Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 06, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » भाद्रपद » कथा कादंबरी » रेहान... » Archive through September 06, 2007 « Previous Next »

Chaffa
Thursday, August 23, 2007 - 2:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी चालु दे! मी copy करतोयच पण आता सलग जोडुन वाचायला छान वाटतय.

Abhijat
Friday, August 24, 2007 - 8:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथेच्या लिंक सोबत new tag बघून नवीन भाग आला अश्या आनंदात लिन्क उघडली पण कस्चे काय! :-(

Sush
Friday, August 24, 2007 - 9:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिजात, माझहि आत्ता तसच झाल.
लिन्क उघडलि आणि तुमचे मेल. अपेक्शा भन्ग झाला. (अरेरे आता परत असेच होणार कोणितरि येउन लिन्क उघडणार आणि माझे पोस्ट पाहुन त्या व्यक्तिचा पण अपेक्शा भन्ग होणार)


Arati7
Friday, August 24, 2007 - 10:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्च$...........
खरच सुश माझा पण तेच झाल यार :-(


Kashi
Friday, August 24, 2007 - 10:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुश..तुम्हाला मोदक...मी पण धावत आले न्युचा टग वाचुन.. नंदिनी........:-( :-(

Sush
Friday, August 24, 2007 - 10:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला आल्यासरशी कथा नाहि पण एक मोदक तरि मिळाला.
काशी अहोजाओ नका करु मला.


Madhavm
Friday, August 24, 2007 - 11:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुकाराम कुठे आहात ? मागल्या वेळेस तुम्ही दिनेशची कथा पुढे चालू केली होतीत आता ही पण पुढे चालू करा बघू :-)

Kayrao
Friday, August 24, 2007 - 12:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Admin - New tag मधे Differentiate करु शकतो का ? , Whether the story updated by writer or reader , this will help

Nandini2911
Saturday, August 25, 2007 - 1:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"हेलो, सरस्वती है?" पलीकडून आवाज आला.
"कोण सरस्वती?" तिने उत्तर दिलं.
"सरस्वती, जो आपके यहा काम करती है."

आता तिला आठवलं.
"ओह, सरस्वती कुलकर्णी. ती तए केव्हाच सोडून गेली. जवळ जवळ चार महिने झाले असतील." रेहानच्या हृदयाचा ठोका चुकला.
"किधर गयी?"
"ते तर मला माहीत नाही. मी इथे जॉईन होऊन दोन महिने झालेत."
"कोई उसके बारे मे कुछ information दे सकता है?" त्याने विचारले.

"कोण बोलतय?" पलीकडून एकदम पुरुषी आवाज ऐकून रेहान दचकला. फोन ट्रान्स्फ़र करायच्या आधी सांगायचं तरी...
"कौन बात कर रहा है?" त्याने विचारलं.
"मी जाधव बोलतोय. तुम्ही कोण?"
"मी रेहान.. सरस्वतीचा..."
"हो हो हो. तुम्हीच का ते रेहान. अरे आज बोलायला मिळालं. सरस्वती तुमच्याबद्दल बोलताना थकायची नाही. कसे आहात? आणि आमची सरस्वती कशी आहे?"
"तेच विचारायला मी फोन केलाय. सरस्वती कुठे आहे?"

"थट्टा करू नका राव. अहो, बारावीची परीक्षा झाल्यावर दुसर्‍या दिवशी मुंबईला गेली. तुमच्या घरी... मजेत आहे ना?"
"पागल है क्या? ती कधी आली माझ्या घरी. I was out of country for six months. माझा आणि तिचा काहीच contact नाही. ती कुठे आहे हे तुम्हाला माहीत आहे ना?" त्याने जरा चिडून विचारलं.

"कशावरून तू रेहानच बोलतो आहेस? सरस्वती रेहानसोबत गेली आहे. इतकंच मला माहीत आहे. बाकी ती जाणे आणि रेहान. परत इथे फोन करू नकोस."
जाधवानी जोरात रीसीव्हर आपटला.

कुणीतरी जोरात कानाखाली माराली असं रेहानला वाटलं. पण त्याच्या मनात प्रश्नाचं जाळं पसरलं. सरस्वती गेली तर कुठे गेली? आणि जाताना माझ्यासोबत जाते हे सांगून का गेली?

"ओह" तो हलकेच म्हणाला. सरस्वती नक्कीच मुंबईला आली असणार. सुधीर देशपांडेनी तिला नोकरी दिली असणार. मुंबई खूप मोठं शहर होतं. पण तरीही सरस्वतीला शोधून काढणं कठीण नव्हतं.

त्याने फोन उचलला. "हेलो, कासिमचाचा.. मुंबई का आजका हर newspaper लेके आओ. मराठी आणि एंग्लिश. ताबडतोब."

सरस्वती केळकर हे नाव ऑलरेडी बायलाईन घेत असेल याची त्याला पूर्ण खात्री होती.






Aktta
Saturday, August 25, 2007 - 3:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभारी आहोत....
चांगलाच वळसा घेतला आहे कथानका ने.......
असच काय तरी बोलतातना...
एकटा.....


Athak
Sunday, August 26, 2007 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

याला 'कहानीमे ट्वीस्ट 'म्हणत्यात :-)

Ana_meera
Monday, August 27, 2007 - 9:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कसू twist नथी!!!
लवकर पूर्ण करा हो नंदिनीजी!!!
आठवड्यानंतर मोठा तरी भाग घाला ना, जमल्यास!!!!!


Rakhee
Monday, August 27, 2007 - 5:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सरस्वतीच आडनाव केळकर च कुलकर्णी कस झाल रेहान आणि वीर ला झासा देऊन तिनी दुसर्‍या कोणाशी लग्न केल का :-)

Nandini2911
Tuesday, August 28, 2007 - 6:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राखी, धन्यवाद.
वाचकहो, सरस्वती अजूनही केळकरच आहे. चुकुन ती कुलकर्णी झाली आहे. गडबडीत टाएप केल्यामुळे चूक झाली आहे. :-) मला वाटतं आडनावं बदलायची मला सवय झाली आहे, (ती पण दुसर्‍याची.)



Himscool
Tuesday, August 28, 2007 - 6:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी तुला स्वत:चे आडनाव बदलण्याची फारच घाई झाली आहे असे वाटते आहे...

Sush
Tuesday, August 28, 2007 - 7:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनि तुमचे आडनाव बदलण्या आधीतरी कथा पुर्ण करा.

Manogat
Tuesday, August 28, 2007 - 10:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळा घोळ कथानक लवकर पुर्ण न केल्यामुळे होत आहे नंदु तुझी अडचन समझु शकतो ग पण आता कथा रेंगाळते आहे. नेहमीच कथेचा छोटासा भाग post केलेला असतो. वचकाची हिरमोड होते ग त्याने. जर कथा पुर्ण आहे तर एकदमच post का नाही करत. please dont take it wrong we are waiting for the story

Ana_meera
Wednesday, August 29, 2007 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाचकांना १ नम्र विनंतीSSSS
comment पोस्ट करू नका होS हिरमोड होतो गोष्टी ऐवजी comment वाचून!!
आताही खूप लोकांचा होणार आहे. sorry


Nandini2911
Wednesday, August 29, 2007 - 3:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डायरी वाचता वाचता वीरेने मधेच बंद केली. गाडी कुठल्या तरी सिग्नलला थांबली होती. बाहेर कुणीतरी एक नागडं पोरगं भीक मागत होतं. त्याने दहाची नोट काढून त्याला दिली. कधी कधी वाटायचं, जर त्याच्या आईने त्यालापण असंच उकीरड्यावर टाकलं असतं तर.... किती वेगळं आयुष्य झालं असतं.

कसंही आयुष्य असतं तरी इतकं कठीण नक्कीच नसतं. थोडंतरी सोपं सुटसुटीत जरूर असतं. पण जर तरच्या गोष्टी खर्‍या आयुष्यात काय कामाच्या?

त्याने परत डायरीकडे पाहिलं. रेहान सरस्वतीला शोधत होता. याचा अर्थ.. एक मिनिट काहीतरी गडबड होती. ही डायरी रेहानची नव्हती. मग त्यामधे रेहानची ही आठवण कशी काय आली?? रेहानने सरस्वतीला सांगितलं? पण तेही शक्य नाही. कारण जेव्हा सरस्वती आणि रेहान भेटतील तेव्हा रेहान स्वत्:चं नाव देखील सांगण्याच्या स्थितीत नसेल. मग हे कसं शक्य आहे? काहीतरी घोटाळा नक्कीच होत होता.

वीरेने सपासप मागची पाने चाळली. आतापर्यंत रेहान असा कधीच भेटला नव्हता. कायम तेव्हा तेव्हा आला जेव्हा सरस्वती त्याला भेटली होती. सरस्वतीशिवाय त्याचं काहीच अस्तित्व नव्हतं. मग आता अचानक रेहान.... सरस्वतीला शोधतो?

सरस्वतीने रत्नागिरी सोडताना सर्वाना सांगितलं होतं की ती रेहानबरोबर जातेय. कारण तिला भलते सलते प्रश्न विचारले असते. आश्रमातून तिला सोडलं नसतं. म्हणून तिने रेहानबरोबर लग्न करणार असल्याचं सर्वाना सांगितलं होतं. आणि लग्नानंतर दुबईला सेटल होणार असल्याचंही.

अर्थात सरस्वती खोटं बोलत होती. यात वीरला आश्चर्य वाटण्यासारखं ही काही नव्हतं. पण तरीही वीरला सरस्वतीच्या डायरीमधले हे पान जरा वेगळं वाटलं. हलक्या हाताने ते पान त्याने कोपर्‍यात दुमडलं. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला.
नंबर रसिकाचा होता.
"हा मा बोल..... " पण पलीकडे रसिका नव्हती.
"काय? कसं शक्य आहे? थांब मी येतो तिकडे." त्याने ड्रायव्हरला गाडी परत साराच्या फ़्लॅतवर घायला सांगितली. ताबडतोब.


Kunal1259
Thursday, September 06, 2007 - 9:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी कथा खुपच छान चालली आहे...पण फारच.. हळु सरकतेय.. जरा लवकर लवकर पोस्ट टाकले तर अजुन मजा येईल...प्लिज जरा लवकर पोस्ट टाक...




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators