Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
रेहान...

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » भाद्रपद » कथा कादंबरी » रेहान... « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through June 05, 200720 06-05-07  12:53 pm
Archive through June 12, 200720 06-12-07  5:42 am
Archive through June 25, 200720 06-25-07  9:16 pm
Archive through July 02, 200720 07-02-07  7:51 am
Archive through July 12, 200720 07-12-07  1:47 pm
Archive through July 19, 200720 07-19-07  9:42 am
Archive through July 31, 200720 07-31-07  6:59 pm
Archive through August 10, 200720 08-10-07  12:07 pm
Archive through August 19, 200720 08-19-07  10:42 am
Archive through September 06, 200720 09-06-07  9:43 am
Archive through September 26, 200720 09-26-07  12:54 pm
Archive through October 03, 200720 10-03-07  7:57 pm

Swapna_nadkarni
Wednesday, October 03, 2007 - 11:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Nandini, Please finish it fast..नाहीतर तर्क वितर्क करुन मला वेड लागायची वेळ येइल...

Sampadak
Thursday, October 04, 2007 - 4:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



"नक्षत्रांचा साज लेऊनी, रात्र अंगणी आली
दीप उजळले नयनी माझ्या, ही तर दीपावली"


प्रकाश आणि चैतन्याचा उत्सव म्हणजे दिवाळी! आनंद आणि उत्साहाचे उधाण म्हणजे दिवाळी! प्रेमाचा आणि सौहार्दतेचा पुरस्कार म्हणजे दिवाळी! तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीची आणि संपन्नता, सौख्य व संस्कृतीच्या पावलांवर चालत येणारी दिवाळी आता जवळ येऊन ठेपली आहे. दिवाळीचे मुख्य आकर्षण म्हणजे आपल्या मायबोलीचा दिवाळी अंक. गेली सात वर्षं आपला अंक अधिकाधिक बहारदार होत चालला आहे. याचे पूर्ण श्रेय अर्थात मायबोलीकरांच्या प्रतिभाशाली योगदानाला आहे.

यावर्षीचा दिवाळी अंकही या परंपरेत एक पुढचे पाऊल ठरेल यात आम्हाला शंका नाही. अंकाची तयारी जोरदार सुरु आहेच. मायबोलीवरचे सर्व साहित्यिक, कवी, चित्रकार, छायाचित्रकार, कलाकार, व्यासंगी आणि ज्ञानी सभासद दिवाळी अंकात उत्स्फूर्तपणे भाग घेतील व अंकासाठी आपल्या प्रवेशिका पाठवतील अशी आशा आहे. अशा या सर्वांना म्हणजेच तुम्हाला पुन्हा एकदा आवर्जून निमंत्रित करण्यासाठी ही एक आठवण. तुमच्या प्रवेशिका २४ ऑक्टोबर पूर्वी आमच्यापर्यत पोचल्या पाहिजेत. म्हणजेच येत्या वीस दिवसात!

तेव्हा, 'सावकाश लिहू', किंवा 'मनात आहे पण शब्दात नाही' यासारख्या विचारांना (वाचा सबबींना) थारा न देता लवकरात लवकर आपले साहित्य नवीन मायबोलीवर उपलब्ध असलेला "दिवाळी अंक लेखन" हा दुवा वापरुन पाठवा. आपले प्रश्न किंवा शंका संपादक मंडळाकडे जरुर पाठवा. धन्यवाद!


Sush
Thursday, October 04, 2007 - 4:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनि ह्या टिउने सगळ्याना स्क्रिझोफेनिक बनवायच्या अगोदर कथा पुर्ण कर.

Arc
Thursday, October 04, 2007 - 8:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

loop schizophrenia !!!

कल्पना झकास आहे.


Lampan
Friday, October 05, 2007 - 8:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

tiu लै भारी ....

Nandini2911
Friday, October 05, 2007 - 10:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टीऊ.. मी काय म्हणते.. तो वीर आहे ना... तो जर स्किझोफ़्रेनिक असेल आणि ही सर्व त्याची कल्पना असेल तर...

Ana_meera
Friday, October 05, 2007 - 10:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काई पण चालेल. पण नंदि, लिही ना ग पटापट?

Mi_anu
Friday, October 05, 2007 - 11:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता सगळे जण अमका स्किझोफ्रेनिक आहे, तमका आहे असे तर्क लढवतायत तर माझा पण एक तर्क:
सुधिर देशमुख स्किझोफ्रेनिक आहेत..त्यांच्याकडचे सगळे पत्रकार बोर आहेत, त्यामुळे अशी एखादी फटाकडी पत्रकारीण असावी या त्यांच्या कल्पनेतून साराचा जन्म झाला आहे.. आणि साराची प्याशन कामाबद्दल इतकी जबरदस्त का या त्यांनाच पडलेल्या प्रश्नातून वीर कपूर, प्रिया,रेहान, गजाकाका यांचा जन्म झाला आहे.
(कथेत फक्त देखमुख आणि धवन एवढीच पात्रे खरी आहेत!!)
हाहाहा. कृपया हलकेच घ्यावे.


Chinnu
Friday, October 05, 2007 - 7:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे तिला लिहु द्याल की STY करणार आहात इथे! :-)

Tiu
Friday, October 05, 2007 - 8:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता फक्त betting चालु व्हायचं बाकी आहे इथे! ;)

Tiu
Friday, October 05, 2007 - 8:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो वीर आहे ना... तो जर स्किझोफ़्रेनिक असेल आणि ही सर्व त्याची कल्पना असेल तर...
>>>

काहीही...लोकांना काही कळतच नाही. काहीपण लिहितात. आम्ही बघा कसे लॉजिकल गेस करतो! :D

नंदिनी. दिवे घे ग! आणी लवकर पुढचा भाग पोस्ट कर. नाहितर सगळ्यांचा अजुन एक एक guess is on the way!!! :-)


Nandini2911
Saturday, October 06, 2007 - 12:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साराने रेहानला मदत करायचं ठरवलं होतं. तिच्या आईवडीलापेक्षा तिला फ़ैजलचाचा जवळचे होते. कित्येकदा घरामधे आईवडलाची भांडणं झाली की ती सरळ त्याच्या घरी जायची.

रेहानसोबत खेळायची. भटकायची. तारे बघायची.

आज त्याच रेहानला या अवस्थेत बघावं लागत होतं. कुठं काय चुकलं होतं ते समजत नव्हतं. जर त्याच वेळेला रेहानला समजून घेतलं असतं तर... पण त्याचं हे सरस्वती बद्दल त्याने कुणालाच सांगितलं नव्हतं. आणि जेव्हा सर्वाना समजलं होतं तो पर्यंत रेहान व्यसनाधीन झाला होता.
"या केसेस मधे बर्‍याचदा हे बघायला मिळतं. हे लोक जेव्हा सत्य आणि कल्पना याचे गल्लत करू लागतात तेव्हा त्याचा सर्वात जास्त त्रास त्यानाच होतो. जसं की या केसमधे आपल्या लक्षात येईल...." रेहानचे डॉ शर्मा साराला आणि वीरला सांगत होते. "रेहानने सरस्वतीची कल्पना फ़ार लहानपणापासून आणली आहे. मात्र त्याबद्दल त्याने कुणालाच सांगितलं नाही. सारा ही त्या कल्पनेमागची प्रेरणा होती. जेव्हा सारा रेहानच्या आयुष्यातून निघून गेली तेव्हा अर्थातच सरस्वती पण निघून गेली. आणी मग पुढे काय या प्रश्नाने त्याला छळलं. त्याने प्रश्नाची उत्तरे शोधायचा प्रयत्न केला. पण हाती काहीच लागलं नाही. आणि मग सुरू झाला दुसरा आजार. डीप्रेशन. त्यातून मग आधी दारू, आणि मग कोकेन. दुर्दैवाने या गोष्टी आपल्याकडे सर्रास उपलब्ध व्हायला लागल्या आहेत." शर्मा बोलत होते. सारा एकटक ऐकत होती. वीरच्या डोक्यात वेगळंच विचारचक्र चालू होतं.
"जेव्हा रेहानच्या वडलाना समजलं तेव्हा त्यानी रेहानला घरात बंद करून ठेवलं. त्याचं रेहानवर खूप प्रेम आहे. पण त्याच्याअ या वागण्यामुळे रेहान सुधरला नाही तर बिघडला. कुठलाही ड्रग ऍडिक्ट जोपर्यंत ड्रग्ज मिळत असतात तोपर्यंत शांत असतो. आणि जेव्हा त्याला ते मिळत नाही तेव्हा तो हिंसक बनू शकतो. रेहानने हेच केलं. He almost killed his father. "

"नो.." सारा म्हणाली. तिच्या चेहर्‍यावर आश्चर्य दिसत होतं.वीरने तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला.
"विश्वास ठेवणं कठीण जातं हे मलाही मान्य आहे." शर्मा म्हणाले. "तेव्हापासून रेहान इथे आहे. खूप इंप्रूव्हमेंट आहे त्याच्यामधे. आता आम्हाला त्याच्याविषयी अंधुकशी का होईना आशा आहे."
"म्हणजे तो ठिक होऊ शकतो?" वीरने विचारले.
"बर्‍यापैकी." शर्मा हसत म्हणाले.
"थॅंक गॉड.." सारा नि:श्वास टाकत म्हनाली.
"हो पण त्यासाठी सारा मला तुझी मदत लागेल. रेहानला तू नक्केच बरं करू शकशील." शर्मा म्हणाले.


Nandini2911
Saturday, October 06, 2007 - 1:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साराने त्यादिवशी रसिकाला फोन केला.
"ममा... मला खूप चिंता वाटतेय. माहित नाही. पण असं उगाच घाबरल्यासारखं होतय.."
"घाबरतेस कशाला? ट्रीटमेंट तुझी थोडीच आहे? आणि तू तर मदत करतेयस. चांगलं काम करताना टेन्शन कसलं घ्यायचं.?" रसिकाचा नुसता आवाजच इतका आश्वासक होता.
"बघा ना, वीर पण नेमका इथे नाहीये. तो असता तर मला कशाचीच भिती वाटली नसती..."
"अगं, त्याचं कामच असं असणार. तसाही तो असून त्याने काही केलं नसतं... उलट तुला जास्त टेन्शन आलं असतं.. "

रेहानच्या ट्रीटमेँटचा हा नवीन भाग डॉ शर्मा आजपासून सुरू करणार होते. अर्थात साराने याबात कुणालाच काही सांगितलं नव्हतं. सुधीरजीना पण नाही.
पण तिने रसिकाला मात्र सांगितलं होतं. वीर नको म्हणत असतानाही. सरस्वतीची डायरी वीरने रात्रंदिवस बसून वाचून काढली. सरस्वतीचे कॅरेक्टर स्केच त्याने बनवलं. सारा आणि सरस्वतीमधे काय फ़रक आहे हे लिहून काढलं.

रेहानने साराला त्याच्या कल्पनेच्या जगात सरस्वती बनवलं होतं. वीर सत्यामधे साराला सरस्वती बनवत होता.

साराने सकाळचा वेळ या ट्रीटमेंटसाठी ठेवला होता. दुपारी परत ऑफ़िस. सकाळी फ़ैजलचाचा रोज तिला न्यायला येणार होते. आणि दुपारून ऑफ़िसला सोडणार होते. रोज एक तासाचं तरी किमान सेशन करायचं असं डॉ शर्मानी सांगितलं होतं. सारा मनातून फ़ार भेदरली होती. पण वीरने तिला धीर दिला होता.

सकाळी सारा निळ्या रंगाचा सलवार कमीझ घालूउन फ़ैजलचाचाची वाट बघत बसली होती. काय बोलायचं कसं बोलायचं हे सर्व वीरने तिला लिहून दिलं होतं. पण नेमकं आज त्याचं आऊटदोर्‍अचं आज शूट होतं. तिने त्याचा नंबर परत एकदा ट्राय केला. नॉट रीचेबल.

फ़ैजलचाचानी दरवाजाची बेल वाजवली...
"नीहा हे मला जमणार नाही...." तिच्या मनात एक विचार चमकून गेला. काही चूक झाली. आणि रेहानचा यात नाहक जीव गेला तर काय.....

तिच्या डोळ्यासमोर महिन्याभरापूर्वी हॉस्पिटलमधे पाहिलेला रेहान तरळून गेला. आणी दुसर्‍याच क्षणी तिला सुर्यास्ताच्या रंगात तिच्या डोळ्यात बघत सांगणारा..
"एक जिग सॉ पझल है... जिसके हम दो टुकडे है..."

साराने देवाओउढे दिवा लावला. एकतर हे तुकडे आता जोडले गेले असते किंवा कायमचे मोडले असते..




Ana_meera
Saturday, October 06, 2007 - 1:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुखद आश्चर्य!!! चक्क दोन भाग...
सोमवारी...........


Arc
Monday, October 08, 2007 - 6:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक शंका. डायरी साराकडे कधी आणि कशी आली.schizophreniaमधे एक character imagine करने समजु शकते पण सरस्वतिच्य आयुश्यात इतकि characters आहेत ति सगळिच्या सगळि रेहनने imagine केलि असतिल तर फ़र acute schizophrenia आहे.

Dmugdha
Monday, October 08, 2007 - 11:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Please comlete the story.

Zakki
Monday, October 08, 2007 - 5:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

comlete म्हणजे काय?

म्हणजे मराठी नाही तर नाही, पण इंग्रजी तरी जरा .. .. .. ?


Dmugdha
Tuesday, October 09, 2007 - 5:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sorry for spelling mistake.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators