|
Bee
| |
| Tuesday, September 04, 2007 - 2:37 am: |
|
|
बा देश केलयं की मी त्याचं कौतूक... दंश घेऊन करावं असे म्हणतोस का
|
Mankya
| |
| Tuesday, September 04, 2007 - 3:20 am: |
|
|
परागकण .. मोहळ मस्तच ! श्यामलीला मोदक ! झाड ..' बळ ' झेपली नाही यार ! लोपा .. धन्यवाद ! श्यामली .. लांबली म्हणतेस होय, पण मला तर एक जरी ओळ काढली तर ती अपुर्णच वाटयला लागत्ये ! पण तू म्हणतेच आहेस तर ... ! माणिक !
|
कल्पना ... मी तुमची कविता इतकीच वाचली . एकटी असूनही मलाच नसते जागा माइया आभाळा एव्हढ्या मनामध्येही...... आणि आवडली . सुमेधा .. तुम्ही लवकरच गज़ल लिहायला लागणार असं दिसतंय . माणिक .. कविता लांबली का असं जेव्हा एखाद्या वाचकाला वाटतं तेव्हा मी दोन अर्थ घेतो . एक म्हणजे जे म्हणायचय तेच तेच अनेकदा घोळवलं गेलंय किंवा जे म्हणायचय ते खूप उशीरा म्हटलं गेलंय . आणि लयीत नसलेल्या कवितांना खूप कडवी असली की वाचकाचा रसभंग होतो . ह्या तीनही धर्तीवर विचार करून बघ . अनावधानाने परके बीज येऊनी अट्टाहासाने मुरते सल होऊनी रुजते आत अन शल्य बनूनी अंकुरते ह्या मला आवडलेल्या ओळी . आणि शेवटही . छान . लिहीत रहा . पीके . बडे दिनों बाद ? परवाच स्वातीशी चर्चा करत असताना we were amazed to find out how two words sound almost same विषय माझ्या एका कवितेतल्या " विधातालिखित काही कविता " ह्या ओळीचा होता . हे almost "विधीलिखित " सारखं वाचताना वाटत राहतं आणि तो ( ही ) अर्थ अभिप्रेत आहेच , त्यामुळे गंमत वाटली . तसंच मी सकाळपासून तुझ्या कवितेतला " प्राणांतिक " वाचताना मागे " प्रामाणिक , प्रामाणिक " असा पण आवाज येतोय आणि माझ्यामते तो ही अर्थ हवाच आहे . कविता आवडली हे सांगणे न लगे . झाडा .. निसटून जाई जांभईतुनी अन उचकीमागच्या अनामिकाचे अकारणाच्या नेत्री का'जळ' काय विशेष ? कुणीतरी आठवण काढतंय का ?
|
Bairagee
| |
| Tuesday, September 04, 2007 - 6:29 am: |
|
|
वैभव, निर्व्याज शब्दांच्या वेशात हिंडणाऱ्या अतिरेक्यांची कविता मस्त आहे. परागकण, छोटी पण नेटकी वेल-राउंडेड कविता आहे. झाड, पहिल्या तीन ओळी आणि "अकारणाच्या नेत्री का जळ" आवडले. मी आनंद, "नितळ वाहत्या जळांत फिरतो/ वेडा मासा गर गर गर गर" वाव्वा. फारच मस्त. एकंदरच द्विरुक्तींचा वापर आवडला. छान.माणिक सरळ मुक्तछंदाचा वापर करायला हवा होता असे माझे मत. कल्पना चांगल्या आहेत.
|
Sumedha Chhan kavita.. donhi manogat chhan mandali ahes. Manik as usual chhan. Anand paus....!!! pavasachya sagalya kavita chhan asatat. paus jasa tharavun yet nahi tashya pavasachya kavita tharavun lihita yet nahit.. tya barasatat.. mast... themb them paus mhanaje themb themb gaN themaba themba ne abhalach dharativar yeN. Pkya... pranatik dansh hi chalel pan lihit ja... barech diwasani?? tya madhachya aunshabaddal ek savistar mail kar baghu.. Zaad no zeps...
|
Sumedhap
| |
| Tuesday, September 04, 2007 - 10:45 am: |
|
|
सर्वांचे मनापासुन आभार....प्रतिक्रिया मिळाल्यावर पुढच्या रचानांसाठी फार मदत होते...आणी हेच मायबोलीचे वैशिष्ट्य आहे....
|
तुझ्या सोबतीत प्रत्येक दिवस अपुरा तुझ्या विना प्रत्येक क्षण अधुरा तुझ्या बरोबर असताना श्वासांचा विसर पडतो तुझ्या विना श्वास नकोसा वाटतो तुझ्या संगतीतील प्रत्येक श्वासात तुझाच गंध आहे आज पर्यंत मी त्या गंधावरच जगतो आहे तुझ्या सहवासात जगाचा विसर पडतो तुझ्या विना तुझ्या आठवणींवर जगतो. तुझ्या सहवासात पहिल्या पावसाच्या सरी पडतात तुझ्या विना जगताना हृदयामध्ये दर्या पडतात तुझ्या सोबत जगताना शांत मंद झरे वाहतात तुझ्या विना तेच झरे डोळ्यातले धबधबे होतात तुझ्या सहवासात मनात आनंदाच्या लाटा येतात तुझ्या विना मनामध्ये वादळांवर वादळे येतात ऋतु येतात, ऋतु जातात निसर्गात बदल होतात तू येतेस, भेटुन जातेस मनाची उलथापालथ होते तुझ्या संगतीत जगताना एक जन्म अपुरा वाटतो तुझ्या विना जगताना क्षणही आयुष्या सारखा वाटतो तुझ्या सोबत जगताना जगण्याचा अर्थ कळला तुझ्या विना जगताना मी कोण हा प्रश्न पडला
|
नमस्कार लंडनमध्ये परवा झालेल्या आनंदाचं गांव च्या प्रयोगाची एक छोटिशी झलक ( video ) पुढे दिलेल्या पत्त्यावर upload केली आहे. कशी वाटतिये ते जरूर कळवा! http://www.sadha-sopa.com/?q=node/214
|
Paragkan
| |
| Wednesday, September 05, 2007 - 1:58 am: |
|
|
धन्यवाद मंडळी! सत्यभाय ... तुमीच एक 'संदर्भासहित स्पष्टीकरण' लिखो. मला हल्ली परिक्षा द्यायची नाही ... घ्यायची सवय लागली आहे.
|
ह्या देहामधुनी.... ह्या देहामधुनी... कधी उमलती गाणी झरझर झरते कधी... नयनामधले पाणी हा देह दावतो काम, क्रोध अन मोह आगर पूण्याचे... वा पापाचा डोह हा देहच दिसतो... कधी दिसेना आत्मा वलयात गूढ जणू दडलेला परमात्मा हा देह दावतो सत्त्व, तत्त्व अन माया हा देहच रचतो... ब्रम्हांडाचा पाया
|
Vaisanty
| |
| Wednesday, September 05, 2007 - 1:03 pm: |
|
|
द्वैतातुनी हा उगा जन्म फिरतो गतिमागुती ये पुन्हा स्तब्धता कधि अर्थ साकारितो शब्दवाही कधि शब्द सांभाळितो सांगता
|
वैभव, ' तिथी' आणि ' अतिरेक' दोन्ही अप्रतिम! पराग, ' मोहोळ' सुंदर. झाड, ' मेघ असा की कोसळतो जो मृगजळ केवळ..' वा! कश्याला त्या काचेच्या आणि काजळाच्या खेळात अडकलास? त्या अवरतणांनी रसभंग होतोय असं माझं मत. वैशाली, ' द्वैत' छान आहे.
|
Sudhir_p5
| |
| Thursday, September 06, 2007 - 4:12 am: |
|
|
जयन्त फ़रच छान कवित आहे
|
Zaad
| |
| Thursday, September 06, 2007 - 4:41 pm: |
|
|
बळ या कवितेबद्दल खरं तर न समजणार्या कवितांबद्दलचीच ही कविता आहे! कित्येक कलाकृती अबोध, गूढ असतात. अर्थ समजत नसला तरी त्यांचा एक विशिष्ट परिणाम आपल्यावर होत असतो. वैयक्तिक माझ्यावर जेव्हा असा परिणाम होतो, तेव्हा त्याचे प्रतिबिंब माझ्या कवितांवरती उमटते असं मला या कवितेतून सांगायचंय. हा आशय झाला. आता या कवितेतील प्रतिमा आणि या कवितेची संहिता यबद्दल्: पहिल्या कडव्यात अशा अबोध गोष्टी निर्माण करणार्या निर्मिकाबद्दल भाष्य केलंय. आकाश धरेला टेकतं त्या जागेला सर्व प्रथम क्षितीज म्हणून कुणी म्हटलं असेल? मुळात तिथं काहीही नसताना त्या जागेला क्षितीजरेखा म्हणून तिथं काहीतरी आहे असं भासवणारा निर्मिक.... त्याने मेघ मागितला तरी त्यातून मृगजळच कोसळेल. तर असा हा अनेक सुंदर (माझ्या दृष्टीने) भास निर्माण करणारा निर्मिक. त्याला समजून घ्यायला गेलं तर ते जमत नाही. एखाद्या अवघड विषयाचं लेक्चर असावं, सगळं डोक्यावरून जातंय, अशावेळी जांभई येते आणि नेमकं त्याच वेळी असं एखादं वाक्य निसटून जातं की ज्याने खूप काही समजलं असतं तर त्याप्रमाणेच या निर्मिकाची रचना समजून घेताना ती एखाद्या चुकार जांभईत (समजून घेण्यातला कंटाळा) निसटून जाते. उचकी लागली साधी तरी कुणीतरी आठवण काढतंय म्हणून कोण हळवं झालं असेल सगळ्यात आधी भावभावनांचे हे सुंदर खेळ निर्माण करणारा हा निर्मिक. डोळ्यात काजळ घालतो सौंदर्यासाठी, या अशा भावनांच्या खेळामुळे सौंदर्यनिर्मिती होते हा अर्थ दुय्यम राहून मुख्य अर्थ डोळ्यात का जळ? अधोरेखित व्हावा म्हणून इथे अवतरण हवं. नुसतं डोळ्यात काजळ म्हणून सोडून दिलं तर त्यातला श्लेष समजला तरी मुख्य अर्थ कुठला घ्यायचा किंवा पहिला अर्थ कुठला घ्यायचा त्याचं स्वातंत्र्य वाचकाला मिळतं. मला अभिप्रेत असलेला मुख्य अर्थ वाचकाने आधी घ्यावा म्हणून ते अवतरण. तर अशा ह्या निर्मिकाचा प्रभाव माझ्यावर पडतो आणि त्यातून निर्माण झालेल्या कलाकृतींचा अर्थ लावण्याचे बळ माझ्यात असतेच असे नाही! निर्मि'काचे' मधलं अवतरण केवळ त्यात काच हा शब्द आल्याने आणि पुढे कवडसे ही प्रतिमा असल्याने घेतलेला नाही. निर्मिकाचे कवडसे पडणे आणि मुळात या शब्दातच काच हा शब्द येणे ही गोष्ट या कवितेत निर्माण झालेल्या वातावरणामुळे निव्वळ योगायोग नसून ती एक लक्षणीय बाब आहे असं मला लिहिताना वाटलं आणि अजून मी त्याच मूडमध्ये असल्याने मला ते अवतरण हवेसेच वाटत आहे. लयीत वाचताना रसभंग होतोय की अर्थाच्या दृष्टीने, स्वाती?
|
>>> अर्थ कुठला घ्यायचा त्याचं स्वातंत्र्य वाचकाला मिळतं. मला अभिप्रेत असलेला मुख्य अर्थ वाचकाने आधी घ्यावा म्हणून ते अवतरण. Precisely!! झाड, प्रथम सविस्तर विवेचन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. रसभंग वाटला तो अर्थाच्याच दृष्टीने. (' लय' अशी नाहीये कवितेला.. किंवा मग माझ्या लक्षात आलेली नाही.) तुला अभिप्रेत असलेला अर्थ कितीही सुंदर असला तरी तो असा अधोरेखित करून उलट तू (what defines it, confines it या न्यायाने) त्या कवितेच्या व्याप्तीवर मर्यादा घालतोयस असं नाही का वाटत तुला? म्हणजे तू जरी ' न कळणार्या कवितांबद्दल' लिहायला घेतलंस तरी माझ्याशी ही कविता एकूणच निर्मितीबद्दल (including विश्वाची निर्मिती), तिच्या मागच्या अनाकलनीय प्रक्रियांबद्दल आणि प्रेरणांबद्दल बोलते आहे. मग निर्मिक ही काचच का? त्या प्रकाशाचा उगम असलेला जो आद्य निर्मिक, तो ही तितकाच गूढरम्य नाही का? आयुष्यही असंच अर्थ शोधू जाता हातून निसटून जाणारं नाही का? तरीही जगत रहाण्याची, आल्या गेल्या क्षणांमधली संगती शोधत रहायची उर्मी ही भासमान क्षितीज आखून मृगजळ मागण्याइतकीच वेडी आणि तरीही ह्रद्य नाही का? असो. मला या कवितेनी खूप आनंद दिला. तेव्हा ही अशी चिरफाड करून तिचा अपमान करणं योग्य नव्हे. तुझी अवतरणं तुझ्यापाशी आणि मला सापडलेला अर्थ माझ्यापाशी. जाता जाता, तुझ्या मृगजळावरून ही कुसुमाग्रजांची भावकणिका आठवली : हे ह्रदय नसे परि स्थंडिल धगधगलेले आशांचे इंधन ज्यावर अखंड चाले हे जीवन की हे मृगजळ एक विराट मृग आर्त धावती दूर.. सारखे दूर.. अन क्षितिजावरती सदा जलाचा पूर..
