|
Meenu
| |
| Monday, September 10, 2007 - 4:50 pm: |
|
|
वैभव, झाड मस्तच चाल्लय .. अजुन पुरता विचार झाला नाहीये कवितांवर पण सुंदरच.
|
Meenu
| |
| Monday, September 10, 2007 - 4:57 pm: |
|
|
आत्ता होतं इथं कुणी आता कोणी नाही भास होता ..? छे ! आत्ता होतं इथं कुणी आता कोणी नाही आठवली क्षणभर हसरी आनंदाची सारी गाणी आठवणींच्या माळेमध्ये सुंदर सुंदर मणी मणी आत्ता होतं .. हरवणे सापडणे चाललेले क्षणोक्षणी दुःखानंतर आनंदाचे डोळ्यामध्ये दाटे पाणी आत्ता होतं ..
|
Zaad
| |
| Tuesday, September 11, 2007 - 6:22 am: |
|
|
दुःखानंतर आनंदाचे डोळ्यामध्ये दाटे पाणी व्वा! अजून एक्-दोन कडवी असती तर... असं वाटलं वाचताना.
|
Psg
| |
| Tuesday, September 11, 2007 - 7:00 am: |
|
|
मीनु, किती दिवसांनी! मलाही झाडसारखच वाटलं- अजून हवी होती.. अश्विनी, खूपच सुरेख.. झाड- ’काच’ फ़ारच मस्त आहे.. वैभव- "डोह"बद्दल काय बोलायचं? अंतर्मुख करणारी अप्रतिम कविता.. लिहित रहा..
|
Shyamli
| |
| Tuesday, September 11, 2007 - 11:57 am: |
|
|
मीनु, मस्तच बाकी पूनमला मोदक (किती दिवसानी?????????????????????) मलाही झाडसारखच वाटलं- अजून हवी होती.. >>>> अंह, मला मात्र ही अपूर्णताच आवडली कवितेची
|
|
|