|
Princess
| |
| Thursday, September 06, 2007 - 7:42 am: |
| 
|
दर चार दिवसानी राहुल कुठल्यातरी नवीन माणसाशी तिची ओळख करुन द्यायचा. "हाच एक शेवटचा आणि मग तु हीरोईन" असे आश्वासन द्यायचा. स्वत:च्या मोहाच्या जाळ्यात चंदा अशी अडकली की बाहेर पडण्याचा मार्गच मिळत नव्हता. "नाही म्हणालीस तर मल्लीला सांगेन"अशी नवी धमकी सुद्धा आता राहुलच्या बोलण्यात यायला लागली होती. आजही चंदा "हॉटेल रत्ना"च्या दिशेने निघाली होती. लोकलमधली विंडोसीट पकडुन चंदा बाहेर पाहु लागली. तिच्या मनात विचारांचं वादळ दाटुन आलं " मुंबई... माणसच माणसे.... गर्दी... कितीतरी चेहरे ... कोण चांगले कोण वाईट... सगळे सारखेच दिसतात.... माझ्या चेहऱ्यावरुन तरी कोणाला कळणारेय की मी किती वाईट आहे. मी करतेय ते बरोबर की चुक... चुक चुक चुकच.... ये गलत है... ये गलत है." ट्रेन स्टेशनवर थांबली आणि चंदा दचकली. चर्चगेटला ट्रेन पोहचली होती आणि तिला ग्रॅंटरोडला उतरायचे होते. आता काय... परत जाणारी ट्रेन पकडुन पुन्हा मागे जा. ती मनाशीच चडफडली. आधीच तिला उशीर झाला होता त्यात या चुकीच्या प्रवासाने अजुन भर घातली. पलिकडच्या प्लॅटफॉर्मवर जाता जाता तिच्या मनात आले "काश जिंदगी की ट्रेन भी मुझे फिरसे मेरे पुराने स्टेशन पे छोड सके. और मै अपना सफर फिरसे शुरु करु... " "क्यों नहीं? जिंदगी के सफर मे पुराने मकाम पे जा के नया सफर शुरु करना मुमकीन नही. पर जहाँ हो वहाँ से रास्ता तो बदल सकते है ना..." मनाने उत्तर दिले. चंदा ग्रॅंटरोडला न जाता तडक घरी परतली. रात्र पहाटेकडे सरकु लागली तरी चंदाच्या डोळ्याला डोळा लागला नाही. "आता यातुन बाहेर पडायलाच हवे. मुझे नयी जिंदगी शुरु करनी होगी." हेच वारंवार तिच्या मनात येत होते. खिडकीतुन दिसणाऱ्या पाने गळलेल्या झाडाकडे बघुन तिला वाटले "पतझड आने से पेड तो निराश नहीं होते है." पहाट झाली तशी चंदा उठली. मल्ली आणि रामलाल गाढ झोपलेले पाहुन तिने पावलांचा आवाज न करता तांदुळाचा डब्बा उघडला. "एक, दो, तीन, ... दो हजार है, बस्स हो जायेगा" कुठे जायचय ते मनात नक्की करुन ती स्टेशन कडे निघाली. जाता जाता एक फोन करायला ती विसरली नाही. दादर स्टेशनवर उभ्या असलेल्या ट्रेनमध्ये चंदा जाउन बसली. झुक झुक करत गाडी धावु लागली तसा तिच्या डोळ्यासमोरुन भुतकाळ सरकु लागला. कधीतरी माझे आई वडिलही असेच नवे आयुष्य सुरु करायला त्यांचे गांव सोडुन आले असतील. आज मी ही जातेय नवे आयुष्य सुरु करायला - एका नव्या जागी... जिथली माती माझी आहे, जिथे मला माझी माणसे भेटतील. कधीकाळी तुटलेली नाळ मी पुन्हा जोडायला जातेय. "एक सफर गलत हुआ तो क्या अब तो सही रास्ते पर चल सकती हुँ ना. " चंदाच्या मनावरचा ताण आता हलका झाला होता. खिडकीतल्या गार वाऱ्याने तिला गाढ झोप लागली. छ्त्तीस तासानंतर ती स्टेशनवर उतरली तेव्हा बरखा मौसी तिच्या नवऱ्या सोबत चंदाची वाट पाहत तिथेच फलाटावर बसली होती आणि समोरच लिहिले होते "रामपुर शहर मे आपका स्वागत है." . समाप्त... समाप्त... समाप्त...
|
Arc
| |
| Thursday, September 06, 2007 - 9:13 am: |
| 
|
मस्त आहे. पण तिथे त्या गावात तिला काय future आहे?
|
Princess
| |
| Thursday, September 06, 2007 - 9:53 am: |
| 
|
मंजुडी, गोबुदा, मन्दारडी, आशु२९, प्राजक्ताडी, दाद, सुनिधी, तिऊ, चेतना, स्नेहा२१, आयटीगर्ल, एआरसी सगळ्याना कथा वाचुन मला प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद. मंदार, तुमच्या प्रश्नाचे उत्तर: भारतात कुठेही जाण्यास बंदी नाही. पण मुंबईमध्ये जसे लोंढ्याने लोक येतात तसे इतर कुठेच नाही. दहा वर्षा पूर्वी म्हणे एखाद्या बिहाऱ्याला विचारले की नौकरी कुठे हवी - मुंबई की दिल्ली तो तर सरळ मुंबई सांगायचा. खरेतर गरज आणि वेळच ठरवते कुठे जायचे आणि शेवटी दैव नेईल तिकडेच आपण जातो कारण "अपने मर्जी के कहां अपने सफर के हम है..." एआरसी, तिथे तिला कदाचित काहीच फ्युचर नाही पण चंदा हा निर्णय घेते कारण तिला नवे आयुष्य सुरु करायचे असते. ते पण अशा जागी जिथे तिचा काळा भुतकाळ कधीच समोर येणार नाही. पण त्याचवेळी तिला आधाराची पण आवश्यकता आहे म्हणुन ती रामपुर निवडते. तिचे वय बघता ती तिचे शिक्षण पूर्ण करु शकते. कदाचित घाव भरल्यावर पुन्हा मुंबईला देखील परत जाऊ शकते. भविष्या पेक्षाही सध्या भुतकाळ विसरणे तिच्यासाठी अधिक आवश्यक आहे.
|
Manjud
| |
| Thursday, September 06, 2007 - 10:28 am: |
| 
|
पूनम, छान, छान छान. अतिशय वेगात कुठेहि तोल ढळू न देत आणि मुख्य वाट बघायला न लावता कथा पूर्ण केलीस. खुप आवडली. तुझ्या अशाच छान कथा अशाच वेगाने मायबोलीवर येऊ देत. अनेक अनेक शुभेच्छा!!!
|
Ana_meera
| |
| Thursday, September 06, 2007 - 11:19 am: |
| 
|
कथा व वेग दोन्ही सुपर्ब!!
|
Chetnaa
| |
| Thursday, September 06, 2007 - 12:12 pm: |
| 
|
प्रिंसेस... कथेचा सुपर फ़ास्ट वेग़... वेगळं कथानक.. आणि भाषेचा बाज... सही ग... छा गई तुम... आणि ह्या पासुन प्रेरणा घेऊन अनेक पर प्रांतीय परत आपापल्या गावी जातील तर आपली मुंबई मिळेल आपल्याला परत... असा स्वार्थी विचारही आला मनात कथा वाचुन... 
|
Zelam
| |
| Thursday, September 06, 2007 - 12:24 pm: |
| 
|
छान आहे गं पूनम. खरच पर प्रांतीयांना वाचायला द्यायची का ही कथा? :-)
|
Zakki
| |
| Thursday, September 06, 2007 - 12:41 pm: |
| 
|
कथा छान आहे. मला पण आता असेच तडक उठून भारतात जावे असे वाटायला लागले आहे. पण तेव्हढी हिंमत नाही.
|
Maanus
| |
| Thursday, September 06, 2007 - 12:51 pm: |
| 
|
चांगली होती ग कथा, मला पहीले वाटलेल की उंच माझा झोका नाटकासारखा काहीतरी शेवट करतेस का काय. हेच नाटकाच नाव होत ना? त्यात तीला मॉडेल बनायच असत, त्यावर एक मराठी चित्रपट पन आला होता पन तसे किंवा आत्महत्या न करता, नविन जिवन good. पुर्वी टाकलेला एक quote परत टाकतो. "We cross our bridges when we come to them and burn them behind us, with nothing to show for our progress except a memory of the smell of smoke, and a presumption that once our eyes watered." - Tom Stoppard
|
Maitreyee
| |
| Thursday, September 06, 2007 - 1:57 pm: |
| 
|
प्रिन्सेस, छान गं, कथेची हाताळणी, भाषा आणि प्रवास, रामपूर ते मुम्बई आणि बॅक तू रामपूर ही कन्सेप्ट.
|
Amruta
| |
| Thursday, September 06, 2007 - 3:26 pm: |
| 
|
छान आहे कथा.. concept पण आवडला.
|
Aashu29
| |
| Thursday, September 06, 2007 - 3:40 pm: |
| 
|
नेहमिप्रमाणे मराठि माणसाचि कथा नसुन मजुरांच्या आयुश्याविशयी कथा होति, म्हणुन एकदम interesting वाटलि!! शेवट पण आवाडला!!
|
Kedarjoshi
| |
| Thursday, September 06, 2007 - 6:26 pm: |
| 
|
मस्त आहे कथा. मलाही कनसेप्ट आवडली. माणसा सरीवर सरी नाव होते त्या पिक्चर चे.
|
Runi
| |
| Thursday, September 06, 2007 - 8:01 pm: |
| 
|
पुनम, कथेचा फ्लो आणि शेवट जरा जास्तच आवडला.
|
Prajaktad
| |
| Thursday, September 06, 2007 - 8:12 pm: |
| 
|
मला पण आता असेच तडक उठून भारतात जावे असे वाटायला लागले आहे. >>>झक्की भलतच काय? मैत्रियीला अनुमोदन! वेगळि आणी चांगली कथा
|
Mankya
| |
| Friday, September 07, 2007 - 1:11 am: |
| 
|
Princess.. भाषेचा वेगळेपणा भावला अन विषयही वेगळा मस्त. वेगही छानच ! भविष्या पेक्षाही सध्या भुतकाळ विसरणे तिच्यासाठी अधिक आवश्यक आहे. .. ही भूमिका कळली नव्हती, बरं झालं लिहिलस ते नंतर. चंदाच्या व्यक्तिमत्वातले बारकावे तू छानच मांडलेस.
|
Bee
| |
| Friday, September 07, 2007 - 8:27 am: |
| 
|
कथा जरा फ़िल्मी झाली पण बाकी सर्वकाही छान जमले आहे. हिन्दीमराठी दोन्ही भाषेचा वापर, कथेचा प्रवाह, शैली वाचकाची उत्सुक्ता कायम ठेवते..
|
Psg
| |
| Friday, September 07, 2007 - 9:18 am: |
| 
|
छान लिहिली आहेस प्रिन्सेस कथा.. आवडली..
|
Monakshi
| |
| Friday, September 07, 2007 - 9:20 am: |
| 
|
पूनम, छान लिहिली आहेस गं कथा आणि फ्लो पण एकदम छान आहे.
|
Gobu
| |
| Friday, September 07, 2007 - 9:49 am: |
| 
|
प्रिन्सेस, फ़ार वेगळी कथा आहे! अभिनन्दन! पैसा पैसा करुन माणुस दमतो शेवटी मुम्बई सोडुन गावाकडे जातो आणि खरे सुख शोधत बसतो
|
|
|