|
Disha013
| |
| Friday, September 07, 2007 - 7:28 pm: |
| 
|
संपली का कथा? माणसा हे ललित नाही वाटत. पण जे काही लिहिलय लै झ्याक लिवलस बघ! आणि लिहितालिहिता वाचकांशी संवाद पण चालु आहे तुझा! आणि हो,कथेत कॅमेरा कुठुन आणलास? तुला काळ मागे जातो असे म्हणाय्चयं का?
|
Maanus
| |
| Friday, September 07, 2007 - 7:50 pm: |
| 
|
नाही नाही, सुरु आहे अजुन. काय हे गणिताचा उद्देश पुर्ण नाही झालेला दिसत. 35 - 5 - 10 - 5 = 15 . म्हणजे अजुन १५ वर्ष आहेत गोष्ट संपायला. आज / उद्या पुर्ण करेल. मी सुरु केले तेव्हा मला वाटल एक दोन पोस्ट मधे मी संपवेल कथा आणि म्हणुन ललित मधे टाकल. पन नंतर कॅमेर्याची कल्पना सुचली काळ मागे पुढे न्यायला आणि त्यामुळे गोष्ट लांबत चालली आहे. god = ग्वॉड, कुठेतरी ऐकलेले. इथे सुट होत होता म्हणुन टाकला . वन्स म्हणजे नवर्याची बहीन का नवर्याच्या भावाची बायको?
|
माणुस, छान चाललंय! पटकन पुढे जाऊ दे. नवर्याच्या भावाची बायको म्हणजे वहिनी अन नवर्याची बहिण म्हणजे वन्सं माझ्या समजुती प्रमाणे. चू. भु. द्या. घ्या.
|
Peacelily2025 , Tuze barober ahe,mothya nandela adrane vanse mhanaychi paddhat ahe aplya Maharashtrat . Baki gost zakas ahe .. Manus keep it up. amza yete tuzya bhutache. pudhcha bagh lavkar tak.
|
Manjud
| |
| Saturday, September 08, 2007 - 5:47 am: |
| 
|
माणसा, नवर्याची बहिण = नणंद तिला वन्सं म्हणून हाक मारतात. नवर्याच्या भावाची बायको = जाऊ आणि भावाची बायको = वहिनी.
|
Mrinmayee
| |
| Saturday, September 08, 2007 - 2:52 pm: |
| 
|
माणसा, छान चाललीय इनोदी कथा! तो कॅमेरा आता लवकर पुढे सरकव..! आणि भावाची बायको = वहिनी... येव्हडं नातं त्याला पक्क माहिती असावं! बाकी दोन नाती नक्की कळतील भविष्यात!! *बंधना पल्याडची अल्याडला आल्यावर!
|
Maanus
| |
| Saturday, September 08, 2007 - 6:04 pm: |
| 
|
कॅमेरा ५ वर्ष पुढे जातो. सोनाबाईचे उपवास, जप सध्या वाढलेले आहे. नविन गरजा भागवन्यासाठी सोमाने हर्डवेअरचे दुकान टाकलेय. घरात विज आलीय. नाही म्हणायला झाड तोडल्याचा एक फायदा असा झालाय की झालेल्या रिकाम्या जागेत, सरकारी खर्चातुन तांब्या घेवुन बसायला एक छोटी खोली बांधण्यात आलिय. माधवने पन शिकलेला एक प्रयोग गावी करुन बघावा म्हणुन रिकाम्या जागेत गोबरगॅसचा प्लांन्ट टाकलाय. त्यामुळे सरपन न वापरनारे एक घर गावात तयार झालेय. काशी आणि सोमा गावीच असल्याने त्यांच्या बायका पोरांचा पसारा घरात वाढलाय. पैशाच भुत अजुनही सोनाबाईंच्या डोक्यावर मिरा वाटतच आहे. परंतु पोरा बाळांच्यात त्या ईतक्या गुंतल्यात की तिकडे लक्ष द्यायला त्यांना जास्त वेळ मिळत नाहीय. गेल्यावर्षी माधव नारायण राव आणि सोनाबाईंना ताजमहाल दाखवायला घेवुन गेलेला. देवळात पण कधी नवर्याबरोबर एकत्र न गेलेल्या सोनाबाई ह्या वेळेस पहील्यांदाच नवर्याबरोबर एकत्र ताजमहाल बघायला गेल्यात. तिथे काढलेला दोघांचा फोटो त्यांनी पेटीत जपुन ठेवलाय. अशातच एक दिवशी सोनाबाई करंज्या तळत असताना सोमाच कार्ट, साहील पळत पळत आजीकडे आला आणि "आजे ये आजे" "काय र" "हे बघ मला काय सापडल" आपली छोटीशी मुठ उघडत तो म्हणाला "चाराने सापडले बघ मला माळयावर" "कुठ गावला" "माळ्यावर ग आजे" "फ्येक फ्येक आधी ते पैक खाली" "नाय मला जमनशेठच्या दुकानातुन गोळ्या आणायच्यात" "फ्येकतोस का लावु एक कानाखाली" साहीलने भोंगा पसरला. सोनाबाईंनी कसेबसे साहील च्या हातातुन पैसे काढले, देवळात गेल्या तिथे दान पेटीत ते पैसे टाकले. मुठभर अंगारा उचलाला आणि घरी आल्या. चिमुटभर अंगारा साहील च्या कपळाला फासला. माळ्यावर गेल्या, अंधारातच सगळीकडे अंगारा टाकला. खाली आल्या. मिठाचे चारपाच खडे उचलले, साहीलचा भोंगा सुरु असतानाच त्याच्या मुठीत येतील तेवढे केस पकडले आणि दृष्ट काढु लागल्या. "काय करु राहीलीस ग म्हातारे" "आजी ने माझे पैसे घेतले" आजी तोपर्यंत मिठ फेकुन द्यायला मागे गेल्या. बाप आल्यावर साहील चा भोंगा आजुनच वाढला. शेवटी गोळ्या आनुन दिल्यावर तो शांत झाला. त्या रात्री सोनाबाईंना काही झोप लागली नाही. त्यांना विस वर्षापुर्वीची रात्र आठवली. आजही त्या मधल्या खोलीतच झोपायचा प्रयत्न करत होत्या, डावीकडे दोन सुना, छोटी कविता, उजवीकडे साहील, अक्षय. सोनाबाई सोडुन सगळे जन शांत झोपलेले. दर एक दोन घटक्यांनतर खन्न खन्न सुरुच होते. पुढच्या वर्षी तुला कोंबड नक्की कापेल अस खंडोबाला सांगत सांगत त्या झोपी गेल्या. रात्री झोप नाही झाली तरी सवयीप्रमाणे त्यांना पहाटे जाग आली. आणि त्यांना समोर काय दिसले....
|
Prajaktad
| |
| Saturday, September 08, 2007 - 7:27 pm: |
| 
|
माणसा! झक्कास लिहतो आहेस..
|
Maanus
| |
| Saturday, September 08, 2007 - 9:27 pm: |
| 
|
छ्ताकडे बघत सुर्यदेवाला नमस्कार करत सोनाबाई उठल्या. त्यांची नजर जमीनीकडे गेली. त्यांना पावलांच्या आकाराच्या काही राखेच्या खुना चुलीच्या खोलीकडे जाताना दिसली. पावल करंज्यांच्या डब्यापर्यंत गेली होती. त्यांनी डबा उघडुन पाहीला, काही करंज्या पन कमी झालेल्या. कालच्या गोंढळात करंज्यांच्या डब्यात बिबवा ठेवायला विसरल्याने हे माळ्यावरच भुत खाली येवुन करंज्या खावुन गेले असे त्यांना वाटले. त्यांनी लगेच सुनांना पोरांना उठवले, काय म्हातारीची कटकट म्हणत लोक उठले. आज मिस्त्री न लावतात सोनाबाई कामाला लागल्या. भुताचे पाय घरात पडलेले, ते जावे म्हणुन, सगळ्या खोल्या शेनाने सारवुन टाकल्या. खंडोबाला कोणता कोंबडा कापायचा निवडुन ठेवला, त्याला खायला तांदुळ दिले. दुपारी कपडे धुवायला नदीवर गेल्या तेव्हा. मोठ्या जावु बाई. "काय माझ मेलीच नशिब, कुठ कुठ जावुन बसतात ह्ये काय माहीत. सगळ्या धोतराला राख लावुन आनलीया. दिवाळीत जुगार योक दिस खेळायचा आस्तो पर हे तिन्ही भाव महीनाभर जुगार खेळत बसत्यात आन मग आम्हाला हे निस्तराव लागत" "ओ जावुबाई माझ्या नवर्याला बोलायच काम नाय" जावा जावांची मग पुढे थोडा वेळ चांगलीच भांडण जुंपली. पण शेवटी सगळे कपडे धुवुन झाल्यावर, धुतलेल्या कपड्यांच्या पाट्या एकमेकिंच्या डोक्यावर ठेवायला मदत केली आणि घरी आल्या. घरी आल्यावर सोनाबाई गेल्या २०-२५ वर्षाचा काळ आठवु लागल्या. आत्याबाई पैशाबद्दल बोलल्यावर का हसल्या, नारयणरावानी भगताला का नाही बोलावुन दिले, झाड का तोडुन देत नव्हते. पहील्यांदा आवज कसा अस्पष्ठ असायचा, आता का स्पष्ठ झालाय. आपन पाहीलेले तेव्हा २ पैसे ५ पैसे होते काल साहीलला २५ पैसे सापडले. नविन घरात जुळवुन घेता घेता, आणि कामाच्या गडबडीत सोनाबाई हे कधीच विसरुन गेल्या होत्या की दिवाळीत एक दिवस थोडा का होईना पन पैसे लावुन जुगार खेळतात. स्वतः च्या वेडेपनाबद्दल त्या हसल्या. लगेच झाडु घेवुन माळ्यावर गेल्या. माळ्यावरी सगळी जळमट काढली, प्रकाशासाठी थोडीफार जागा केली. कालचा टाकलेला अंगारा झाडुन काढला. आणि आज रात्री न चुकता पाणी चकल्या करंज्या माळ्यावर भुतांसाठी नेवुन ठेवल्या. आता पैशाचा आवाज ऐकुन त्यांना भीती वाटत नव्हती. हे वर्ष असेच गेले. हार्डवेअरच्या दुकानाने घरात टी.व्ही आला. काशीने देखील किराणा मालाचे दुकाण सुरु केलेय. घरात बर्याच नविन गोष्टी येवु लागल्यात. आर्थिक सुबत्ता आलीय. घरातली मंडळी शेतावर गेलेली आहेत हे बघुन, साहील ची आई म्हणाली. "अहो मी काय म्हणते, ते माळ्याचे छप्पर आपन अजुन थोडे उंच करुन घ्यायचे का" सोमाने प्रश्नार्थक चेहर्याने तिच्याकडे पाहीले. "तुमचे आता कितीतरी गवंडी ओळखीचे झालेत, देईल की कोणीतरी स्वस्तात बांधुन" "बघु" पुढे काही महीने तिने सोमाकडे तिघांसाठी स्वतंत्र खोलीचा तगादा लावला, तो ऐकत नाही हे बघुन ती माहेरी गेली. आठवडा झाला तरी बायको आली नाही म्हणुन सोमा सासरी गेला. स्टेशन वर साहील चा मामा तंबाकु मळत बसलेला, आपल्या ताईला हा माणूस निट वागवत नाही म्हणुन तो तसाच बसुन राहीला. सोमा एकटाच सासरी गेला. अर्धा पाऊन तासाने चहा झाला. आल्यासारखा दोन दिवस राहुन सोमा घरी आला. अजुन एक आठवड्याने साहील ची आई घरी आली. सोमाने नारयणरावांना वर खोली बांधणार आहे असे सांगीतले. लागलीच काशी म्हणाला एक कशाला दोन खोल्या बांधु. ह्या वेळेस फोटो भिंतीला लागण्या पुर्वीच दोन वेगळ्या खोल्या बांधल्या गेल्या. कृपया स्त्री वाईट असते असे वाटुन घेवु नका. तो उद्देश नाहीय.
|
Maanus
| |
| Saturday, September 08, 2007 - 9:51 pm: |
| 
|
कॅमेरा आजच्या दिवसावर येतो. बराच काळ लोटलाय. ताजमहाल मधे काढलेला नारायणरावांचा फोटो kodak paper वर मोठा बनवुन आनलाय. गोबरगॅस प्रकल्प कधीच बंद पडलाय. सध्या प्रत्येकाकडे लाल टाकीत बंद असलेला गॅस येतोय. ह्या वर्षी प्रणयला दोन्ही काकांककडुन फराळाचे आमंत्रण आलेय. सध्या सोनाबाईना कमी एकु येतेय. तसे त्यांचे कान अजुनही ठणठणीत आहेत. कलप न लावाता केस पन काळेभोर आहेत. परंतु जुगार बंद असला तरी माळ्यावरुन अजुनही त्यांना पैशाचा आवाज येतो आणि म्हणुन त्या ऐकु येत नाही असे दाखवतात. आणि त्यामुळे त्या अजुनही माळ्यावर जायला घाबरतात.
