम बाजूला ठेवून कर पूर्ण पटकन, खूप उत्सुकता आहे पुढच वाचन्याची.

Namrata4u
Tuesday, October 16, 2007 - 7:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण जस वय वाढत गेल तस तस माझ्या लक्षात यायला लागल की मी अगदीच काही फडतुस नाही.
बरयापैकी above average आहे आणि माझी बंडखोरी सुरु झाली.
तुम्ही जेव्हा science ला जा म्हणालात तेव्हा मी हट्टान commerce ला गेले आणि "मला नाही पेलवणार science" अस मुद्दामच तुम्हाला सांगीतल.
I wanted to hurt you as you had hurt me. मला आठवलं तरी लाज वाटते डॅडी , I hate myself and I hate you for making me hate myself.
माझ्या बरोबरीच्या कितीतरी मुली science ला गेल्या. त्यातल्या काही MSc झाल्या. पण मी BCom
होऊन देखील तुम्हाला वाटल तस CA वगैरे काही करणार नव्हते , कारण माझ्या मनात एक दगड बसला होता की मी कधीच यशस्वी होउ शकत नाही आणि म्हणून BCom झाल्यावर about turn करुन मी mechanical dropsmen चा डिप्लोमा घेतला. डॅडी . तुम्ही रागवला नाहीत मझ्यावार पण घरातल्या वातावरणाची असहाय्यता मला सर्व काही सांगुन गेली. एकदा वाटल , मीरा ताई जशी तुम्हाला मिठी मारते तशी घटट मिठी
मारुन सांगाव मी CA च्या terms भरायला तयार आहे. पण दरवेळी जस तुम्ही मीर ताईच्या कपाळावर ओठ ठेवुन म्हणायचात Buck up बेटा तस माझ्याबाबतित होणार नाही याची मला खात्री होती.
हा एकमेव निर्णय असा होता की जो मी तुम्हाला विरोध करण्यासाठी घेतला नव्हता. उलट मला खरोखर मनापासुन वाटत होत की खरच हेच माझ क्षेत्र आणि मी त्यात यशस्वि झाले डॅडी. आयुष्यात प्रथमच मोठठ अस यश मी मिळवल. तुमच्या कदाचित लक्शत नसेल , आमच्या Batch ला मी
पहिली आहे.
मीर ताई जेव्हा boardat पहिली आली तेव्हा तीचे अगदी ५ star hotel मध्ये देखील सत्कार झाले. ती IIT ला first येऊन Stanford ला गेली तेव्हा देखील तिचे भव्य सत्कार झाले.
तिच्या त्या भव्य सत्कार समारंभापुढ़े माझा टेक्नीकल school मधला बक्षिस समारंभ म्हणजे काहीच नव्हता. पण मला त्याच मह्त्त्व फार होत , पण तुम्ही आला नाहीत . तुम्हाला तुमचा Phd चा student जास्त मह्त्वाचा वाटला. त्यादिवशी ममाशी माझ ह्या विषयावरुन
पहिल्यांदा भांडण झाल आणि एक धडा मी त्यादिवशी शिकले की मी कितीही धडपडले आणि कितीही प्रयत्न केले तरी तुमच्या दृष्टितुन मिराताई ची जागा कधीच घेउ शकणार नव्हते.

Swa_26
Tuesday, October 16, 2007 - 7:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान आहे शैली तुझी... वेगळी!!

R_joshi
Tuesday, October 16, 2007 - 7:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नम्रता खुपच छान लिहिले आहेस. असे अनुभव अनेकांच्या वाटयाला येत असतिल.

Namrata4u
Tuesday, October 16, 2007 - 8:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी आणि अरुण कसे भेटलो हे अजूनही तुम्हाला माहित नाही डॅडी. सामन्य अरुण मध्ये मी काय पाहिल? हा प्रश्न वारंवर मी तुमच्या डोळ्यात वाचलाय.
मध्यंतरी मला तुम्ही श्रीधर uncle कडे दाखवल्याच कळलं. डॅडी , अरुण मध्ये मी माझ सामान्यपण पाहिल. मी ज्या कंपनी त कामाला होते,
त्याच कंपनी त designing department ला अरुण कामाला होता. तो engineer नव्हता पण national institute of designing चा diploma होता त्याच्याकडे.
तो एकमेव माणूस की त्याने मला "मी" म्हणून स्विकारले.
आशोक ग़द्रे चि त्याने आनिरुद्ध ग़द्रे शी तुलना केली नही. त्याला मी जशी होती तशी आवडले. तुमच्या छायेतुन मी थोडीफ़ार बाहेर आले.
माझ्यातला inferiority complex कमी झाला आणि त्याने जेव्हा लग्नाच विचारल , तेव्हा अगदी पिसासारख हलक हलक वाटल मला. मी त्याला
स्विकारल कारण अशोका अनिरुद्ध ग़द्रे ह्या नावाला glamour असल तरी अशोका अरुण नुलकर ह्या नावात मनःशांती होती.
आणि अगदी पहिल्यांदाच उघड उघड विरोध केलात तुम्ही. सरळ सरळ माझ्याशी बोललात आणि ते ही कशासाठी तर माझा आयुषयभराचा आनंद हिरावुन घेण्यासाठि.
डाँ. ज़ोग निवङला होता डॅडी तुम्ही माझ्यासाठी. असे दचकु नका, मला माहित होत. तुम्हाला वाटेल तरीही मी का विरोध केल?
कारण डाँ ज़ोग बुद्धिमान होता. तुमच्या approval साठी मी आयुष्यभर धावतच राहिले. मला पुन्हा तेच करायच नव्हत. मी तुम्हाला जस सतत
अपयशच दिल तसच त्याचही झाल असत आणि मग तो , मी ,तुम्ही आणि ममा असे चार जीव दुःखी झाले असते.
डॅडी, मी australia ला का आले? हे तुम्हाला कायम पडलेल कोड. डॅडी , लग्नानंतर घरा-घरात किंवा एखाद्या समारंभात अरुण ची आणि तुमचि
तुलना व्ह्ययची.मीरा ताईच्या genius नवरयाची व अरुण ची तुलना व्ह्ययची. त्याहून वाईट म्हणजे अरुण ची कुचेष्टा व्हायला लागली. अरुण ला
एकाकी निराशा वाटायला लागली. पुर्विचा हसणारा आणि हसवाणारा अरुण अबोल वाटायला लागला. त्याच सुमारास हशुभाईंनी आम्हाला इकडे येण्याची offer दिली. Machine tools
च्या व्यवसायात आमचा उत्तम जम बसला आहे. atlast you can be proud of me डॅडी.

Namrata4u
Tuesday, October 16, 2007 - 8:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डॅडी, तुम्हाला वाटेल हे सगळं मी तुम्हाला आत्ताच का लिहितेय? कारण मी भारतात परत येतेय. जगभरची व्रुत्तपत्र , मासिक म्हणत आहेत , तुमची जगाला
गरज आहे. तुम्हाला वाचवायलाच हव कारण तुमच्या संशोधनातुन तुम्ही हजारो लोकांना वाचवू शकाल. मी त्यासाठिच भारतात परत येत आहे.
डॅडी, मी आजपर्यन्त तुमच्यासाठी साध birthday gift सुद्धा निवडू शकले नाही. आता मात्र माझे जीवन मी तुम्हाला देणार आहे. मला uterus चा
cancer आहे. ३ महिन्यांच्या वर मी जगणार नाही. माझे हदय मी तुम्हाला देणार आहे.
Please , don't say "no" डॅडी , ही पहिली आणि शेवटचीच गोष्ट मी तुम्हाला देणार आहे.

I Love you डॅडी , thats why my heart reaches out to you.

तुमची,
अशोका



समाप्त
......




Namrata4u
Tuesday, October 16, 2007 - 8:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रहो तुमच्या प्रतिक्रियांसाठी धन्यवाद.. परंतु या कथेसाठी माझ्या जिवलग मैत्रिंण सायलीने खूप मदत केलीय so credit goes to her also !!!

Bsk
Tuesday, October 16, 2007 - 9:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूप छान.. नक्की काय आवडलं सांगता येत नाहीय.. पण शैली आवडली.. लिहीत रहा..

Ana_meera
Tuesday, October 16, 2007 - 9:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विषय आवडला मला. आणि लिहिण्याची style पण... हम्म.. जगात असे अनेक आईबाप असतील नाही.. जे खुप अपेक्षा ठेवतात.. २ मुलांत तुलना करतात..:-(

Monakshi
Tuesday, October 16, 2007 - 9:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नम्रता too good खरंच डोळे पाणावले. पहिलाच प्रयत्न असेल तर खूपच छान लिहिले आहेस. पुढील लिखाणास शुभेच्छा. :-)

Kts
Tuesday, October 16, 2007 - 9:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नम्रता आणि सायली, खुपच सुन्दर कथा लिहिली आहेस. अगदि काळजात हात घालते.

Akhi
Tuesday, October 16, 2007 - 9:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुप छान..... अशोका नि तिच्या सामान्यातलं आसामान्य पण दाखवलं...........

लिहीत रहा


Shrini
Tuesday, October 16, 2007 - 1:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

good one.... लिहिण्याची शैली आवडली. एकसंध लिहीलं असतं तर अजून परीणामकारक झालं असतं.

एक प्रश्न मात्र पडला गोष्ट वाचून... समजा अशोका ला कॅन्सर नसता, तरी तिने तिचे हृदय वडीलांना दिले असते का ?


Prashantkhapane
Tuesday, October 16, 2007 - 1:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Wonderful way of writing and a really nice story.

Shrini,
I'll say why (should anybody do that)?




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators