Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
सती

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » श्रावण » कथा कादंबरी » सती « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through August 09, 200720 08-10-07  3:40 am
Archive through August 22, 200720 08-22-07  12:05 pm
Archive through September 07, 200720 09-07-07  6:16 am

Smitatakalkar
Friday, September 07, 2007 - 8:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mi kalach join zale ahe ,Apratim katha ahe,Khilvun thevle ahe.
Well Done Shradha!!!!

Shraddhak
Friday, September 07, 2007 - 2:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

२१ जून २००५.

मी किती आनंदी आहे, हे शब्दांत लिहिताच येत नाहीये. शिशिरही.... तो तर आनंदाने वेडावून गेलाय. बातमी कळली तेव्हा डॉ अवस्थींसमोर बसून ढसाढसा रडले मी. आयुष्यातली, निराशेने व्यापलेली ती काळीकुट्ट दोन वर्षं एकदम नाहीशीच झाली. स्वतःच्या भावना कायम ताब्यात ठेवणार्‍या शिशिरच्या डोळ्यांतही पाणी आलेलं.
'Now take good care of yourself.' डॉक्टर अतिशय मृदू स्वरात म्हणाले. क्लिनिकमधून बाहेर पडल्या पडल्या आईला फोन लावला. मला आनंदातिशयानं बोलताही येत नव्हतं काही.
हैदराबादला परतल्यानंतर पहिली गोष्ट केली ती म्हणजे नोकरीचा राजीनामा दिला. नकोच ते कामाचं प्रेशर, हेक्टिक रूटीन, ती धावपळ.. मला माझ्या बाळाच्या बाबतीत कुठलाही चान्स घ्यायचा नाहीये.
आई आलीये सध्या हैदराबादला. तीच माझ्या खाण्यापिण्याची काळजी घेतेय. इथल्या एका डॉक्टरांकडे नियमित चेक अप सुरू आहेत.
शिशिरही ऑफिसातून लौकरच येतो सध्या. माझ्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवतो तो. माझ्याशी, आईशी गप्पा मारत बसतो.
परवा माझ्यासाठी खास Mom to be ने घालायचे कुठलेसे महागडे, ब्रॅंडेड कपडे घेऊन आला.
' खरंतर तुला गरज नाहीये याची. तू अशीच खूप सुंदर दिसतेयस. ' तो मला जवळ घेऊन म्हणाला.
नमिताला बाळ पहायची भयंकर उत्सुकता लागलीये. रोज ती सौम्याबरोबर येऊन मला भेटून जाते. तीन वर्षाची झाली ती आता... भयंकर चौकस झालीये आणि सारखी प्रश्न विचारत असते.
' चाची बेबी का नाम क्या है? '
' अभी तक उसका कोई नाम नही रखा... '
' तो कब रखना है? '

तिचे प्रश्न संपता संपत नाहीत. मजा वाटते पण त्या प्रश्नांची.
परवा सौम्याने माझ्यासाठी एक ताईत आणला होता.
' दीदी बांध लो. किसी की नजर नही लगेगी आपको. अभी तो बुरे दिन टले है आपके. प्लीज, बांध लो. '
तिच्या स्वरातली कळकळ जाणवून मी तो बांधून घेतला खरा... पण तिला सांगितलंच...
' मै इन सब चीजोंपे विश्वास नही करती सौम्या. '
ओघाओघात मग तिला टुणकीचीही गोष्ट सांगितली. तिला ते फारसं रुचलं नसावं.
' चलो... अभी तो सब ठीक हो रहा है. टेक केअर दीदी. '

मलाही ते दिवस पुन्हा आठवले मग. ती त्या वाड्यातली अस्वस्थ करणारी जाणीव... त्या परिसराचा प्रभावच तसा होता बहुधा. त्यादिवशी टुणकीहून परतताना वाटलेली रमेची भीती.... या असल्या गोष्टींवर कधी विश्वास ठेवला नाही आपण. तिथे गेलो तेही शिशिरच्या आईंच्या इच्छेपोटी. पण शेवटी आपल्या बुद्धीला पटलं तेच केलं.
जाऊ दे. त्या गोष्टीचा फार विचार करायला नको आता.


Shraddhak
Friday, September 07, 2007 - 3:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

........ थोडीफार फळं, डॉक्टरांनी सांगितलेली औषधं घेऊन शिशिर घरात शिरला. घरात सर्वत्र भयाण शांतता दाटलेली.... हिवाळ्यातला लहान झालेला दिवस मावळतीला लागलेला. सुधा औषधांच्या गुंगीत गाढ झोपली होती.
.... ' वाढ झालेली नाहीये बाळाची आणि.... ' पुढचं बोलणं त्याला कळलंच नाही.
दोन आठवड्यांपूर्वीची रात्रीची धावपळ त्याला आठवली. रात्री बाराला त्याने सुधाला हॉस्पिटलमध्ये हलवलं होतं. डॉक्टरांनी बाळाबद्दल सांगितलं मात्र... तो मटकन खालीच बसला. ' सुधाला कसं सांभाळू मी डॉक्टर? ती वेडी होईल.... हेल्प मी... माझ्यात बळ नाहीये आता. ' तो डॉक्टरांसमोर ढसाढसा रडायला लागला.
सुधा शुद्धीवर आली तेव्हा तिने आकांत केला....
' आय लॉस्ट माय बेबी, शिशिर... मला जगायचं नाहीये..... मला मरू द्या. डॉक्टर, मला जगायचं नाहीये. डॉक्टरऽऽऽ '
तिला जवळही घ्यायचं त्राण न उरलेला तो डॉक्टर नर्सेसची धावपळ पाहात एका कोपर्‍यात सुन्न बसून राहिला.....

नुकतंच घरी आणलं होतं त्याने तिला.
' उठली होती का? '
सुधाच्या आईंनी नकारार्थी मान हलवली.
' मी बसतो काहीवेळ तिच्याजवळ... '
' बरं, मी जरा स्वयंपाकाचं बघते. '
त्या उठून बाहेर गेल्या. सुधाच्या डोक्यावरून हात फिरवत तो निःशब्द बसून राहिला.

' ईशानी... ' सुधाचा आवाज ऐकून तो चमकला.
' राणी बरं वाटतंय का? ' तो तिच्या जवळ जाऊन म्हणाला.
कसला भकास दिसत होता सुधाचा चेहरा. विस्कटलेले केस, निर्जीव डोळे...
' काही हवंय का, राणी? '
' तिने आपल्या बाळाला मारलं... ' ती अस्फुट स्वरात म्हणाली.
' अं... ' शिशिरला काहीच अर्थबोध झाला नाही.
' रमा... तिने मारलंय आपल्या बाळाला शिशिर.... तुला समजत कसं नाही? सगळे म्हणत होते ते खरंय. ती आहे... इनामदारांवर लक्ष ठेवून आहे. तिचा अपमान सहन होत नाही तिला... '
एवढ्या बोलण्यानेही तिला धाप लागली. शिशिरने तिला घट्ट जवळ घेतलं,
' राणी, शांत हो.. हे काय बोलतेयस? तुझी तब्येत नाजूक झालीये खूप... औषध.... '
सुधा स्वतःवरचा ताबा सुटल्यासारखी किंचाळलीच...
' तुला कळत कसं नाहीये शिशिर... तिने... तिनेच... हे घडवून आणलं सगळं.... तिनेच... चल... आत्ताच्या आत्ता आपण टुणकीला जाऊ... प्लीज चल... मला आई व्हायचंय शिशिर... मला आई व्हायचंय... तिच्यासमोर नाक घासेन मी... काय हवं ते करीन.. चल ना... चल ना! '
ती ओक्साबोक्शी रडायला लागली.

.... ' त्यांचं वाढलेलं वय, आधीची काही complications यामुळे हे झालेलं असू शकतं. आत्ता त्यांनी सध्याच्या परिस्थितीतून recover होण्याची गरज आहे. पुढेही योग्य काळजी घेतली तर त्या आई होऊ शकतात. '
डॉक्टरांनी त्याला बरंच समजावून सांगितलं होतं. ते त्याला हळू हळू सुधाला समजावून सांगायचं होतं.
' सुधा... असल्या गोष्टींवर आपला कधीतरी विश्वास होता का राणी? डॉक्टर म्हणाले की काही प्रॉब्लेम्स.... '
त्याचं बोलणं तसंच राहिलं....
' मला तिथं घेऊन चलऽऽऽ.... ' सुधा विचित्र किंचाळली. ' ऐक माझं... मला मूल हवंय! खरा प्रॉब्लेम तुला कळत नाहीये का? नाहीये का कळत? रमा.... कोप... सती.... '

सुधाची शुद्ध हरपली. बधीर झाल्यासारखा शिशिर तिच्याकडे पाहात तिथेच थिजून उभा राहिला.

समाप्त.


Tiu
Friday, September 07, 2007 - 3:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेवट कळाला नाही! :-(

कथा लवकर संपवल्यासरखी वाटली...म्हणजे अजुन एक दोन भाग वाढवता आले असते. रमेचा कोप वगैरे खरं वाटत नाही, पण तसं conclude करुन कथा संपवली असती तरी आवडलं असतं. रमेचा कोप वगैरे समजुती अंधश्रद्धा होत्या आणि सुधा शेवटी आई झाली असं conclude केलं असतं तर कथा जास्त आवडली असती.
पण आत काय शेवट झाला हे कळतच नाहिये!

