|
Jo_s
| |
| Friday, September 07, 2007 - 7:03 am: |
| 
|
अजय, कॉम्प्युटरची मदत घ्यायची आयडीया छान आहे, फ, सुरेखच चित्र एकदम आवडलं सुधीर
|
फ़,खूप सुरेख आहे रे चित्र... आणि वरच लिखाणही.. तो वाडा आहे अजुन डोळ्यांसमोर... अजुनही सदाशिव पेठेत काही वाडे आहेत. पण तेही कधी जमीनादोस्त होतील सांगता येणार नाही
|
फ , फ़ारच सुरेख आली आहेत दोन्ही चित्रं .
|
Yog
| |
| Sunday, September 09, 2007 - 9:51 pm: |
| 
|
Ajai,Pha, झकास जमलियेत चित्र...
|
Hems
| |
| Monday, September 10, 2007 - 12:31 am: |
| 
|
ग्रेट चित्र फ ! लिखाणही चित्राइतकच सुंदर. चित्रामधले भिंतींचे तडे, झरोके, कशीबशी मावलेली गाडी.. उत्तम !!
|
Nvgole
| |
| Monday, September 10, 2007 - 9:50 am: |
| 
|
फ, सुरेखच चित्र काढले आहेस! पुण्यातले दगडी वाडे, दगडी चौरंग, दगडी नांदी, दगडी दरवाजे अशा अनेक गोष्टींची तरल चित्रे माझ्या मनश्चक्षूपुढे कायमच तरळत असतात. मात्र रेखनाचा एवढा तंतोतंत (तसेच कशाला अगदी नामधारीही) नमुना काढण्याची प्रतिभा नाही. तुझ्या आठवणीत असतील तर इथे अवश्य चित्रांकित कर. अनेकांच्या स्मृतीस संजीवन मिळेल अशी साधार शक्यता आहे. अगदी सदाशिवपेठच्या हौदाचे किंवा नागनाथ पाराचेही चित्र संस्मरणीय ठरेल.
|
Ajai
| |
| Monday, September 10, 2007 - 11:17 am: |
| 
|
Pha दुव्याबद्दल आभार. सुंदर रेखाटन.. शाईने वेगगवेगळ्या छटा मिळवण्याचे कसब तर खासच. रेखाटनासाठि वापरलेल्या कागद tinted आहे कि नंतर काहि काम केलेय त्यावर. त्या विशिष्ट tint मुळे त्यावाड्याचे जुनेपण अधोरेखित होतेय
|
Mmr
| |
| Monday, September 10, 2007 - 11:43 am: |
| 
|
हा माझा पहिला प्रयत्न.. गोड मानुन घ्या.

|
Dineshvs
| |
| Monday, September 10, 2007 - 2:11 pm: |
| 
|
Mnr सुंदर चित्र. झाडाखाली घडा घेतलेली एखादी तरुणी हवी होती. ( खुप पुर्वी छायागीत च्या आधी असे चित्र दाखवत असत, त्याची आठवण झाली )
|
Itgirl
| |
| Monday, September 10, 2007 - 2:18 pm: |
| 
|
सहीच आले आहे Mmr हे चित्र!! याला पहिला प्रयत्न कोण म्हणेल? हे काय paint मधे केले का? फ़ारच सुंदर आहे फ़: तुम्ही रेखाटने scan करून इथे पोस्ट करता का? खूप छान केले आहे वाड्याचे रेखाटन
|
Upas
| |
| Monday, September 10, 2007 - 4:17 pm: |
| 
|
फ केवळ अप्रतिम चित्र.. उपक्रम खास आवडला.. पुढे मागे ह्या सगळ्या चित्रांचं प्रदर्शन भरवता आल तर अति-उत्तम! माझ्यासारख्या उपर्या सदाशिव पेठी माणसालाही हळ हळ वाटते जीर्ण वाडे ढासळताना पाहून.. हे वाडे सांभाळायची जबाबदारी पुढच्या पीढीची नव्हे का? आणि पुरातत्व विभागाने सुद्धा त्यांच्या क्षमतेप्रमाणे पुण्यात काही वास्तु जपल्या आहेत जुन्या.. म्हणजे रेणुका स्वरूप वरून पुढे उजव्या हाताला वळलं तर एक दोन वाडे आहेत तिथे लिहिलेय स्पष्ट ही वास्तू सरकारने जपलेय असं काहीसं.. आता अख्खं पुणं जपणं तर शक्य नाही ना.. कृष्णेकाठंचं कुंतल ते राहीलं नाही हे वाक्य आठवतं! 
|
Manuswini
| |
| Monday, September 10, 2007 - 9:53 pm: |
| 
|
फ, तुझे ते लिखण वाचुन मनाला एक चुटपुट लागुन गेली, खरेच, इतकी ताकद त्या चित्रात नी लिहिण्यात सुद्धा. खरे तर ते पहिल्या पानावर टाकल्याने मी उत्सुक्तेने गेले नी वाचले. खरे तर मी सुद्धा 'उपरीच' जसे वरती उपास म्हणतो तसे, पुण्याचा संबध असा नाहीच आला ज्यास्त पण हे असे वाचले की वाटते की काय दिसत असतील ते वाडे जेव्हा शाबूत असतील तेव्हा, का नाही सरकार सांभाळत जसे बाकी देशात करतात तसे, इतकी चुटपुट लागून गेली बघ...........
|
MMR, फारच सुंदर! चित्र पाहुन पहीला प्रयत्न असेल असे वाटत नाही. अजुन अशीच चित्रे तु रेखाटावी.....
|
Shraddhak
| |
| Tuesday, September 11, 2007 - 4:52 am: |
| 
|
कृष्णेकाठंचं कुंतल ते राहीलं नाही हे वाक्य आठवतं<<<< उपास, कुंतल नाही रे... कुंडल. लिहिताना कुणाच्याशा कुंतलाच्या आठवणीत हरवला होतास की काय? 
|
Mmr
| |
| Tuesday, September 11, 2007 - 6:55 am: |
| 
|
HO MI PRYTNA KARNAR ATA TUMCHYA SURVANCHYA SUBHECHAA ASTIL TER
|
Jo_s
| |
| Tuesday, September 11, 2007 - 7:18 am: |
| 
|
mmr छानच आहे हे चित्र
|
Upas
| |
| Tuesday, September 11, 2007 - 5:17 pm: |
| 
|
oops! श्र मला कुंडलच म्हणायचं होतं.. छे!
|
Farend
| |
| Tuesday, September 11, 2007 - 9:45 pm: |
| 
|
फ, एकदम मस्त चित्र आहे, लहानपणी अशा अनेक वाड्यांमधे गेलेलो आणि राहिलेलो आहे, त्याची आठवण आली. अजूनही त्या भागात काही वाडे आहेत, निदान आतून १५-२० वर्षांपूर्वी होते तसेच असतील. आणि या जुन्या वाड्यांचे आता फोटो तरी आहेत का नाही कोणास ठाऊक? कदाचित तेथील लोकांच्या वैयक्तिक फोटोंमधे मिळतील. या चित्रात ती मारुती व्हॅन सारखी गाडी त्या चित्रातून जे दाखवायची आहे ते बरोबर दाखवते असे वाटले. या वाड्यांना सायकली माहीत होत्या, अशा गाड्या आणि असे वाडे हे एकदम contrast आहे. हाच उद्देश होता का? हा वाडा सदाशिव पेठ हौदा समोर म्हणजे कुमठेकर रस्ता क्रॉस केल्यावर समोर का? मी बहुतेक त्या वाड्यात कधीतरी गेलेलो आहे कारण माझ्या मित्राचे नातेवाईक तेथे राहात होते. तेथे पुढे एक मारूतीचे छोटे देउळ आहे ना?
|
|
|