Ajai
| |
| Friday, September 28, 2007 - 12:16 pm: |
|
|
आजचा दिवसच घाईगडबडिचा. सकाळ पासुन कॉन्फरन्स कॉल आणि नंतर रिव्हु मीटींग अगदि मेल चेक करायलाही उसंत नव्हती. लंच स्कीप केलेच होते म्हणजे आजही बाय्कोच्या शिव्या खाव्या लागणार. पुढच्या मीटींगला जायच्या आधि येकदा मेल चेक करुया म्हणुन आउट्लूक उघडला. नेहमीप्रमाणेच ५०६० मेल इनबॉक्स मधे पडली होती. FYI आणि Cc वगळुन बाकिची मेल्स वगळुन बाकि मह्त्व्वाचे काहि दिसतय का ते चेक करु लागलो. HR department कडुन येक मेल होतं. मुंबईत जोरदार पावस झाल्याने लवकर घरी जायची परवानगि देणारे मेल होते ते. ह्म्म सकाळि थोडि रीपरीप होती पावसाची पण येवढे लवकर सोडण्यासारखं काय झाले असेल. चला थोड काम आट्पुन निघुया आज लवकर असा विचार करुन बायकोला घरि फोन केला तर फोन डेड. मोबाईल नेटवर्क पण जाम. नंतर लक्क्षात आले कि माझ्या मोबाईलवरही तासाभरात कुणाचा फोन नव्हता. काहितरी वेगळ घडत होतं नक्कि. खिडकिचे ब्लाईन्ड्स थोडे वरकरुन पाहिले तर पाऊस अक्षरश कोसळत होता. केबीन बाहेर येउन पाहिले तर बहुतेक जण घरि जायच्या तयारित होते. मीही प्याक.आप करुन पार्किंग मधे आलो. ऑफिस पार्किंग बेसमेंट मधे. बेसमेंट्च्या स्लोपवरुन पाणी आत येत होते आणि बाहेर पडायसाठि गाड्यांची रांग लागली होती. ऑफिस पार्किंगमधुन रस्त्यावर यायलाच १५ मिनिटं लागली. रस्त्यावर पोचल्यावर मात्र पुढच्या संकटाची चाहुल लागली. मुसळधार पाऊस म्हणजे काय त्याचा प्रत्यय येत होता. वायपर्स फ़ुल्ल स्पीड वर ठेवुन्ही पुढचे काहि दिसणे कठिण होऊन बसले होते अंधेरी MIDC हुन गाड्या गोगलगाईच्या गतीने हालत होत्या. त्यातच येखादा रीक्क्षावाला मधेच घुसुन वात आणत होता. सन्ध्याकाळचे ६ वाजुन गेल तरि अजुन लिंक रोडवर सुद्धा पोचलो नव्हतो. ५ मिनिटांच्या रस्त्याला आज २ तास लागले. fantacy land च्या पुढे कार नेण्यात काहिच अर्थ नव्हता कारण रस्त्यावर ढोपरभर पाणी होते. laptop लंचबॉक्स गाडितच सोडुन, त्यातल्यात्यात उंच भाग पाहुन गाडी रस्त्याच्या कडेला लावली. जानबची तो ग़ाडिया पचास. पुढचा मार्ग तर आणखिन कठिण होता. रस्त्यात काहि ठिकाणि अगदि कमरभर पाणी होत. मधेच कुठे devider तर कुठे म्यानहोल. अनोळखि माणसांचा आधार घेवुन पुढे पाउल टाकयचे. पाण्यात चलुन चालुन पाय अगदि नम झाले होते. रात्री दिडवाजता घरि पोचलो. निसर्गाचे तांडव बाहेर चालुच होते पण घराच्या चारभिंतीआत थोड सुरक्षित वाट्त होतं. कढत पाण्याने आंघोळ करुन ज़ेवायला बसलो. TV चालु केला. बापरे निसर्गाचा प्रकोप जबर्दस्त होता. मुंबईच नाही तर महाराष्ट्रात अनेक भागात पावसाचे तांडव चालु होते. अरे बापरे ईतकावेळ लक्षात आले नाहि पण आपला गावही मुंबई जवळच आहे, अगदि सुर्यानदिच्या काठावर. तस घर उंचावर आहे पण मोठ्ठा पुर आल तर पायरिला पाणी लागत. आई बाबा गावीच असतात. माझा घास घश्यातच अडकला. ईतकावेळ मी माझाच विचार करत होतो पण आत्ता मात्र पायाखालचि जमिन सरकली. फोन बंद घरी संपर्क करणही कठिण. बराचवेळ बिछानात तळमळत काढला. अगदी पाहटे पाहटे झोप लागली सकाळि मोबईल वाजला. मोबाईल नेटवर्क चालु झाल बहुतेक असा विचार करुन डोळे चोळत फोन उचलला बाबांचा फोन होता आम्हि ठिक आहोत ना म्हणून फोन केला होता त्यांनी. गाविही भरपुर पाउस होता पण घरचे सगळे सुरक्षित होते. नेहमी बंद पडणारा गावचा फोन या पावसात चालु असणं हेही नवलच. सकाळी पावसाने उघडिप दिली. रस्त्यावर वाहतुक मात्र तुरळक होती. अंधेरिला यायला येक रिक्क्षावाला जेमतेम तयार झाला. रस्त्यावर जिकडे तिकडे बंद पडलेल्या गाड्या आणी जमा झालेला कचरा दिसत होता. अंधेरिला पोचलो. माझि कार लख्ख धुवुन निघालि होती. दरवाजा उघडुन आत पाहीलं सामान जागच्या जागि होत पण कार्पेट्चि ओलं होउन पार वाट लागली होती. गाडी मात्र येक सेल्फ़्मधे चालु झाली. ऑफिसला पोचलो तर आमच्या Contingency planning चे बारा वाजले होते. बेसमेंन्ट पार्किंग मधे तिनचार कार बुडाल्या होत्या. विजेचा सप्लाय आणि जनरेटर दोन्हि पाण्याखालि. त्यामुळे lift बंद. म्हणजे आज जिने तुडवायला लागले. वर ऑफ़िस मधे आणीच अवकळा. UPS batteries drain out झालेल्या त्यामुळे आख्क datacenter आणी नेटवर्क down . त्यातुन देशविदेशातुन सगळ्यान्चे फोने यायला लागले. दुपारि MD नी मीटिंग बोलवलि आणी शेवटि disaster recovery call कर्ण्याचा निर्णय झाला. पुढचे दोन दिवस DR co-ordination मधेच गेले. मधे गावी जाणं शक्य झाल नाहि. पेपरात मात्र झालेल्या हानिच्या विदारक बातम्या येत होता. office मधले सगळे काम स्थिर्स्थवर झाल्यावर आज सन्ध्याकाळी गावि जायला निघालो. NH 8 ची अक्षरश वाट लागलि होती. काहिठिकाणी तर रस्ता अगदि वाहुन गेला होता. जे अंतर कापयला मला नेहमी तासभर लागतो तिथे आज अडीच तास लागले. गावी जायला हायवेवरुन वळलो. या रस्त्याचि हालत तर आणिकच खराब. मधे सुर्या नदिवरचा पुल. थोडा पाऊस झाल तरि बुडतो आणी मग गावचा संपर्क जगाशि तुटतो. या पावसात तर नक्किच हा पुल बुडाला असेल. अंधारपडायला सुरुवात झालि होति. गाडिथांबवुन पाणी कुठवर चढलं होतं ते पहात होतो. अंधारात नीट अंदाज येत नव्हता पण आजुबाजुच्या झाडांवर अडकलेले गवतावरुन तरि पुर फार भयंकर असेल असे वाटत होते. कार सुरु केली तर हेडलाइटच्या प्रकाशात रमशा दिसला. रमशा म्हणजे रमेश. माझा बालपणीचा मित्र. गावि आम्हि येकाच शाळेत शिकलो. रमशा तसा आडदांड. कबड्डि, खोखो अशा मैदानि खेळात पुढे. मी अभ्यासात. रमशा पट्टिचा पोहणारा. त्याच्याबरोबर मीहि हातपाय मारायला शिकलो. पुढे मी शिकायला मुंबईला आलो आणि मुम्बैकरच झालो. पण जेव्हाकेव्हा गावियायचो तेव्हा रमशाबरोबर बैठक ठरलेली. मी रमशाला आवाज देवुन बोलवले. त्याचे लक्षच नव्हते. त्याला गाडित बसवला. नेहमी अघळ्पघळ गप्पा मारणारा रमशा आज अगदिच गप्प होता. गाडित येक विचित्र घाण वास येत होता. बहुदा ओल्या कार्पेट्च्या कूजण्याचा वास असावा. मी खिडकिच्या काचा खालि केल्या पण वास काहि कमी झाला नाहि. पाच मिनिटात रमशाचे घर आले. उद्या भेटतो म्हणुन त्याचा निरोप घेतला. घरी आई बाबा वाट पाहत होते. नेहमी प्रमाणे विज गेलि होती. हातपाय धुवुन लगेच ताटावर बसलो. हवेत मस्त गारवा होता. कंदीलाच्या उजेडात गरम गरम जेवणावर ताव मारायचि मजा काहि औरच. जेवता जेवता बाबा पुराचे प्रताप सांगत होते. आमचिही आंब्याची तीन नदिलगतचि झाडं वाहुन गेलि होति. भाताचि रोपणी अर्धि संपली होति त्याचेचि बरेच नुकसान झाले होते. "उद्या रमशाच्या घरी जाउन ये रे!" ताटात भाकरि वाढाताना आई म्हणाली. "या पावसात गेला बिचारा" "काय?" मी जवळ जवळ किन्चाळलोच. " हो रे. पुलापलिकडे गावातलि काहि मुलं अडकली होति. त्याना आणायला हा पाण्यात उतरला. त्याचवेळी वर बंधार्यातुन पाणी सोडले..................................." आई पुढे बोलातच राहिली, पण माझ्या कानापर्यंत येक अक्षर पोचत नव्हते. त्या कुंद वातावरणातही मला घाम फुटला होता.
|
Bgovekar
| |
| Friday, September 28, 2007 - 12:27 pm: |
|
|
ओह! म्हणजे तो...?? वाचुन शेवटी काटा उभा राहिला अंगावर. थोडक्यात समर्पक लिहिलय.
|
Vegayan
| |
| Friday, September 28, 2007 - 12:46 pm: |
|
|
जबर्दस्त !!!१दम सुन्न करणारा शेवट !!
|
सही जवाब! कळलेच नाही मला शेवटपर्यंत. म्हणजे ही भयकथा आहे हे एक्स्पेक्टच नव्हते केले.
|
Chaffa
| |
| Friday, September 28, 2007 - 4:04 pm: |
|
|
भन्नाट, शेवट सुंदर केलायस ( म्हणजे अनपेक्षीत रे) शुभेच्छा.
|
Runi
| |
| Friday, September 28, 2007 - 6:48 pm: |
|
|
अजय कथा एकदम आवडली, धन्यवाद.
|
Shachi
| |
| Friday, September 28, 2007 - 9:56 pm: |
|
|
शेवट एकदम अनपेक्शित केला आहे. कथा खुपच छान. शेवट वाचताना अन्गावर काटा उभा रहिला
|
Maanus
| |
| Saturday, September 29, 2007 - 12:41 am: |
|
|
बापरे... काय डांगर स्टोरी हाय
|
अजय,सही रे.. शेवट मस्तच...
|
Chetnaa
| |
| Saturday, September 29, 2007 - 3:55 am: |
|
|
सही... काहितरी वेगळा विषय वाटत असताना अचानक शेवटाने हादरा दिला...
|
Manjud
| |
| Saturday, September 29, 2007 - 5:34 am: |
|
|
हूह!!! अजय, मस्तंच एकदम...... तो विचित्र वास आला तेव्हाच मला वाटलं की काहितरी गूढ असावं कारण मुंबईपासून प्रवास करत येताना हा वास कुठेच आला नव्हता तो रमशा बसल्यावर एकदम आला... सहीच लिहिलंय...
|
Swa_26
| |
| Saturday, September 29, 2007 - 5:55 am: |
|
|
मस्तच लिहीलयंस रे अजय!! शेवट छान!
|
Ana_meera
| |
| Saturday, September 29, 2007 - 7:13 am: |
|
|
२६ जुलै ची सत्यघटना वाचतोय असे वाटलेले. बापरे भयकथा ही! चांगली आहे,
|
Ladaki
| |
| Saturday, September 29, 2007 - 9:52 am: |
|
|
>>>TV चालु केला. >>>... खुप छान लिहीलय अजय तुम्ही... तो दिवस मुंबईकर कधीच विसरु शकत नाहीत... पण त्या दिवशी सगळ्या मुंबईची electricity गुल होती... फक्त मिरा रोडला मी जिथे राहते तिथेच electricity होती... बाकी बर्याच भागात पाणी साचल्यामुळे वीज कपात करण्यात आली होती...
|
Mmr
| |
| Saturday, September 29, 2007 - 10:24 am: |
|
|
खुप छान लिहीलय तुम्ही. काहितरी वेगळा विषय वाटला...
|
मस्तच लिहिलं आहे. शेवट अगदीच अनपेक्शित आहे, keep it up -भावना.
|
Monakshi
| |
| Monday, October 01, 2007 - 7:14 am: |
|
|
अजय, सहीच, मला वाटलं की तुम्ही २६ जुलैला अडकलेला त्याबद्दल काहीतरि अनुभव लिहिताय, हे मात्र एकदम भयकथा, सहीच. कहानीमें ट्विस्ट.
|
Daad
| |
| Tuesday, October 02, 2007 - 5:17 am: |
|
|
झकास म्हणजे झकासच. अजय, भयकथेचा जो पंच असतो तो इतका सहज आणि जबरदस्तं दिलाय की... जवाब नही!
|
Anaghavn
| |
| Tuesday, October 02, 2007 - 10:27 am: |
|
|
सॉरी,हा ईथे एकदम वेगळा विशय आहे. पण कुठे विचारायच हे समजत नाहीये म्हणून ईथे विचारते."एका वर्शाची गोश्ट" या कदम्बरी च काय ज़ाला पुढे? २५ जुलाई नन्तर एकही भाग नाहीये त्याचा.कोणी सान्गु शकेल क?
|
Runi
| |
| Tuesday, October 02, 2007 - 2:10 pm: |
|
|
अनघा, अजुन ती कथा अपुर्ण आहे. पुढचे भाग वाचण्यासाठी तुला त्या गोष्टीची लेखिका शोनुला प्रेमळ धमकी आग्रह करावा लागेल ती कथा पुर्ण करण्यासाठी. तो नेक काम मे देर किसलिए. तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
|