|
Maanus
| |
| Wednesday, September 05, 2007 - 3:43 am: |
| 
|
बोक्याला हाकलुन द्यायला म्हणुन सोनाबाई उठल्या आणि परत तेच... माळ्यावरुन पैशांचा खुळखुळाट त्यांना ऐकु आला. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ सोनाबाई ४०-४२ वर्षांपुर्वी जवळच्याच गावातुन लग्न होवुन पौड मधे आल्या होत्या. गाव तस त्यांना नविन नव्हत. कळत असल्यापासुन वांगी विकायला म्हणुन दर मंगळवारच्या बाजाराला त्या पौडात यायच्या. अशातच मागच्या आळीतल्या नारयणरावांबरोबर त्यांचे लग्न ठरले व त्या कायमच्याच पौड मधे आल्या. मनासारख व माहेरपासुन जवळच सासर मिळाल्यामुळे सोनाबाई खुपच आनंदी होत्या. त्यांचा नविन घरात तशी बरीच मंडळी होती. नारयणरावांचे आई वडील, दोन भाऊ, त्यांच्या बायका, मुल. असा बराच गोतावळा होता घरात, घराबाहेर पन चिकार होता. एक गाय, दोन बैल, बैलगाडी, दहा बार कोंबड्या. घरामागे मोठा परडा होता, परड्यात वेग वेगळी झाड, कढीपत्ता, जुई जाई, मोगरा, शेवगा, चिंच. चिंच. कधीकधी त्यावर काही घुबड बसलेली दिसत. सोनाबाईचे चुलत सासरे, देखील त्यांच घरात माळ्यावर रहायचे. पन सोनाबाईच्या लग्नानंतर दोन वर्षातच त्यांचे निधन झाले. ओघाने सोनाबाईना पाच मुल झाली नातवंड बघायचे सुख पन त्यांना मिळाले. परंतु ही एक गोष्ट, दर वर्षी त्यांना सतावत असे. पेरणी झाल्यावर, जसा जसा अश्विन महीना संपायला येत असे, तसे तसे त्यांना रोज माळ्यावरुन पैसे खणकल्याचा आवाज यायचा. आणि मग तो हळु हळु कमी होवुन बंद व्ह्यायचा. अश्विन आला की सोनाबाईना माहेरी पळावेसे वाटे. त्या बोलणार तरी कुणाला, घरातली पुरुष मंडळी बाहेर झोपलेली असत व बाईमाणस, मुल मधल्या खोलीत. आज ४० वर्ष झाली, तरी त्या एकट्या होवुन कधी माळ्यावर गेल्या नाहीत.माळ्याचा विचार जरी मनात आला तरी त्यांना त्यांचे चुलत सासरे दिसत. लेखक शिकाउ आहे. कथा छोटीच असेल पन पुर्ण व्हायला थोडासा वेळ लागेल. तो पर्यंत करमणुन म्हणुन हाडळीला भेटा
|
Maanus
| |
| Wednesday, September 05, 2007 - 3:57 am: |
| 
|
ज्यांना mystery समजली असेल, ते लोक बिंधास्तपने पुढचा पार्ट लिहु शकता, मी तुम्ही लिहीलेय त्याच्या पुढुन सुरवात करेल.
|
Amruta
| |
| Wednesday, September 05, 2007 - 3:20 pm: |
| 
|
(माणसा, अरे एकटा रहातोयस.. भलते सलते विचार करु नकोस. ) पण गोष्ट पुर्ण कर बर. आता तोपर्यंत तुझ्या हडळिला भेटुन येते.
|
Preetib
| |
| Wednesday, September 05, 2007 - 7:30 pm: |
| 
|
vachali tujhi Hadalichi gostha.. Hey Maanus to Newport NJ madhe rahtos ka...me pan tithech rahate... ))) Newport Mall cha 9:40 cha show anel baghitale..hadal/bhut ajun nahi disale.. aatachi hee gostha lawkar purna kar
|
Maanus
| |
| Wednesday, September 05, 2007 - 8:25 pm: |
| 
|
कॅमेरा ३५ वर्ष मागे जातो. मध्यरात्र झालेली, सोनाबाई शांत झोपल्या होत्या. तेवढ्यात खन्SSS खनSSS एकदम बारीकश्या अशा त्या आवाजाने सोनाबाईची झोप मोडली गेली. त्यांनी इकडे तिकडे पाहीले कोण आवाज करतय म्हणुन. म्हादु ला उचापती करायची सवय होती. पन तो शांत झोपलेला दिसला. डाव्या बाजुला मोठ्या वंस, मधल्या वंस, शेवंता, सुमन, उजवीकडे आत्याबाई म्हादु, काशीनाथ, सोमनाथ. सगळे कसे शांत झोपलेले होते. मग आवाज कोण करतेय. थोडासा काणोसा घेतल्यावर माळ्यावरच्या खोलीतुन आवाज येतोय हे सोनाबाईंना कळाले. त्या माळ्याच्या खोलीकडे निघाल्या. समोरच दृश्य बघुन सोनाबाईंचे डोळे एकदम मोठे झाले. माळ्यावरच्या अंधारी खोलीत खुप अंधार होता. हळु हळु त्यांना थोडे थोडे दिसु लागले. मध्यभागी पुसटशी एक चटई दिसतेय. व त्यावर जमलेला दोन पैसे, पाच पैशाचा ढिग. हळुच मधुन कुठुनतरी एक दोन पैसे त्यात येवुन पडत होते. हे काय होतेय, पैसे असे हवेतुन चटईवर कसकाय पडतायत. काही कळत नव्हत. आणि पुढे काय होतेय हे बघत थांबन्याईतकी, त्यांच्यात अजुन हिम्मत नव्हती. झरझर करत त्या खाली देवघरतात आल्या. देवाला नमस्कार केला व डोळे घट्ट बंद करुन झोपायचा प्रयत्न करु लागल्या.
|
Maanus
| |
| Wednesday, September 05, 2007 - 8:43 pm: |
| 
|
अरे यार मी नुकताच newport मधुन move झालो... i miss that place . भुत दिसेल हो दिसेल, माझ्यासारखी तल्लख नजर ठेव अमृता, मला भुता बिताची खुप भिती वाटते. पन तरीदेखी daring करुन ही गोष्ट लिहीतोय. तो रात पाहील्यापासुन मला अजुनही माझ्या bed मधुन दोन हात बाहेर येतील अस वाटते. नयना, भुत वैगेरे मी अजुनही संपुर्ण नाही पाहीले.
|
Runi
| |
| Thursday, September 06, 2007 - 12:32 am: |
| 
|
भुत वैगेरे मी अजुनही संपुर्ण नाही पाहीले. >>>म्हणजे तु अपुर्ण भुत बघीतलेयस असे म्हणायच आहे का तुला माणुस
|
Maanus
| |
| Thursday, September 06, 2007 - 12:42 am: |
| 
|
कॅमेरा ५ वर्ष पुढे जातो. इकडे तिकडे कोणी नाही हे बघत सोनाबाई बोलल्या. "आत्या, अहो आत्याबाई" "काय ग" "लै वर्स झाली येक इचारल म्हणत वते" "हा मग बोल की खळा खळा, इतक दिस कुणाची वाट बघु राहीली वतीस" "तुम्हाला कधी पैशे वाजल्याचा आवाज येतो का हो" "येतो की, रोजच येतो, तुझ्या बा न काय पर आम्हाला पैशाचा आवाज नाय ऐकवला" "आव तस नाय व, मला ना कधी कधी वरच्या खोलीतुन पैशे पडल्यावानी वाटत. येकदा म्या वर बी गेलती, तवा पैशे आशे उडत वते बघा संमदीकड" आत्याबाई हसल्या. त्यांनी मुठभर गहु उचलले, आणि जात्यात टाकुन त्या परत जात फिरवु लगल्या. गहु दळायच्या दगडी मिक्सरला, जातंच म्हणतात ना? मी विसरायला लागलो एक एक शब्द आता.
|
Savyasachi
| |
| Thursday, September 06, 2007 - 1:16 am: |
| 
|
>> गहु दळायच्या दगडी मिक्सरला हा हा हा... माणसा, कहर झाला. असो. कथा आकर्षक आहे.
|
Maanus
| |
| Thursday, September 06, 2007 - 1:18 am: |
| 
|
कॅमेरा १० वर्ष पुढे जातो. (पाच वर्षच पुढे ढकलायचा होता, पन पुढचे इतके वर्ष काय लिहायचे समजत नाहीय ) सोनाबाईंच्या लग्नाला २०-२२ वर्ष झालीत. घरामागे पाण्याची नविन टाकी बांधली गेलीय. एकाच्या दोन गाई झाल्यात. आत्याबाई आणि त्यांचे मालक सध्या पुण्यातल्या कलासागर मधुन रंगवुन आणलेल्या फोटोतुन नातवंडाना मोठे होताना बघतायत. फोटो भिंतीला लागल्यावर घराबाजुची मोकळी जमिन विकत घेवुन प्रत्येक भावाने आपली आपली एक स्वतंत्र खोली बांधली, एकाच्या तीन चुली झाल्या. नारायण रावंकडे मुख्य घर राहीले, त्यामुळे वरच्या मजल्यावरची खोली आणि त्यातुन दर वर्षी ठरावीक काळात येणारा पैशाचा आवाज काय सोनाबाईंचा पिच्छा सोडत नव्हत. ह्या वर्षी भाद्रपद संपायला आला तसा त्यांनी रंगकाम काढले. निळा डिस्टेंपर, चुना, डिंक सगळीकडे नुसता पसारा. बघता बघता दोन खोल्यांना रंग लावुन झाला. आता चुलीची खोली तेवढी राहीली होती. म्हादु काशी सोमा हनुमाणाच्या मंदीरात गेलेले. घरात नारायणराव आणि सोनाबाईच होत्या. "चहाच बघता का जरा" नारायण राव तंबाकुत चुना टाकत म्हणाले. "वय" तंबाकु मळुन झाली, ती चिमटीत पकडुन तोंडात टाकणार म्हणुन नजर वर गेली तर सोनाबाई तिथेच उभ्या होत्या. "माथ ठिकाणावर हाय का" "नाय येक ईचारल म्हणत वती" "काय झाल आता" "आव मामंजीच भावु गेल्यापासुन दर वर्साला ह्या टायमाला आपल्या वरच्या खोलीत पैस उडत असतात. मला काय कळु नाय राहील. आत्यांना बी ईचारल म्या एकदा, त्या नुसत्या हसल्या. मला लै भ्या वाटत व. भगताला बोलवायच का ह्या येळेस" "चहाSSSS"
|
Psg
| |
| Thursday, September 06, 2007 - 5:25 am: |
| 
|
फोटो भिंतीला लागल्यावर जबरी वाक्य आहे सही जा रहे हो माणूस.. भराभर लिही..
|
Princess
| |
| Thursday, September 06, 2007 - 9:58 am: |
| 
|
माणुस, खुप मस्त लिहितोय रे बाबा. तुझ्या सगळ्याच पोस्ट इतक्या वाचनीय असतात तर कथा किती मस्त असेल... खुप मजा येतेय वाचायला. लवकर पुर्ण कर.
|
Itgirl
| |
| Thursday, September 06, 2007 - 10:15 am: |
| 
|
माणसा, मस्तच रे!! धमाल आली वाचायला!!
|
Amruta
| |
| Thursday, September 06, 2007 - 2:58 pm: |
| 
|
suspence चांगलाच वाढवलायस बरका माणसा. dialoges पण मजेदार आहेत. चहा sss मधला दरारा चांगलाच दिसतोय.
|
Maanus
| |
| Friday, September 07, 2007 - 3:35 am: |
| 
|
कॅमेरा ५ वर्ष पुढे जातो. म्हादु चा माधव झालेला असतो. माधव शिक्षणासाठी बाहेरगावीच असल्याणे त्याची भाषा सुधारलीय. त्याला तशीच शिकलेली बायको मिळालीय. एक मुलगा आहे. मुलगी बामणात वाढल्याणे मुलाचे नाव शहरी भाषेला शोभेल असे ठेवलेय 'प्रणय'. प्रणय अजुन ९-१० महिण्याचाच आहे. हे त्रिकुट सध्या शहरात रहाते आणि सारखे गावी येत असतात. तर एकदा हे असेच गावी आलेले असतात तेव्हा. सोनाबाई मागच्या आंगणात प्रणय ला आंघोळ घालत असतात. "काय र तुझी आय, काय नाव ठेवलया तुझ आमाला नातवाच नाव बी बोलता येत नाय" " Oh my god, when'll she stop cribbing about that. " "काय लै ग्वॉड वाटल! काय गुळ लागलाय का त्या नावाला ग्वॉड वाटु राहायलया म्हणती." "नाही हो आई, i mean आत्या. पण पुण्यात अशीच नावे असतात." "बर बर. नको उगाच शहानपना शिकवुस. माझा पोरगा तुझ्यापेक्षा जास्त शिकलाय" पाच एक मिनटा नंतर "आत्या हे चिंचेचे झाड खुप जुने आहे का हो" "वय म्या लहाण असल्यापासुन बगतेय त्या झाडाला" "ओह, त्याला चिंचा फारच कमी लागतात नाही आजकाल. आणि तुम्हाला भिती नाही का हो वाटत. i mean चिंचेच्या झाडावर भुते असतात असे ऐकले होते मी" सोनाबाईंची बोट, प्रणय साठी आणलेल्या कोमट तेलात तशिच स्थिर झाली. "नाही मी फक्त ऐकलेय. i dont trust in ghost and all " सोनाबाई तशाच स्थिर, प्रणय ला त्यांच्या पायवर झोप यायला लागली. खर तर प्रणय च्या आईलाच भुताची खुप भिती वाटत असते. जास्त करुन मुक्कामी असल्यावर तांब्या घेवुन मागे जाताना. पन direct झाड तोडा कस म्हणनार म्हणुन असाच एक खडा मारुन पाहीला तिने. आणि बहुतेक तो बरोबर जागी लागला. "आत्या, आहो आत्या... आहो" "अं, नाय नाय, भुत बित काय नसत, भुताला पैक कशाला पाहीजे, त्यो काय कुठबी जावु शकतो" "काय बोलताय तुम्ही"
|
Maanus
| |
| Friday, September 07, 2007 - 4:55 am: |
| 
|
कॅमेरा ५ वर्ष पुढे जातो. आज सोनाबाई खुष आहेत. प्रणय च्या आईने घातलेल्या गोंधळापासुन चिंचेवरच भुतच आपण तेलकट काही बनवायला घेतले की आपल्या घरात येवुन पैसे उडवत असते. आणि हे भुत घालवाय ला ते झाडच तोडावे लागणार अशी सोनाबाईंची ठाम समजुत झालेली असते. गेली पाच वर्ष त्यांनी कशीबशी तळलेल्या पदार्थात बिबवा कोळसा ठेवुन मनाची समजुन काढली. पन पैशाचा आवाज कमी होण्याऐवजी ठळक होत होता. पन त्या आज खुष आहेत. गेले पाच वर्ष त्या जवळ जवळ रोज नारायण रावांच्या मागे लागलेल्या कातकर्यांना बोलवुन ते झाड तोडुन घेउ. पन नारायण राव काही ऐकत नव्हते. तेव्हा ह्या वर्षी गणपती झाल्यावर घरात जेव्हा रंगकाम काढले, तेव्हा कधी नाही ते सोनाबाई सकाळीच आपल्या माहेरी मुक्कामाला म्हणुन निघुन गेल्या. २५ वर्ष झाली सोनाबाईंच्या लग्नाला पन आज पर्यंत त्या कधी माहेरी मुक्कामी नव्हत्या राहील्या. दुपारी चहाला म्हणुन कधी कधी जात, पन मुक्काम हा पहील्यांदाच. त्याच दिवशी संध्याकाळी नारायणराव सासरच्या गावी असलेल्या देवळात किर्तणाला म्हणुन गेले. किश्नाने नारायणरावांना देवळात पाहीले. तडक तो घरी गेला. "दाजी किर्तण ऐकायला आलेत" सोनाबाईंचे दोन्ही बाऊ ताट तसेच सोडुन लगेच देवळाकडे पळाले. लोकांना बाजुला सरकवत एका बाजुला बसलेल्या दाजींपर्यंत पोचले. "बुवा चांगला गातो नव" "आ.... हा. बरा हाय, आण्णा गुरवारच्यालाच असतो व्हय" "व्हय" तेवढ्यात पिंट्या कुठुन तरी आला. "दाजी, आक्का मागच्या आळीला निघालीया, कुलप लावलय का इचारलय" "न्हाय म्हणाव. म्या किरतण ऐकुण येईल." "पिंट्या आयेला ताट कर म्हणाव दाजीं साठी" "थांब र, पुढच्या वक्ताला येईल कधीतरी जेवायला. किरतण चांगल हाय." किर्तण संपवुन नारायण राव घरी आले, पुढच्या खोलीत ताट झाकुण ठेवलेले होते. दुसर्या दिवशी सकाळी नारायण रावांनी कातकर्यांना बोलावले, निम्म झाड तोडुन झालेय. आणि म्हणुन आज सोनाबाई खुष आहेत. त्यांनी सगळ्यांसाठी चहा बनवलाय. म्हणता म्हणाता आठवड्याभरात सगळ झाड तोडुन झाल. रंगकाम संपल. महीना संपला. अजुन तरी ह्या वर्षी काही पैशाचा आवाज त्यांनी ऐकला नाहीय. औदा त्रिकुट आठवड्यासाठी येणार होते म्हणुन देखील सोनाबाई खुष आहेत. शंकरपाळ्या, चिवडा तर बनवुन झालेयच आता अणारश्याचे पिठ बनवायला घेतलेय. चपातीचा डबा उघडा राहीला असे वाटले म्हणुन रात्री सोनाबाई उठल्या. डब्याचे झाकण लावुन त्या परत येत होत्या तेवढ्यात परत खन्न्SS
|
Ana_meera
| |
| Friday, September 07, 2007 - 5:06 am: |
| 
|
लई सरस इश्टोरीSS सोनाबाईच....... वाटतात मजला!! पण सिध्द कसे करणार?
|
Manjud
| |
| Friday, September 07, 2007 - 5:35 am: |
| 
|
ललित आहे का हे? मला विनोदि कथा वाटत्ये. असो, जे काही आहे ते खुप छान चालले आहे. माणसा, तू पण लिहितोस हे मला माहीत नव्हते. मस्तच लिहितोस एकदम!! फक्त ते " वंस " जरा " वन्सं " असं लिही. मी ते हंस, वंश सारखं वाचलं.
|
माणसा, लै भारी स्टाईल राव तुझी लिखाणाची... एकदम आवडली...
|
Tiu
| |
| Friday, September 07, 2007 - 2:58 pm: |
| 
|
माणसा...जमलं जमलं. improvement दिसतेय लिहिण्यात..शेवटले २ भाग तर लई बेष्ट लिवलेत राव! <" Oh my god, when'll she stop cribbing about that. " "काय लै ग्वॉड वाटल! काय गुळ लागलाय का त्या नावाला ग्वॉड वाटु राहायलया म्हणती." "नाही हो आई, i mean आत्या. पण पुण्यात अशीच नावे असतात." "बर बर. नको उगाच शहानपना शिकवुस. माझा पोरगा तुझ्यापेक्षा जास्त शिकलाय" >>> ह ह पु वा.
|
|
|