|
झाड , स्वाती ... एवढी छान चर्चा करून कविता समजावून दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार . माझ्यामते अवतरणचिन्ह देऊन व्याप्ती मर्यादित करू नये हे खरं असलं तरीही जर कवीला ह्यात दोन अर्थ अभिप्रेत आहेत हे अधोरेखित करायचंच असेल तर काय हरकत आहे ? आपल्याला एवीतेवी माहीत आहेच की दोन अर्थ आहेत पण ज्यांना माहीत नाही किंवा लक्षात आलेलं नाही त्यांना हे जास्त सुलभ ठरत असेल तर काय हरकत आहे ? शेवटी तो प्रश्न कवीचा आहे असे वाटते . झाडा .. का " जळ " चा श्लेष मात्र आधी बोलल्याप्रमाणे विशेष पटला नाही . म्हणजे कार्यकारणभाव आणि परिणाम म्हणजेच उचकी आणि अनामिकाच्या नेत्री का जळ असे सुसंगत वाटते पण इथे काजळ अनाठायी आणि अस्पष्ट वाटले खरे . पूर्ण कविता सुचताना काजळ हा ही असाच निर्मिला गेलेला संकेत असं योग्य असलं तरीही ज्या पध्दतीने कविता सांगणं स्वीकारलेलं आहेस त्या flow मध्ये परिणाम म्हणून अनामिकाच्या नेत्री काजळ हे बसत नाही असं माझं मत . ताजमहालाला विटा लावून झाल्या .. आता पुरे ह्या कवितेने मलाही खूपच आनंद दिला हे सांगणे न लगे
|
Bee
| |
| Friday, September 07, 2007 - 1:56 am: |
|
|
वैशाली, कमीतकमी शब्दात इतकी सुंदर कविता...
|
Mankya
| |
| Friday, September 07, 2007 - 3:52 am: |
|
|
सुमतीताई ... वलयात गूढ .. हे आवडलं ! Vaisanty... क्लाSSSस ! खूप कमी शब्दात गहिरा अर्थ ! वैभवा, बैरागी .. मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद अन प्रतिसादाबद्दलही ! झाड ... तुझे आभार मानले पाहिजेत, तुझ्या ' बळा ' वर खूप दिवसांनी discussion झाले कवितेवर, निरनिराळ्या पैलूंवर ! स्वाती, वैभवा .. खूप छान माहिती दिलीत ! माणिक !
|
Bairagee
| |
| Friday, September 07, 2007 - 4:00 am: |
|
|
कवितेत अवतरण चिन्हेच नव्हे तर इतर विरामचिन्हेदेखील वापरू नयेत, असे काही जणांचे म्हणणे आहे. मर्ढेकरांनी तर अशा चिन्हांना अजिबात टाळले आहे. त्याचे कारण वर स्वाती ह्यांनी दिलेल्या उत्तरात आहे. कारण कवितेच्या व्याप्तीवर, अर्थाच्या शक्यतांवर त्यामुळे मर्यादा येतात, असे अनेकांना वाटते. जिथे केवळ एक आणि एकच अर्थ कवीला पोचवायचा आहे तिथे नेमके विरामचचिन्ह देणे वाईट नाही असे मला वाटते. विशेषत: अल्पविराम, स्वल्पविराम वाचण्याचा आनंद वाढवू शकतात. वाचताना कुठे थांबा घ्यायचे हे वाचकाला कळते. पण एकंदर विरामचिन्हांनी कवितेला फारसे कसू नये. अवतरण चिन्हांचा केवळ श्लेष कळावा म्हणून झाड ह्यांनी वापर केला आहे. असा हुशार वापर टाळावा असे मला वाटते. मर्मज्ञ वाचकाला कळायचे ते कळतेच.
|
झाड तू दिलेल स्पष्टीकरण सुंदर आहे, ते कवितेतुन तसच्या तस प्रतित होत की नही हे मी पाडताळुन पाहील नाही. तसा मी कवितेच्या बाबतित मुढज्ञानी आहे त्यामुळे क्षमा असावी. पण तु मंडलेले मुद्दे हे फारच छान आहेत, ते जर मला कविता वाचताना कळाले असते तर आहा काय मजा आलि असती. तरीही कवी कडुन कवेता समजवुन घेण्याची मजाच काही आगळी असते. पण एक खर की तू म्हंटल्या प्रमाणे दुर्लक्ष करुन जर जांभई दिली असती (प्रतिक्रीया दिली नसती) तर ह्या आनंदालाही पारखा झालो असतो झक्कास...
|
|
|