|
Maanus
| |
| Saturday, September 08, 2007 - 9:59 pm: |
| 
|
"पैशाच भुत" पुस्तकाच्या कव्हरचे मागचे पान. कथा सुरु केली तेव्हा मला फक्त दिवाळीत कधी कधी पैसे लावुन जुगार खेळला जातो हे सांगायचे होते. दिवाळी भारतीय गणने नुसार कधी असते (अश्विन महीन्याच्या शेवटी) , दिवाळीत काय काय करतात (फराळ, रंगकाम) हे सांगायचे होते. for a change एक रहस्यमय कथा लिहायची होती. नंतर हळू हळू कथा वाढत गेली, मग म्हटल गावातल्या काही आठवणी पन द्याव्या टाकुन. कथेत कोंटुंबीक कलह तर आजीबात नव्हता टाकायचा, पण शेवटच्या भागात थोडासा आलाच. सोमाची सासरची भेट तर totally unexpected . माझा आणि लेखनाचा coding च्या पलीकडे काही एक संबध नाहीय. त्यामुळे काही चुका झाल्या असतील तर सांभाळुन घ्या. आणि कुणाचे ' प्रणय ' नाव असेल तर तुझे नाव चांगले आहे रे, मी आपले ते असेच टाकलेय. बाकी नावाचे कोणी इथे असेल असे वाटत नाही. - सागर
|
Tiu
| |
| Sunday, September 09, 2007 - 1:21 am: |
| 
|
very good ...झकास लिहिलंय माणसा... keep writing now! coding च्या पलिकडे पण लिहीत रहा आता. मला तर तुमच्या code मधे... I mean कथेमधे शुद्धलेखनातल्या चुका सोडल्या तर एक पण defect मिळाला नाही! syntax error आहेत. logical error एकही नाही
|
Chetnaa
| |
| Sunday, September 09, 2007 - 1:50 pm: |
| 
|
मानसा... जबरी रे... रहस्य आणि विनोद... असं कॉंबिनेशन बहुधा हे पहिलंच... लगे रहो..
|
Aashu29
| |
| Sunday, September 09, 2007 - 8:47 pm: |
| 
|
सागरबुवा, आपण लिहिता हे एव्हानाच कळलं, पण मस्त मनोरंजक आहे ह गोष्ट!!
|
Psg
| |
| Monday, September 10, 2007 - 8:02 am: |
| 
|
मानसा, एकदम फ़क्कड लिवलस बग! लईच आवडलं.. ड्वायलॉक तर जबरदस्त आहेत.. पण रहस्यभेद अजून जोशात व्हायला हवा होता! पैश्याचा खणखणाट हा इतक्या छोट्या कारणानी आहे हे समजल्यावर तिचे वैतागल्याचे, आपण उगाच इतके वर्ष घाबरलो वगैरे टाईपचे संवाद तुझ्या टीपीकल स्टाईलमधे वाचायला जास्त मजा आली असती
|
Maanus
| |
| Monday, September 10, 2007 - 2:12 pm: |
| 
|
thank you! thank you!! thank you!!! सागरबुवा! लिहीत वैगेरे नाही ग, शाळेत कधी मनसोक्त निबंध लिहीता आला नाही, मग म्हटल ईतल्या मुक्त व्यासपिठावर लिहुन बघावा. psg धन्यवाद, परत कधी काही छापायची इच्छा झाली तर ते नक्की लक्षात ठेवेल. syntax errors सुधारतोय, compiler नसल्यामुळे थोडे कठीण जात आहे अरे वा कुणाला तरी रहस्य वाटले, गुड आता कळाल, बंधन कसले म्हणत आहेस, काय आजकाल मुली अमेरीकेत यायला नाही म्हणतात, त्यामुळे त्या बंधनात कधी गुंतणार काय माहीत केम मिराबेन! मजामा छो ना. it, runi, amruta, savya, disha, princess, manjud, peacelily, smita आणि ROM सगळयांचे आवर्जुन येऊन गोष्ट वाचल्याबद्दल आभार मग ह्या वर्षी कोण किती पैसे लावणार आहे. गावात पन सध्या पैसे लावणे प्रकार बंद झालाय, फक्त उत्तर भारतातच कुठे कुठे दिवाळीत जुगार खेळला जातो आजकाल.
|
Divya
| |
| Monday, September 10, 2007 - 3:49 pm: |
| 
|
छान लिहीलीये गोष्ट. वाचताना खुप हसले. 
|
Princess
| |
| Tuesday, September 11, 2007 - 3:58 am: |
| 
|
माणसा, मस्त लिहिलस. पहिला प्रयत्न न वाटावा एवढे छान झालय. पण शुद्ध लेखनावर लक्ष देणे आवश्यक आहे. ते तुम्ही पुढच्या गोष्टीच्या वेळी लक्षात ठेवा. आणि हो अजुन एक म्हणजे रहस्यभेदाबद्दल पी एसजीला अनुमोदन.
|
Chetnaa
| |
| Tuesday, September 11, 2007 - 4:20 am: |
| 
|
it, runi, amruta, savya, disha, princess, manjud, peacelily, smita आणि ROM सगळयांचे आवर्जुन येऊन गोष्ट वाचल्याबद्दल आभार >>>>> aaNi mee?
|
Good one maansa! .. .. ..
|
|
|