Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 10, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » श्रावण » काव्यधारा » कविता » Archive through September 10, 2007 « Previous Next »

Vaibhav_joshi
Friday, September 07, 2007 - 8:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डोह

प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही .
एखादा डोह असू द्यावा अथांग ..
कुठल्याही क्षणी हक्काने जावं
आपलं प्रतिबिंबही पडणार नाही
अशा अंतरावर बसून बघत रहावं ....
आपण डोहाकडे .. डोहाने आपल्याकडे .
ना आपल्या चेहर्‍यावर तृष्णा
ना त्याच्या पाण्यावर तरंग
मुळात अपेक्षाच नसतील
तर कसला अपेक्षाभंग ?
डोळ्यांनीच विचारावं त्याला
हा स्थायी स्वभाव कुठून मिळाला ?
अन हलकेच एखादं पान सरकवत
त्याने दाखवून द्यावं
बरीच आंतरिक उर्मी आहे .. पण तळाला
अश्यावेळी
ते पान परत पाण्यात सोडून द्यावं .
हाती आलेला प्रत्येक पुरावा
वापरायलाच हवा असं नाही
प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही .


Zaad
Friday, September 07, 2007 - 9:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती, अवतरणाने वाचकाला एका विशिष्ट दिशेने विचार करायला प्रवृत्त केले जाईल, पण त्याने व्याप्ती मर्यादित कशी होईल? अधोरेखित केलेल्या अर्थाव्यतिरिक्त इतर अर्थ त्याने शोधूच नये असं कुठंय? हा, हे अर्थ शोधणं अवघड होऊ शकतं अशाने हे मान्य. निर्मिक ही काच आहे असं नक्कीच म्हणायचं नव्हतं मला, पण त्या अवतरणाने तसा अर्थ प्रतीत होत असेल तर ते अवतरण काढून टाकायला हवं. 'निर्मिकाचे' या शब्दात आलेला 'काच' हा शब्द मला महत्त्वाचा वाटला. निर्मिक काच नाही, पण जसे सूर्याचे किरण काचेवर पडून मग ते परिवर्तित होतात, तसे या निर्मिकाच्या आणि माझ्या मधे असलेल्या गोष्टींमुळे हे कवडसे पडत आहेत. हा अर्थ मला आत्ता लागला. लिहीताना असं काही वाटलं नव्हतं, पण फक्त 'निर्मिकाचे' मधला काच हा शब्द खुणावत राहिला म्हणून तिथे अवतरण दिले गेले. पण हा सगळा अर्थ जर त्यातून प्रतीत होत नसेल तर ते अवतरण काढलेलेच बरे! :-)
हे सोडून कवितेवर तू जे लिहिलं आहेस ते खरंच, अगदी मला जसं सांगायचं होतें तस्सच आहे, म्हणून तुझे खूप खूप आभार. आणि हो, लय नाहीये या कवितेला हे कबूल, त्यामुळे तो प्रश्न अर्थाच्याच दृष्टीने हे नक्की.

वैभव, काजळ वर अजून विचार करतो!

बैरागी, श्लेष कळावा म्हणून अवतरण दिलेले नाहीये, तर त्यातील एक विशिष्ट अर्थ अधोरेखित करावा म्हणून दिलंय.
मर्ढेकर तर कवितेला शीर्षक देण्याच्याही विरोधात होते. विरामचिन्हे, शीर्षक यांनी कवितेची व्याप्ती कमी होते असं म्हणण्यापेक्षा वाचकाला एक दिशा ठरवून दिली जाते, पण म्हणून दुसर्‍या दिशा सापडतच नाहीत असे तर नाही ना?

सत्यजित, कवितेतून सगळं नाही व्यक्त होत हे मान्य आणि मला छळतंय खूप.
माणिक, खरंय, स्वाती आणि वैभवकडून नेहमीच खूप छान मार्गदर्शन मिळतं. त्यामुळे याला चिरफाड असं म्हणून मी त्याचा अपमान करणार नाही. :-) हे तर रत्नं देणारं मंथन आहे, हलाहल पचवल्याबद्दल कवितांचे चंद्रही मिळतात


Zaad
Friday, September 07, 2007 - 9:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डोह निव्वळ अप्रतिम, खूप विचार करायला लावणारी आहे. खास वैभवी टच!!!!

Mankya
Friday, September 07, 2007 - 9:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डोह .. खास म्हणजे खास ! खूपच चिंतनशील कविता वैभवा !
ना आपल्या चेहर्‍यावर तृष्णा
ना त्याच्या पाण्यावर तरंग .. Fultoo वैभव स्टाईल म्हणजेच अगदी भिडणार्‍या अन दिर्घकाळ मनात रेंगाळणार्‍या ओळी !
डोळ्यांनीच विचारावं .. खरंय, अश्या वेळेस एका शब्दामुळेसुद्धा गलका होतो मनात, अगदी समर्पक !
आपलं प्रतिबिंबही पडणार नाही
अशा अंतरावर बसून बघत रहावं .... व्वाह !
प्रत्येक ओळीसह उलगडत जाणारी तरीही नावासारखीच गहन अर्थ असलेली पण प्रत्येक नवीन वाचनात वाचकाच्या मनस्थितीप्रमाणे निरनिराळा अर्थ प्रसवणारी रचना !

माणिक !


Bairagee
Friday, September 07, 2007 - 10:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



बैरागी, श्लेष कळावा म्हणून अवतरण दिलेले नाहीये, तर त्यातील एक विशिष्ट अर्थ अधोरेखित करावा म्हणून दिलंय.
एकूण एकच की हो! विरामचिन्हांच्या वापराबाबत म्हणाल तर हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्ही केवळ आमचे मत मांडले. बाय द वे झाड, तुम्ही छान "टची" गद्य लिहिता.

वा वैभव! कविता मस्त आहे!
"मुळात अपेक्षाच नसतील तर कसला अपेक्षाभंग ?" नसत्या तरी चालल्या असत्या कारण तो भाव आधीच आला आहे असे वाटले.


Shyamli
Friday, September 07, 2007 - 12:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही . >>>वाह....

Swaatee_ambole
Friday, September 07, 2007 - 1:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, ' डोह' सुंदर आहे.
प्रत्येक वाचनात नवीन अर्थ आणि संदर्भ समजतायत मला. :-)


Chinnu
Friday, September 07, 2007 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वातीला मोदक. खुप खोल खोल आहे डोह!

Lalu
Friday, September 07, 2007 - 4:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डोह... सुंदर!!!
तरी मी एकदाच वाचली आहे.. :-) 'अपेक्षाभंग' बद्दल बैरागींचे पटले.


Asami
Friday, September 07, 2007 - 7:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डोह एकदम विचारविन्मुख व्हायला लावणारी आहे. (का कोण जाणे विड़मुख असावे असे वाटतेय) बैरागींना अनुमोदन

Sashal
Friday, September 07, 2007 - 7:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'डोह' छान आहे ..

'विन्मुख' हे असं लिहायचं आहे का?


Slarti
Friday, September 07, 2007 - 7:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'डोह' आवडली, वैभव. ...

Paragkan
Saturday, September 08, 2007 - 2:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kya baat hai !!

Vaibhav_joshi
Monday, September 10, 2007 - 5:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद .

बैरागी ..

खरं सांगायचं तर अपेक्षाभंग असायला हवं की नको , यावर judicious conclusion ला येता येत नाहीये . . मी आत्ताही बराच वेळ विचार केला . माझ्यामते आधीच्या दोन वाक्यात individuality आहे . आणि हे वाक्य दोन्ही बाजूची एकत्र निरपेक्षता अधोरेखित करतं . सध्या तरी असं वाटतंय की it takes the poem ahead

thanks again


Zaad
Monday, September 10, 2007 - 5:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काच

काल काचेच्या पलिकडून पहावी लागणारी सुखं
आज चष्म्यातून घरभर चकाकताना पाहतो आहे
पाहतो आहे या चिमुरड्या पोरी
काचेइतकंच पारदर्शी हासणार्‍या
हातांवरती मेंदी काढून घेणार्‍या
आणि मग चष्म्याआडच आठवतो
पंचमीच्या दिवशी कंदिल फुटून
लाल रंगलेला आईचा तळहात
तसाच सुकल्याने काळाठिक्कर पडलेला.....

एक चिमुरडी आईला विचारत असते,
'आई आई, मेंदी खूप रंगली की काळी का गं पडते?'


Milya
Monday, September 10, 2007 - 6:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पीके : नसेलच मिळणार तर ना सही
मधाचा अंश,
पण एखादा प्राणांतिक दंश तरी >>> वा मस्तच. खूप दिवसांनी रे!!!

आणि वैभवा तुझे नि माझे विचार परत जुळले रे.. मी पहिल्यांदा वाचताना ते प्रामाणिक असेच वाचले होते ...

झाड : 'बळ' तुझ्या स्पष्टीकरणाच्या आधी समजली नव्हती.. (माझा अद्न्यपणा) पण स्पष्टीकरण छान दिलेस...

वैभव : डोह खूप अप्रतिम... दिवस सार्थकी लागला.. पण आज काही काम करावेसे वाटत नाहीये.. नुसते शांतपणे खिडकीबाहेर पहात बसून रहावे असे वाटतेय.. मी चित्रकार असतो तर एक छानसे चित्र काढले असते कवितेवर...



Jo_s
Monday, September 10, 2007 - 6:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, डोह,
कविता...........
......वाचत रहावं
प्रत्येक अप्रतीम ....
आणि........बद्दल
सांगायलाच हव असं नाही.


झाड,
छान वाटली वाचायला


सुधीर


Jagu
Monday, September 10, 2007 - 7:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक दिवस किरण व्हावे
धरती आकाशावर पसरावे

एक दिवस थेंब व्हावे
शिंपल्यात बसुन मोती व्हावे

एक दिवस पवन व्हावे
अदृष्य रुपे मुक्त हिंडावे

एक दिवस परागकण व्हावे
फुलाच्या सहवासात सुगंधी व्हावे

एक दिवस फुल व्हावे
इश्वर मुर्तिची पूजा व्हावे





Ashwini
Monday, September 10, 2007 - 3:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूप दिवसांनी इकडे येणं झालं. बर्‍याच छान छान कविता मिस केल्यात.


भास

असेनास का तू, केवळ एक भास
उमटले नसोत कधीच
जगात तुझे श्वास
ते मला जाणवतात
अवघ्या रोमरोमात
इतके खरे, इतके जिवंत
कधी देहात, कधी प्राणांत
तसही,
प्रेम दुसर्‍यावर कुठे अवलंबून असतं?
तेच खरं, जे आपल्याला वाटतं.
आणि खरं तर,
देखणे भौतिक देह धारण केलेले
अन् सुगंधी श्वास लाभलेले
प्रियतम तरी कुठे खरे असतात?
तेही सारे भासच नव्हेत का...?




Shyamli
Monday, September 10, 2007 - 3:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आहा...
खासच ग अश्विनी, जबरी आवडल




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators