|
Aashu29
| |
| Tuesday, September 04, 2007 - 1:28 pm: |
| 
|
आटपाट नगर होतं वाल्या कथा वाचुन जमाना झाला होता, वाचुन खरच बरं वाटलं, नवा प्रयत्न आहे, मुर्ख टिकेकडे पाहु नका, आम्हा रसिकांची तुम्हाला साथ आहे!!
|
Dineshvs
| |
| Tuesday, September 04, 2007 - 1:38 pm: |
| 
|
सगळ्यांचा प्रतिसाद वाचुन खुप छान वाटले. माझ्या प्रयोगाना इथे नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळत आलाय. मूळच्या जिवतीच्या कथेची धाटणी अशीच आहे. ( जिवतीची कथा मुलाबाळांच्या सुखासमाधानासाठी, श्रावणी शुक्रवारी वाचतात. ते व्रत आहे. आजुबाजुच्या लहान मुलाना बोलवुन गुळचणे देतात. ) psg या कहाणीप्रकाराला काहि फ़ॉर्म वैगरे नाही. पण कहाणीत एक नादमाधुर्य असावे. वाक्य छोटी छोटी असावीत. माफक नाट्य असावे, थोडासा बोध असावा, असे काहि संकेत आहेत.
|
Zakki
| |
| Tuesday, September 04, 2007 - 1:49 pm: |
| 
|
मास्तुरे, हीच कथा 'भाबडी व ढोबळ' न करता व 'खूप बेसुमार' विस्तार, शैली व मांडणी करून कशी लिहीता येईल याची झलक दाखवा. म्हणजे बर्याच लोकांना समजेल.
|
Mansmi18
| |
| Tuesday, September 04, 2007 - 1:55 pm: |
| 
|
दिनेश, अतिशय छान कथा. आवडली. आम्ही अजुनही शुक्रवारी जिवतीची कथा वाचतो.(आम्हाला अन्धश्रद्धा सोडवत नाहीत हो) one minor comment format मधे वाक्ये एकाखाली एक लिहिली असतीत आणि १||,||२|| असे लिहिलेले वगळले असते तर वाचायला सोपी गेली असती. काही लोक भाबडी कथा असे म्हणत आहेत. पण खरच जगातले लोक असे भाबडे आणि सरळ मनाचे झाले असते तर किति चांगले झाले असते नाही?
|
Amruta
| |
| Tuesday, September 04, 2007 - 2:50 pm: |
| 
|
छान आहे कथा. श्रावणात एक तरी जिवतीची कथा वाचल्याच समाधान मिळाल.
|
Velachi
| |
| Tuesday, September 04, 2007 - 4:07 pm: |
| 
|
Khoopachखूपच सुन्दर लिहिली आहे तुम्ही कहाणी...मन भरून आल.. अप्रतिम!!!
|
Ajjuka
| |
| Tuesday, September 04, 2007 - 4:48 pm: |
| 
|
दिनेशदा.. मजा आली वाचताना. कुठल्याही पूजांमधे काही interest नसायचा पण या सगळ्या कहाण्या वाचायसाठी मी संबंध पूजाभर शांत बसून असायचे आणि मग कहाणी वाचायला मिळणे असं बक्षीस मिळायचं कधी कधी... ते एकदम आठवलं..
|
Ksmita
| |
| Tuesday, September 04, 2007 - 5:38 pm: |
| 
|
मस्तच !! कित्येक वर्षानी कहाणी वाचायचा योग आला केवळ तुमच्यामुळे, धन्यवाद, छान वाटले लहानपणीचे दिवस आठवले .
|
Manuswini
| |
| Tuesday, September 04, 2007 - 6:15 pm: |
| 
|
झक्की, तुम्हाला अनुमोदन. (काय हे चार शब्द लिहायचेच का?)
|
Prajaktad
| |
| Tuesday, September 04, 2007 - 7:24 pm: |
| 
|
दिनेशदा! वेगळा प्रयोग... भाबडी पण,आवडेल अशि कथा..
|
Sunidhee
| |
| Tuesday, September 04, 2007 - 9:47 pm: |
| 
|
दिनेश.. खूप आवडली.. मनाला भिडली. वेगळ्या प्रकारे लिहिल्याने अजुनच. manasmi जगातले एक कोट्यांश लोक जरी असे भाबडे आणि सरळ मनाचे झाले तरी कोणी अनाथ म्हणुन वाढणार नाही. माझी भाबडी आशा दिनेश अजुन येउ द्या!!
|
Zelam
| |
| Wednesday, September 05, 2007 - 12:58 am: |
| 
|
दिनेशदा आवडली. भाबडी असेल तरी असा positive विचार करायला काय हरकत आहे? कहाणीच्या स्वरूपात लिहिल्याने कथेचा बाजही आवडला.
|
Zakasrao
| |
| Wednesday, September 05, 2007 - 3:56 am: |
| 
|
मुळातच ही कथा तुम्ही ज्या फ़ॉर्म मधे लिहिली आहे तो फ़ॉर्म आवडला. भाबडी म्हणाल तर आपल्या अश्या कथा भाबड्यच असतात ना. पण कुठेतरी जगात चांगल आहे आणि त्यामुळे पुन्य मिळत,चांगल होत, चांगल वागा असा संदेश देणार्या. CBDG तुमचे नवीन प्रयोग मात्र छान चालले आहेत. ह्याआधीची कथा पण मला आवडली होती पण प्रतिक्रिया द्यायचीच राहुन गेली होती.
|
Bhagya
| |
| Wednesday, September 05, 2007 - 3:59 am: |
| 
|
मास्तुरे!!! एका मराठी सिनेमात अशोक सराफ़ने याच नावाने भुताचे काम केलेले आठवतेय का कोणाला? भुतासारखेच उपटता नाही? झक्की काकांना अनुमोदन. आम्ही वाट बघतोय मास्तुरे कधी कथा लिहिताय याची.
|
Swa_26
| |
| Wednesday, September 05, 2007 - 5:48 am: |
| 
|
दिनेशदा... मस्त आहे कथा!! आवडली!! भाबडेपण असले तरी सत्य डोकावतेच आहे त्यातुन!!
|
Jo_s
| |
| Wednesday, September 05, 2007 - 9:29 am: |
| 
|
दिनेश, छानच कथा, सर्वांगानी सुंदर.... पण याला भाबडी म्हणावीशी का वाटते सगळ्याना? एखाद्याच साध सरळ, चांगलं वागणं आता भाबडं ठरावं? आता भोवतालच्या सगळ्याच गोष्टी आणि सगळ्यांचच वागणं इतक वाकडं, स्वार्थी झालं आहे की साध्या, सरळ, नैसर्गीक बाबीही वेगळ्या उठून दिसू लागल्या आहेत. त्या मुळे असेल कदाचीत. लहान मुलांना "खोटे बोलू नये" असे शिकवतात तेव्हा कळतं की अरे, खोटं बोलणंही असतं तर. नाही तर त्यांच्या साठी खर बोलणं ही नैसर्गीक क्रिया आहे.
|
दिनेश, 'कथा वाचून डोळ्यात पाणी केव्हा आले ते कळलेच नाही' हीच माझीसुद्धा प्रतिक्रीया. खूप दिवसान्नी काहीतरी ह्रुदयस्पर्शी वाचायला मिळाले.
|
Vishee
| |
| Wednesday, September 05, 2007 - 1:43 pm: |
| 
|
छान कथा आहे, अगदी मनाला भिडणारी. मांडलेय पण छान. मधेच एकदा वाटलं कि आता ही काय बरं मागते राजा राणी कडे, पण तिनेही रास्तच मागणं मागितलं. राजा राणीनेही तिला दिलेलं वचन पाळलं. नाहीतर जगात चांगल्या माणसांना चांगलीच माणसं भेटतात असं नाही!!.....