अजुन एक...
आधीच्या part पर्यंत कथा diary फ़ोर्म मधे होती...म्हणजे सुधाची diary आपण वाचत होतो. flow पण खुप छान होता. अचानक शेवटचा part असा वेगळा का?
link तुटल्यासारखी वाटली मला तरी.


Lalu
Friday, September 07, 2007 - 5:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजच पहिल्यापासून वाचली. नेहमीप्रमाणे चांगली रंगवली आहे.

टिऊ, मला असं वाटलं, सुधा त्यावेळी आपल्या बुद्धीला पटेल तेच करते. रमेचा कोप वगैरे अंधश्रद्धाच समजून ती त्यावेळी दर्शनाला जात नाही. ती बाळासाठीही तिच्या परीने शक्य ते सगळं करते. तिला कुठलाही चान्स घ्यायचा नसतो असं आलं आहे लेखनात. पण तरीही शेवटी ती मूल गमावते, याला वेगळीच कारणे असणार अर्थातच. पण जी सहज शक्य होती ती एक गोष्ट आपण केली नाही याची तिला चुटपुट लागते. आणि सुधा हे सगळं बोलतेय तेव्हां ती त्या धक्क्यातून अजून सावरलेलीही नाही.

स्वतःचं मूल, आई होणं हा काही स्त्रियांच्या बाबतीत खूप संवेदनशील विषय असतो. सगळे प्रयत्न करुनही अशा बाबतीत अपयश येतं तेव्हा त्या मनःस्थितीत व्यक्ती असा विचार करणे शक्य आहे.


Swaatee_ambole
Friday, September 07, 2007 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालूला मोदक. कथेची नायिका खुबीने सुरुवातीपासूनच ' विश्वास नसण्याबद्दल' पुरेशी खंबीर दाखवलेलीच नाही. तिने सतीचं दर्शन न घेण्याचं तत्कालिक कारण पहा.
कथा आवडली.


Asami
Friday, September 07, 2007 - 6:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र मस्त लिहिली आहेस. प्रश्नच नाही

Zelam
Friday, September 07, 2007 - 6:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र छान आहे कथा. लालूचे विवेचनही मस्तच, त्यामुळे अधिक आवडली.
सौम्या आणि नमिताचे प्रयोजन नीट नाही कळले कथेतले. कदाचित नमिताला समोर पाहून सुधाला बाळाची प्रतिमा डोळ्यासमोर येत असावी.

टिऊ शेवटचा भाग डायरी format मध्ये नाही कारण सुधाची मनःस्थितीच नाही डायरी लिहायची.


Peacelily2025
Friday, September 07, 2007 - 6:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र, कथा छानच रंगली, मला खुपच आवडली. शेवट जरा घाइत केलास का? सुधाचे स्वतन्त्र मत असण्या विषयी प्रश्न नाहीच तिने तिच्या मनाला ज्या वेळी जे पटले तसेच केले. अन तरीही मनाच्या एका कोपर्यात जी सब्कोन्शस भिती असेल, ती बाळ गमावल्यावर प्रकट झालीच, असे वाटते. अश्या छान कथा लिहित रहा! पुढची कथा लवकर येउ देत.

Tiu
Friday, September 07, 2007 - 6:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते पटलं मला... अशा मनस्थितीत कोण डायरी लिहिणार? बरोबर आहे...

पण आतापर्यंत आपण सुधाच्या point of view नी कथा वाचत होतो... अचानक शेवटी लेखिकेच्या किंवा तिसर्याच व्यक्तिच्या point of view ने वाचतो...ते जरा odd नाही वाटत का? फ्लो जात नाही का कथेचा?

असो... बाकी कथा खुपच छान आहे. फ्लो चांगला आहे हे मी आधिच लिहिलय. (till the 2nd last part!) वेगवेगळ्या वेळच्या तीच्या feelings छान मांडल्या आहेत.

फक्त शेवटचा भाग वाचुन माझं थोडं confusion झालं...शिवाय काही conclusion पण झालं नाही!


Kmayuresh2002
Saturday, September 08, 2007 - 3:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र,मस्त झाली गं कथा.. खास तुझ्या इस्टाइलमध्ये झालीये..:-)

Smitatakalkar
Saturday, September 08, 2007 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टिउ म्हन्तेय ते बरोबर आहे,कथेचा शेवट झाला नाहि.ख़्हुप प्रश्न मनात घोलत राहतात.
Sउधचे काय झाले असेल
तिल बाल झाले का??
ति टुनकिला गेलि का
ति वेडि झलि का???
श्र द्धा तु कथेचा शेवट कर

katha ekdam Zkas hoti.
Tu ugach mood ghalvalas.


Manjud
Saturday, September 08, 2007 - 5:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा कथा फारच छान. शिशिर आणि सुधा एकदम पर्फ़ेक्ट, आजच्या युगातले प्रतिनिधी दाखवलेस. त्यांचं एकमेकातलं नातं खुपच भावलं.

शेवट असा नको होता पण कथेची मागणिच तशी होती.


Ana_meera
Saturday, September 08, 2007 - 6:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथेपुढची कथा लिही ना श्रध्दा! अंधश्रध्दा वाढेल नाहीतर..

गोष्ट चांगली आहे.


Devdattag
Saturday, September 08, 2007 - 6:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथा आवडली.. मुख्यत: शेवटात कॉम्प्रमाईज न केल्याने जास्त.
माझ्या मते.. बर्‍याचदा वाचक कथेचा शेवट गृहीत धरून वाचत असतो, आणि तो तसा नाही झाला तर एकतर त्याचा हिरमोड तरी होतो नाही तर तो गृहीत धरलेला शेवट न झाल्याने वेगळं वाचायला मिळाल्याने सुखावतो. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया येणे स्वाभाविक आहे.


Nandini2911
Saturday, September 08, 2007 - 7:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र, खूप चान खुलवलीस कथा. मी तर अजून supernatural गोष्टी येतील असं मानत होते. पण तु मात्र कायम भावनिक नातं रंगवलंस. त्यामुळे शेवट माझ्यासाठी तरी अनपेक्षित झाला.

सुरुवातीला जो तु फ़्लो ठेवला होतास तो मधेच जरा हरवल्यासारखा वाटला.. पण शेवट वाचल्यावर बरोबर लिंक लागली. शेवटी अचानक नॅरेशन सुरू झाल्यामुळे जरा मी गोंधळले. एकदम तृतीय पुरुष आणण्यापेक्षा जर शिशिरचा दृष्टीकोन आणला असता तर कदाचित इतका जर्क बसला नसता (प्रथम पुरुषच चालु राहिल्यामुळे) अर्थात हे माझं मत..

पण एकूण कथा छान होती..


Psg
Saturday, September 08, 2007 - 8:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त श्र. आवडली कथा..
मूल होत नाही तेव्हाही सुधाच्या मनात किन्तु येत नाही की 'आपण रमेच्या समाधीचं दर्शन घेतलं नाही म्हणून मूल होत नाहीये'. ते उपचारांवरच भरवसा ठेवतात. तिथेच बुद्धीला पटणार्‍या गोष्टीच करायचा खंबीरपणा दिसतो. मात्र सगळं व्यवस्थित असूनही मूल दगावतं तेव्हा रमेच्या शापाची आठवण येणं साहजिक आहे. हां.. कोणतेही उपचार न करता केवळ 'सतीचं दर्शन घेतलं नाही, म्हणूनच मूल होत नाहीये' असा विचार केला असता तर ती अंधश्रद्धा ठरली असती. पण तसं होत नाही इथे. बुद्धी आणि हृदयाचं द्वंद्व सुरेख दाखवलं आहे..


Aashu29
Saturday, September 08, 2007 - 10:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदम जबरदस्त आहे श्र, तुझी कथा!! जरा शेवट अजुन १ पार्ट असेल असे वाटते आहे तोच तुझा समाप्तचा बोर्ड वाचला, आता तू कथा वाढवण्यात अर्थ नाही, अन्धश्रधा मानण्यावर असते. परत रमेचं दर्शन घेतलं असतं तर नसतं का गेलं तिचं बाळ?


Chetnaa
Saturday, September 08, 2007 - 10:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र, छान आहे कथा... आईचं हृदय दाखवलं आहेस... आणि हृदयापुढे डोकं चालत नाही... त्यामुळे शेवटी तिला तसं वाटणं... त्या शॉकच्या अवस्थेत बरोबर वाटते..... नंतर कदाचित तिलाच ते पटणार नाही सुध्दा... दोन्ही शक्यता असु शकतात...

Mrinmayee
Saturday, September 08, 2007 - 2:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रध्दा, अगदी शेवटासगट कथा आवडली! प्रसंगानुरुप बुध्दी मनावर आणि मन बुध्दीवर मात करतं... सुंदर शब्दचित्र!

Prajaktad
Saturday, September 08, 2007 - 7:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र!कथा आवडली... पुनम ला अनुमोदन!.

Daad
Monday, September 10, 2007 - 1:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्रिनमयीला अनुमोदन- 'प्रसंगानुरुप बुध्दी मनावर आणि मन बुध्दीवर मात करतं... सुंदर शब्दचित्र! '
अंधश्रद्धा, श्रद्धा सुद्धा मानण्यावरच आहे. सुधाची मन:स्थिती अतिशय सुंदर शब्दात मांडली आहेस, श्रद्धा.
तुझ्या पुढच्या लिखाणाची वाट बघते, छान लिहितेस.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators