|
Tukaram
| |
| Wednesday, September 12, 2007 - 9:29 pm: |
| 
|
Full Story for your reading pleasure... Part I - " अहो चहा तसाच राहिला?" " अरे हो कि… आज जरा गडबडित आहे हा सुनील ना.. स्वतः नीट जगणार नाहि आणि दुस-याला पण नीट जगु देणार नाही. " " काय केल आता त्यांनी? " " रात्रभर झोप नाही मला.. काही गोष्टी मनात नुसता गोंधळ घालत होत्या" " ते तुमचं रोजचंच आहे.. काहितरी आठवंत बसता आणि माग झोप लागत नाही.. एकदा झोपेचि वेळ गेली कि मग आहे पहाटेपर्यंत चुळबुळ " " सोड ते.. जरा चहा दे बरं इकडे, दारातच पितो " अरुण सरपोतदार. घरी बाबा तर बाहेर सर्वांचे मास्तर. मास्तर हे नाव पोस्ट मास्टरची नोकरी ४० वर्ष केल्यामुळे मागे लगलेलं. रिटायर होउन १ वर्ष झालयं आणि नवीन विना-धावपळीच्या जीवनची आजुनहि पूर्ण सवय होतीय. सकाळची पूजा, चालणे, मित्रांच्या भेटी आणि संध्यकाळचा कट्टा ह्यात रिटायर्ड आयुष्य संथ गतिने उमलत आहे. सुनील काणे, हा ४० वर्षांपासूनचा मित्र. मित्र, फमिली डॉक्टर, सल्लागार आणि वादाचा प्रतिस्पर्धी. आठवड्यातुन ३-४ वेळा भेट झाल्याशिवाय दोघांनाही करमत नाहि. पण भेटले की वाद सुरु. बाकी मास्टरांची सगळी कडे एक अनुभवी, शांत आणि विचारी माणुस म्हणुन ख्याति आहे. कधी कुणावर रागवणार नाहि कि आवाज चढवुन बोलणार नाहीत. कुणाला दुखावणे त्यांना काधि जमलेच नाही. लोकांनी त्यांचा फायदा घेताला तरी त्यांना त्याचे कधिच काहि वाटले नाही. डॉ. सुनीलशी बोलताना मात्र त्यांचा रंग थोडा वेगळा असयचा. मैत्रिच तशी होति त्यांची. " एवढं काय घाइचं काम आहे आज सुनीलकाकांकडे? " रुपाली ने विचारले. मास्तरांना २ अपत्य. सुमीत आणि शेंडेफळ रुपाली. सुमीत सॉफ्टवेअर कंपनीमधे मनेजर आहे तर बाईसाहेब आजुन कॉलेज मधे रमल्यात. " काहि नाहि ग. सुमीत गेला का ऑफिसला? काधि येतो आणि कधि जातो तेच काळत नाही " पिशवी हातात घेत मास्तर म्हणाले. " बाबा….. आजोबांच्या फोटोला नमस्कार न करताच निघालात? " " ३८ वर्षात असं कधी झालंय का? .. येतो मी ".. मास्तर फोटोला नमस्कार करुन घराबाहेर पडले. " नमस्कार " बाजुचा चहावाला हात हालवत होता. " बारा वाजता २ पाठवुन द्या डॉक्टरांकडे " मास्तरांनी त्याच्या नमस्काराचे उत्तर दिले. रोजचा १० मिनिटांचा रस्ता पण आज एवढा लांब का वाटत होता कुणास ठावुक?. झर झर चालंत मास्तर क्लिनिक कम ऑफिस कम घराची मागची रुम माधे पोचले. " या ".. सुनीलचा ओळखिचा आवाज. " झोपला नसशीलच? " " तुझ्या नादि लागलेला कोणता माणुस झोपु शकला का कधी? " मास्तरांनी पाहिली सलामि दिली. " तयारीनिशी आला आहेस ना? " " हो. काय काय गोष्टी तुला कायमच्या द्यायच्या ते ठरवले आहे. …... हेच का ते का नाही??.. वगैरे विचारुन डोक्याला त्रास देवु नकोस. मिळतंय त्यात आनंद मान. " " बरं बरं….. चल आत, बघु काय काय देतो आहेस मला ते? " "आणि मला नंतर परत हवे असेल तर? " " माहिन्याभरापर्यंत परत करीन्…पुढचा भरवसा नाही " " ठिक आहे " " ये आत मधे " डॉ सुनीलनी मिलिटरी स्टाइलमधे रुम कडे बोट दाखवुन सांगितले. Part II .................. २५ दिवसांनंतर " काय वहिनी आज अर्जंट भेटायला बोलावलत ? " डॉ. सुनीलनी चहाचा घोट घेत विचारलं. " हो. थोडं बोलायचं होतं तुमच्याशी " "बोला" "ह्यांच्याविषयी काही बोलायचं होतं तुमच्याशी. " " अरुण?? काय झालं त्याला? मला तर आजकाल झोप छान लागते म्हणुन खुश होउन सांगत असतो. " " हो... हो.. बरं झालं बाई त्यांचा झोपेचा प्रश्न मिटला एकदाचा " "बर मग? " तुम्ही त्यांचे जवळचे मित्र आणि घरचेच एक असल्यामुळे फक्त तुमच्याशी बोलतेय " वहिनी डोळ्याला पदर लावंत म्हणाल्या. " काळजी करु नका. निश्चिंत मनाने सांगा" " हल्ली ह्यांच्या स्वभावात खुप फरक पडलाय हो. सारखे चिडचिड करतात. केंव्हा काय म्हणतील ह्याचा भरवसा नाही. कुठल्या कुठल्या जुन्या गोष्टी आठवतात आणि त्यावरुन सगळं घर डोक्यावर घेतात. माझं काय? मी सगळं सहन करीन पण मुलांचं तसं नाही. सुमीततर कुठेतरी दुस-या शहरात जॉब करीन म्हणतोय. ईथे आता राहु शकणार नाही म्हणाला. " " अरेच्च्या एकदम काय झालं सुमीतला? बाप लेक चांगले मित्रासारखे वागंत होते एकमेकाशी. ? " " नजर लागली कुणाचीतरी दुसरं काय... इतक्या चांगल्या स्वभावाचा माणूस असा अचानक कसा काय बदलु शकतो?" " मला नीट सांगा काय काय झालं ते..." " पंधरा दिवसा पूर्वीची गोष्ट..." वहीनींच्या डोळ्यासमोर प्रसंग तसाच्या तसा उभा राहिला... ...................... सकाळची वेळ. मास्तर काही कामानिमित्त बाहेर निघाले होते. "अहो... स्वेटर घालुन जा. आज अचानक थंडी पडलीय. " " आयुष्यभर तु सांगतेस तेच करायचं का मी? माझ्या मनाचा कधी विचार होतो का ह्या घरात? " " अहो साधं स्वेटरचं सांगितलं मी एवढं चिडायला काय झालं? " " काही नाही झालं का ही नाही. माझा जन्म तुझ्याकारणी लागला ह्यात समाधान मानायला हवे ना मी? लग्नापासून सर्व काही माझ्या इच्छेविरुध्द झालं तरी मी चिडायला नकोच नाही का? तेंव्हाच बाबांना सांगयला हवं होतं कि तुझ्याशी लग्न नाही करायचं मला म्हणून. चूक झाली. आयुष्य व्यर्थ गेल्यासारखं वाटतंय. निघुन जातो आता मी ह्या घरातुन " वहीनींचा हुंदका त्यांच्या कानापर्यंत पोचला नाही. " बग दे ग माझी रुपाली." मास्तर गरंजले. आणि निघाले. " बाबा फोटोला नमस्कार राहिला...." रुपाली घाबरंत हळु अवाजात म्हणाली. " देव नाहीत ते रोज पाया पडायला. आज्ञा आणि अन्न्याय ह्या शीवाय काय दिलं त्यांनी मला? हा फोटो इकडुन काढुन टाकला पाहिजे. " तरातरा जात त्यांनी दरवाजा जोरात आपटला. .................... " तुम्हीच सांगा भाउजी ह्यांचा असा अवतार तुम्ही कधी पाहीला आहे का? " " नाही... " डॉक्टर विचारत पडंले... " आणि सुमीतचं काय? " तुम्हाला तर माहित आहेच की खुप वर्षांपुर्वी सुमीत काही महीने नको त्या गोष्टिंच्या व्यसनात होता. पण किती सुधारला तो नंतर मेहनत करुन इंजिनीअर झाला, आता तर छान नोकरी करतो आणि एखाद्या वाईट स्वप्नाप्रमाणे आम्ही सर्वजण त्या दिवसांना विसरलो होतो " " कठिण काळ होता तो. आणि सुमीतची रिकव्हरी कौतुकास्पदंच आहे. मी त्याचं उदाहरण सगळ्यांना देतो. " "हो. पण हे परवा त्याला ऍडिक्ट म्हणाले. आणि माझ्या तोंडाला काळं फासलंस म्हणाले. तो विषय ह्या घरात काढण्याची काही गरंज आहे का? सांगा तुम्हीच. " " नाही...पण.... आश्चर्य आहे कि गोष्टि आठवायला कशा काय लागल्या ? " डॉक्टर स्वतशीच बोलंत होते. " म्हणजे? " " काही नाही. तुम्ही काळजी करु नका. मी लगेच बोलतो त्याच्याशी. सगळं नीट होईल " "तुमचं ऐकतील ते असं वाटलं म्हणून तुमच्याशी बोलले. त्यांना सांगु नका नाहितर रागवतील ते " "मी काळजी घेइन. ... येतो मी." डॉक्टर घाइघाइत निघुन गेले. Part III "ये.. काय म्हणतोस. ४-५ दिवस कुठे गायब झालस..?" डॉक्टर मास्तरांना हसत हसत म्हणाले. "अरे बरीच कामे होती.. वेळच मिळाला नाही बघ.. आज हिने १० वेळा सांगितलं.. मग आलो.. म्हणलं तुझं काहितरी महत्वाचं काम असणार. " "काही नाही रे.. तुझ्याशी सहज बोलायचं होतं" "बोल.." "कसं वाटतंय तुला आज काल मागे झोप न येण्याची कंप्लेंट होती कय झालं त्याचं?" "झोप छान येतेय.. गेले १५-२० दिवस तर खूपंच छान पण २-३ दिवस झाले परत तोच त्रास चालु झालाय… " "बरं बरं… काय होतय नक्कि…?" "काहितरी जुन्या गोष्टि आठवुन मन उदास होतंय " "म्हणजे?" "तुला तर माहितंच आहे मझ्या लग्नाच्या वेळची गडबड आणि सुमीत चा प्रॉब्लेम.. तेच विषय डोक्यात घोळतात.." "बंर मला वाटतं कि तु मला महिन्याभरापुर्वि दिलेल्या गोष्टि घेवुन जा.." "मी तुला काय दिलंय? मला तर काही आठवंत नाही.." "का....ऽ य? तुला आठवंत नाही? … " "असं एकदम ओरडतोस कशाला?" "काहि नही.. मला वाटतं मी तुला चेक करायला पाहिजे आणि मल तुझा काही वेळ दे… २-३ तास…" "उद्या?" "चालेल. मी तयारीला लागतो…" "कसल्या?" "अं...काही नाही तु ये उद्या.." मास्तर निघुन गेले आणि डॉक्टर कितीतरी वेळ विचार करत खुर्चित बसुन रहिले.. असं कसं शक्य आहे? त्यांचं मन विचारंत होतं.. जुन्या गोष्टि रिप्लेस होऊ शकतात? माणसाचं मन म्हणजे अद्भुत प्रकार आहे.. सर्वात पहिल्यांदा मला 'जैसे थे' परिस्थिति आणली पाहिजे मग पुढे विचार करु.. डॉक्टरांनी मनाशी काहितरी ठरवंले आणि ते उद्याच्या तयारीला लागले.. "थोडे थकल्यासारखे वाटताय. झोपा थोडावेळ हवं तर" "नको. जरा देवळात जाउन येतो. ४ दिवसांपुर्वी सुनील नी काही औषधं दिली त्याचा हा परिणाम. पण ब-यापैकी बरं वाटतंय मला." "ठिक आहे" वहिनींनी जास्तं आग्रह केला नाही. " मी सोडु का बाबा तुम्हाला?" सुमीतनी ऑफिसला निघता निघता विचारले. " नको रे. तु जा पुढे. तुला बरिच कामं असणार. एवढा मोठा मनेजर तु. माझ्यामुळे तुझ्या कामात व्यत्यय नको आणि वेळेवर कामाला जाणे हे सर्वात महत्वाचं. आपण कालसारख्या रात्रि गप्पा मारु. जा तु." गेल्या २-३ दिवसात मास्तरांनी सुमीतबरोबर खुप गप्पा मारल्या होत्या आणि त्याला लाजवेल इतके त्याचे कौतुक केले होते. वहिनी तर सारख्या देवाचे आभार मानत होत्या. "मी पण येते." त्या मास्तरांबरोबर निघाल्या. "अहो. एक विचारु का?" " काय हुकुम आहे?" मास्तर हसत म्हणाले. " हुकुम कसला. ड़ऑ. सुनीलनी मला भेटायला बोलावलय. तुम्हाला चालायला लागुनये म्हणुन एकटीला येवुन औषधं घेउन जायला सांगितलंय. जाउ का मी देवळानंतर तिकडे.?" "काही हरकत नाही. त्याला म्हणाव एखादी चक्कर टाक जमेल तेंव्हा" "बंर, सांगेन मी." दोघांनी देवाचे दर्शन घेतले आणि ठरल्याप्रमाणे वहिनी डॉ. कडे निघाल्या. औषधाचे निमित्त सांगुन एकट्याच या असा डॉ. चा फोन आला होता. मास्तरांविषयी काहीतरी महत्वाचं बोलायचं असणार नाहीतर डॉ. असा निरोप देणार नाहीत. त्या शक्य तेवढ्या वेगात चालंत डॉ. च्या घरापाशी पोचल्या. " या....... डॉ. नी त्यांना आत बोलावले". हॉलमधे शिरताना तिकडे कुणीतरी तिथे बसलेलं आहे हे त्यांच्या लक्शात आलं. "ये आई बस..." सुमीत जागा करंत म्हणाला. Part IV - " चहा कॉफी काही घेणार? डॉ. नी विचारले. "नाही नको. निघताना झाला. काय काम निघालं अर्जंट ?" वहिनींनी न रहावुन विचारलं. "मास्तरांविषयी काही बोलायचं होतं " डॉ. नी सरळ मुद्दाला हात घातला. "सगळं ठिक तर आहे ना ? " सुमीत च्या चेहे-यावर टेंन्शन दिसंत होतं. "हो हो... काळजीचं कारण नाही, पण काही गोष्टी तुम्हाला माहित असणं महत्वाचं वाटलं म्हणून इथे बोलावलं. " एक मिनीटाच्या शांततेनंतर डॉ. सांगु लागले. "तुम्हाला त्यांच्या स्वभावात किंवा वागण्यात बदल झालेला माहितच आहे. त्या मागची कारणं आणि पुढील काळजी ह्या साठी तुम्हाला इथं बोलावलं. " डॉ. न थांबता पुढे बोलु लागले. " मी ब-याच वर्षांपासून माणसाचा मेंदु आणि त्याची स्मरणशक्ति ह्यावर आभ्यास आणि प्रयोग करत आलो आहे. मेंदु गोष्टी कशा स्टोअर करतो आणि वेळच्यावेळी योग्य आठवणी कशा काय प्रोसेस करतो ह्याचा अभ्यास करुन मी स्मरणश्क्ति वाढवण्यासाठी काय करता येइल ह्यावर निरनिराळे आडाखे बांधत आलो आहे. मास्तरांना ह्याविषयी कल्पना होतीच पण त्यांनी कधी ह्यामधे रस घेतला नाही. आणि त्यामुळेच ह्या विषयावर आमचे कधी बोलणं पण झाले नाही." त्या दोघांच्या चेहे-यावरील भाव गंभीर होत असलेले पाहुन त्यांनी आपल्या बोलण्याचा वेग वाढवला. " काही महिन्यांपासून त्यांना झोप न येण्याचा त्रास होतोय हे मला जेंव्हा त्यांनी सांगितलं मी त्यावर विचार करायला सुरुवात केली. जुन्या आठवणींचा मनात चाललेला हल्लकल्लोळ आणि त्यासंदर्भातली स्वप्नं हीच त्यामागची कारणं असल्याचं त्यांनी मला १० वेळा सांगितलं आणि माझ्या मनात एका प्रयोगाच्या कल्पनेनं जन्म घेतला. मी स्मरणश्क्ति कशी वाढावी ह्यावर प्रयोग करत होतो. पण एका विशेष पद्धतीने जर मेंदु मधल्या काही जागा रिकाम्या करता आल्या तर त्याचा नवीन गोष्टी लक्शात ठेवण्यासाठी काही वापर करता येइल का? ह्यावर मी काही प्रगती केली होती. नकारंच मिळेल हे माहित असून मी त्यांना प्रयोग करायचा का? असं गमतीत म्हणालो आणि ते चक्क हो म्हणाले. तयारी म्हणून मी त्यांना ३ अशा गोष्टी लिहुन आणायला सांगितल्या ज्या त्यांना विसरायच्या होत्या. प्रोसेस होती--- त्यांनी त्या गोष्टी परत परत आठवायच्या आणि त्याच वेळेस मी मेंदुचा नकाशा तयार करुन, लोकेशन फिक्स करुन, तिथले स्ट्र्क्चर आतिसुक्श्म लेझर ने बदलायचे." ...... " आम्ही प्रयोग केला सर्व टेस्ट नॉर्मल आल्या पण.................. त्यानंतर जे झाले त्याची मी कधी कल्पनाही करु शकलो नसतो. " एव्हाना वाहिनी रडु लागल्या होत्या.. Part V - " तुम्ही काळजी करु नका वहिनी. सर्व काही ठिक आहे आता... माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा." डॉ. नी सुमीतला त्यांना धीर दिला. सुमीतही आईला शांत करु लागला. "कशाला हवेत असले जीवाचे खेळ?" वहिनी चिड्क्या स्वरात म्हणाल्या. "सांगतो." डॉ. नी पाण्याचा घोट घेत बोलणे पुढे चालु केले. "सामान्य माणूस हा नेहमी सुखाच्या आनंदाच्या शोधात असतो आणि अगदी लहानपणापासून स्वत साठी काय भले-काय बुरे ह्याचा त्याला अंदाज असतो. आणि त्यामुळेच पुढे जाउन तो चांगल्या गोष्टी, चांगल्या व्यक्ती, चांगल्या आठवणी ह्याला आयुष्यात सर्वात जास्त महत्व देवु लागतो. जीवनातले उतार, अडचणी, समस्या आणि कठिण समय कसा काय संपुर्णपणे नष्ट करता येइल ह्यावर तो न्-कळत काम करायला लागतो. ह्यात काही चुक आहे असं माझं म्हणणं नाही पण मन फक्त चांगल्या गोष्टींकडेच लक्श द्यायला लागतं आणि जीवनातल्या इतर बाबी कमी महत्वाच्या किंवा नकोशा वाटायला लागतात. मास्तरांचं तसंच काहीसं झालं. आणि माझाही अंदाज चुकला". "म्हणजे?" सुमीत. " पहिली कडू आठवण जी त्यांनी घालवायला सांगितली ती म्हणजे त्यांच्या वडिलांचा म्रुत्यु. त्या वेळेस मास्तर २०-२१ वर्षाचे होते आणि तुझे आजोबा एका एक्सिडेंट नंतर हॉस्पिटल मधे गेले. अगदि शेवटच्या क्षणापर्यंत मास्तर त्यांच्या बरोबर होते. जरी मास्तरांचं आणि त्यांचं वर वर पटत नसलं तरी दोघांचं एकमेकावर खुप प्रेम होतं. त्यांचा स्वतसमोर झालेला म्रुत्यु मास्तरांच्या मनावर खुप परिणाम करुन गेला आणि ती आठवण त्यांना नकोशी झाली. मास्तरांचं जीवन त्या एका क्षणाने बदलुन गेले. अचानक ते घरातला कर्ता पुरुष बनले. शिक्षण थांबले, नोकरी चालु झाली, लग्न झाले आणि इतर जबाबद-या अंगावर पडल्या. त्यांच्या इच्छेप्रमाणे मी ती आठवण पुसुन टाकली. दुसरी आठवण होती सुमीतच्या हॉस्पिटलमधल्या दिवसांची. ते २ दिवस जेंव्हा तु बेशुद्ध होतास ते दिवस त्यांना काढुन टाकायचे होते. आणि मी ते केलंही." "पण तुम्ही तर म्हणता की प्रयोग यशस्वी झाला म्हणून आणि ह्या आठवणी तर घालवण्यालायकच होत्या मग प्रॉब्लेम काय झाला?" " तिथेच तर माझा अंदाज चुकला आणि मानवी मनाचा एक महत्वाचा धागा माझ्या हाती लागला. " डॉ. पुढे सांगु लागले. " मास्तरांच्या इच्छेप्रमाणे ते ह्या सर्व गोष्टि विसरले. पण हळुहळु त्यांच्या स्वभावात फरक पडु लागला आणि त्यांना दुस-या काही गोष्टी आठवु लागल्या. थोडा विचार केल्यावर आणि त्यांच्याशी बोलल्यावर मला काही गोष्टींचा उलगडा झाला..... Part VI ....... डॉक्टर पुढे सान्गु लागले " मास्तरांशी बोलल्यावर मला त्याच घटनांविषयी परत विचार करावा लागला. मी जेंव्हा त्यांना त्यांच्या आठवणी परत दिल्या आणि काय काय घडले ते परत सांगायला लावले मला लक्षात आले कि ह्या घटना फक्त दुःखकारक न्हवत्या तर त्यांचा मास्तरांच्या जीवनावर खुप मोठ्या प्रमाणावर चांगला परिणाम झाला होता. माणूस जसे सुखामधे आनंदाचे क्षण वेचतो तसेच तो दुःखामधे जीवनाची मुल्ये वेचतो. त्याचे जीवन एका अर्थी त्याच काळात घडत असते. सुखाच्य मागे धावणा-या माणसला हे लक्षात येत नाही कि दुःखी क्षणांनी त्याच्या जीवनावर किती चांगला प्रभाव पडला आहे ते. मास्तरांचे तरुणपणी एक मुलीवर अव्यक्त प्रेम होते. त्यांच्या वडिलांना ते माहित होते पण जात्-पात मधे येत असल्याने गोष्टि कधिच पुढे गेल्या नाहीत. मास्तरांच्या वडिलंनी जाण्यापुर्वी त्यांचे मनाविरुध्ध लग्न केल्या साठी माफ़ि मागितली होती. पहडा सारखे मजबुत माणूस होते तुझे आजोबा पण खूप हळवे झाले होते त्या क्षणि आणि मास्तरांना जवळ घेवुन खूप रडले. मास्तरांनी त्यांना मनापासून माफ़ केले आणि कुटुंबाची काळजी घेण्याचे वचन दिले. ज़री तो खूप दुःखाचा क्षण होता, एका समंजस आणि कर्त्या पुरुषचा जन्म होत होता आणि माझ्या प्रयोग मुळे जशी स्वतःच्या समोर वडिलांचा झालेल्या म्रुत्युची दुखद आठवण गेली तशीच मनाची झालेली जढण घडण पण गेली. त्यामुळेच ते अचानक वहिनींचा राग करु लागले. तरुण पणा माधे दबुन राहिलेला राग आता बाहेर येवु लगला आणि सुमीतच म्हणाल तर " "सांगायची गरज नहि डॉक्टर सुमीत म्हणला .. " त्या वेळेस, मी जेंव्हा हॉस्पिटल मधे बेशुद्धितुन उठलो तेंव्हा बाबा माझ्यापाशीच बसलेले होते मनातली नीराशा आणि दुःख डोळ्यतील अश्रु बनुन गालावरुन ओघळत होते.. मी त्यांना असं कधिच पाहिलं न्हवतं त्यांच्याकडे पाहुन आणि त्यांनि नंतर दिलेल्या प्रेमळ सल्ल्यांमुळेच मी तिथेच स्वतःला पुर्णपणे सुधारायचं असं ठरवलं आणि त्यांना तसं वचन पण दिलं आमचे नाते एकदम बदलुन गेले आणि आम्ही खूप जवळ आलो... मझ्या मते हॉस्पिटल्च्या दिवसांच्या आठवणी बरोबर ती पण आठवण गेली असणार आणि त्यामुळेच माझ्यावर ते नाराज होते." "अगदी बरोबर " डॉक्टर त्यच्य पाठीवर थाप देवुन म्हणाले.. " पण आता सगळे काही ठीक झाले आहे. त्यांच्या सर्व आठवणी मी त्यांना परत दिल्या आहेत आता जेंव्हा मी माझ्या जीवनामधिल दुःखांचा विचार करतो.. मला त्यांचा कधिच त्रास होत नाही.. कारण माझं आयुष्या फुलवण्यात त्या क्षणांचं मोठा वाटा आहे एक बरं झालं की मी SHIFT + DELETE बटन नाही दाबले प्रयोगाच्या वेळी.." "म्हणजे?'' वहिनींनी विचारले.. " आई, SHIFT + DELETE दाबले की कॉम्पुटर मधला डाटा पूर्णपणे डिलीट होतो आणि परत नाही मिळत" डॉक्टरांचे आभार मानून ते दोघेहि तिथुन बाहेर पडले. दोघांच्याही चेहे-यावर दुःखी क्षणांनि हसु आणले होते. समाप्त.
|
Madhavm
| |
| Thursday, September 13, 2007 - 1:50 am: |
| 
|
सुंदर कथा आहे. विज्ञानकथा आहे पण विचार करायला पण लावते.
|
Arch
| |
| Thursday, September 13, 2007 - 2:19 am: |
| 
|
माणूस जसे सुखामधे आनंदाचे क्षण वेचतो तसेच तो दुःखामधे जीवनाची मुल्ये वेचतो आता जेंव्हा मी माझ्या जीवनामधिल दुःखांचा विचार करतो.. मला त्यांचा कधिच त्रास होत नाही.. कारण माझं आयुष्या फुलवण्यात त्या क्षणांचं मोठा वाटा आहे >> तुकाराम, आवडली हं कथा. अगदी विचार करायला लावणारी.
|
Chetnaa
| |
| Thursday, September 13, 2007 - 4:00 am: |
| 
|
तुकाराम.. खुप छान आणि विचार करायला लावणारी आहे कथा.. ते २६ काय आहे? काही कळले नाही...
|
Zakasrao
| |
| Thursday, September 13, 2007 - 4:13 am: |
| 
|
छान लिहिलय. ते मधे मधे २६ का आलय? जर तुम्ही काढु शकत असाल तर ते काढुन टाका.
|
Rameshdd
| |
| Thursday, September 13, 2007 - 6:27 am: |
| 
|
आरे वा वा छान अखेर केलास
|
Daad
| |
| Thursday, September 13, 2007 - 7:27 am: |
| 
|
एक सुंदर कथा. आता एकसंध आल्याने त्यातल्या कथाबीजाची ताकद कळतेय. छानच!
|
सुंदर कथा आहे. आणी सलग वचताना अजुन मजा आली. So Keep Posting
|
R_joshi
| |
| Thursday, September 13, 2007 - 8:59 am: |
| 
|
उत्तम कथा. कथेतला विषय नक्किच विचार करायला लावतो. एकसंध पोस्ट केल्यामुळे वाचायला हि बरे वाटले.
|
तुकोबा एक वेगळा विषय आणि उत्तम कथा! विज्ञान आणि तत्वज्ञान दोन्हीचे योग्य मिश्रण. कुठंही थीम वीक होत नाही. लिहीत रहा!
|
Zaad
| |
| Thursday, September 13, 2007 - 10:29 am: |
| 
|
कथा आवडली, लिहीत रहा.
|
Psg
| |
| Thursday, September 13, 2007 - 11:24 am: |
| 
|
छान लिहिलेय तुकाराम. पूर्ण गोष्ट एकत्र वाचायला मिळाली, त्यामुळे आवडली..
|
Tukaram
| |
| Thursday, September 13, 2007 - 12:30 pm: |
| 
|
सर्वांना धन्यवाद!!... २६ कसं काय आलंय कुणास ठावुक?... मॉड ला मेल केलीय...
|
२६ काढुन टाकल आहे.
|
Tukaram
| |
| Thursday, September 13, 2007 - 3:58 pm: |
| 
|
धन्यवाद मॉड. .....!!! ..... .....
|
Gobu
| |
| Thursday, September 13, 2007 - 6:10 pm: |
| 
|
तुकोबा, कथेचा विषय वेगळा आहे आणि प्रयत्न कौतुकास्पद आहे. अभिनन्दन!
|
वा. छान कथा आहे तुकोबा.
|
Disha013
| |
| Thursday, September 13, 2007 - 6:50 pm: |
| 
|
खुप छान लिहीलिये कथा.विषयही वेगळा.
|
Asami
| |
| Thursday, September 13, 2007 - 7:00 pm: |
| 
|
fantastic विज्ञान कथा. फ़क्कड जमलीये
|
Lalu
| |
| Thursday, September 13, 2007 - 8:08 pm: |
| 
|
छान आहे कथा. 'Eternal Sunshine of the Spotless Mind' पाहिलाय का? काहीसा असाच. बघा, आवडेल.
|
|
|