Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 07, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » श्रावण » इतर कला » माझी चित्रकला » Archive through September 07, 2007 « Previous Next »

Ajai
Sunday, August 26, 2007 - 3:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

shravaNaat haa BB agadich koradaa vaatatoy mhaNun ...
my first attempt with dry pastels


Jo_s
Sunday, August 26, 2007 - 3:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त, अजय खासच आलय चित्र, वरचा ओठ उजवीकडे जरासा ऑड वाटतोय, डोळेतर खासच आलेत, एकूण मस्तच....

सुधीर


Ajai
Sunday, August 26, 2007 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks सुधिर.
इथे थोडि computer चि हेल्प घेतलिय refernce सठि.
photo editor मधे posterize kele @3 bits that gave me 3 tones for reference , light middle and dark त्याप्रमाणे ३ शेड्स वापरुन मग कागदावर screen वर पाहुन शेडींग केले. नंतर blending करुन uniform skin tone आणला.
दाढि मधे थोडा प्रोब्लेम आला. आधि शेडिंग केल्यामुळे स्टिपलिन्ग निट जमले नाहि
मी regular white पेपर वापरला
जर light brown कलरचा TK पेपर वापरला असता तर mid tone रेडी मिळाले असते. ही सर्व techniques
www.wetcanvas.com वरुन वाचुन try केलित

Mmr
Wednesday, August 29, 2007 - 6:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

dadhi kali jast zali ahe tyat white colour asta ter chan watla asta. pun aso ha pun chanuch ahe.

Pha
Wednesday, September 05, 2007 - 7:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय, प्रतिसाद खूप उशिरा लिहितोय त्याबद्दल क्षमस्व. अपूर्वने म्हटल्याप्रमाणे खाद्यांचे / हातांचे प्रमाण थोडे सुधारायला हवे होते; ते तू नंतर केलेस हे उत्तम!
ग्लेझिंगबद्दल विचारशील तर मला स्पेसिफिक ऑइल पेंट ग्लेझिंगबद्दल सांगता येणार नाही. रंगाचे 'माध्यमा'बरोबर मिसळून पारदर्शक पद्धतीने थर देणे ही संकल्पना तेवढी माहिती आहे. थर देताना खालच्या थरातला रंग वरच्या थरातल्या पारदर्शकतेने थोडासा दिसतो.. वरच्या रंगात मिसळतो. बाकी, मी तैलरंगांच्या मिडटोन - डार्क टोन - हायलाइट्स क्रमाने रंगवल्या जाणार्‍या अभिजात पद्धतीप्रमाणे रंगवायचा प्रयत्न करतो. ग्लेझिंगबद्दल अधिक माहिती हवी असेल तर हा दुवा बघ :
१.
ग्लेझिंग १-२-३

'वैशाली'बद्दल : तू म्हणतोअस तसं वेगळ्या कोनातून त्रिमितीय प्रक्षेप दाखवता आला असता.. पण स्वस्थ चित्ताने रेखाटायला जिथे जागा मिळाली तिथे बसलो अन् तिथून दिसणारे दृश रेखाटले. :-O

बाकी आषाढातले लिंबूटिंबूचे खडूवरील कोरीवकामदेखील छान वाटले.

Pha
Wednesday, September 05, 2007 - 11:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'पूर्वीचं पुणं राहिलं नाही!' .. खर्‍या पुणेकरानं(वयाची अट नाही) दिवसातून एकदातरी म्हटलंच पाहिजे असं हे वाक्य! (संदर्भ: 'मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर': 'पुल') विनोदाचा भाग सोडला तर हे वाक्य कुठल्याही पिढीतल्या माणसानं बोलावं इतकं पुणं कालौघात बदलत गेलंय, माणसांच्या मनात नॉस्टॅल्जिक खुणा ठेवत बदलत गेलंय. गेल्या दहा वर्षांत पुणं जितक्या वेगानं बदलत गेलंय तितकं आधी कधीच नसावं. माझ्या शाळकरी वयातला पुण्याचा भूगोल बराच बदलत गेलाय, विस्तारत गेलाय. नवनवीन उपनगरं, तिथली नवीन निवासी - व्यावसायिक बांधकामं यांमुळे हे रूप पालटतंय. आजवर जिथे राहिलोय त्या गावातल्या पेठांच्या भागातही जुने वाडे / चाळी / बंगले पाडले जाऊन रुंद रस्ते, नवीन इमारती, शॉपिंग कॉम्प्लेक्स उठताहेत. बदल बरा की वाईट हा मुद्दा टाळला तरी कुठेतरी त्या जुन्या वास्तूंबद्दल रूखरूख लागून राहतेच. आमच्या / शेजारच्या किंवा शाळेतल्या मित्रांच्या वाड्यांमधून, घरांमधून लपंडाव खेळताना धुंडाळलेले त्या वास्तूंचे कानेकोपरे सांद्र्यासापट्यांत लपताना झालेल्या ओरखड्यांखेरीज काही उबदार स्पर्शही ठेवून गेलेत.

सदाशिव पेठेतील नागनाथपाराकडून उंबर्‍या गणपती चौकात जाणार्‍या रस्त्यावरचे तीन - चार वाडे रस्तारुंदीकरणासाठी नुकतेच पाडले. त्या वाड्यांमध्ये कोणी ओळखीचे राहत नसल्यामुळे तश्या आठवणी नव्हत्या; मात्र त्या रस्त्यावरून सवाई गंधर्वच्या मैफिलींनंतर, सीओईपीतल्या ऍक्टिव्हिटिंनंतर, बालगंधर्व मधल्या प्रयोगांनंतर रात्री परतताना या वाड्यांचे रस्त्यावरच्या दिव्यांच्या मंद पिवळ्या प्रकाशातले चेहरे चितारण्याजोगे बोलके वाटायचे.

तो योग तेव्हा काही आला नाही. रस्तारुंदीकरणासाठी पाडापाडी झाल्यानंतर काही वाड्यांचे थोडेफार अवशेष शिल्लक राहिले होते. नागनाथ पारावरून उंबर्‍या गणपती चौकाकडे एकदा जात असताना सदाशिव पेठ हौदासमोरच्या अर्धपडक्या वाड्याकडे पाहून थबकलो. वाड्याचा निम्मा भाग पडला होता.. शिल्लक भागामध्ये काही खोल्यांच्या खिडक्या, स्वयंपाकघरातले आडवे झरोके, चंद्रमौळी कौलं आणि कुठेसे बाक आलेले म्हातारे वासे दिसत होते. राहवलं नाही..

तेच हे रेखाचित्र :

' सदाशिव पेठ घर क्रमांक ६५८ ते ६३१ '



Prashantkhapane
Wednesday, September 05, 2007 - 7:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Pha,
As usual fantastic!! Keep posting those masterpieces.
Prashant + Teju

Maanus
Wednesday, September 05, 2007 - 8:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ, i envy your hands.

Ksha
Thursday, September 06, 2007 - 1:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ, सुरेख आलय रे!
मला आमचा जुना वाडा आठवला एकदम. फोटो आहेत त्याचे पण या चित्रात जे एक कारुण्य आहे ना. छानच!


Bee
Thursday, September 06, 2007 - 3:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ, चित्र तर आहेच सुरेख पण त्या संदर्भात तू वर जे ओघवत ललित त्यावर लिहिलं आहेस ते केवळ आहे. त्याबद्दल मी तुझी पाठ थोपटतो आणि नेमस्तकांना विनंती करतो की तुझं हे पोष्ट मायबोलिच्या १ल्या पानावर लिंक रुपात द्या. हा एक नविन उपक्रम तू सुरू केला आहेस तेही कौतूकास्पद आहे.

Badbadi
Thursday, September 06, 2007 - 7:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ, अप्रतिम चित्र!!! आणि तुझ्या लिखाणाशी पूर्ण सहमत. बदलत्या पुण्याचे तुझ्यामाझ्यासरखे अनेक साक्षीदार असतील इथे. आता अशा वाड्यांची चित्रच बघायला मिळतील फक्त!!!

Lopamudraa
Thursday, September 06, 2007 - 7:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ सुंदर चित्र..
जुने वाडे खुप छान वाटतात खर तर ते सांभाळले जायला हवे अस ते वैभव..
बदल बरा की वाईट हे जे तु म्हणतोस त्याबद्दल जरा England , france या ठिकाणी मी बघितले हे लोक जुन्या वास्तु बाहेरुन सांभाळुन आहेत इथल्या कुठल्याही खेड्यात फ़िरा even Paris London सारख्या मोटया शहरात सगळ्या जुन्या वास्तु बाहेरुन शाबुत आहेत आतुन अगदी modern आपल्या कडे जुन्या वास्तु पाडणे यात लोकांजवळ त्याअशा पध्धतीने सांभाळायला पैसा नाही.
तुझे स्केच बघुन मलाही काढायचा हुरुप आला..


Psg
Thursday, September 06, 2007 - 7:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ, मस्तच! अगदी डोळ्यासमोर उभा राहिला तो वाडा.. म्हणजे त्याचे अवशेष..

Limbutimbu
Thursday, September 06, 2007 - 10:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान हे चित्र!
माझ्या मते या चित्रात सर्वात कठीण भाग म्हणजे आपल्याकडे उतरते असलेल्या छपराचे रेखाटन ज्यात जागेअभावी व माध्यमा कारणे शेडिन्गला फारसा वाव नव्हता, तरीही वरील टोकाकडुन आपल्या दिशेने उतरत जाणार्‍या छपरातील उतार अचूक टिपला गेलाय, जो माझ्यामते सर्वात कठीण भाग होता
वाड्याच्या खालील बाजुस अन्धाराची गडद रन्गसन्गती घेवुन वरील बाजुस उजेडाचा चढत्या क्रमाने दाखविलेला परिणाम व बाजुच्या इमारतीन्च्या भिन्तिन्ना कमित कमी दिलेले महत्व या मुळे बघणार्‍याची नजर मधिल मुख्य ऑब्जेक्ट वरच फिरत रहाते हे वैशिष्ठ्य नीट जोपासल गेल हे!
घराच्या छपरावर चित्राच्या एकुणातलि अन्दाजे एक तृतियान्श जागा अवकाशा करिता सोडल्यामुळे घराच्या जुनाटपणाबरोबरच एक प्रकारची खुजेपणाची खिन्न करणारी अवस्था चित्र बघताना जाणवत रहाते! (अवकाश हा शब्द मी आकाशा करीता वापरला नाही हे, ते मागिल बिल्डिन्गची भिन्त हे हे माहिते)

मला चित्रकलेतील फारस समजत नाही, पण जेवढ सुचल तेवढ लिहिल
:-)

Seema_
Thursday, September 06, 2007 - 6:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़,अतिशय सुरेख चित्र . आणि बी म्हणतो तस ते ललित ही सुंदर लिहिलय .

Maitreyee
Thursday, September 06, 2007 - 8:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़, उच्च आलय चित्र! आजूबाजूच्या उंच बिल्डिन्ग्स आणि मधे तो अर्ध मोडका वाडा...जबरा इफ़ेक्टिव्ह झालय!!

Swaatee_ambole
Thursday, September 06, 2007 - 8:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त चित्र आहे फ.

Shyamli
Thursday, September 06, 2007 - 9:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ, छानच आलय चित्र,
याबाबतीत गोव्याच्या लोकांच कौतुक वाटत मला,
आतून अगदि चकाचक नविन असते वास्तू पण बाहेरची बाजु लोपानी म्हटल्याप्रमाणे जुनं सांभाळणारी असते,खरच जपायला हव्या जुन्या वास्तु. औरंगाबादला दरवाज्यांच शहर म्हंटल जातं किती तरी भव्य दरवाजे आहेत औरंगाबादमधे पण ब-याच दरवाज्यांची अवस्था अशीच झालीये अताशा :-(
(पुरातत्व खातं झोपा काढतय) :-(



Zakasrao
Friday, September 07, 2007 - 3:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ खुप छान आहे हे रेखाटन. वैशालीचे चित्रदेखिल खुप छान होते रे. :-)
माणुस म्हणतो त्याप्रमाणेच I envy your hands :-)
वाइट वाटत की तुला फ़ार वेळ मिळत नाही तुझी कलाकारी पार पाडायला याच.


Dineshvs
Friday, September 07, 2007 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ, जर माझी आठवण दगा देत नसेल तर या वाड्यात माझी मावस आजी, लक्ष्मीबाई आचरेकर रहात असे.
चित्रं खुपच सुंदर आहे.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators