|
Princess
| |
| Monday, September 03, 2007 - 6:56 am: |
| 
|
एक प्रवास चुकलेला... उन्ह उतरायला लागलीत तसा सगळ्या मजुरांचा कामाचा वेग कमी होत होता. थकुन मल्ली आणि बरखा तिथेच वाळुच्या एका ढिगाऱ्यावर बसली. त्यांना तसे बसलेले पाहुन दरियासिंग धावतच आला "छोरी, काम नही करेगी तो आज का पैसा काट लुंगा. उठ बरखा और भाग यहांसे." बरखा झटकन उठली आणि धावतच वाळुची टोपली उचलुन कामाच्या दिशेने धावली. मल्लीही उठुन जाणार तर दरियाने तिचा हात पकडुन तिला थांबवले "तुझे बैठना है तो बैठ थोडी देर. तबियत ठीक नही है का?" त्याच्या प्रश्नाच्या उत्तर न देता तिने फक्त हात झटकला आणि पायाशी पडलेली चुंबळ उचलुन ती चालायला लागली. "का कह रहा था वो राक्षस तुम्हे?" मल्लीच्या तोंडातुन आई बहिणीच्या शिव्या ऐकुन रामलालने तिला विचारले. "कुछ नाही. वही बात, हमेसा की. हरामी एक बार भी छुनेका चानस नही छोडता." उत्तर प्रदेशातल्या रामपुर जवळच्या चोटीगंज गावातली मालविका. पण मालविका नाव तिला सुद्धा लक्षात नसेल आता. सगळेच मल्ली म्हणायचे त्यामुळे तेच तिचे खरे नाव झाले होते आता. घरच्या गरीबीमुळे सगळे कुटुंबच हातावर पोट भरणारे. तिच्या २ बहिणी २ भाऊ आई वडिल सगळेच मजुर. बरखा तिची मोठी बहिण. घरातले इतर सदस्य पण असेच कुठेतरी मजुरी करायचे. मग रामपुरहुन चालतच सगळे सोबत घरी जात. भल्या पहाटे पुन्हा पोटाची खळगी भरण्यासाठी रामपुरच्या रस्त्याला लागायचे. देवाने गरीबाच्या घरात काय विचार करुन मल्लीसारखे रत्न जन्माला घातले होते कुणास ठाऊक. उन्हातान्हात काम करुन तांबुस झालेला गोरा रंग, टपोरे तपकिरी डोळे, लांबसडक दाट केस. मल्ली एखाद्या कोरीव शिल्पा सारखी दिसायची. दरियासिंग साईतवरचा ठेकेदार होता. त्याची नजर अशा सौंदर्यखणीवर न पडती तरच नवल. कुठल्या ना कुठल्या बहाण्याने तो तिला सतत नजरे समोर ठेवायचा. कामात पण सुट देण्याचा प्रयत्न करायचा. पण मल्लीने त्याला भीक नाही घातली. आणि जीव ओवाळुन बसली साईटवरच्याच एका मजुरावर. तो नशीबवान होता - रामलाल.
|
Princess
| |
| Monday, September 03, 2007 - 7:33 am: |
| 
|
"सुना हुं, तु उस रामलाल की जोरु बननेवाली है" दरियासिंग लाळ टपकणाऱ्या कुत्र्यासारखा मल्लीच्या मागे फिरत होता. "तुमसे मतलब?" मल्लीने हातातली टोपली पुढच्या मजुराकडे फेकत विचारले. "हमसे मतलब नाही तो और किससे? जिंदगीभर रेती मे ही रहना है का? उसको छोड. मेरी जोरु बन जा." त्याच्याकडे न पाहताच मल्लीने उत्तर दिले "और हमने ना कह दिया तो का कर लेगा?" "जबरदस्ती करेगा. दरिया को ना बोलेगी तो बहोत पछतायेगी. याद रख." शेपटीवर पाय ठेवलेल्या सापासारखा फुत्कार टाकत दरिया पाय आपटत तिथुन निघुन गेला. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत बरखाला तिने झालेला सगळा प्रकार सांगितला. वरकरणी दाखवत नसली तरी आतुन ती खुप घाबरली होती. "मल्ली, वो राक्षस तुम्हे छोडेगा नही. तू कुछ भी कर और जल्दी से रामलालसे सादी कर ले " बरखाने असे सांगताच तिने मनात एक विचार पक्का केला. संध्याकाळी रामलालला दरियाने दिलेली धमकी सांगितली. "रामलाल, हम आजही सादी कर लेते है. वो मुआ नही तो मेरी जान ले लेगा." "सादी करने से का वो छोड देगा तुम्हे?" "वो नाही पता... पर मरुंगी तो तुम्हारी जोरु बनके मरुंगी." मल्लीच्या डोळ्यात पाणी दाटुन आले. रामलालला रात्रभर झोप आली नाही. लग्न केले तरी दरिया मल्लीला सोडुन देईल अशी आशा करणे व्यर्थ आहे हे त्याला कळत होते पण या समस्येवर तोडगा काय, हे काहीही करुन त्याला सुचत नव्हते. पहाटे पहाटे त्याच्या मनात एक विचार चमकला आणि पटकन उठुन त्याने तांदळाचा डब्बा उघडुन चाचपडुन पाहिला. "एक दो, तीन ... एक हजार है. बस्स हो जायेगा" असा विचार करुन तो तडक मल्लीच्या घराकडे चालायला लागला. मल्लीचा बाप चहा पित चावडीवर बसलेला होता. "जय राम जी की, इतना सबेरे क्या कर रहा हो ?" चहाचा भुर्र भुर्र आवाज करत त्याने विचारले. "मुझे मल्लीसे सादी करनी है. दरिया करने नाही देगा. मै मल्ली को रामपुरसे दुर लेके जाता हुं." रामलालने श्वासाचेही अंतर न घेता सगळे एका दमात सांगितले. आता मल्लीचा बाप काय काय सुनवेल, या विचाराने त्याचा भेजा भुगा व्हायला लागला. मात्र बिना दहेजची आपली मुलगी खपतेय हे पाहुन मल्लीच्या बापाचा आनंद गगनात मावेनासा झाला. तीन तीन पोरींच्या लग्नाची चिंता वजा होऊन आता फक्त दोघीनाच खपवावे लागेल, या विचाराने त्याने काहीएक विचार न करता रामलालला होकार दिला. "मल्ली की माई, जरा चाय दे ना बाहर. मेहमान आया है." "चाय नाही, मल्ली को बुलाऒ." रामलालला सकाळ होण्याच्या आतच चोटीगंज पासुन , रामपुरपासुन दुर निघुन जायचे होते. मल्लीला घेऊन त्याने तडक रेल्वे स्टेशन गाठले. स्टेशन मास्टरला चौकशी करुन हव्या असलेल्या ट्रेन मध्ये ते दोघेही जाऊन बसले. छत्तीस तासानंतर रामलाल आणि मल्ली येऊन पोहचले अशा एका शहरात जिथे सगळ्याना प्रवेश आहे युपी वाले, बिहारी, नेपाळी, पाकिस्तानी, गर्दुले, हिजडे, वेश्या... सगळ्यांचे स्वागत आहे "आमच्या मुंबईत".
|
Manjud
| |
| Monday, September 03, 2007 - 9:38 am: |
| 
|
पूनमवा का लिखत हो!!! बहुत अच्छा. चालू रख, चालू रख
|
Gobu
| |
| Monday, September 03, 2007 - 10:02 am: |
| 
|
बहोत खुब! चान्गली ग्रिप पकडली आहेस, कथाही वेगळी आहे पण डॉयलॉग्स कडे थोडे जास्त लक्ष दे.
|
Mandard
| |
| Monday, September 03, 2007 - 2:22 pm: |
| 
|
मुम्बई सोडुन भारतात इतर शहरात काय बाहेरच्यांना प्रवेश बंदी आहे का. :-)
|
Princess
| |
| Monday, September 03, 2007 - 3:04 pm: |
| 
|
दादर स्टेशनवर रामलालचा हात आपल्या हातात घट्ट पकडुन मल्ली फलाटावरच्या गर्दीकडे पहातच राहिली. "ये कहाँ लेके आये हमका? यहाँ तो सौ दरियासिंग मिल जायेंगे." धास्तावलेल्या सुरात मल्लीने रामलालला विचारले. "घबराऒ नाही. ये बंबई है बंबई. यहाँ तुझे देखने के लिये किसीके भी पास टाईम नही है. सब बस भाग रहे है." "तुमको कौनु बताया?" "हमने एक फिलम देखी थी. उसमे बताया था. फिर वो हमारी साईट पर लालु था ना उसका जिजा यहीं पे काम करता है. लालु भी बताया हमको. बंबई मे सब लोग के लिये जगह है. अपने जैसा गरीब लोग भी है. फिलम वाला भी इधर ही रहता है. अब चल जल्दी. यहां रहना है तो भागना पडेगा समझी?" होकारार्थी मान हलवत मल्ली रामलालच्या पावला बरोबर पाऊल टाकु लागली. स्टेशनच्या बाहेर पडताच पोटातल्या कावळ्यानी भुकेची जाणीव करुन दिली. "चाय पियेगी?" रामलालने मल्लीला चहाची टपरी दिसताच विचारले. ती होच म्हणेल हे गृहित धरुन दोन चहाची ऑर्डर पण दिली. चहा पितानाच त्याचे लक्ष चहावाल्याच्या गळ्याकडे गेले. त्याच्या गळ्यात चाकुच्या आकाराचे छोटेसे लॉकेट बघुन तो मनोमन हसला. चहाचे पैसे देता देता त्याने विचारले "रामपुर के हो का?" "हाँ. चाकुसे पहचाना का?" रामलाल फक्त हसला. तसा चहावाला त्याला म्हणाला "नया हो बंबईमे?" "हाँ. अभी आया हुँ. काम मिलेगा का?" "कैसा काम आवत है?" "हम रेती का काम करता था. यहाँ पे मिलेगा का?" "हाँ. नयी बंबईमे जाओ. बहोत मिलेगा. मै एक नंबर देता हुं तुमको. राजु नाम है. अपना रामपुरवालाही है. कंस्ट्रक्शन पे ठेकेदार का काम करता है. थोडा मदद मिलेगा." एका कागदावर नंबर लिहुन देत त्याने रामलाल कडे पाहिले. "कुछ और मदद चाहिए होगा तो इधर आओ. मै सुबह शाम इधर ही रहता हुँ. चहावाल्याशी अजुन रामपुरबद्दल गप्पा झाल्यावर रामलाल नवी मुंबईला जाण्यासाठी निघाला. राजुने रामलालला दुसऱ्या दिवसापासुन लगेच कामावर बोलवले. राहण्याचा प्रश्नही तोच सोडवणार होता. आजची रात्र मात्र त्या दोघाना फुटपाथवरच घालवावी लागणार होती. मल्ली एका क्षणी रामलाल वर खुप खुश होती तर दुसऱ्या क्षणी तिला आई वडिलांची आठवण येत होती. जुईनगरच्या फलाटावर बसुन दोघेही विचारात हरवुन गेले होते. "रामलाल, हमका वापस जाना है. नाही रहना हमका." मल्ली त्याला गदागदा हलवत म्हणाली. "पागल हो का? इतना अच्छा काम मिल रहा है. रहने का भी राजु देनेवाला है. अब क्यों रोती है? दो चार महिना बाद जाई के माँ बाप से मिलके आओ." रामलाल उद्याची स्वप्न पाहत आणि मल्ली कालच्या आठवणी काढत एका बाकाला टेकुन गाढ झोपुन गेलेत.
|
Princess
| |
| Monday, September 03, 2007 - 3:07 pm: |
| 
|
मल्लीने कामावर जाऊ नये अशीच रामलालची इच्छा होती. पण "दोघेही मेहनत करुया आणि सुखाने संसार करु" असे मल्लीनेच सांगितल्यावर त्या दोघानी कामावर जाणे सुरु केले. रामलाल कष्ट करण्याचा चंगच बांधुन मुंबईत आला होता. बांधकामावर सुट्टी असली की तो दादरला चहावाल्या रंजनला मदत करायला जायचा. कपबश्या विसळणे, रंजन जेवायला गेल्यावर गिऱ्हाईक बघणे, टपरी साफ करणे अगदी सगळे काम करायचा. पैसा कमवणे आणि जमवणे हेच एक ध्येय झाले होते त्याचे. त्याच्या मधाळ स्वभावाने त्याने खुप मित्रही मिळवले होते. सकाळी दुध वाटायला जाणे, नंतर रेतीकाम आणि रात्री न्युजपेपरचे पाने लावायला पेपर वाल्याकडे. त्याचे कष्ट बघुन मल्ली कासावीस व्हायची पण पुढच्या पिढीला रेतीकामात जन्म घालावा लागु नये हीच दोघांची इच्छा होती. मल्लीने आता रेतीकाम बंद केले होते. चपात्या करुन देणे, लहान मुलाना शाळेत सोडणे असे काम करुन तीही संसाराला हातभार लावत होती. एरवी बांधकाम मजुरांच्या घरात दिसणारे दृष्य मात्र मल्लीच्या घरात कधीच दिसले नाही. रामलाल पिउन आला तरी मल्लीच्या अंगावर कधी हात टाकायचा नाही. गुमान पडुन राहायचा. तिची टापटीप राहणी, स्वच्छ काम, स्वयंपाक घरातला उरक पाहुन तारकरानी तिला पुर्ण वेळ कामासाठी ठेउन घेतले. हातात पैसाही बरा येउ लागला आणि कामाची दगदगही कमी झाली. दिवसामागुन दिवस गेलेत. मल्ली आणि रामलालने एका रुमचेच असलेल घर टीव्ही, फ्रीज, पलंग घेउन छान सजवुन टाकले. तारकरांकडे दिवसभर काम करुन संध्याकाळी दोन घराच्या चपात्या बनवुन मल्ली घरी येउन नवऱ्याला गरम गरम भाकरी करुन घालत असे. तारकर पती पत्नी दोघेही नौकरी करत. तारकराना दोन मुली आणि एक मुलगा. विश्वासाने मल्लीवर घर आणि मुले सोपवुन पति पत्नी निश्चिंतपणे घराबाहेर पडत. मल्लीही मुलाना शाळेत सोडणे, आणणे, खाऊ घालणे सगळे काही अगदी मन लावुन करत असे. घरातल्या किमती वस्तुना कधी चुकुनही मल्लीने स्पर्श केला ना्ही. मनात कधी कुठल्या वस्तुची वासना दाटुन आलीच तर देवाला मनोमन प्रार्थना करत असे "देवा, हे असेच मलाही लाभु दे." गरीबीत सुद्धा तिची आणि रामलालची नियत शाबुत राहिली होती.
|
Aashu29
| |
| Tuesday, September 04, 2007 - 1:37 pm: |
| 
|
छान चाल्लय ग बयो!! मी पण वाचतेय!!
|
Princess
| |
| Tuesday, September 04, 2007 - 3:09 pm: |
| 
|
नववा महिना लागला तशी मल्ली अजुनच उजळली. तिचे वाढते सौंदर्य बघुन तारकर बाईना वाटायचे हिला नक्कीच कुणाची नजर लागेल. पुर्वी त्यांच्या घरातले उरले सुरले मल्ली घरी घेउन जात असे पण आता तारकरानी तिला त्यांच्या घरीच जेवण करायला सांगितले. मल्ली कष्टातही दु:ख करायची नाही. जे आहे त्यात समाधानी राहायची. गरोदरपणात तिचे समाधान चेहऱ्यावर आनंद बनुन झळकत होते. सकाळीच रामलाल २ किलो बर्फी घेउन आला आणि जो भेटेल त्याला सांगत सुटला "मै चाँद जैसी बेटी का बाप बन गया हुँ." मल्लीची मुलगी जणु तिचे प्रतिरुप घेउन आली होती. रामलालने पोरीला नाव दिले "चंदा". खरच किती समर्पक नाव होते ते. शुक्लातला चंद्र जसा प्रत्येक दिवशी नवे रुप लेउन येतो तशीच चंदाही मोठी होताना रुपवतीचा नवाच अविष्कार होत होती. चंदाची हौस मौज, कपडालत्ता, शाळा सगळे काही तारकरांच्या जीवावर होत होते. जुनी पुस्तके, जुने कपडे आणि त्यांच्या घरातले नको असलेले सगळे काही मल्लीच्या घरात येउन पडत असे. मल्लीला चंदाने खुप शिकावे आणि तारकर बाईसारखे ऑफिसमध्ये जावे असे वाटायचे. पोरीला कुठेही कामाला न धाडता तिने शाळेत घातले होते ते यासाठीच. रामलालची आणि तिची सगळी स्वप्न आता चंदाच्या रुपाने मोठी होत होती. सुट्टी असली की तारकराच्या घरी चंदा घरकामाला जायची. खरे तर कामापेक्षा तिला त्यांच्या घरातला मोठा टीव्ही, मोठा फ्रीज, छान खेळणी याचेच जास्त अप्रुप वाटायचे. "चंदा की माँ, बाहर आओ, जल्दी ...जल्दी देखो रामलाल को क्या हो गया" मल्लीची शेजारीण नीलाम्मा तारकरांच्या घरी ओरडतच आली. रामलालला पाहुन मल्लीची शुद्धच हरपली. आजुबाजुच्या लोकानीच त्याला सरकारी दवाखान्यात नेले. रामलालचा एक पाय कायमचा निकामी झाला होता. "क्यों रोवत हो, मल्ली? मरा नाही हुँ मै." रामलाल पडल्या पडल्या मल्लीला समजावत होता. "मत रो अम्मा" रडता रडता छोटीशी चंदा तिच्या आईला सांगत होती. रामलालच्या अपघाताने जणु मल्लीच्या अंगातले बळच गेले होते. तिचे सौंदर्य पार लोपले. चेहऱ्यावर होत्या फक्त भग्न स्वप्नांच्या खुणा आणि भविष्याची चिंता.
|
Princess
| |
| Tuesday, September 04, 2007 - 3:50 pm: |
| 
|
घरातला कर्ता पुरुष असा बिछान्याला खिळल्यावर मल्लीला खंबीर होणे भागच होते. चंदाच्या वाट्याला असे हातावर पोट धरण्याची वेळ येऊ नये हेच स्वप्न आता तिच्या कष्टाला बळ देत होते. "चंदा, अच्छा पेपर लिखना." तारकरानी आशिर्वाद आणि साखर देत चंदाच्या पाठीवर हात फिरवला. साखरेची वाटी देवापुढे ठेवताना त्यांच्या मनात आले "गरिबाची किती परिक्षा घेशील रे बाबा" चंदानेही अभ्यासात कधी कसर केली नाही. दहावीला पासष्ट टक्के मिळवुन तिने सर्व शाळेची शाबासकी मिळवली. शाळेतल्याच कुंटे सरांनी तिला अकरावी, बारावीच्या शिक्षणासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. कॉलेजने चंदाला एका नव्याच विश्वात आणुन सोडले. गेल्या कित्येक वर्षात तिला न कळलेले एक गुपित हळुच तिच्या वयाने उघडले. टक लावुन पाहणारी वर्गातली मुल. येताजाता ऐकु येणाऱ्या शिट्ट्या, तिचे वर्णन करणारी गाणी. हे सगळे काही नवे होते आणि खुप हवेहवेसे पण. चंदाला तिच्या रुपाची जाणीव तर झालीच आणि थोडा गर्व सुद्धा. माधुरी दीक्षीत चंदाच्या खांद्यावर हात ठेवुन उभी होती. चंदा स्टेजवर उभी राहुन हात हलवत सगळ्यांचे अभिवादन स्वीकारत होती. टाळ्यांचा कडकडाट झाला आणि मल्लीने ग्लासभर पाणी चंदाच्या डोळ्यावर ओतले. "क्या बडबड करती हो नींदमे. चल उठ के नहाने का पानी लेके आ." चंदाच्या सुंदर स्वप्नाचा रोज सकाळी असाच अंत व्हायचा. "माँ, एक दिन तो मुझे पूरा सपना देखने दे." वैतागुन चंदा म्हणाली. पण दहा हातानी कामाला लागलेल्या मल्लीपर्यंत तिची विनंती पोहचलीच नाही. "क्या कर रही हो, कितना देर आईना देखोगी?" मल्लीने कावलेल्या सुरात चंदाला विचारले. "कॉलेज मे छुट्टी है का?" "नाही तो. बस जा ही रही हुँ." बोलता बोलता हातातल्या पिशवीत दोन वह्या सरकवुन चंदा बाहेर पडली. चंदाला आजकाल हा नवाच शौक जडला होता. तासंतास आरशा समोर स्वत:लाच न्याहाळत बसायची. मल्लीला तिची चिंता वाटायची. रामलाल जवळ बसत तिने मनातली खळबळ बोलुन दाखवली. "छोरी के लक्षण ठीक नाही लागत. किसी के जाल मे... " तिचे वाक्यही पुर्ण न होऊ देता रामलाल म्हणाला. "१७ साल की हो गयी है छोरी. तु मेरे साथ १६ साल की उमर मे भाग आयी थी." आणि हसुन तिच्या चेहऱ्यावरच्या आठ्याकडे पाहत म्हणाला "चिंता ना कर. समझदार है वो"
|
Prajaktad
| |
| Tuesday, September 04, 2007 - 7:38 pm: |
| 
|
सुपर फ़ास्ट वेगाने कथा पुर्ण होतेय...भाषेचा बाज उत्तम पकडलाय..
|
Daad
| |
| Tuesday, September 04, 2007 - 11:12 pm: |
| 
|
प्राजक्ताला मोदक. प्रिन्सेस, जम के चल रही है! और आने दो!
|
Princess
| |
| Wednesday, September 05, 2007 - 7:09 am: |
| 
|
वर्गात सर काय शिकवताय तिकडे तिचे मुळीच लक्ष नव्हते. वहीतल्या पानापानावर नाव कोरणे चालुच होते. "राहुल". चंदाला कळतच नव्हते तिला काय झालय. त्या वही मध्ये लिहिलेल्या प्रत्येक नावात तिला राहुलचा चेहरा दिसला तशी ती मनाशीच हसली. "राहुल" चंदाच्या प्रत्येक क्षणावर त्याचाच हक्क होता आता. "राहुल" म्हणजे "राहुल तारकर" चंदाच्या प्रेमाचा त्याला पत्ताच नव्हता. पण चंदाला मात्र सारखे वाटायचे की तो तिच्याकडे चोरुन चोरुन पाहतोय. तारकरांच्या लेकी लग्न होऊन मुंबैतच दोन टोकाला राहायला गेल्यात. दिवाळीला आल्यात तसे मल्लीचे कामही वाढले. घरातली सफाई, दिवाळीचा फराळ, जावयांचा पाहुणचार सगळे करण्यात मल्ली मागे रहिली नाही. तिच्या कष्टांची जाणीव तारकराना होतीच. बाई जावयाला म्हणाल्यात "हिच्यामुळे माझी नौकरी झाली, पोरे मोठी पण हिनेच केलीत माझी." आपल्या कष्टाला कौतुकाची झालर लागलेली बघुन मल्लीच्या डोळ्यात अश्रु आलेत. जावई बापुनी एक पुडके मल्लीच्या पुढ्यात धरले तसे ती म्हणाली, "नाही नाही. हमे कुछ नाही चाहिए. हमारी चंदा को नौकरी लगा दो बस." "नौकरी भी देंगे. अभी ये दीपावली का भेंट है. ये ले लो." नाही हो करत मल्लीने ते पुडके हातात घेतले आणि घरी गेली. "इ देखो, कितनी सुंदर साडी है." रामलालच्या चेहऱ्यापुढे हातातल्या साडीचा पदर उघडत ती म्हणाली. साडी पाहुन तर चंदाने "मीच नेसेल" असा हट्ट धरला. दुसऱ्याच दिवशी ती साडी नेसुन तारकरांच्या घरी गेली. राहुल दारातच भेटला, "चंदा, आज एकदम फुल टू हाँ" तशी ती एकदम लाजली आणि म्हणाली, "सच?" "और क्या. एकदम ऐश्वर्या लग रही है." "वो जाने दे, तू वोह फिल्म का कुछ काम करता है ना, मुझे भी एक रोल दे ना." "तुझे???? क्या कुछ भी..." तोंडातुन येणारे हसु कसेबसे दाबत तो घराबाहेर पडला.
|
Princess
| |
| Wednesday, September 05, 2007 - 1:13 pm: |
| 
|
दिवसा मागुन दिवस गेलेत. चंदाचे वेडे प्रेम वाढतच गेले. दिवस रात्र राहुलची स्वप्न बघायचीत. आणि आता तर एक नवीनच भुत डोक्यात शिरले होते..."हीरोईन बनायचे". पण ते पुर्ण कसे करायचे हे मात्र तिला कळत नव्हते. तिच्या एका मैत्रिणीने तिला एक मार्ग सुचवला त्याप्रमाणे रोज २/ ३ तास ती "संक्रमण" स्टुडिओच्या बाहेर उभी राहायची. कोणीतरी डायरेक्टर पाहिल आणि मला एक तरी छोटासा रोल देईल हीच एक छोटीशी आशा मनात घेउन चंदा पाय दुखे पर्यंत तिष्ठत राहायची. मल्ली आणि रामलालला मात्र याचा मुळीच थांगपत्ता नव्हता. रामलाल अपंग आणि मल्ली बिचारी एकच स्वप्न पुर्ण करण्यासाठी कष्टाचा गाडा ओढत होती. चंदाला त्यांच्या कष्टाची जाणीव नव्हती असे नाही. तिलाही तेच तर बदलायचे होते... पण हळुहळु नाही... झटपट. मल्ली जिथे जिथे काम करायची त्या सर्वांच्या घरातल्या वस्तुनी चंदाला नेहमी मोहित केले होते. तसेच संपन्न घर तिला हवे होते. मोठे घर, पैसाच पैसा, हवे ते घेण्याची ऐपत सगळे काही मिळवायचे होते चंदाला. आकाशीच्या चंद्रालाच हात लावायला निघाली होती ती. पंखात बळ नसताना घरट्यातल्या पिल्लाला जणु आकाश खुणावत होते. २/३ महिने असेच गेल्यानंतर मात्र चंदालाही तिथे उभे राहण्याचा कंटाळा आला. पण डोक्यातले भुत मात्र अजुनही बाहेर पडले नव्हते. डान्स बार मधल्या एका मुलीला हिंदी पिक्चर मध्ये एक आयटम सॉंग करायला मिळाले असे लोकलमधल्या चर्चेतुन तिला समजले. आता चंदाला अजुन एक वाट मिळाली. तो मिणमिणता प्रकाश, नाचणाऱ्या स्त्रिया, त्यांचे ते अश्लील हावभाव, दारु पित बसलेले आणि नजरेतूनही स्त्रीच्या शरीराचे लचके तोडणारे लांडगे ते सगळे बघुन चंदाला क्षणभर त्या वातावरणाची शिसारीच आली पण ... क्षणभरच. काऊंटरवरच्या माणसाकडे मादक नजरेने पाहत ती म्हणाली "काम मिलेगा क्या?" तिच्यासारख्या "माल"ला नाही कोण म्हणेल. तिला आतल्या खोलीत नेउन त्याने कामाच्या वेळा आणि मोबदला समजावला. साडी नेसता नेसता चंदा मल्लीला म्हणाली "माँ, शाम को तीन चार घंटे की नौकरी मिल रही है. तुमको भी थोडी मदद हो जायेगी." "मेरी बच्ची..."मल्लीने तिला छातीशी कवटाळत म्हटले. चंदाची नौकरी सुरु झाली. तिच्यासाठी मात्र ही फक्त एक पायरी होती, तिच्या स्वप्नाच्या मार्गावरची. येणारे जाणारे गिऱ्हाईक फिल्म लाईन मधले तर नाही ना, यासाठी तिची चौकस नजर सतत लोकावर भिरभिरत राही. नौकरी सुरु करुन २ महिने झाले तरी तिला हवे तसे लोक भेटले नाहीतच. पैसा तर मिळत होता पण सगळ्या गरजा पुर्ण होतील एवढा नाही आणि स्वप्नाकडे जाणारा मार्ग अजुनही गवसत नव्हता. चंदाला तर प्रत्येक क्षण जणु वाया जातोय असेच वाटायला लागला. शेवटी तिने डान्सबारमधली नौकरी सोडण्याचा निश्चय केला.
|
Sunidhee
| |
| Wednesday, September 05, 2007 - 5:53 pm: |
| 
|
अरे बापरे!! काय शेवट होणार आहे गोष्टीचा? चांगला असु दे..(ही फक्त माझी इछछा गं..) छान आहे प्रवास. पंखात बळ नसताना घरट्यातल्या पिल्लाला जणु आकाश खुणावत होते. ... खूप आवडले.
|
Tiu
| |
| Wednesday, September 05, 2007 - 6:46 pm: |
| 
|
वाह...खुप छान चालली आहे कथा...लवकर पुढचा भाग येउ द्या!
|
Chetnaa
| |
| Thursday, September 06, 2007 - 3:48 am: |
| 
|
प्रिंसेस... उत्सुकता प्रचंड वाढतेय... लवकर पूर्ण कर ज बाई...
|
Sneha21
| |
| Thursday, September 06, 2007 - 6:22 am: |
| 
|
princess कथेचा वेग चान्गला आहे आनि तुमचि शैली पन..
|
Princess
| |
| Thursday, September 06, 2007 - 7:30 am: |
| 
|
"चंदा, तुम्हे हीरोईन बनना है ना?" राहुल विचारत होता. "हाँ" चंदा खुष होऊन बोलली. "तो फिर आज शाम को मेरे साथ चल. तुम्हे एक आदमीसे मिलवाता हुँ." चंदाच्या स्वत:च्या कानावर मुळीच विश्वास बसत नव्हता. आपल्या ध्येयाची वाट ही अशी अनपेक्षितपणे आपल्याच पावलाकडे चालुन येईल हे ति्ला खरेच वाटत नव्हते. मनातुन खुप घाबरलेली चंदा त्या आलिशान ऑफिसमधल्या दमदार एसीने अजुनच गार पडली होती. "क्या बोलने का, अंदर जा के?" तिने राहुल कडे पाहत विचारले. "मै बोलुँगा. तु बस सुन." ती मनावरचे ओझे उतरल्यागत हसली. राहुल आधी आत गेला. बाहेर चंदाला एक एक क्षण जणु एक एक युगा सारखा मोठा वाटत होता. "रैना साब, लडकी ले के आया हुँ. हीरोईन बनना है उसको." राहुलने डोळे मिचकावत सांगितले डोळ्यावरचा सोनेरी काड्यांचा चष्मा त्याच्या गुळगुळीत टकलावर घेत रैना उठला. काचेवरचा पडदा दुर सारत त्याने बाहेर बसलेल्या चंदावर एक नजर टाकली. त्याचे हिरवे डोळे अजुनच हिरवट झालेत. ओठावर जीभ फिरवत खुष होऊन तो म्हणाला "मुझे उसे ठीक से देखना पडेगा. आज रात को "होटल रत्ना" मे लेके आओ." "फिर मेरा आपके साथ काम पक्का ना?" "हाँ हाँ बिलकुल. मेरे नेक्स्ट प्रोजेक्ट का सेट डिझाईन का काम तुम्हारा." राहुल आपले स्ट्रगलरचे आयुष्य संपल्याचा आनंद लपवत बाहेर आला आणि चंदाला म्हणाला "आज रात को मिलेगी क्या उससे?" "मतलब? उसके साथ..." "हाँ, मतलब साफ है. पर उसके बाद वो तुझे हीरोईन बना देगा. एकदम फ़ुलटू." चंदा तिथेच थिजल्यासारखी उभी राहिली. डोळ्यातून येणारे पाणीही पुसायचे तिला भान राहिले नाही. घरी पोहचल्यावरही डोक्यातला गोंधळ कमी झालेला नव्हता. एका बाजुला बख्खळ पैसा आणि स्वप्न पुर्ती तर दुसऱ्या बाजुला तेच रोजचे नीरस रटाळ आयुष्य. एका बाजुला चारित्र्य भंग तर दुसऱ्या बाजुला शील टिकवुन ठेवण्याची धमक. किती वेळ मनामनाचे द्वंद्व चालले कुणास ठाऊक पण मग अंधार पडला तसे काहीतरी ठरवुन चंदा बाहेर पडली. राहुल तिची बस स्टॉपवर वाट बघत उभा होता. मुकाट्याने ती त्याच्या बरोबर हॉटेल रत्ना मध्ये पोहचली. तिला सोडुन राहुल माघारी परतला.
|
Itgirl
| |
| Thursday, September 06, 2007 - 7:35 am: |
| 
|
सुनिधीला अनुमोदक ग राजकन्ये... अशी इच्छा करते की चांगला असू दे शेवट...
|
|
|