|
Mansmi18
| |
| Wednesday, August 22, 2007 - 4:53 pm: |
| 
|
आपण मायबोलीवर एक कायदा करायला हवा! कथाकादंबरी जास्तीत जास्त ३ दिवसात पुर्ण करायलाच हवी अन्यथा दंड भरावा लागेल. just kidding लवकर पुर्ण करा हो.
|
Storvi
| |
| Wednesday, August 22, 2007 - 6:25 pm: |
| 
|
असा कायदा असता तर नुसत्या जावाकसम वर मायबोलीचा सर्व खर्च निघाला असता.. 
|
Aktta
| |
| Wednesday, August 22, 2007 - 8:26 pm: |
| 
|
ह्म्म्म मज्जा येते आहे...... असा कायदा केला तर मला वाटत र्सवात जास्त नुकसान सरस्वतीच होइल... एकटा...
|
Amol_amol
| |
| Wednesday, August 22, 2007 - 9:03 pm: |
| 
|
मराठी टायपिंग ऑफलाइन पण करता यायला पाहिजे. म्हणजे प्रवास वगैरे करताना पण लिहिता येईल. Admin????
|
Chaffa
| |
| Thursday, August 23, 2007 - 2:22 pm: |
| 
|
अहो श्रध्दा श्रावणात पुर्ण करणार ना कथा? नाहीतर ती copy करुन ठेवतो (अर्थात तुमची परवानगी असेल तरच) कारण कथा पुर्णपणे एकदम वाचायला खरी मस्त वाटेल. जबरदस्तच.
|
चाफ्फा, तुम्ही कॉपी करून ठेवू शकता. काही हरकत नाही.
|
Jaijuee
| |
| Monday, August 27, 2007 - 8:29 am: |
| 
|
? copy kara harqat naahi mhanaje kaay? aamachi harqat aahe! kathaa lavkar poorna karaa! 20 divas hotil aataa! "Rehan"cha vikram modiit nakaa ho kaadhU!
|
Shraddhak
| |
| Thursday, August 30, 2007 - 1:58 pm: |
| 
|
२ जून २००२. आता जरा रूटीन मूळपदावर येतंय. टुणकीहून परतल्यावर त्या सगळ्या प्रवासाने प्रचंड थकायला झालेलं. तशात डोळ्यांसमोर तो एकाट वाडा दिसायचा. त्याच्या आसपासची ती नीरव शांतता, लांबूनच बघितलेलं ते रमेचं देऊळ.... आणि रमा आणि पार्वतीची कथा... मी तिथे जाऊनही दर्शन घेतलं नाही रमेचं. आईंना वचन दिलं होतं खरंतर! मी केलं ते चूक की बरोबर? बाबांना फोन लावला. ' केलंस ते योग्यच केलंस, सुधा. माझा आधीपासूनच या गोष्टीला विरोध होता. आणि काहीही होणार नाही. काळजी करू नकोस. ' ते त्यांच्या नेहमीच्या शांत, आश्वासक सुरात म्हणाले. माझं मन बरंच शांतावलं. उद्यापासून ऑफिस सुरू पुन्हा. एकदा तिकडे गुंतले की हे विचार जरा बाजूला पडतील. शिशिरला विचारलं कालच, ' आईंची इच्छा मी अखेर पुरी केलीच नाही शिशिर. तुला राग आला नाही ना माझा? ' ' नोप्, राग वगैरे नाही आला. दर्शन घ्यायचा निर्णयही तुझाच होता आणि न घ्यायचाही... मला का राग येईल, सुधा? ' शिशिरसारखा समजूतदार माणूस शोधून सापडणं कठीण. आज जाऊन बरीच खरेदी करून आले. वाणसामान भरलं. घर जरा नीट आवरलं. उद्यापासून एकदा ऑफिस सुरू झालं की कशालाच वेळ उरणार नाही. आज शेजारची सौम्या आली होती संध्याकाळी. पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी गेली होती चांगले चार महिने. तिला आईंचं कळलं आल्या आल्या. लगेच भेटायला आली होती. मुलीलाही बरोबर घेऊन आलेली. अवघी दोन महिन्यांची आहे. बाहुलीसारखी दिसते. ' क्या नाम रखा फिर इसका? ' ' नमिता... ' ' बडी cute है... ' जरा घरातलं वातावरण बदलल्यासारखं झालं तेवढ्या वेळात. नमिता मॅडम थोडा वेळ मस्ती करून आईच्या मांडीवर गाढ झोपलेल्या. ' चाचीजी बहोत खयाल रखती थी मेरा. ' सौम्याची नि आईंची गेल्या वर्षभरात चांगलीच गट्टी जमलेली. सौम्या आई होणार हे कळल्यावर स्वतःची मुलगी असल्यासारखे तिचे लाड पुरवलेले त्यांनी. बोलता बोलता सौम्याच्या डोळ्यात पाणी आलेलं. बोलता बोलता बराच वेळ गेला. नमिताबाईंची एक झोपही पुरी झालेली. निघावंच लागलं मग सौम्याला. रात्रीचे बारा व्हायला आलेत आता. झोपावं.
|
Shraddhak
| |
| Thursday, August 30, 2007 - 3:06 pm: |
| 
|
१० फ़ेब्रुवारी २००३. आज माझ्या नि शिशिरच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस. तीन वर्षांनंतरही त्या दहा फ़ेब्रुवारीच्या आणि त्यानंतरच्या दिवसांच्या आठवणी काल घडल्यासारख्या मनात ताज्या आहेत. आम्ही लग्नानंतर गोव्याला गेलो होतो. ' तुम्ही तिथे पोचल्यावर लगेचच व्हॅलेंटाईन्स डे आहे चौदा तारखेला... ' माझ्या ग्रुपमधल्या काही मैत्रिणींनी अगदी चार चारदा आठवण करून दिलेली. ' मग त्याला मी काय करू? ' असं मी विचारलं तेव्हा हताश होऊन कपाळावर हात मारलेला. खरंतर व्हॅलेंटाईन्स डे वगैरे प्रकार मला पटत नाहीतच. ' दिखाऊ प्रेमाचा सण ' वगैरे लेबलं लावतच असते मी त्या प्रकाराला. तरीही त्या १४ फ़ेब्रुवारीला मला सुखद आश्चर्याचा धक्का बसला. शिशिरने अगदी फ़िल्मी स्टाईलने गुडघ्यांवर बसून माझा हात हातात घेऊन बोटात एक हिर्याची अंगठी चढवली. एरवी मी ' अरे कशाला आता एवढी महागाची अंगठी आणलीस? ' असं म्हणालेच असते. पण त्या दिवशी ते सगळंच इतकं अनपेक्षित आणि सुखद होतं की मला असं काही म्हणायचं भानही राहिलं नाही. माझ्या नाजूक बोटात शोभून दिसणार्या त्या अंगठीवर वारंवार नजर जात राहिली. आणि शिशिरच्या हसर्या चेहर्यावरही. ... नवीन साडीची घडी मोडली आज. संध्याकाळी मन लावून तयार झाले. मरून रंगाचा नवीन कुर्ता घातलेला शिशिरही देखणा दिसत होता. गेलो त्या रेस्टॉरंटचा माहौलही सुरेख.. आत्ता थोड्या वेळापूर्वी परतलो. सौम्याच्या घरात जाग होतीच. सध्या नमिताचं ' झोपणार नाही... ' आंदोलन चालू असतं. तिला झोपवायच्या प्रयत्नात सौम्यालाच पेंग आलेली. दोघी बाल्कनीत होत्या. ' देखा दीदी... आधी रात हो गई और इसे अभी भी नींद नही आ रही... परेशान हो गई हूं. न खुद सोती है न मुझे सोने देती है... ' लॅच उघडून घरात आले. आमचं शांत, गप्प घर. आम्ही दोघंही घरात असलो तरी शांतताच असते बहुतकरून. मला एकदम काय झालं कोण जाणे... ' शिशिर, आपण मुलाचा चान्स घ्यायचा का आता? ' त्याचं ऐकून न घेता मी भराभर बोलत सुटले. ' आता आपलं ठरलंच आहे ना हैदराबादमध्ये काही वर्षं राहायचं? आपापल्या जॉब्जमध्येही बर्यापैकी स्थिरावलो आहोत आपण. मग काय हरकत आहे? नमिता.... ' शिशिर हसायला लागला. ' तरीच म्हटलं, आत्ता एकदम हा विषय कसा निघाला? तू म्हणतेस ते खरंय... मलाही छान वाटेल... ' त्याचं पुढचं बोलणं मला फारसं ऐकूच आलं नाही मग. मी आमच्या बाळाच्या विचारांत पार हरवलेले... त्या विचारांनीही मला खूप छान वाटतंय आत्ता. डॉक्टरच्या appointments लगेच घ्याव्यात. पूर्ण चेक अप करून घ्यावा एकदा. नाहीतरी घरात आम्ही दोघंच! कुणीतरी तिसरं आलं तर जरा घरात चैतन्य येईल. छानशी मुलगी हवी पहिली, नमितासारखी... बाहुली. तिच्यासाठी काही काळ मी जरा करीयर बाजूला ठेवेन. बाप रे! केवढी पुढे पोचलेय मी! जरा आवरतं घ्यावं. क्रमशः
|
Sneha21
| |
| Friday, August 31, 2007 - 6:24 am: |
| 
|
पन तुम्हि कथा आवरती घेउ नका प्लीज लवकर करा पोस्ट
|
Sush
| |
| Friday, August 31, 2007 - 6:35 am: |
| 
|
अरे यार, क्रुपा करुन अभिप्राय कथा सम्पल्यावर टाका. new चा टैग बघुन पुढिल कथा वाचायला म्हणुन इथे यावे तर काय अभिप्राय. जाम हिरमोड होतो.
|
२० फ़ेब्रुवारी २००३ अपेक्षेप्रमाणेच नॉर्मल आले रिपोर्टस सगळेच. मन कसं आनंदाने मोहरून गेलंय. शिशिरचं आणि माझं बाळ... आईशी परवा बोलत होते तेव्हा हा विषय निघाला. तिलाही आमचा निर्णय कळल्यावर आनंद झाला. ' २८ चालू आहे गं तुला आत्ता. बरं झालं हा विचार केलास ते. तिशीच्या आत पहिलं मूल झालं तर बरंच.... ' शिशिरच्या आईंना हौस होती मुलांची. त्यांना नातवंडं बघायला मिळायला हवी होती. असो. शिशिरची चुलतबहीण, वैदेही उद्या हैदराबादला येतेय. उद्याची सुट्टी घेतलीच आहे. लगेचच वीकेंड. वैदेहीबरोबर जाम धमाल येते.. शॉपिंग, भटकणं, खाणं, गप्पा! सध्या आयुष्यात एक नवीनच चैतन्य आल्यासारखं जाणवतं. मी जरा जास्तच बोलकी झालेय गेल्या काही दिवसांत. शिशिरलाही जाणवलंय हे! माझ्या या उल्हसित मनःस्थितीमुळे तोही जरा जास्तच आनंदी आहे की काय असं वाटायला लागलंय. नमिताशी खेळायलाही मजा येते मग. आजकाल घरी असले की एकदातरी तिला घरी घेऊन येतेच. तिचं घरात असणं, दंगा करणंही सुखावह वाटतं. शब्दांत मांडता येणार नाही असं!
|
२१ जानेवारी २००४. गेल्या बर्याच दिवसांत डायरीला हातही लावलेला नाहीय. शेवटची नोंद १३ ऑक्टोबर २००३ ची. शिशिरचा वाढदिवस. उसना उत्साह आणून तो दिवस साजरा केला. त्याच्या नि माझ्या आवडीचा स्वयंपाक केला खूप तास घालवून आणि डायनिंग टेबलवर बसल्या बसल्या माझ्या डोळ्यांतनं पाणी यायला लागलं, ' शिशिर... ' जेवण गेलंच नाही मग दोघांनाही. त्याच्या कुशीत शिरून मी रडत राहिले आणि तो काही न बोलता मला थोपटत राहिला, माझ्या केसांतून हात फिरवत राहिला. सगळं अन्न दुसर्या दिवशी मोलकरणीला देऊन टाकलं. तिला वाटलेलं आश्चर्य जाणवलंच! आजची गतही काही वेगळी नाही. हे असं वारंवार व्हायला लागलंय. मनाला कशानेच उभारी येतच नाहीये. ' का असं वागतेयस राणी? ' शिशिरने विचारलेले प्रश्नही माझ्या मेंदूपर्यंत पोचत नाहीत आताशा. आजही संध्याकाळी तो आला तर मी दिवा न लावता अंधारात तशीच बसले होते. ' सुधा... ' ' अं... ' ' अशी काय करतेस, राणी? इतकी का हताश होतेयस इतक्यातच? ' ' मग मी काय करू शिशिर? ' माझ्याही नकळत डोळे पुन्हा भरभरून वाहू लागले. ' आपल्याला मूल का होत नाहीये शिशिर? दहा वेळा आपण वेगवेगळ्या टेस्ट्स करून घेतल्या. तुझ्यात कसलाच दोष नाही आणि माझ्यातही... शिशिर, हे असह्य होतंय मला आता... वाट बघणं असह्य होतंय मला. ' ' सुधा, आपल्याला डॉक्टरांनी काय सांगितलंय? काही काही केसेसमध्ये लागू शकतो वेळ. आपण म्हटलं नि झालं अशी गोष्ट आहे का ती? ' ' शिशिर, इतका? इतका वेळ? काहीतरी प्रॉब्लेम आहे... नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. ' ' शांत हो पाहू आधी... चल, तयार हो. आपण कुठेतरी बाहेर चक्कर मारून येऊ आणि बाहेरच काहीतरी खाऊ. चल... बरं वाटेल तुला. ' बाहेर गेल्यावरही मन लागलं नाही कशातच! त्याच्या कुठल्याच बोलण्याकडे लक्ष नव्हतंच माझं! तोही गप्पच झाला मग. एकमेकांशी चकार शब्द न बोलता आम्ही एका हॉटेलात जेवलो. वेटरलाही नवल वाटलं असावं बहुधा! घरी आल्या आल्या शिशिर माझा हात हातात घेऊन म्हणाला. ' सुधा, मूल होत नाहीये म्हणून किती खंतावतेयस. व्हायचं तेव्हा होईल गं राणी मूल. तोवर एकमेकांना आपण आहोत ना! ए, इकडं बघ माझ्याकडं... मी आहे ना तुझ्यासोबत! ' डोळ्यांतलं पाणी त्याच्यापासून लपवायचा निष्फळ प्रयत्न करत मी हट्टाने खिडकीतून लांब कुठेतरी बघत राहिले. शून्यात! क्रमशः
|
Shraddhak
| |
| Wednesday, September 05, 2007 - 7:12 am: |
| 
|
२१ मार्च २००४. गेल्या नोंदीनंतर बरोबर दोन महिने. अजूनही परिस्थिती वेगळी नाही. गेल्या वर्षी या सुमारास किती आनंदी होते मी. सगळं कसं सुंदर वाटत होतं. पण आज? एका वर्षात माझ्यात जमीन अस्मानाचा फरक पडलाय. जगण्यातला रस संपलाय जणू! शिशिर मला सारखं समजावून थकून गेलाय. माझ्याशी फारसा बोलतही नाही तो आताशा. सध्या उशिराच येतो ऑफिसातनं. अधून मधून आम्ही बाहेर वगैरे जातो फिरायला, पण त्यातही काही रस वाटत नाही. आई बाबांनीही मला खूप समजावलं. पण परिणाम शून्य! सौम्या तशी रोजच येते माझ्याशी बोलायला. तिलाही माझी चिंता लागून राहिली असावी. नमिता माझ्या आसपास असली की मला जरा बरं वाटतं. सौम्या तिला आवर्जून बरोबर आणते मग... चांगली आहे सौम्या! तिचा खूप आधार वाटतो सध्याच्या या काळात. परवा रस्त्यावर एके ठिकाणी पोस्टर विकणारा मुलगा बसला होता. त्याच्या पोस्टर्सच्या चळतीमध्ये सगळ्यात वर एका गोंडस बाळाचं पोस्टर. ' ले लीजिये नं मॅडम... सिर्फ तीस रुपए का है. ' ' नको बाबा... मी काय करू ते पोस्टर घेऊन? त्रास होईल.... ' त्याला मराठी कळणार नाही, हे जाणवलंच नाही मला. तो माझ्याकडे गोंधळल्यासारखा थोडावेळ बघत राहिला आणि लगेच दुसर्या गिर्हाईकाकडे वळला. मी पाय ओढत घरी आले. गेले काही दिवस एक विचार मनात जोम धरतोय. हे सगळं मी थांबवायला हवंय आता. मला कंटाळा आलाय या स्थितीचा, आमच्या घरातल्या निःशब्द वातावरणाचा... मूल न होण्याचं दुःख मनाआड करता येणं शक्यच नाहीये, पण मी नॉर्मल वागायला हवंय. जमेल का पण? क्रमशः
|
Shraddhak
| |
| Wednesday, September 05, 2007 - 8:19 am: |
| 
|
२३ मे २००४. सध्या जरा बरं चाललंय. रूटीन व्यवस्थित होतंच आधीही. आता फारसा विचारच करत नाही कुठल्याच गोष्टीचा. शिशिरलाही जरा बरं वाटतंय त्यामुळे. डायरी नियमित लिहितेय सध्या. जरा जास्तच तपशीलवार. अगदी कुणाकडे जेवायला गेलो तेव्हा यजमानीण बाईंनी काय ड्रेस घातला होता, इथपासून शेवटी दिलेली कॉफी कशी अगदीच बेचव होती इथपर्यंत. परवा शिशिरने सहज म्हणून मी डायरी लिहिताना डोकावून बघितलं आणि हसायलाच लागला... कितीतरी दिवसांनी. ' देशपांडे बाईंचा नेकलेस त्यांच्या साडीला अज्जिबात मॅच करत नव्हता???? आणि बघू... बघू... हे काय? मेहता त्यांच्या चमचमणार्या हिरव्या फ़्लूरोसंट साडीत हिरव्या बेडकासारख्या दिसत होत्या???? सुधा, बाकी डायरी पण वाचू दे नं. भलतीच रंजक वाटतीये.. ही ही ही... ' मला खूपच बरं वाटलं. त्याच्या हसण्यात सामील होत मीदेखील त्याला माझ्या डायरीतल्या वेगवेगळ्या नोंदी वाचून दाखवायला लागले. एरवी कधी माझी डायरी दुसर्या कुणाला ऐकवणं तर सोडाच, दृष्टीसदेखील पडू दिली नसती... पण आजची गोष्ट वेगळी होती. आज पुन्हा एकदा आयुष्य नॉर्मलला आल्यासारखं वाटतंय.
|
Shraddhak
| |
| Wednesday, September 05, 2007 - 8:30 am: |
| 
|
१० फ़ेब्रुवारी २००५. कालचा दिवस मस्त गेला. संध्याकाळी शिशिर जरा लौकरच घरी आला आणि आला तेही एकदम खुशीत. ' मला माझ्या performance बद्दल अवॉर्ड मिळालं, सुधा. I am so happy. चल आज कुठेतरी जाऊया. सेलेब्रेट करूया. चल तयार हो. ' आरशासमोर उभी राहून केस ठाकठीक करताना जाणवलं, की हे ही बर्याच दिवसांनी. अशा छानपैकी किती दिवसांत तयार झालोच नाहीओत आपण. मग मुद्दाम अगदी वेळ घेऊन तयार झाले. ' कशी दिसतेय मी? ' माझा हा आवाजही बर्याच काळाने आल्यासारखा वाटला मला. शिशिरच्या डोळ्यांत पसंतीची पावती वाचता येत होती. बर्याच दिवसांनी रेस्टॉरंटमध्ये आम्ही दोघं भरभरून गप्पा मारत होतो, कुठेतरी फिरायला जायचे बेत आखत होतो.... आज कळलं की पुढल्या आठवड्यात तो सगळा समारंभ आहे. पार्टी आहे त्याच्या कंपनीत आणि मलाही आमंत्रण ( अर्थात!) आहेच. त्या दिवशी काय घालावं वगैरेची तयारी शिशिरच्या चेष्टेला न जुमानता मी आत्तापासूनच सुरू केलीये.
|
Shraddhak
| |
| Wednesday, September 05, 2007 - 8:49 am: |
| 
|
१७ फ़ेब्रुवारी २००५. आज मी खूप आनंदात आहे. आजचा समारंभ, त्यानंतरची पार्टी... आणि हो मिसेस कुलकर्ण्यांची भेट, सगळ्या चांगल्या गोष्टी एकदमच घडून आल्यायत. दृष्ट लागण्यासारखं झालं अवॉर्ड फ़ंक्शन. काळ्या सुटातला शिशिर देखणा दिसत होता. अवॉर्ड मिळाल्याचा आनंद त्याच्या छोटेखानी भाषणातल्या शब्दाशब्दातून ओसंडत होता अगदी. त्याच्या सहकार्यांची काही भाषणं, त्याच्या बॉसचंही भाषण झालं मग. नंतरच्या पार्टीत अचानकच मिसेस कुलकर्ण्यांची भेट झाली. मला फार आवडतात त्या. मी हैदराबादला नुकतीच आले होते तेव्हा आम्ही पहिल्यांदा त्यांच्याकडेच गेलेलो. मि. कुलकर्णी शिशिरच्या कंपनीतून निवृत्त झालेले काही वर्षांपूर्वी. तरी त्यांची, शिशिरची चांगलीच ओळख होती. मध्यंतरी कुलकर्णी काका काकू जर्मनीला त्यांच्या मुलाकडे गेल्याने भेट झालीच नव्हती. ' काकू, तुम्ही? ' मी हरखून म्हटलं. आमच्या गप्पा सुरू झाल्या. मधल्या काळातले अपडेट्स... त्या त्यांच्या नातवाबद्दल सांगत होत्या. ' सुधा, लग्नाला पाच वर्षं झाली ना तुझ्या? मग मुलांचं वगैरे... ' इतर कुणी असतं तर मी नक्कीच ' तुम्हाला का नसत्या पंचायती? ' म्हटलं असतंच! चिडून किंवा विनोदाने. पण कुलकर्णी काकूंसमोर असं वागता येत नाही. मी मान खाली घालून गप्प उभी राहिले. ' का गं, काय झालं? ' त्यांच्या आवाजातला तो काळजीचा स्वर.... मला रडू आवरणं कठीणच झालं मग. ' कळलं पोरी... पण असं निराश होऊन चालायचं नाही. बरं ऐक. मी तुला डॉक्टर अवस्थींचा पत्ता देते. पुण्यात आहेत ते. त्यांना कन्सल्ट करून बघ. फार जुने आणि निष्णात डॉक्टर आहेत ते.... ' शिशिरच्या कानावर ही गोष्ट घातली. ' ओके. जाऊयात आपण पुण्याला. पण एक प्रॉमिस कर. या प्रयत्नांना यश आलं नाही तर पुन्हा खिन्न व्हायचं नाही. पूर्वी वागलीस तसं वेड्यासारखं वागायचं नाही. कबूल? ' मी ' हो ' म्हटलं. मनात पुन्हा कुठेतरी आशा पालवली होती. क्रमशः
|
Kunal1259
| |
| Wednesday, September 05, 2007 - 11:11 am: |
| 
|
नमस्ते... आज हे माझे पहिलेच पोस्ट आहे... पण, गेल्या बर्याच दिवसा पासुन मी ही कथा वाचतोय... प्लिज कथेचे पोस्ट.. जरा लवकर लवकर टाकत जा.... कथा खरच खुपच छान चालली आहे....
|
Shraddhak
| |
| Wednesday, September 05, 2007 - 11:21 am: |
| 
|
२२ एप्रिल २००५. डॉ अवस्थींची ट्रीटमेंट सुरळीत सुरू आहे. छान वाटतंय सध्या. डॉ एकदम छान आहेत. मिस्कील आजोबांसारखे दिसतात. संपूर्ण केस पांढरे, डोळ्यांवर सोनेरी काड्यांचा चष्मा... डोळ्यांवर पेक्षा त्याला नाकावरचा चष्मा म्हणायला हवं. कारण तो नाकावरच असतो नेहमी. बोलतात भरपूर. आणि आपण काही सांगायला लागलो तर ऐकूनही घेतात patiently. पहिल्या अपॉईंटमेंटच्या वेळी गेल्या गेल्याच त्यांनी ' सुधा, काहीतरी छोटासा प्रॉब्लेम झालाय नं? बघूयात बरं आपण. ' असं मला पाहून म्हटलं होतं. त्यांचा तो आश्वासक स्वर आणि त्यातून जाणवणारा त्यांचा आत्मविश्वास. मनावरचं सगळं मळभ त्या शब्दांनीच दूर झाल्यासारखं वाटलं. त्यांनी सगळे रिपोर्टस पाहिले बारकाईने. ' सुरू करूयात हां आपण ट्रीटमेंट. लगेचच! आणि त्याआधी एक दोन छोट्या छोट्या टेस्ट्सही करून घेऊ. काय? ' मी अत्यानंदाने ' हो ' म्हणून मान डोलावली. 'Everything is going to be alright.' हे त्यांचं लाडकं पालुपद आहे. ते त्यांच्या तोंडून ऐकताना १०० टक्के खरं वाटतं. त्यांच्या प्रत्येक appointment मध्ये मला मनाने ताजंतवानं झाल्यासारखं वाटतं. आमच्या प्रयत्नांना नक्कीच यश येईल, असा विश्वासही कधी नव्हे तो वाटायला लागलाय. काल झोपताना शिशिरच्या गळ्यात हात टाकून त्याला सांगितलं, ' आपल्याला पहिली मुलगी झाली की तिचं नाव ईशानी ठेवूयात हं आपण. ' अचानक हे काय? म्हणून गोंधळलेल्या त्याच्या चेहर्याकडे बघत मी त्याच्या कुशीत घुसून हसत हसत झोपी गेले.
|
Rrs
| |
| Friday, September 07, 2007 - 6:16 am: |
| 
|
Aaj ch join zaloy, khupach chhan
|
|
|