|
Dineshvs
| |
| Wednesday, September 05, 2007 - 3:39 pm: |
| 
|
सुधीर, या कथेच्या संदर्भात सर्वप्रथम भाबडा हा शब्द मीच वापरला, त्यामुळे त्याची जबाबदारी माझी. तुझ्या प्रतिक्रियेने परत विचार करायला लावले. जिवतीची जी मूळ कथा आहे. त्यात थोडा क्रुरपणा आहे. एका ब्राम्हणीचे बाळ, नाळ वारेसकट एक राणी पळवते. यात तिला सुईण मदत करते. हे अगदी योजनाबद्ध रितीने केले जाते. यासंबंधी ब्राम्हणीला काहि मोल दिल्याचा उल्लेख नाही. कदाचित असे अत्याचार त्या काळी, राणीसाठी क्षम्य असावेत. ती ब्राम्हणी त्या मुलाला विसरत नाही. त्याचे शुभ चिंतत राहते. ती काहि नेम पाळते. तांदळाचे धूण ओलांडत नाही, कारल्याच्या मांडवाखालुन जात नाही. ( याचे मला समजलेले संदर्भ फारच विचित्र आहेत. ) पुढे तो मुलगा मोठा झाल्यावर, काहि सामाजिक रितींमूळे त्याची आपल्या आईशी भेट होते. राणीच तीची ओळख करुन देते. तो खर्या आईला वाडा बांधुन देतो वैगरे. आता विचार करता माझ्या कथेत, भाबडी म्हणावी अशी एकच घटना, म्हणजे राणीने जगनीच्या त्यागाची ठेवलेली जाणीव. खरे तर तो त्यागही नाही. जगनीने या ना त्या रुपात मोबदला घेतला आहेच. शिवाय सरोगेट मदरबाबत वचलेली बातमी डोक्यात होतीच. भारतात सध्या काय दर दिला जातो वैगरे सगळेच त्यात होते. पण अगदी दुसर्याचे मुल असले तरी, अपत्यजन्म, हि केवळ शारिर पातळीवर राहणारी घटना असते असे मला वाटत नाही. ( याबाबतीत माझा स्वतःचा अनुभव अगदी विरुद्ध असला तरिही, तो अपवाद आहे, असेच माझे मत आहे. ) म्हणुन मी हि कथा अशी लिहिली. माझ्या माणुसकीच्या कल्पनेत राणीचे असेच वागणे बसु शकते. आता तंत्रज्ञान फुढे गेलेय, तरिही गर्भ मानवी स्त्रीच्या शरिराबाहेर वाढवणे अजुनही शक्य झालेले नाही. ( याच संदर्भात माझी काल निर्णय, हि एक जुनी कथा होती ) त्यामुळे मानवी स्त्रीचा सहभाग न टाळता येण्याजोगा. तसे बघायला गेलो, तर या ठिकाणी जन्माला येणार्या मुलाशी, आईचा तसा संबंध नाहीच. ( खुप पुर्वी प्रभाकर पणशीकर, सुधा करमरकर आणि मधु कांबीकर यांचे पुत्रकामेष्टी नावाचे नाटक आले होते. यात त्या आईचा थेट संबंध असतो, आणि म्हणुनच ती मुलावर हक्क सांगते ) म्हणुन मी इथे दोन मुलांची योजना केली आहे. ( तसे रक्ताचे नाते, हि देखील कविकल्पनाच. माता व बालक यांच्यात अजिबात रक्ताची देवाणघेवाण होत नाही. त्यांचे रक्तगट वेगळे असु शकतात. इतकेच नव्हे तर आईचा रक्तगट निगेटिव्ह आणि गर्भाचा पॉझिटिव्ह, असला तर त्यात द्वंद्व देखील होते. ) पण वर उल्लेख केलेली घटना सोडली तर बाकि पात्रांची वर्तणुक, आदर्श असली तरी, ती अपवादात्मक नाही. निदान नसावी अशी अपेक्षा. धर्माने वागणे, यापेक्षा वेगळे असते ? आज इतक्या मानवी पातळीवर जगणे आपल्याला अशक्य आहे का ? असे वागणे आपल्याला भावनिक पातळीवर का हेलावते ? असे घडायला हवे पण घडत नाही, म्हणुनच ना ?
|
Ajjuka
| |
| Wednesday, September 05, 2007 - 4:33 pm: |
| 
|
|तांदळाचे धूण ओलांडत नाही, कारल्याच्या मांडवाखालुन जात नाही. ( याचे मला समजलेले संदर्भ फारच विचित्र आहेत. )| हे संदर्भ मी पण वाचलेत. बर्याच ठिकाणी उल्लेख आहेत या चिन्हांच्या अर्थाचे. पहिल्यांदा कळलं तेव्हा एईएई असं वाटलं होतं पण मग विचार करता लक्षात आलं की खरंतर कसलं brilliant सूचन आहे सगळ्या गोष्टींचं. कळायचं ते कळतं आणि vulgarity कुठेही नाही. आपल्याला वाटते तितकी आपली संस्कृती झाकपाक, सोज्वळ अशी नाहीये. निसर्गाचा आदर करते आपली संस्कृती. सगळ्या लोककथांच्यात अशी विविध प्रतिके येतात. माणसाच्या आदीम प्रेरणांशी नातं जोडणारी. अत्यंत प्रामाणिक, कुठल्याही खोट्या सज्जनतेचं ढोंग न करणारी प्रतिकं. फार interesting आहे ही चिन्हमीमांसा. असो विषयांतराबद्दल क्षमस्व!
|
|
|